• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

डीपफेक फसवणूक

- सुधीर साबळे (सायबर जाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 7, 2025
in पंचनामा
0

एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे माहिती-तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे. अनेक गोष्टी सोप्या होत आहेत. ही चांगली गोष्ट असली तरी दुसरीकडे या एआयमुळे फसवणूक करण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामध्ये तुमचा फोटो लावून फसवण्याचे प्रकार घडतात. अशा प्रकारापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी आपण काही नियम पाळायला हवेत.
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वासार्ह वाटणारे डीपफेक व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग तयार करण्यासाठी गुन्हेगार एआय अल्गोरिदमचा वापर करतात. अलीकडच्या काळात याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआयचा वापर करून सायबर भामटे विविध प्रकारचे घोटाळे करतात. उदा. आर्थिक फायदा मिळावा म्हणून समोरच्या व्यक्तीची तोतयेगिरी करून फसवणूक करणे, त्याच्याबाबत खोटी माहिती पसरवणे, विशिष्ट कृती करण्यासाठी व्यक्तींना प्रवृत्त करणे, असे उद्योग करण्यात येतात. त्यासाठी सायबर चोरटे, हॅकर वेगवगळ्या क्लृप्त्या वापरतात.
श्रीकांत महाजन हा एका चांगल्या आयटी कंपनीत काम करत होता. माहिती-तंत्रज्ञानात त्याला चांगली गती होती. नवीन माहिती मिळवणे, त्याचा वापर करणे ही त्याची सवय बनली होती. या माहितीचा उपयोग चांगल्या कामासाठी करण्याऐवजी फसवणूक करण्यासाठी करण्याचा कट त्याने आखला. नव्याने विकसित होणार्‍या एआय तंत्रज्ञानाचं त्याला उत्तम ज्ञान होतं. एआय अल्गोरिदममध्ये फेरफार करण्याचे कौशल्य त्याला चांगल्या प्रकारे अवगत होते. त्याचा वापर करून श्रीकांतने घोटाळ्यांची मालिका घडवून आणायचं ठरवलं आणि त्याकरता खात्रीचे डीपफेक व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग तयार करण्याची योजना आखली. काही फेमस व्यक्तींची फसवणूक करणे, आर्थिक फायद्यासाठी त्यांचा वापर करणे हे अंतिम ध्येय श्रीकांतने समोर ठेवले होते. त्यासाठी त्याने कोडच्या बरोबरच काही ओळींचा समावेश करण्याचे ठरवले होते.
सुरुवातीला श्रीकांतने राजकीय व्यक्तींची धक्कादायक विधाने आणि मागण्या करणारे डीपफेक व्हिडिओ आणि व्हॉइस रेकॉर्डिंग तयार केले. त्यांचा फोटो वापरून सोशल मीडियावर त्यांचे बनावट प्रोफाइल आणि बनावट वेबसाइट्स तयार करून त्याने त्या फसव्या रेकॉर्डिंगचा प्रसार करण्यास सुरुवात केली. अनेक नागरिकांनी तो डीपफेक व्हिडिओ आणि ऑडिओ पहिला, ऐकला, त्यानंतर त्यांच्या मनात त्या व्यक्तींबद्दल एक प्रकारचा रोष निर्माण झाला होता. दरम्यान, आपण असे काहीच केलेले नाही, आपल्या नावाचा, फोटोचा वापर करून कुणीतरी असे उद्योग केले असल्याचे सांगत त्या व्यक्ती समोर आल्या. या सगळ्या कटामागे कोणीतरी समाजकंटक आहे, त्याने केलेल्या या कृत्याचा आपल्याला फारच तोटा होतो आहे, आपली नाहक बदनामी होत आहे, असे सांगून आणि या सगळ्या प्रकाराचा निषेध करून त्यांनी या सगळ्या प्रकाराची पोलिसात तक्रार केली.
दरम्यान, राजकीय व्यक्तींबरोबरच असा प्रकार कंपन्यांच्या काही प्रमुखांच्या बाबतीतही झाला होता. तो देखील सगळा फसवाच प्रकार होता. पण सुरुवातीला लोकांना तो खरा वाटला होता. इतकेच नाही, तर त्याचा मोठा फटका शेअर बाजाराला बसला होता, त्यामुळे मार्केटमध्ये काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आता पुढचे काही महिने काय होणार या भीतीपोटी गुंतवणूकदारांमध्ये गोंधळून टाकणारे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला गुंतवणूकदारांना हा प्रकार खरा वाटला होता. पण जेव्हा त्या कंपनीच्या अधिकार्‍याने खुलासा करून ‘आपल्या नावाचा, चेहर्‍याचा वापर करून हा बनावट व्हिडिओ बनवण्यात आलाय’असे सांगितले, तेव्हा हा सगळा फसवाफसवीचा प्रकार असल्याचे समोर आले होते. याच्या पाठीमागे कोण आहे, याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. प्रारंभी त्यांना क्लू मिळणे कठीण गेले. पण, तांत्रिक बाजूचा सखोल तपास करताना श्रीकांत नावाची व्यक्ती हे प्रकार करत असल्याचे निष्पन्न झाले.
श्रीकांतलाही याचा अंदाज आला होता. त्याने कधीच पळ काढला होता. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो इकडून तिकडे पळत होता. कधी तामीळनाडूमध्ये, कधी राजस्थान अशा राज्यांमध्ये तो फिरत होता. अखेरीस पोलिसांनी त्याला सुरतमधून अटक केली. तेव्हा आपणच हा प्रकार केल्याची कबुली त्याने दिली. एआय तंत्राचा वापर करून, त्या व्यक्तीचा चेहरा वापरून जागतिक बाजारपेठेत आगामी काळात कशा प्रकारची घसरण घडवून आणता येऊ शकते, त्याचा भांडवली बाजार, शेअर मार्केटवर कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो, हे दाखवून देण्यासाठी आपण हा कट रचल्याचे त्याने सांगितले. फसवणूक करणे आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानेच त्याने हे केले होते. प्रसिद्ध व्यक्ती, कंपन्यांचे अधिकारी यांच्या फोटोचा आणि आवाजाचा वापर करून त्याने हा प्रकार केला होता. पोलिसांनी त्याच्यावर फसवणूक करणे, आयटी कायदा यानुसार कारवाई करून त्याची रवानगी जेलमध्ये केली.

अशी घ्या काळजी

– डिटेक्शन प्रणालीचा वापर : एआय-चालित डीपफेक डिटेक्शन करण्यासाठी त्यामध्ये वापरण्यात आलेली फसवी सामग्री स्कॅन ओळखण्यासाठी एआय-चालित डीपफेक डिटेक्शन यंत्रणेचा वापर करा. या प्रणालीच्या माध्यमातून त्याचे नमुने आणि विसंगतीचे विश्लेषण करणे शक्य होते.
– प्रमाणीकरण : ऑनलाइन व्यक्तींच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी मजबूत वापरकर्ता प्रमाणीकरण आणि सत्यापन यंत्रणेचा वापर करा.
– डिजिटल स्वाक्षरीचा वापर करा : डिजिटल सामग्री आणि संप्रेषणांची सत्यता सत्यापित करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी आणि एन्क्रिप्शन वापरा.
– शिक्षण आणि जागरूकता : डीपफेक तंत्रज्ञानाचे अस्तित्व आणि जोखीम याबद्दल सार्वजनिक आणि संस्थांना शिक्षित करा. संभाव्य फेरफार केलेल्या सामग्रीचा सामना करताना त्याच्या पडताळणीला प्रोत्साहन द्या.
– द्वि-घटक प्रमाणीकरण : सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर जोडण्यासाठी ऑनलाइन खात्यांवर द्वि-घटक प्रमाणीकरण सक्षम करा.
– सामग्री प्रमाणीकरण साधने : व्यक्ती आणि संस्थांना फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगसारख्या डिजिटल सामग्रीची सत्यता पडताळण्याची परवानगी देणार्‍या साधनाचा वापर करण्यास प्राधान्य द्या.

Previous Post

पावसाळी सूप्स (डंपलिंग सूप्स)

Next Post

राशीभविष्य

Next Post

राशीभविष्य

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.