
एकनाथ शिंदे
कुणाकुणाला किती आवरू
एकापेक्षा एक भारी
तिकडून शहाजी डोळे वटारती
सीएम बघती गंमत सारी
दिला सल्ला यांना पोटे
फुटेस्तोवर खाऊ नका
गरीब बिचार्या वंचितांच्या
पोटावरती मारू नका
सगळे शिव्या देती मनात
निमुटपणे राग गिळतो
अगदीच ओव्हर झाल्यावरती
मुकाटपणे गावी पळतो
—– —– —– —–
रामदास कदम
बार बार देखो गाणे
हजारवेळा गायले
संकटात शिंदेंशिवाय
पाठी कुणी ना राहिले
काय सांगू बारची महती
सुंदर सुंदर बारबाला
नशा चढल्यावरती तुम्ही
म्हणाल कलिजा खलास झाला
कृपाशीर्वाद शिंदे यांचे
राहोत सदा आमच्यापाठी
हात धुवून लागू नका
सीएम तुम्ही आमच्यापाठी
—– —– —– —–
देवेंद्र फडणवीस
आमचे बघा किती सच्चे
सारे धुतल्या तांदळासारखे
त्यांच्यामुळे आम्ही बदनाम
दिवे लावती त्यांचे दिवटे
शक्य होतील तितके दिवस
नखरे यांचे बघून घेईन
गळ्यापाशी आले जर ते
क्षणात त्यांना फेकून देईन
लोकच यांना निवडणुकीत
शिकवतीलच चांगला धडा
तेव्हा डुबतील नेत्यांसंगे
पापांचा तो घेऊन घडा
—– —– —– —–
अदिती तटकरे
बहिणींबरोबर भाऊसुद्धा
सगळेच शेंड्या लावून गेले
बाप रे बाप किती लुटमार
माझे अवसान गळून गेले
फक्त केवळ मतांसाठी
शिंदेसीएमनी आणली योजना
काम झाल्यावरती फत्ते
घोटाळा हा कुणीच बघेना
जो तो येतो मलाच बोलतो
मी तरी त्याला करणार काय
फक्त मनातल्या मनात बोलते
त्यांच्या नाकात दोन पाय
—– —– —– —–
धनंजय मुंडे
उगाच आरोप माझ्यावरती
मी तर किती शुद्ध होतो
वाल्मिक कराड मित्र असला
तरीही त्याच्या कटात नव्हतो
त्याचे धंदे माहीत होते
त्याचा राजा तोच होता
असंगाशी संग नडला
एवढाच मुद्दा खरा होता
आता साधू संत बनून
येईन नक्की तुमच्या दारी
तेव्हा बघून म्हणू नका
कराडवाल्याची आली स्वारी