नागरिक
रोज अपघात, खून, बलात्कार
अरे, या राज्यात चाललंय काय
अडीच वर्षांतली बेबंदशाही
राज्यात असं कधी घडलंच नाय
पांढर्या पायाचं सरकार नकली
धरून बांधून बनवली मोट
अलिबाबा नि चाळीस चोरांच्या
मुद्दलात होती आधीच खोट
निसर्गनियमांविरुद्ध जाता
अद्दल घडवी तो परमेश्वर
बळी जातसे निष्पापांचा
पाप कुणाचे कुणाला घोर!
—– —– —–
महाराष्ट्र
कराड प्रकरण पुढे येता
गवळी प्रकरण पडले मागे
बलात्कार आणि हत्या करून
गवळी कैदेत प्राक्तन भोगे
कराड, गवळी, मंत्री मुंडे
सगळाच आहे जांगडगुत्ता
पोलिसांचेही भय ना उरले
यांच्यामागे निर्दय सत्ता?
पाशवी हत्या सरपंचाची
कोण देईल त्याला न्याय
भयाण आक्रोश कुटुंबाचा
गरीबांना कुणी वालीच नाय
—– —– —–
विधानभवन
तीन तिगाडा काम बिगाडा
तीन पायांची विचित्र शर्यत
कुठवर गेली मजल यांची
एकमेकांना पाडण्यापर्यंत
किती धरावी लालुच यांनी
शिंदे रुसले पवार हसले
परस्परांना पाण्यात पाहता
सत्ता-जाळ्यात तिघेही फसले
एकेक आव्हान झेलता झेलता
फडणवीसांची झाली कोंडी
दोघे म्हणती सुटलो आम्ही
जा तुम्ही तोफांच्या तोंडी
—– —– —– —–
देवेंद्र फडणवीस
मंत्रीपदासाठी हपापलेले
त्यांची आयझेड करून टाकली
बोंबा मारत फिरती गावभर
म्हणती आमची संधी हुकली
सगळेच मंत्री सज्जन नाहीत
आहेत त्यांची लफडी ठाऊक
तरी काहींना केले सामील
जरी त्यांचीही पापे घाऊक
डोळे लावून बसले शिंदे
होईन म्हणाले होम मिनिस्टर
पाठीवरती बसता रट्टा
म्हणती शहांचे लागले नष्टर
—– —– —–
महायुती
राज्याची ही लुटून तिजोरी
झालो आम्ही कैसे गब्बर
खाऊंगा नि खाने दुंगा
नवी घोषणा लागू तत्पर
किती ओतला पैसा नि धन
भरून पावलो हे इलेक्शन
किती लबाड्या किती घोटाळे
तरीही झाले हो सिलेक्शन
बहिणींसाठी लाच योजना
त्यांनी हात धुवून घेतले
निम्म्या बहिणी पात्रही नसता
आता पैशावर त्यांच्या बेतले