• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
July 7, 2022
in टपल्या आणि टिचक्या
0

□ योगी आदित्यनाथ थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरला धडकला पक्षी.
■ आता पक्ष्याच्या घरट्यावर बुलडोझर चालणार.

□ ५० कोटी रुपयांचा पाऊस पाडतो सांगून ठाकुर्ली-चोळेगाव येथे ५६ लाखांचा चुना लावून पुजार्‍यासह सहाजण फरार
■ पाऊस पडलाच, पण पुजार्‍यावर आणि साथीदारांवर… ५६ लाखांचा.

□ कुणाच्या ताकदीशिवाय शिंदे हे धाडस करणार नाहीत – एकनाथ खडसे
■ ती महाशक्ती सगळ्यांना माहिती होती… आता खुराड्यातून बाहेर येऊन कॉक कॉक पण करायला लागली आहे.

□ …तर बंडखोर आसामला का जाऊन बसले? – शरद पवार
■ इथे शिवसैनिकांना आणि शिवसेना पक्षप्रमुखांना दाखवायला तोंड आहे का?

□ सत्तेचा प्रस्ताव आल्यास विचार करू – मुनगंटीवार
■ मांजरी डोळे मिटून आइस्क्रीम खातायत.

□ बंडखोर १४ आमदारांना केंद्राची वाय प्लस सुरक्षा. कुटुंबीयांना संरक्षण द्या. राज्यपालांची मागणी
■ बिचार्‍या काश्मिरी पंडितांचं एवढं भाग्य नाही… त्यांचा उपयोग फक्त राजकारणापुरता… बाकी कायमस्वरूपी वार्‍यावर.

□ मोबाइलमुळे मुले हिंसक बनली आहेत का? कोरोनाकाळात वाढले मोबाइल वापरण्याचे प्रमाण
■ मोबाइलवर बिल कशाला फाडायचं? मोबाइलवर त्यांना काय पाहायला मिळतं ते चुकीचं आहे ना?

□ मोफत रेशन योजना बंद होणार. केंद्र सरकारला आर्थिक भार सोसवेना. ८० कोटी नागरिकांना फटका.
■ हळुहळू सगळ्यांना भिकेला लागायचं आहे… पैसा फक्त दोन मित्रांच्या मुठीत राहणार.

□ प्रत्येक भारतीयाच्या डीएनएमध्ये लोकशाही – नरेंद्र मोदी
■ तुम्ही डीएनएबदलाचं ऑपरेशन केलंय की काय!

□ आसाममध्ये २८ जिल्ह्यांना महापुराचा वेढा. राज्यात पावसाचे ११८ बळी.
■ सामान्य माणसं मरोत हो हवी तेवढी; आमचे ‘मौल्यवान’ आमदार सुरक्षित आहेत ना, मग झालं.

□ चीन सिंथेटिक ड्रग्जचे सेंटर. मेक्सिको सेल्समन. ग्राहक म्हणून दोघांचे टार्गेट भारत.
■ तीच सगळी गुजरातच्या बंदरात उतरतात काय?

□ राजकारणात ‘शॉर्टकट’ चालत नाही. लोकांना जास्त दिवस मुर्ख बनवले जाऊ शकत नाही – नितीन गडकरी
■ हे ज्यांना सांगताय, त्या सत्तामदांधांना सांगून काही उपयोग नाही गडकरी साहेब!

□ १०० कोटींपेक्षा जास्त पैशांचे आमिष दाखवूनही मी गेलो नाही – औरंगाबादमधील कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांचा गौप्यस्फोट
■ पक्षनिष्ठेची किंमत पैशांमध्ये करणं हे आईचं दूध विकण्यासारखंच आहे.

□ देशात फक्त एक टक्का लोक शास्त्रीय संगीत ऐकतात – राधा मंगेशकर
■ पण, ते सुस्थापित असतात, सुरश्रीमंतही असतात. त्यामुळे शास्त्रीय संगीताला बरकत असते.

□ धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे एकनाथ शिंदे यांच्या बंडावर नाराज.
■ अधर्मवीरांनी धर्मवीरांचा वारसा सांगितल्याने व्यथित झाले असतील ते.

□ आणीबाणीचा भयंकर काळ विसरू नका – नरेंद्र मोदी
■ तुम्ही विसरू द्याल तर विसरतील ना लोक? ती बरी होती, असं म्हणायची वेळ आली आता तुमच्या राज्यात.

□ पंतप्रधान मोदी त्यांच्या मित्रांना देशातील विमानतळ ५० वर्षांसाठी चालवायला ‘दौलतवीर’ करीत आहेत, तर तरुणांना चार वर्षांच्या कंत्राटावर ‘अग्निवीर’ करीत आहेत – राहुल गांधी यांची टीका
■ त्या विमानतळांवर सुरक्षा कर्मचारी नकोत का नंतर? यालाच म्हणतात मित्रप्रेम आणि दूरदृष्टी.

□ अन्य पक्षात वाल्या, भाजपमध्ये गेल्यावर वाल्मिकी – अजय चौधरी
■ भ्रष्टाचाराला आपल्यातच सामावून घेऊन ते भ्रष्टाचारमुक्ती साधत आहेत.

□ बोलण्यासारखे काही नाही म्हणून फडणवीसांचे मौन – चंद्रकांतदादा पाटील
■ आता बोलू लागतील घडाघडा.

□ इस्लाम, ख्रिस्ती धर्म राजकीयच! सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
■ हिंदू धर्म तसा नव्हता, तो आता तुमच्याच अनुयायांनी बनवायला घेतलाय.

Previous Post

शिवसेनेशी गद्दारी, राजकारणातून हद्दपारी!

Next Post

शिक्षण आयटीआय; कर्तबगारी आयआयटीच्या तोडीची!

Next Post

शिक्षण आयटीआय; कर्तबगारी आयआयटीच्या तोडीची!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.