• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

अण्णांचा घंटानाद खुळा!

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
September 9, 2021
in टोचन
0

मंदिरे उघडली नाहीत तर आम्ही बळजबरीने उघडू, घंटानाद करून लोकांच्या कानठळ्या बसवू अशी अण्णागर्जना जेव्हा आमच्या कानी पडली तेव्हा आमचे हातपाय लटलटा कापू लागले. लष्कर टाइप वेशातील एका हातात बंदूक आणि दुसर्‍या हातात घंटेचा टोल बडवणारे अण्णांचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. मंदिराच्या बाहेर लावलेल्या घंटा जोर लावून बडवून झाल्यावर अण्णांनी थेट मंदिराच्या दरवाजाला असलेल्या पितळेच्या अगडबंब कुलपाला हात घातला आणि शत्रुपक्षाच्या सैनिकांची मुंडी पिरगाळतात तशी ती त्या कुलपाची मुंडी पिरगाळू लागले. मध्येच डोक्यावरची लष्कर टाइप टोपी सावरत तोंडाचा पट्टा चालवत होते, तुझी किल्ली माझ्याकडे नसली म्हणून काय झाले? या मनगटात इतका जोर आहे की एका बुक्कीतच तुझा कपाळमोक्ष करून टाकतो असे त्यांनी म्हणताच जोरात धडाडधूम असा आवाज झाला आणि मी झोपलो होतो त्या भिंतीलगत असलेल्या फळीवरील तांब्या, पेले, ग्लासेस ही सगळी स्टीलची सामग्री अंगावर पडल्याने मी खाडकन जागा झालो, उठलो आणि बाजूला झालो. ही आमच्या घरातल्या बोक्याची करामत होती. फळीवरून तो माझ्याकडे चंपादादांसारखा पांढर्‍या मिशा फेंदारून बघत होता. पाहतो तो सकाळ झाली होती. दरवाजा उघडला. पेपरवाल्याने कडीला लावलेला पेपर काढला आणि डोळ्यावर झोप असतानाही वाचू लागलो.
आतल्या पानात बातमी होती… अण्णा आक्रमक पवित्र्यात. सरकारने मंदिरे न उघडल्यास आम्ही स्वत: बळजबरीने उघडू. घंटानाद करण्याचा अण्णांचा इशारा… आत्ता माझी ट्यूब पेटली. म्हणजे झोपेत मला दृष्टांत झाला तर… तेवढ्यात तो बोका फळीवरून पुन्हा मिशा फेंदारत माझ्याकडे पाहू लागला. मी काठी घेतली आणि ती वर उगारताच बोका दारातून पळून गेला. लहानपणी संघशाखेत जात असल्यामुळे लाठी-काठी फिरवण्याची सवय काही खुंटीला टांगून ठेवली नव्हती. अजूनही सकाळी उठल्यावर व्यायाम म्हणून ती प्रॅक्टिस उपयोगी पडते. आज त्यांच्यात असतो तर कदाचित नमो पार्टीत मोठ्या पदावर असतो.
सकाळी कामं आटोपल्यावर नेहमीप्रमाणे पोक्या आला. त्याला मी तो पेपर दाखवला. ती बातमी वाचून पोक्या म्हणाला, अण्णांना सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, असं ऐकलं होतं, पण इथे तर सुपार्‍याच सुपार्‍या घेतल्याचं दिसतंय… मंदिरात घुसू काय म्हणताहेत, कुलपांची टाळी फोडू काय म्हणताहेत एक मात्र खरं की मिलिटरीतून परतल्यावर ती भाषा मात्र ते विसरले नाहीत.
–पोक्या तुला त्यांच्या या आक्रमक भूमिकेबद्दल काय वाटतं?
-माझं असं वैयक्तिक मत आहे की अण्णांन भाजपवाल्यांनी भाजपप्रवेशाची खुली ऑफर दिली असावी. शिवाय केंद्रात एखादं खातं देण्याचाही विचार त्यांच्यापुढे मांडला असावा.
-अरे, पण केंद्राचाच मंदिर प्रवेशबंदीला पाठिंबा असताना ते मंदिरं उघडण्याची सुपारी अण्णांना कशी काय देऊ शकतील? हे काही तरी भलतंच त्रांगडं दिसतंय.
-त्यात त्रांगडं-बिंगडं काही नाही. केंद्राने दिल्लीत एक म्हणायचं आणि महाराष्ट्रात सध्या भाजपचे मंदिरे उघडा आंदोलनाचे चाळे चाललेत त्याबद्दल मात्र काहीच बोलायचं नाही, हे ठरवून चालल्यासारखं वाटतं. हे इतके लबाड लोक आहेत की कशासाठी कुणाचा वापर करून घ्यावा हे त्यांना चांगलं कळतं. सध्या मंदिरं बंद असल्यामुळे अनेकांचे मंदिराच्या हवेशीर व्हरांड्यात रात्री झोपण्याचे वांदे झालेत. याचा फायदा घेऊन नमोवाद्यांनी मंदिरं उघडा आंदोलन सुरू केलं आणि त्यात असेही काही लोक सामील झालेत, असं मला वाटतं. म्हणजे माझा आपला अंदाज.
-अण्णांच्या बाबतीत मला नाही तसं वाटत. त्यांनी नुसती हाक दिली तरी दिल्ली डळमळते. ज्यावेळी त्यांचा आतला आवाज आक्रोश करून उठतो तेव्हाच ते कोणत्याही आंदोलनाचा आवाज देतात. आता त्याचा फायदा इतर कोणी घेतात आणि ‘कजरा’ मुहोब्बतवाला म्हणत स्वत:चीच ‘लाल’ करत स्वार्थ साधतात त्याला अण्णा काय करणार! मग लोक म्हणतात, अण्णा करी ठणाणा!
-हे खरं असलं तरी आताचे अण्णा काही वेगळेच वाटतात. नेहमी समाजाच्या भल्याच्या गोष्टी करणारे अण्णा आज सार्‍या जगाचा शत्रू असलेल्या कोरोना या अति अतिसूक्ष्म जीवाणूला मदत होईल अशी आततायी घोषणा करतात तरी कसे, हे महाघंटेहून मोठे प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या देशातील कोट्यवधी बांधवांना पडले आहे याला काय म्हणावे?
-मला वाटतं, गेल्या दोन वर्षातील लॉकडाऊनमुळे कसलंही आंदोलन करता न आल्यामुळे त्यांचे हात आणि तोंड शिवशिवत असावं नाहीतर घंटानाद करण्याचा आवाज त्यांनी महाराष्ट्रातील नमोवाद्यांच्या बेसूर सुरात आपला, चिरका असला तरी लष्करी धार असलेला सूर मिसळलाच नसता.
-लष्करात ते जीप ड्रायव्हर होते. पोक्या त्यावेळचा त्यांचा फोटो पाहिलास ना तर चाट पडशील.
-तरीही मंदिरे उघडणे ही सरकारी आदेशाची पायमल्ली आहे हे निदान अण्णांना तरी कळायला हवं. आपण त्यांच्याशी फोनवरून बोलायला हवं. लाव तुझा मोबाईल आणि दे माझ्याकडं…
-हॅल्लो हॅल्लो, अण्णा मी मुंबईहून पोक्या बोलतोय. मागे दिल्लीच्या आंदोलनात आपली भेट झाली होती. मी नव्हतो का नाचायला स्टेजवर त्या सुंदरीबरोबर. नंतर राज्यपाल झाली ती.
-आठवलं. सध्या तुमच्याकडली मंदिरं काय म्हणताहेत? उघडता की नाही? शेलारमामांची भजनमंडळी आली की नाही तुम्हाला भेटायला? आता मंदिरं उघडायला हवी. तुम्हीही त्यांच्या आंदोलनात सामील व्हा. घंटानाद करा, जीव तोडून घंटा बडवा..
-अहो, तो आवाज ऐकून झोपेत असलेला कोरोना पुन्हा जागा होईल आणि गर्दीत शिरून एकेकाला वरची वाट दाखवील.
-हे बघा, शूरवीर मरणाला घाबरत नसतात. पण आज माणसांच्या जिवापेक्षा मला कोरोनाच्या जिवाची काळजी वाटते. त्या इवल्याशा सूक्ष्मतिसूक्ष्म जीवाणूला मारण्यासाठी तुम्ही सार्‍या समाजाला वेठीस धरता? चीनशी आम्हीही लढतोय. लढाईत जीवितहानी होणारच. पण घाबरू नका. हा अण्णा जोपर्यंत खंबीर आहे तोपर्यंत कोरोनाचा काय तर कोरोनाचे पिताश्री समोर आले तरी हा अण्णा पळून जाणार नाही. किती दिवस तुम्ही घाबरटासारखे जीवन जगणार? म्हणूनच मंदिरे उघडा, आरत्या करा, घंटानाद करा, समरगीते म्हणा, संचलन करा यातूनच उद्याचा भारत, उद्याचे मंत्री, नेते तयार होतील, हा माझा दिव्य संदेश आहे. जय भारत!

– टोक्या टोचणकर

Previous Post

जैसी करनी…

Next Post

कसा पण टाका…

Related Posts

टोचन

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
टोचन

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
टोचन

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

May 5, 2025
टोचन

अपमान! अपमान!! अपमान!!!

April 25, 2025
Next Post

कसा पण टाका...

गुजरातचे बाबासाहेब भोसले!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.