• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

‘आपले’ नव्हे, आप्पलपोटे सरकार!

- संतोष देशपांडे (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 8, 2022
in देशकाल
0
‘आपले’ नव्हे, आप्पलपोटे सरकार!

गणपती बाप्पापेक्षा स्वतःची मोठी छायाचित्रे झळकवणारे हे आप्पलपोटे स्वतः खरोखरीचे गणेशभक्त आहेत का फक्त सत्तेचे भोगी आहेत? भक्तांवरचे अरिष्ट टाळणारा विघ्नहर्ता कोठे आणि महाराष्ट्रावर खोके सरकारचे अरिष्ट आणणारे हे सत्तालोलुप कोठे? या जाहिरातीलाच बेस्टचे नियमित प्रवासी व मुंबईकर श्याम पाखरे यांनी हरकत घेतली आहे.
– – –

महाराष्ट्रात गद्दारांचे ‘ईडी’ सरकार आल्यापासून नवनवीन जावईशोध लागत आहेत… दहीहंडी, मंगळागौर आणि लपाछपी हे अधिकृत खेळ आहेत असा एक शोध नुकताच या सरकारने लावून झाला. खरे तर यांनी निष्ठा, विचारधारा, सामाजिक बांधिलकी यांचाच एक खेळ मांडलेला आहे. त्याला यांचा राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता द्यायला हरकत नाही. भारतीय जनता पक्षाने या संशोधनात नुकतीच एक ताजी भर घातली आणि ती मुंबईतल्या बेस्टच्या बसेसवर झळकवली. बेस्टवरची आजवरची वर्स्ट जाहिरात, असा तिचा उल्लेख करायला हरकत नाही. यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे खरं, पण ते निव्वळ ‘ऐक’नाथ आहेत, हे महाराष्ट्रातला बच्चा बच्चा जाणतो. यांना आपण काय किंमत देतो आणि हे सरकार कोणाचं आहे, हे भाजपने या जाहिरातीत दाखवून दिलं… ‘आपलं सरकार’ असा शब्दप्रयोग असलेल्या या जाहिरातीत फक्त भाजपचेच चेहरे आहेत, एकनाथ शिंदेही नाहीत आणि त्यांच्या गटातले कोणी महानुभावही नाहीत. काय ही अप्रतिष्ठा! असो. ती त्यांनी आपल्या कर्माने ओढवून घेतलेली आहे.
आता भाजपने लावलेल्या थोर शोधाकडे वळू या. या जाहिरातीत असं म्हटलं आहे की महाराष्ट्रात आपलं सरकार (म्हणजे या गावोगावचा भुसा भरून फुगलेल्या ‘महाशक्ती’चं एकटीचंच सरकार) आलं आणि हिंदू सणांवरचं विघ्न टळलं… ही जाहिरात भाजपला शोभेल अशी हिणकस तर आहेच, पण भाजपच्या परंपरेप्रमाणे धादांत खोटीही आहे… महाराष्ट्राचा महाउत्सव अशा गणेशोत्सवालाही यांनी गलिच्छ राजकारणासाठी वापरावे, याकडे लोक हतबुद्ध होऊन पाहात आहेत.
हे तथाकथित विघ्न नक्की कोणत्या सणांवर येणार होते? ते नक्की कोणामुळे येणार होते? महाराष्ट्रात बहुसंख्य हिंदूच राहताय. त्यांच्या सणांवर कोण विघ्न आणणार होतं? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता मोघमात ‘आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले- गणपती बाप्पा मोरया’ अशी धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करणारी तद्दन प्रचारकी जाहिरात कदाचित शिंदे गटालाही जमली नसती (अजून ते नवखे आहेत आणि त्यांच्यावरचे शिवसेनेचे काही संस्कार तरी पुसले गेले नसावेत). या विविधतेने नटलेल्या देशात सर्व धर्मियांचे असंख्य सण उत्साहात साजरे होतात आणि ही परंपरा आजची नाही तर शतकानुशतकांची आहे. हिंदूंच्या सणांवर मोगलाईत अथवा ब्रिटीशकाळातही विघ्न आणण्याचे धारिष्ट्य कधी कोणी केले नाही, तिथे स्वतंत्र हिंदुस्तानात हिंदूंच्याच सणांवर नक्की कोणते विघ्न येणार होते? आज महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतं तर या सणांवर विघ्न आलं असतं, ते यांचं सरकार आल्यामुळे टळलं अशी ही मांडणी आहे… ती काही मुंबईकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी निश्चितच नाही. ती मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी केली आहे. जिथे निवडणुका येतात तिथे भाजपचे सरकार नसेल तर तिथला बहुसंख्याक असलेला हिंदू आपोआप ‘खतरे में’ येतो आणि निवडणूक झाल्यावर भाजपची सत्ता आली तर आपोआप सुरक्षित होतो, अशी ही मांडणी हिंदू समाजाची बदनामी करणारीच आहे. जगात कोणत्या देशातला कोणता बहुसंख्याक समाज असुरक्षित असतो? बरे, निवडणुका झाल्या आणि यांची सत्ता आली की हा हिंदू वार्‍यावर सोडला जातो, नाही तर महागाईच्या आगीत फेकून दिला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला मजबूत संविधान दिले आहे. इथे कोणावरही अन्याय झाला, अत्याचार झाला तर तो निपटून काढण्यासाठी सक्षम कायदा व तो राबवणारी यंत्रणा अस्तित्त्वात आहे. त्यातही महाराष्ट्रात हिंदू सणांवर भयंकर विघ्न येणार अशी भाजपची खात्री होती तर त्यांनी पोलिसांत, न्यायालयांत दाद मागायला काहीच हरकत नव्हती. पण तिथे पुरावा लागतो. तो कुठून आणणार? मुळात अस्तित्त्वात नसलेल्या काल्पनिक विघ्नाची भीती जनतेच्या मनात निर्माण करायची आणि भयग्रस्त जनतेला राजकीय बुवाबाजीचे बळी बनवायचे, हा खेळ भाजपा प्रत्येक निवडणुकीत खेळते. त्यातून ते सत्तेजवळ जातात, पण देश मात्र जवळ येण्याएवजी तुटत जातो, माणसांमाणसांमधल्या आणि इतकी वर्षं गुण्यागोविंदाने नांदलेल्या समाजांमध्ये वितुष्ट येतं, दरी पडते, ती रुंदावत जाते. हे राष्ट्रनिर्माणाचं काम आहे?
खरे तर महाराष्ट्रात कोणत्याही हिंदू सणांवर कधी विघ्न आलेलं नाही, कधी येणारही नाही आणि यांच्या कर्तबगारीने कधी विघ्न ओढवलंच तर विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपेने शिवसेना ते परतवून लावायला सक्षम आहे, हे मराठीजनांनी अनेकदा पाहिलेलं आहे, मुंबईकरांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. पण गद्दारांच्या ‘ईडी’ सरकारवर मात्र आता सरकार टिकवण्याचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. आज निवडणुका झाल्या तर उद्धवजींच्या नेतृत्वालाच सर्वात जास्त पसंती आहे, शिवसेना आधीपेक्षा अधिक जागा जिंकेल आणि महाविकास आघाडी आणखी मजबूत होऊन सत्तेत येईल, हे वेगवेगळे सर्व्हे सांगत आहेत. यापुढील निवडणुकीत क्रोधित जनता तांडव करणार आणि तिसरा डोळा उघडून ‘ईडी’ सरकारची राखरांगोळी करणार हेच खरे विघ्न आहे.
या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठळक व मोठी छायाचित्रे वापरलेली आहेत. मराठी उत्सवांचेही दर्शन नाही आणि मुंबईचेही दर्शन नाही. यांना श्रीगणेशाचा जयजयकार करण्याचा हेतू आहे की स्वतःचा उदो उदो करायचा आहे, ते जाहिरात बघताच समजते. गणपती बाप्पापेक्षा स्वतःची मोठी छायाचित्रे झळकवणारे हे आप्पलपोटे स्वतः खरोखरीचे गणेशभक्त आहेत का फक्त सत्तेचे भोगी आहेत? भक्तांवरचे अरिष्ट टाळणारा विघ्नहर्ता कोठे आणि महाराष्ट्रावर खोके सरकारचे अरिष्ट आणणारे हे सत्तालोलुप कोठे? या जाहिरातीलाच बेस्टचे नियमित प्रवासी व मुंबईकर श्याम पाखरे यांनी हरकत घेतली असून त्यानी ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकांना ईमेल करून जाहिरात ताबडतोब हटवण्याची मागणी केली आहे. ही राजकीय जाहिरात असून, या जाहिरातीमुळे समाजांत जातीय तेढ निर्माण होईल. धर्मनिरपेक्ष देशाचा नागरिक आणि बेस्टचा नियमित प्रवासी म्हणून मला ही जाहिरात आक्षेपार्ह वाटते. त्यामुळे ही जाहिरात तातडीने हटवावी व भविष्यात अशा प्रकारच्या जाहिराती होणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी, अशी योग्य आणि सडेतोड मागणी श्री. पाखरे यांनी या ईमेलमध्ये केली आहे. मुंबई ही सर्व धर्म, जाती, भाषा, वर्ग याना एकत्र बांधून ठेवणारी महानगरी आहे आणि इथे धर्म आणि जातिभेदाचे विष पसरू नये यासाठी श्री. पाखरे यांनी दाखवलेल्या धाडसासाठी ते कौतुकास पात्र आहेत. त्यांचे ईमेल व बसची छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल होऊन टीकेची झोड उठल्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांना उत्तर द्यावे लागले. राज्य सरकारने केलेल्या कामाची माहिती या जाहिरातीतून देण्यात आली आहे असे थातूरमातूर उत्तर देत त्यांनी वेळ मारून नेली आहे.
शेलार यांच्या सरकारची अवस्था आज ‘इंजीन लहान आणि गाडी मोठी’ अशी होऊन बसली आहे. तीन महिन्यात सांगता येतील अशी इन मीन तीन कामे देखील यांच्या नावावर नाहीत. ‘वाटाघाटी’च झाल्या नाहीत तर काम कधी करणार? कोरा कागद असलेले हे तथाकथित आपले सरकार जाहीरात करणार तरी कशाची? सतत ‘मोठा करेक्ट कार्यक्रम’ करण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुंतलेले आहेत मुख्यमंत्री तर इतक्या भिडस्त स्वभावाचे आहेत की त्यांना कोणी (बड्या नेत्याने) घरच्या गणपतीच्या दर्शनाचे आमंत्रण दिले तरी त्यांना नाही म्हणताच येत नाही. आपण मुख्यमंत्रीपदी आहोत आणि आपले प्रत्येक मिनिट सरकारच्या कामासाठी सत्कारणी लागावे असे जुनाट व बुरसटलेले विचार मनात देखील न आणता मुख्यमंत्री प्रत्येक आमंत्रण स्विकारत वैयक्तिक हजेरी लावत आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांची वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळख आहे. कुणी सहकाराचा पाया घातला, कुणी कृषिक्रांती घडवून आणली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्र वाचवला, ही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही. शिंदे यांची ओळख राहिलीच तर दहीहंडीपुरती राहणार आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी त्या दिवशीही प्रत्येक आमंत्रणाचा मान राखून दहीहंड्यांना हजेरी लावली. उत्साहाच्या भरात ते एखादी हंडी फोडायला सरसावले नाहीत, हेच नशीब. गणेशोत्सवात तेच सुरू आहे. लौकरच नवरात्र येईल आणि त्यात मध्ये श्राद्धपक्ष देखील आहे. मुख्यमंत्र्यांचा जनसंपर्क ठाण्यात फार मोठा असल्याने त्यांना लग्न, गृहप्रवेश, बारसे यांची देखील आमंत्रणे सातत्याने येत असतीलच. महाराष्ट्राला कार्यक्षम मुख्यमंत्री मिळो ना मिळो, एक मनमिळावू उत्सवमूर्ती नक्कीच लाभलेले आहेत. त्यात त्यांचा काही दोष नाही. सरकार चालवण्याचे काम उपमुख्यमंत्रीच करणार आहेत, हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात उत्सवमूर्ती मोठी असते, पण पूजा मात्र लहानग्या, पूजेच्या मूर्तीचीच होते. त्याप्रमाणे असंवैधानिक असलेले उपमुख्यमंत्री सध्या सरकार दरबारी आणि प्रशासनात पूजेचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. मुख्यमंत्री मात्र एक आकर्षक उत्सवमूर्ती बनलेले आहेत.
भाजपच्या जाहिरातीला संदर्भ आहे कोरोनाकाळाचा. त्या काळात सगळ्याच सणांवर निर्बंध होते आणि सगळीच प्रार्थनास्थळं बंद होती, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून जणू फक्त हिंदू सणांवरच बंदी होती, असला निर्लज्ज कांगावा करण्याचा हा प्रकार आहे. ही बंदी महाविकास आघाडी सरकारने हौसेसाठी लादली होती का? भाजपला दोनच गोष्टी येतात, चकचकीत उत्सवबाजी आणि सरकारांची पाडापाडी. या दोन खेळांसाठी निर्बंध लादण्यास उशीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी देशावर कोरोना संकट ओढवून घेतले आणि नंतर अचानक, अतिकडक लॉकडाऊन लादून जनतेचे हाल हाल केले. त्यांच्याच निर्देशांनुसार देशभरात निर्बंध लादले गेले होते, हे फडणवीस विसरले आहेत का? करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे हाच प्रभावी उपाय होता. गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे लाखोंची गर्दी जमवणारे उत्सव असतील, मोहरमच्या मिरवणुका असतील, रमझानचे मेळे असतील, नाताळचा उत्सव असेल की पंढरपूरची वारी असेल… त्या सगळ्यांवर सरसकट निर्बंध आणले गेले होते. अर्थात, तेव्हाही भाजपाने इथे मतलबी आकांडतांडव करून आपण राजकारणासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतो, हे दाखवून दिले होतेच. हिंदुस्थानात सुदैवाने आज देखील बरीच राज्ये भाजपाच्या कचाट्यातून बचावली आहेत आणि त्या सर्व राज्यातील जनता आपापले सण समारंभ उत्साहात साजरे करते. तिथे कुणी खतर्‍यात येत नाही आणि कोणी बसवर विघ्नहर्ते बनण्याची दाखवेगिरी करत नाहीत.
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर आज ओल्या दुष्काळाचे विघ्न कोसळले आहे. हे सरकार खरोखरच ‘आपले’ असते तर त्यांनी ते दूर करण्याचा प्रयत्न केला असता. पण स्वतःच्याच पुरणपोळीवर तूप ओरपून घ्यायला एकत्र आलेल्यांचे हे सरकार ‘आपले’ नसून ‘अप्पलपोटे’ आहे. जनतेने आजवर भाजपाला आणि मोदी यांना भरपूर प्रेम दिले पण त्याची परतफेड म्हणून ‘आप्पलपोटे’ सतत महागाई, बेरोजगारी आणि भयग्रस्त वातावरण जर देत असतील, तर जनतेने हे एकतर्फी प्रेमप्रकरण आता फार काळ चालू ठेवण्यात फारसा अर्थ नाही. कोरोनाकाळात आमदार निधी सरकारी मुख्यमंत्री निधीत न देता खासगी आणि बेहिशोबी पीएम केयर फंडात देणार्‍या निलाजर्‍यांकडून किती अपेक्षा ठेवायच्या? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या आणि महाराष्ट्राची आन, बान, शान असलेल्या गणेशोत्सवात देखील विद्वेषाची घाण फेकल्याशिवाय यांना आज चैन पडत नाही. या सरकारने आणि भाजपने आता समस्त गणेशभक्तांची माफी मागावी. या देशाच्या संस्कृतीत द्वेषाला, असमानतेला थारा नाही. गणेशोत्सवात विशालकाय गणरायाची पूजा करतानाच लहानग्या ऊंदीरमामाची देखील आपण पूजा करतो. सर्वांना सन्मानाने वागवण्याची आपली परंपरा आहे. आपचे सण, आपली परंपरा फार मजबूत आणि खोलवर पाळेमुळे असलेली आहे आणि उपटसुंभांच्या बेकायदा सरकारच्या येण्याने अथवा जाण्याने त्यात फरक पडत नाही.

Previous Post

छत्रपती शाहूंच्या शिकवणुकीचं सार

Next Post

केशवराव, माफ करा, माफ करा!

Related Posts

सुप्रीम कोर्टाने हातोडा हाणला तरी निर्लज्जम् सदासुखी!
देशकाल

सुप्रीम कोर्टाने हातोडा हाणला तरी निर्लज्जम् सदासुखी!

May 18, 2023
भाकरी, तवा जागच्या जागी; महाशक्तीचे ग्रह मात्र फिरले!
देशकाल

भाकरी, तवा जागच्या जागी; महाशक्तीचे ग्रह मात्र फिरले!

May 11, 2023
रामाच्या अयोध्येत रावणाचे राज्य!
देशकाल

रामाच्या अयोध्येत रावणाचे राज्य!

May 5, 2023
देशकाल

विसरा महाग भाजी, घ्या स्वस्त फाइव्ह जी!

October 6, 2022
Next Post
केशवराव, माफ करा, माफ करा!

केशवराव, माफ करा, माफ करा!

पीपीएफ : बहुगुणी आखूडशिंगी उत्तम योजना

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.