• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

इतिहास क्षमा करणार नाही!

- मर्मभेद १५ एप्रिल २०२३

Nitin Phanse by Nitin Phanse
April 13, 2023
in संपादकीय
0

इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पदस्थल त्याचे; आणिक
चढुनि त्यावर भविष्य वाचा…
ज्ञानपीठ विजेते थोर मराठी कवी विंदा करंदीकर यांची ही अजरामर रचना. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांच्या वाचनात आली असण्याची शक्यता कमीच. मुळातच या जमातीचा शिक्षणाशीच कधी फारसा संबंध असल्याचे त्यांच्या धतिंगबाज वर्तनातून आणि निर्णयांतून दिसत नाही. या ओळी त्यांनी वाचल्या असत्या आणि त्यांचा अर्थही त्यांना समजला असता, तरी त्यांच्यावर काही फरक पडला नसता… चोरी करू नये, चोरी हे पाप आहे, हे अट्टल चोराच्या वाचनात आलेले असतेच की; तरी तो चोरी करायचा थांबतो का? त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे हो तो! चोर सुविचार अंमलात आणायला लागला, तर खाईल काय?
चोराला जशी चोरी टाळता येत नाही, तसे भारतीय जनता पक्षाला सोयीने इतिहास उकरणे आणि बदलणे टाळता येत नाही. त्यांचाही पोटापाण्याचा धंदा आहे तो. मुळात काही उभारण्यापेक्षा आहे ते मोडण्याकडे यांचा कल अधिक. जे आहे ते उभारण्यात यांचा वाटा शून्य; त्यामुळे ते मोडून टाकताना किंवा विकून खाताना शरम वाटण्याचा प्रश्न येत नाही. सध्या या पक्षाच्या मोडतोड विभागाने एनसीईआरटी नावाच्या होयबा संस्थेच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड करायला घेतली आहे. आठवी नववीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहासच गायब कर, महात्मा गांधीजींच्या लढ्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचा विषयच गायब कर, गांधीजींचा खुनी नथुराम गोडसे हा कट्टरपंथी मासिकाचा संपादक होता, ही माहितीच काढून टाक, असले थिल्लर उद्योग एनसीईआरटीने केले आहेत. काहीही करून अदानी किंवा खरे तर मोदानी प्रकरणावरून देशाचे लक्ष उडवायचे, हाच यामागचा हेतू दिसतो.
या देशात मुघल आक्रमक म्हणून आले, हे खरेच. पण राजा जयचंद कोण होता? मुघलांना इथे बोलावून घेणारे कोण होते? मुघल इथे आले, पण ते देश लुटून परत गेले नाहीत, ते या देशाचेच झाले. त्यांच्या काळात हा देश जगातल्या सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. मुघलांशी सोयरिकी करणारे कोण होते? मुघलांचे विश्वासू चाकर कोण होते? जहाँगीर आणि औरंगजेब या बादशहांचा जन्म मुघल-रजपूत सोयरिकीतून झाला होता, मग त्यांना मुघल मानायचे की रजपूत? की राहुल गांधींची आई इटालियन असल्याने ते इटालियन पण, यांचे वडील मुघल म्हणजे हे मुघल अशी आपल्या सोयीने रचना करायची? हिंदी सिनेमांमध्ये दाखवल्याप्रमाणे मुघल बादशहा फर्ड्या उर्दू भाषेत बोलत नसत, ते या मातीतली अवधी भाषा बोलत असत. त्यांनी स्थानिक भाषांमध्ये काव्य केले आहे. सम्राट अकबराच्या काळात राम-सीता यांचे नाणे चलनात होते. जवळपास सगळा देश मुघल साम्राज्य आणि आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या ताब्यात असतानाही त्याचे तलवारीच्या बळावर घाऊक पद्धतीने धर्मांतर केले गेले नाही. भारतीय खानपान, राहणीमान, भाषा, कला आणि स्थापत्यात मुघल काळाचे योगदान फार प्रचंड आहे. ते नाकारणे ही विखारी आणि कद्रू मनाच्या राज्यकर्त्यांची आणि त्यांच्यामागे एकवटलेल्या मूर्ख अंधभक्तांची निखळ आत्मवंचना आहे. मुघल काळ भारताच्या इतिहासातून इतिहासजमा करणे हे चिकन मुघलाईचे नाव बदलून चिकन आदित्यानंद करण्याइतके थिल्लर काम नाही.
यावर सत्ताधीशांचे काही भाट तावच्या ताव निबंध लिहून मुघलांच्या इतिहासानेच शालेय अभ्यासक्रम कसा व्यापला होता, अशा लोणकढ्या थापा मारत आहेत. यांच्या नेत्यांप्रमाणे हेही कधी शाळेत गेले नसावेत किंवा यांनी शाळेला बुट्ट्या मारून टगेगिरी करण्यात वेळ घालवला असावा. रामायण महाभारत काळापासून ते मोहेंजोदडो, हडप्पा संस्कृती, शालिवाहन, सातवाहन, देवगिरीचे रामदेवराय या सगळ्यांचा इतिहास सर्वांना शाळेतच शिकवला गेला आहे. एका इयत्तेला पूर्ण वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला गेला आहे. मुघलांनी या दिवाभीतांची रिकामी डोकी व्यापली आहेत, शालेय अभ्यासक्रम व्यापलेला नाही.
आधीच भारतीय शाळा, शिक्षणपद्धती हा जगभरात विनोदाचा विषय झाला आहे. कृत्रिम जातीय उतरंडीतील तथाकथित खालच्या स्तरावरील लोक शिक्षण घेऊन आपल्या बरोबरीला येतील आणि शेकडो वर्षे काही तथाकथित उच्चजातींनी भोगलेल्या ‘मेरिट’ नावाच्या भंपक आरक्षणाला चूड लागेल, हे लक्षात घेऊन शिक्षणाचा जाणीवपूर्वक बट्ट्याबोळ करण्यात येतो आहे. इतिहासाच्या पुस्तकात असे उघड उघड मूर्खपणाचे बदल करून त्या मातेर्‍याला हातभार लावण्यापलीकडे काही होणार नाही.
शिवाय, आजच्या गुगल आणि चॅट जीपीटीच्या काळात आपल्या गैरसोयीचा इतिहास दडवून ठेवणे अशक्य आहे. इथल्या चिरफाळलेल्या, विद्वेषाने भरलेल्या, चिकित्सा नाकारणार्‍या, इतिहासपुरुषांचे अनाठायी दैवतीकरण करणार्‍या अस्मिताबाज वातावरणामुळे आधीच इथली विद्वान मंडळी इंडॉलॉजी अर्थात भारतविद्या शिकण्यासाठी परदेशांत जात आहेत; आता भारताचा इतिहास गंभीरपणे शिकण्याची इच्छा असलेलेही परदेशांत जाऊ लागतील. पाठ्यपुस्तकांमध्ये असले आचरट बदल करून आपण जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अर्हतेचे मोल कमी करत आहोत, भारतीय पदवीची पत आणखी कमी करत आहोत.
मोदी आणि कंपनीला येनकेनप्रकारेण फक्त निवडणुका जिंकण्याचा चस्का लागलेला आहे. देशाचे भले होते की वाईट, याची त्यांना फिकीर नाही; आत्ता मते मिळाल्याशी मतलब. इतिहास अशा अडाण्यांना आणि त्यांच्या नादी लागलेल्या त्यांच्याहून अधिक अडाणी असलेल्या भक्तगणांना क्षमा करत नाही, हे कळण्याइतका तरी इतिहास त्यांनी वाचायला हवा होता…
…एंटायर हिस्टरीची एखादी पदवी असते का?

Previous Post

“सत्यशोधक”च्या मोशन पोस्टरचे अनावरण

Next Post

सर्चलाईट विझला!

Related Posts

संपादकीय

रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

June 8, 2023
संपादकीय

बारसू पाकिस्तानात आहे काय?

May 5, 2023
संपादकीय

आता राष्ट्रीय जनगणना कधी?

April 27, 2023
संपादकीय

पुढे काय होणार?

April 20, 2023
Next Post

सर्चलाईट विझला!

कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.