• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रबोधन @ १००, मार्मिक @ ६०, ठाकरे सरकार @ १

सचिन परब by सचिन परब
December 10, 2020
in इतर
0
प्रबोधन @ १००, मार्मिक @ ६०, ठाकरे सरकार @ १

सामाजिक उच्चनीच भेदभाव, आपण आणि आपला समाज इतर सर्व समाजांपेक्षा उच्च दर्जाचा मानण्याची नाना फडणिशी आणि धार्मिक क्षेत्रांत भिक्षुकशाहीची दिवसाढवळ्या चालविलेली भांगरेगिरी, या सर्व राष्ट्रविनाशक, समाजविध्वंसक आणि दास्यप्रवर्तक दोषांचा आमूलाग्र नायनाट झाल्याशिवाय स्वराज्याचे अमृत प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी हिन्दुस्थानाच्या घशांत कोंबले, तरी त्यापासून त्याचा लवमात्र उद्धार होणार नाही.` १६ ऑक्टोबर १९२१ ला प्रकाशित प्रबोधन पाक्षिकाच्या पहिल्या अंकातून

गोष्ट १९२१चीच आहे. केशव सीताराम ठाकरे तेव्हा मुंबई सरकारच्या इलेक्ट्रिक- पीडब्ल्यूडी खात्यात काम करत होते. त्यांची ऑफिसात मोठी वट होती. कारण त्यांच्या ऑफिसात झालेला जुन्या रेकॉर्डचा पसारा नीट करणं कुणालाही जमत नव्हतं. केशवरावांच्या डिक्शनरीत अशक्य शब्द नव्हताच. त्यांनी गोर्‍या साहेबांना न जमलेलं काम करून दाखवलं. त्यासाठी अल्फा न्युमरिकल कार्ड सिस्टम बनवली. साहेब एवढा खुश झाला की त्याने रेकॉर्डचं वेगळं खातं बनवून त्याचा हेडक्लार्क बनवलं.

पुरोहितांच्या ढोंगी धर्माच्या कचाट्यात अडकून जातिभेदाच्या पुरात बुडणार्‍या आपल्या माणसांना पाहून केशवराव अस्वस्थ होत होते. भिक्षुकशाहीने लादलेल्या पारतंत्र्यातून आपल्या भावंडांना सोडवण्यासाठी त्यांची टोकदार लेखणी सरसावून पुढे येत होती. केशवरावांच्या लेखणीचा आणि वक्तृत्वाचा ज्वलंत अनुभव महाराष्ट्र अनुभवत होताच. त्यातून महाराष्ट्रभरातल्या बहुजन समाजाला नवी दिशा सापडत होती. म्हणूनच केशवरावांनी नवं वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. नाव होतं, `प्रबोधन` आणि तेव्हापासून केशव सीताराम ठाकरे `प्रबोधनकार` बनले.

पण नियमानुसार सरकारी नोकराला वृत्तपत्र काढता येत नसे. तरीही चीफ सेक्रेटरीने प्रबोधनकारांना विशेष आदेश काढून परवानगी दिली. कारण प्रबोधनकारांसारखा कार्यक्षम अधिकारी त्यांना गमवायचा नव्हता. असं असूनही प्रबोधन सुरू झाल्यानंतर पाच महिन्यांतच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्याला प्रबोधनकारांचा सद्सद्विवेक कारण होताच. पण त्याहीपेक्षा त्यांच्या आईचे संस्कार. प्रबोधनकारांच्या आईचं नाव जानकीबाई. त्यांना सगळे ताई म्हणत. त्यांनी प्रबोधनकारांना सांगितलं होतं, `वेळ आली तर भीक माग, पण इंग्रज सरकारची नोकरी करू नकोस. सरकारच्या नोकरीला लाथ मारून बहुजन समाजाच्या सेवेला वाहून घे.`

१९२२ सालातली २५० रुपयांची नोकरी सोडून प्रबोधनकारांनी बहुजनसेवेला वाहून घेतलं. ते जन्मापासून दारिद्र्यच बघत आले होते. सरकारी नोकरीमुळे थोडं स्थैर्य आलं होतं. पण त्याचाही त्याग करून त्यांनी पत्रकारितेच्या अस्थिर जगात उडी घेतली. प्रबोधन केवळ लोकांच्या मदतीने उभा होता. त्याला मुंबई, सातारा, पुणे असा प्रवास करावा लागला. आधी पाक्षिक, पुढे मासिक आणि शेवटी अनियतकालिक. १९२१ ते १९३० या नऊ वर्षांत प्रबोधनचे फक्त ९५ अंक प्रकाशित झाले. डॉ. अनंत गुरव यांनी प्रबोधनवर पीएचडी करताना त्यातले ९१ अंक शोधून काढले आहेत.

फक्त नऊ वर्षं आणि ते अनियमितपणे प्रकाशित होऊनही प्रबोधनने मराठी पत्रकारितेत नवा इतिहास घडवला. प्रबोधनने पत्रकारितेसारख्या इंटलेक्च्युअल क्षेत्रात असणारी अभिजनांची मिरास मोडून काढली. आपल्याच जातीची थोरवी गाण्यात दंग असणार्‍या भिक्षुकशाहीची झोप उडवली. नव्याने शिक्षण घेऊन पुढे येऊ पाहणार्‍या कष्टकरी समाजांचा स्वाभिमान ठेचण्यासाठी केल्या जाणार्‍या युक्तिवादांना जहाल भाषेत उत्तरं दिली. बहुजनांवर लादलेल्या गुलामगिरीचे साखळदंड तोडण्यासाठी तुटून पडला. प्रबोधनने सामाजिक सुधारणांना बहुजनांच्या घरात पोचवलं. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे बहुजनवादी पत्रकारितेला मान्यता, वलय आणि विचारांचं प्रौढत्व मिळवून दिलं.

ठाकरेंच्याच घरात आणखी एक वेगळाच इतिहास पुढे चाळीस वर्षांनी घडला. गोष्ट १९६१ची. प्रबोधनकारांचे थोरले चिरंजीव बाळासाहेब ठाकरे आपल्या मित्रांसोबत न्यूज डे नावाचं इंग्रजी दैनिक चालवत होते. पण दाक्षिणात्य सहकार्‍यांच्या वर्चस्वामुळे आवाज कोंडला जातोय, हे लक्षात येताच त्यांनी न्यूज डेचा राजीनामा दिला. त्यापुढची हकीकत प्रबोधनकारांचे दुसरे चिरंजीव श्रीकांतजी ठाकरे यांनी आपल्या `जसं घडलं तसं` या आत्मचरित्रात लिहिलीय.

प्रबोधनकारांचा उल्लेख दादा असा असलेला हा उतारा, `न्यूज डे`मधून आमचे बंधू काही महिन्यांनंतर बाहेर पडल्यावर काय करायचं, हा प्रश्न उभा राहिला. पण प्रबोधनकारांनी एक मंत्र दिला होता की माणसाने कधीही हताश होऊन जाऊ नये. नव्या क्लृप्त्या काढाव्यात. त्याप्रमाणे बंधूंनी एक डमी तयार केली. शंकर्स विकली होतं पण आपण दुसरं चांगलं काढलं तर! त्याचं नाव होतं, `कार्टूनिस्ट`. मोठ्या बंधूंनी दादांच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा दादा म्हणाले, इंग्लिशमधे नको. कारण मजकुरासाठी साऊथ इंडियन लोकांच्या पाया पडावं लागेल. तुला अनुभव आलाच आहे. तेव्हा मराठीत काढा! बंधूंना हा विचार एकदम पसंत पडला. झालं. आमचं नावासाठी डोकं सुरू झालं. `तिरंदाज` ठेवावं की `अंजन`? भाऊ दादांकडे गेला.

दादा स्वस्थ खुर्चीवर बसले होते. म्हणाले, `मार्मिक!` मी बाहेर गेलो होतो. आल्यावर त्याने मला सांगितलं. दादांच्या तोंडातून ब्रह्मवाक्यच यायचं नेहमी. मार्मिक, मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक.

१७ नोव्हेंबर १९६०ला स्थापन झालेलं `मार्मिक` इतिहास घडवत होतं. मराठी माणसाला जागं करत राहिलं. त्यातून शिवसेना उभी राहिली. त्याच्या जन्माची कहाणीही श्रीकांतजींनी आत्मचरित्रात सांगितलीय, `कुणी म्हणालं की साहेब तुम्ही विचार दिल्याने मराठी मनं पेटून उठलीत. त्यांना तुम्ही अधिक जवळ आणण्यासाठी एखादा पक्ष स्थापन करा. पण बंधूंच्या डोक्यात एक निराळीच कल्पना होती. त्यांनी प्रबोधनकारांना ही कल्पना सांगितली. ते म्हणाले, तू असं कर. एक संघटना काढ. बंधू म्हणाले, नाव काय द्यायचं? दादा मागच्याप्रमाणे एक ब्रह्मवाक्य बोलले, `शिवसेना!`

२०२० हे वर्ष या सगळ्याला एका धाग्यात गुंफायला आलंय. १६ ऑक्टोबर २०२० पासून प्रबोधनचं शताब्दी वर्ष सुरू झालंय. `मार्मिक`चा हीरकमहोत्सव म्हणजे साठावा वाढदिवस १७ नोव्हेंबर २०२०ला साजरा झालाय. याचवर्षी शिवसेनेने ५५व्या वर्षात पदार्पण केलंय. आता २८ नोव्हेंबर २०२०ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणार्‍या ठाकरे सरकारने एक वर्ष पूर्ण केलंय. ते करताना मुख्यमंत्री सांगत आहेत की आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवायची गरज नाही. माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी ते आम्हाला सांगितलेलं आहे.

उद्धव ठाकरेंचं हे हिंदुत्व प्रबोधनचं आहे. प्रबोधनची शताब्दी आपोआप साजरी होतेच आहे.

 

(लेखक प्रबोधनकार डॉट कॉमचे संपादक आहेत.)

 

Previous Post

लालबाग परिसरात सिलिंडरचा स्फोट, 20 जण जखमी

Next Post

त्रिवेणी संगमाची

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
चला खाऊया!

फ्राईड राईस

May 15, 2025
गावगप्पा

नाठाळ पक्याचं करायचं काय?

May 15, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 15, 2025
Next Post
त्रिवेणी संगमाची

त्रिवेणी संगमाची

जगाला दिशा देणारा महामानव आपल्या राज्यात झाला याचा अभिमान – मुख्यमंत्री

जगाला दिशा देणारा महामानव आपल्या राज्यात झाला याचा अभिमान – मुख्यमंत्री

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.