• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

एक (अ)नाथ!

- प्रशांत कदम (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 14, 2024
in कारण राजकारण
0
एक (अ)नाथ!

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. मात्र, प्रचंड बहुमतानंतरही एकनाथ शिंदे ते देवेंद्र फडणवीस हा बदल घडायला बारा दिवस लागले… या बारा दिवसांत जे घडलं ते भाजपने शिंदेंना सोबत घेऊन प्रत्यक्षात त्यांच्या सेनेचे कसे बारा वाजवले आहेत हे दाखवण्यासाठी पुरेसे होते. निवडणुकीपर्यंत, आमच्यात सगळं काही आलबेल आहे, मुख्यमंत्रीपदाचा फारसा प्रश्न नाही, आमचे तीन पक्ष एकत्रित येतील आणि निर्णय घेतील असं सांगितलं जात होतं. पण निकालानंतर ज्या पद्धतीचे आकडे आले, त्यामुळे हे मतभेद लपवणं देखील अवघड होऊन बसलं. शेवटी भाजपने महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री बसवला. १३२ आकडा आल्यानंतर कुठला पक्ष ही संधी सोडेल? एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता केवळ अडीच वर्षांसाठी होती… भाजपने आता त्यांना खांद्यावरून उतरवायला सुरुवात केली आहे… मित्रपक्षांच्या आधारे भाजप त्या त्या राज्यात आपला विस्तार करून घेतो आणि नंतर त्या मित्रपक्षांनाच कसं बाजूला सारतो याची अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, ओडिशामध्ये बिजू जनता दल, हरियाणामध्ये जेजेपी, आसाममध्ये आसाम गण परिषद, तामिळनाडूमध्ये एआयडीएमके अशी बरीच उदाहरणे सांगता येतील. आता त्याच मालिकेमध्ये शिंदेंचा समावेश झालेला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली याचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. पण ती केवळ अडीच वर्षांसाठीची राजकीय अरेंजमेंट होती. कारण त्यांच्या याच कृतीने भाजपला सत्तेत बसवलं. त्यामुळेच आकडा अधिक असूनसुद्धा भाजपने आपला मुख्यमंत्री न करता शिंदेंना तो मान दिला. पण म्हणून भाजप शिंदेंना काही सातत्याने डोक्यावर बसून ठेवणार नव्हतंच.
मागच्या वेळी शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाले ते महाविकास आघाडी सरकार कोसळवण्याचे बक्षीस होते. यावेळी भाजपचा आकडा १००च्या खाली राहावा ही शिंदे यांची मनापासूनची इच्छा असेल. पण तसे काही घडले नाही. दोस्त फेल हो जाये तो बुरा लगता है, लेकिन दोस्त फर्स्ट आ जाये तो ज्यादा बुरा लगता है, हा आमीर खानच्या थ्री इडियट्स चित्रपटातला डायलॉग शिंदे यांच्या मन:स्थितीचे वर्णन करण्यासाठी यथार्थ आहे.
निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या सगळ्या वाटाघाटींमध्ये शिंदेंची नाराजी काही लपून राहिली नाही. अगदी राजभवनावर काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली देहबोली अचानक बदलली होती. इकडे त्यांचे प्रवक्ते मुख्यमंत्रीपदाबद्दलचे दावे बळकट करत असतानाच शिंदे दोन दिवस काही बोलले नाहीत. त्यामुळे खूप चर्चा सुरू झाल्यानंतर, भाजपने दटावल्यामुळेच असेल, पण शिंदेंना एक पत्रकार परिषद घ्यावी लागली. मुख्यमंत्री ठरवण्याबाबत तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो माझ्यासाठी अंतिम असेल माझी त्याबाबत कुठलीही अडचण आहे असं म्हणू नका, असं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कळवल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत तीन पक्षांचे नेते भेटले. या भेटीनंतर मुंबईत महायुतीची एकत्रित बैठक होईल असे सांगितले जात होते. पण त्यानंतरसुद्धा शिंदे आजारपणाचे निमित्त करत अचानक सातार्‍यातल्या त्यांच्या दरे गावात निघून गेले. महायुतीच्या तीन पक्षांची एकत्रित बैठक पार पडणार होती, ती काही शेवटपर्यंत झालीच नाही. त्याआधीच मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर देखील झाले. खरंतर प्रक्रियेनुसार कुठल्याही आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाची निवड होते तेव्हा सर्वात मोठ्या पक्षाच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर त्यावर आघाडीच्या बैठकीत मान्यता घेतली जाते. त्यानंतर एकत्रितपणे मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर होते. पण इथे भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि हा कार्यक्रम संपतो न संपतो तोच मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शपथविधीची निमंत्रणपत्रिका जाहीर देखील करण्यात आली. म्हणजे मुख्यमंत्री आमचा आहे हे भाजपने इतर दोन मित्रपक्षांना न विचारताच ठरवले आणि जाहीर देखील करून टाकले.
शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासोबत गृहमंत्रीपद हवे आहे, पण ते देखील भाजपाकडून मिळेल याची कुठलीही शाश्वती नाहीच. आत्ता या क्षणापर्यंत मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले नसले तरी भाजप हे खातं सोडेल याची कुठलीही लक्षणं दिसत नाहीत.जो मान अजितदादांना मिळतो, तो मान आम्हाला पण मिळायला हवा, अशी जाहीर खंत शिंदे यांच्या गटाला व्यक्त करावी लागली. याचा अर्थ कानामागून आली आणि तिखट झाली या न्यायाने अजित दादा भाजपासाठी अधिक लाडके बनले. मागच्या वेळीही दादा उपमुख्यमंत्री म्हणून २०२३च्या जूनमध्ये दाखल झाले. पण त्यांच्यासाठी फडणवीस यांनी आपल्याकडे असलेले अर्थ खाते सोडले होते. आता शिंदे यांना उपमुख्यमंत्री करताना गृह-अर्थ यापैकी कुठले खाते न देता इतर खात्यांवरच बोळवण का हा शिंदे गटाचा प्रश्न आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे कोणी आमदार गेले ते केवळ आणि केवळ सत्तेच्या लालसेपोटी. या टोळीला सत्ता नसेल तर सांभाळणे किती अवघड याची चुणूक आता शिंदे यांना दिवसेंदिवस जाणवत राहील. शिवाय भाजपसाठी एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाढवणं ही काही प्राथमिकता नाहीय. मूळ शिवसेनेच्या एकूण वाटचालीत स्वाभिमान हा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. शिवसेनेने राजकीय भूमिका बदलल्या असतील, पण स्वाभिमान कधी गहाण टाकलेला नाही. आता एकनाथ शिंदे हे त्यांचा पक्ष मोदी-शहांच्या चरणात वाहून टाकल्याप्रमाणे वागत आहेत. तुम्ही सांगाल तो मुख्यमंत्री, तुम्ही द्याल ते पद, असं करत करत एकप्रकारे भाजपच जणू आता या शिंदेसेनेचा मालक बनलेला आहे, अशी स्थिती आहे. जो मूळ पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर स्थापन झाला, तो या पातळीवर येऊन लाचार होऊ शकत नाही.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले जवळपास १५-१६ उमेदवार फडणवीस यांनीच त्यांच्या कळपात पाठवले होते. त्या अर्थाने त्यांनी शिंदे यांचा पक्ष निम्मा चालवायला घेतला होताच. म्हणजे शिंदे आपला आकडा कमी आल्यानंतर बिहार पॅटर्न वगैरे सांगून मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतात याची कल्पना फडणवीस यांना बहुदा आली असावीच. त्यादृष्टीने त्यांनी आधीच बंदोबस्त केला असावा.
मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिंदे यांचे तेजही तातडीने गेले आहे. राजकीय नेत्यांच्या आयुष्यात चढउतार होत असतात. पण सत्ता नसतानाही ज्यांची जनतेतली प्रतिमा आणि नेतृत्वाचा कणखरपणा कमी होत नाही, ते खरे नेतृत्व असते. शिवसेनेचा धनुष्यबाण त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हातात शोभतो. निवडणूक आयोगाच्या मर्जीने महाशक्तीच्या वशिल्याने पक्ष आणि चिन्ह चोरला तरी नेतृत्वाचे हे तेज कसे चोरणार ना? त्यामुळेच आता सत्ता गेल्यानंतर अवघ्या काही दिवसात शिंदे अचानक इतक्या रुसव्या फुगव्यांनी चर्चेत येऊ लागले आहेत.
इतके दिवस ते देत होते, त्यामुळे लोक त्यांच्यापाशी टिकून होते. आता त्यांची देण्याची क्षमता देखील पूर्णपणे उरलेली नाही. ती भाजपने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या ओंजळीतून जे काही पडेल तेच शिंदेंच्या हातात पडणार. अशा परिस्थितीत जो शिवसेना नावाचा अंगार ताब्यात घेण्याचा आततायी प्रयत्न शिंदे यांनी केला, त्याची झळ काय असते हे कळायला सुरुवात होईल.
शपथविधीच्या सोहळ्यात शिंदे यांची काय अवस्था झाली होती हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. ज्या महाशक्तीच्या जोरावर इतके दिवस ते उड्या मारत होते, त्याच महाशक्तीसमोर केविलवाण्या अवस्थेत सगळ्या महाराष्ट्राने त्यांना पाहिले. शिंदे म्हणजे शिवसेना नव्हेत. कोर्टाच्या आणि निवडणूक आयोगाच्या मर्जीने या पक्षाच्या इतिहासाशी छेडछाड करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस तो उघडा पडणारच होता. त्यामुळे शिवसेना नावाचं शिवधनुष्य पेलायला गेलेले महाभाग तेच शिवधनुष्य छाताडावर घेऊन पडल्याचे काही दिवसात दिसले तर नवल वाटायला नको.

Previous Post

घरात घुसून जशास तसं

Next Post

पाच डिसेंबरचा करिश्मा; पदोन्नती ते पदावनती!

Related Posts

कारण राजकारण

जातगणना : एक चुनावी जुमला!

May 15, 2025
कारण राजकारण

मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

May 15, 2025
कारण राजकारण

टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

May 15, 2025
कारण राजकारण

पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

May 8, 2025
Next Post

पाच डिसेंबरचा करिश्मा; पदोन्नती ते पदावनती!

धर्मवीरांचा शिष्य झाला भाजपाचा अग्निवीर!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.