• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

करारा जवाब!

- ऋषिराज शेलार (गावच्या गोष्टी)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 7, 2025
in भाष्य
0

दरबार ए आम! गलथान ए हिंद, ब्यादश्या नौरंगजेब मोईद्दीन हातात कागद घेऊन काही पाठ करतोय. मोठमोठ्याने बोलण्यासाठी हिंमत एकवटवतोय. ‘किसी भी मुल्…’ तो बोलण्याचा प्रयत्न करतो. पण बारीक आणि चिरका आवाज निघतो. स्वतःच्याच आवाजाला दचकून तो खुर्ची मागे लपतो. तितक्यात दिवाण ए आममध्ये धिप्पाड वजीर अमानतुल्लाह शामेनी प्रवेश करतो. दिवाण ए आममधील सार्‍या खुर्च्या रिक्त आणि कुणाचाही मागमूस न दिसल्याने वजीर आश्चर्यचकित होतो. खुर्चीमागील नौरंगजेब दिवाण ए आममध्ये आलेल्या त्या भव्य आणि गूढ सावलीने आणखी भितो नि बसल्या (लपल्या?) जागी घट्ट डोळे मिटून अल्लाहतालाचा धावा सुरू करतो. एकाएक खुर्चीमागून पुटपुटण्याचा बारीक लयीचा आवाज जरा पुढील दर पावलागणिक वाढल्यागत वाटल्याने वजीर सावधपणे पुढे सरकतो. एक हात कट्यारवर ठेवत वजीर दबक्या पावलांनी खुर्चीच्या दिशेने जातो. पण गच्च डोळे मिटून श्वास रोखून अल्लाहचा धावा करणार्‍या नौरंगजेबाच्या सूक्ष्म कानांना कोल्हापुरी पायताणांचा अचूक वेध लागतो. ह्या वहाणा प्राडानं चोरू देत नाहीतर दरवड्यात वापरू दे- आवाज करणार म्हणजे करणार! मुळात कोणत्याही अपराध्यानं ह्या वहाणा वापरूच नयेत.
आवाजाच्या दिशेने जाणारा वजीर कट्यार उपसून खुर्चीच्या मागे उडी घेतो. हातात उंचावलेली कट्यार आणि दोन हात करण्याच्या पवित्र्यात उडी घेतलेला वजीर खुर्चीमागंच दृश्य बघून थबकतो, चपापतो, अवाक् होतो. अल्लाहचा धावा करणारा ब्यादश्या नौरंगजेब पायातील मोजडी काढून ती हल्ला, वार रोखण्यासाठी ढालीगत उंच धरून डोळे घट्ट मिटून बसलेला दिसतो.
‘चहापन्हा सुजून ए आला! आपण इथे बसलाय?’ वजीर शामेनी आश्चर्याने विचारतो.
‘हो, काय आहे ना? समोर खुर्चीवर बसल्यावर आमच्या हातातील पानं फार उडत होती. त्यात दारासमोरून येणार्‍या जाणार्‍या दरबारीजनांच्या, शिपायांच्या नजरा आमच्याकडं वळल्या की उगाच इश्श..! मोहरायला होतं!’ चहापन्हाच्या त्या चित्रविचित्र संमिश्र अदा बघून वजीर गोंधळतो!
‘चहापन्हा असं करून कसं चालेल? दरबार ए खास मध्ये आपणाला पचपन इंची छाती दाखवत ही वाक्यं बोलायची आहेत. मुल्कमधील दुश्मन आणि बाहेरील दुश्मन यांना एकच करारा जवाब द्यायचाय आपल्याला! हे ध्यानी आहे ना?’ अमानतुल्लाह नौरंगजेबांना आठवण करून देतो.
‘छट्! हर बार ये पाठ करना! सबके सामने बोल के दिखाना। कंटाळा आ गया है हमे। क्या सचमुच दिवाण ए आममें यह बोलना पडेगा?’ कंटाळवाण्या स्वरात नौरंगजेब!
‘अलबत खरूज! आपणाला हिंमत, शौर्य, साहस… हे… ये दाखवावंच लागेल!’ वजीर अमानतुल्लाह मेंदूवर जोर देत काही भारी शब्द आठवू बघतो.
‘श्शीः बाबा! दरवेळी आम्हीच का? तुम्ही हे… यांना… कोण रे ते? ते नाही का?…त्यांना का असं बोलायला लावत नाही?’ नौरंगजेब लटक्या रागात उठून खुर्चीवर बसत विचारतो.
‘खजूर ए भाला! त्या पदभ्रष्ट राजकुँवरने आपणाला ललकारलं आहे. एकतर जंग खुद और खुदाच्या मर्जीने थांबवली आहे असं सांगा! वा गोरा जनरल गम्पला भिऊन रणमैदान सोडून पळालात हे सांगा! असं बोलतोय तो!’ वजीर पोटतिडकीने समजावण्याचा प्रयत्न करतो.
‘त्यापेक्षा आम्ही पळून आलो असं थेट सांगून टाका, वजीरजी! आम्ही तोवर फाना, लुना वगैरे मुल्क फिरून येऊ! काय?’ नौरंगजेब बेफिकीरीने बोलतो.
‘चहापन्हा त्याने सगळीकडे आपणाची नाचक्की होईल. लोकं हसतील आपल्यावर!’ वजीर समजावणीच्या सुरात बोलतो.
‘हसण्यावरून आठवलं! आमच्या दरेक दौर्‍यात दुसर्‍या मुल्कच्या सुलतान, बादशहा वा किंगसोबत बोलताना बहुतेकदा त्यांची भाषा न कळाल्यास आम्ही मोठमोठ्याने हसून त्यांना मिठीत ओढतो. तशी लोकं हसतील ती न कळल्यानेच हसतील ना? मग हसू देत त्यांना! तसाही परदेश फिरताना आम्हांस बघून रडणारेच अलीकडे जास्त दिसताय. निदान इतका अपवाद झाला तरी पुरे! काय?’ नौरंगजेब निर्लज्जपणे हसत बोलतो.
‘बेअब्रू! बेअब्रू कराल चहापन्हा तुम्ही अश्याने! तुम्ही इतक्यात विसरलात तुमची आवेशपूर्ण पचपन इंचाची भाषणं? कुठेय तुमची ती छाती?’ वजीर जोश निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
‘महोदय कृपया संसदीय भाषा का इस्तेमाल किजीए। आप किससे बात कर रहे हो जानते हो?’ आवाजाला एक ठेहराव घेत नौरंगजेब करारी आवाजात प्रश्न करतो.
‘गलथान ए हिंद! मौफी असावी! खरुजांची खपली काढण्याचा हा प्रयत्न नक्कीच नव्हता! केवळ आपल्या इभ्रतीला…’ जीभ चावत कान धरत वजीर अजिजीनं बोलतो.
‘भिलात ना? बघा, आमच्या केवळ एक वाक्याची कमाल! असंच काही बोललं तर चालेल का?’ नौरंगजेब वजीराची फिरकी घेत सवाल टाकतो.
‘नाही चहापन्हा! त्या राजकुँवरला परखड भाषेत सांगावं लागेल. तो आपणाची बदनामी करत सुटलाय सगळीकडे!’ वजीर वास्तवाचं भान करवून देतो.
‘फिर वही मसला! तुम्ही १८५७मध्येच आहात का हो? आम्हाला ही कागदं पढवण्याऐवजी त्यांच्या हातातच कागदं पडणार नाहीत, अशी तजवीज तुम्ही का करत नाहीत?’ नौरंगजेब बाळबोध प्रश्न करतो.
‘ब्यादश्या! लोकं त्यांच्या पाठीशी आहेत नि ते बोलण्यासाठी कुठल्याही कागदावर निर्भर राहत नाहीत. त्यामुळं आपल्या सूचना फोल ठरतात,’ वजीर त्यांच्या मर्यादा बोलून दाखवतात.
‘तुम्ही त्यांना कैदेत का टाकत नाहीत? इदी सिभॉयला दारूगोळा देववून वेढ्यात का अडकवत नाहीत? ‘ नौरंगजेब प्रश्नांची सरबत्ती करतो.
‘चहापन्हा, त्यापेक्षा ही दोन वाक्य बोलणं अधिक सोपं आहे!’ वजीर मूळ विषयाकडे विषय वळवतो.
‘कि.. सी.. भी मुल्क के आगे, के दबाव में हम झुके नहीं, रुके नहीं! ‘ नौरंगजेब कागदावरील वाक्य अडखळत वाचतो.
‘चहापन्हा जरा जोरसे सीना तानकर बोलिए।’ वजीर नौरंगजेबाचा उत्साह वाढवतो. ‘पण इथे जनरल गम्पचं नाव होतं की! ते का गाळलंत?’ वजीर शंकेनं विचारतो.
‘आप ये सवाल मत पूंछना! वो गोरोंका सरदार जनरल गम्प बात बात पर रूठ जाता है! और फिर हमारी हर एक चीज पर बीस-पच्चीस गुना लगान लगा देता है! करे तो करे क्या? बोले तो बोले क्या?’ नौरंगजेब दुखभरी दास्तान सांगतो.
‘पण चहापन्हा आपण नाव घेतलंत तर्…’ वजीर समजावू बघतो.
‘दिल्लीमें मिनार, मिनार पे चांद!
चांद पर धब्बे, धब्बों की धुलाई!
धुलाई हुई जुलाई में, भोडाल के साथ में
गम्प का नाम लेता, नौरंगजेब अंधेरी रात में!
कैसन लगा वजीरजी? अच्छा है नं?’ नौरंगजेब फेर धरत नाव घेतो.
‘हम क्या कहेगे? कुछ तो लोग कहेंगे!’ बोलता बोलता अमानतुल्लाह शामेनी मटकन खाली बसतो.
‘डरपोक, मक्कार, पाजी, झूठा…’ मोठमोठ्याने बोलत हातवारे करत छ्याशक्कर येतो.
‘कुणास बोलतोय रे?’ अमानतुल्लाह लागलीच विचारतो.
‘ह्या… त्या… डरपोकला! पनीरला! मुजोर साला! जनरल गम्पच्या मांडीवर जाऊन बसलाय. वर खोट्या बाता पसरवतोय. बरं त्यामुळं सफेद महालात आम्हाला जाणं मुश्किल झालंय,’ छ्याशक्कर तावातावाने बोलतो. ‘तसंही तुमच्या जाण्याने वा न जाण्याने कितीसा फरक पडतो? नाही ना? सगळी जवळची दोस्त कौमे लाल्याशेठच्या कह्यात गेलीत. कुठे त्याला जमीन मिळालीय. कुठे खदानी! तर कुठे आणखी काही! तुम्ही एकवार सुद्धा कुणाला थांबवू शकला नाहीत. खरं आहे ना?’ वजीर सडेतोड बोलत छ्याशक्करची शाळा घेतो.
‘छ्याशक्कर काय खबरबात आणलीत?’ नौरंगजेब हालहवाला विचारतो.
‘चहापन्हा स्टेट ऑफ विलासाकडून आपणाला आमंत्रण आलंय. ते विलासवासी नावाने एक किताबत प्रदान करतील. तिथे गर्दीत तुम्हास बघून टाहो फोडणारी पिलावळ सुद्धा तिथे बोलावली आहे. असा साग्रसंगीत बेत तयार आहे.
‘व्वा! मग आताच आमची लवाजम्यासहित जाण्याची तयारी करावी. तशी वर्दीच बाहेर देऊन यावं.’ नौरंगजेब खुशीने आदेश देतो.
‘चहापन्हा हे कागदावरील ओळींचं वाचन… ते तुम्हाला बोलून दाखवावंच लागेल…’ वजीर पुनः आठवण करून देतो.
‘खास असो वा आम! दरबार आता तुम्हीच सांभाळा वजीरजी! आम्ही येतोच तीर्थाटन करून!’ नौरंगजेब पायाला भिंगरी लागल्या गत बोलतो.
‘पण हा करारा जवाब? तो द्यायचा राहिलं की!’ वजीर कागद पुढे करतो.
‘किसीं भी मुल्क के दबाव में हम झुके नहीं व रुके नहीं।’ ‘ना कोई घुसा है, ना घुसा थाच्या अफाट यशानंतर नौरंगजेब पुन्हा एक पाठ केलेलं वाक्य फेकतो. ‘बस इतना काफी है? मैने दिवाण ए आम में बोल दिया। आप दीवाण ए खास में बोल दो।’ म्हणत चहापन्हा पुन्हा पसार होतो.
‘भगोड़ा, डरपोक कही का!’ मागून कुणीतरी पुटपुटल्याचा आवाज येतो. पण बहिरा ब्यादश्या ऐकायला तिथं थांबत नाही.

Previous Post

होलोकॉस्ट अर्थात ज्यूसंहार

Next Post

संक्रमणानंतरचे ‘शुभ’वर्तमान!

Next Post

संक्रमणानंतरचे ‘शुभ’वर्तमान!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.