बाबा रामदेव
आपण दोघे दाढीवाले
एकच आपले गुरू
त्यांचे पाठबळ असल्यावरती
मन मानेल ते करू
तू तर अर्क हिंदुत्वाचा
साक्षात्कारच झाला
त्या नावाने काढा काढू
राज्यात फायदा मला
तुला शिकवतो योगसाधना
आयुर्वेदाचे धडे
राजकारण हे बेभरवशी
केव्हाही भरतील घडे
—– —– —–
योगी आदित्यनाथ
पक्षात शिरले बलात्कारी तरी
त्यांना करून घेऊ पावन
जेलमधील ते आदर्श वैâदी
त्यांना देऊ दृढ आलिंगन
करूया त्यांचा भव्य सत्कार
पुष्पवृष्टींसह घालू हार
फोगाट संस्कृती वाढली जशी
त्यातून सबला होईल नार
लोक नाही करणार उठाव
त्यांचं काहीच नाही चालणार
हम करे सो कायदा इथे
मोदी शब्दही नाही बोलणार
—– —– —–
नितीन गडकरी
लोक म्हणती नका करू
रोज एवढी बडबड बडबड
फुकट नसत्या अफवा उठतात
दिल्लीत कुठे होते गडबड?
त्यांचे काळीज तर दगडाचे
त्यांना नाही पडत फरक
उस पिळून रस पिणे
वापर जसा आहे चरक
भुता हाती आहे भागवत
संघ फक्त वाटतो ‘दक्ष’
त्यांचाही डोळा मतांवरती
त्यांचे नको तिकडे लक्ष
—– —– —–
एकनाथ शिंदे
नका करू मुळीच चिंता
एव्हरीथिंग इज एकदम ओके
थांबा आणि वाट पाहा
नको आम्हाला मोठे खोके
मन करा घट्ट आणि
गोहातीही आठवा
तेव्हा कसे नाचत होता
दोन्ही डोळ्यांत साठवा
आता कशाला भरते धडकी
पोटात येतो गोळा
कशाला मग भीती वाटते
होईल चोळामोळा
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
आमचा झाला चिकटगुंडा
सोडवू कसा मी बाई
त्यांच्याबरोबर फरफटणेही
सुटता सुटत नाही
जिथे त्यांना न्यायचे नसते
न्यावेच लागते मला
तेही लागतात माझ्या पाठी
नसता तापच झाला
कधी होईल सुटका यातून
वाट पाहातो मी मोदी
लवकर व्हावे कोर्ट ऑपरेशन
नको मला ‘उप’ गादी