राज्यातल्या सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या, 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये या निवडणुकीसाठी उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. अनेक ठिकाणी पॅनेल उभे करून उमेदवारांनी प्रचारात रंगत भरली होती.

कोरोनाच्या संकटानंतर प्रथमच राज्यातल्या 34 जिल्ह्यांमधील 14 हजार ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. ग्रामीण भागात अत्यंत प्रतिष्ठsच्या समजल्या जाणाऱया या निवडणुकीसाठी सुमारे साडेतीन लाख अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच व सदस्यपदासाठी लिलाव झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातील उमराणे व नंदुरबार जिल्ह्यातील खोडामळी ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया रद्द केली, तर काही निवडणुकांवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याव्यतिरिक्त उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. कोरोना रुग्णांना सर्व नियमांचे पालन करून संध्याकाळी मतदानाची मुभा दिली आहे. 18 जानेवारी रोजी मतमोजणी होईल.
सौजन्य : सामना