• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बेडकीचा फुगून बैल होईल काय?

(संपादकीय ९ जुलै २०२२)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 7, 2022
in संपादकीय
0

शिवसेनेत फूट पाडून अखेर ईडी सरकार सत्तेवर आले आहे. ईडी ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची आद्याक्षरे आहेत. त्याचबरोबर या सरकारच्या स्थापनेत ईडी या भारतीय जनता पक्षाची सर्वात सक्रिय शाखा बनलेल्या यंत्रणेने जी मोलाची भूमिका बजावली आहे, ती ती पाहूनही लोकांनी याला ईडी सरकार म्हटले आहे. वास्तवात काही भेदक योगायोग जुळून येतात ते असे.
वस्तुत: हे सरकार डीई सरकार असेल, म्हणजे मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे असतील, अशीच सगळ्यांची अटकळ होती. मात्र, ऐनवेळी देवेंद्र फडणवीसांच्या मास्टर स्ट्रोकवर पाणी फिरवणारा ‘हिज मास्टर्स स्ट्रोक’ दिल्लीतून मारला गेला आणि फडणवीस यांना अतिशय अपमानास्पद पद्धतीने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला भाग पाडले गेले. काँग्रेसच्या काळात दिल्लीचे पक्षश्रेष्ठी किंवा हायकमांड कशी राज्यातल्या नेत्यांना आपल्या तालावर नाचवते, यावर फिदीफिदी हसणार्‍यांना त्यांच्याच लाडक्या पक्षात, त्यांच्याच लाडक्या ज्युनियर चाणक्यावर हा प्रसंग ओढवलेला पाहण्याची पाळी आली. फडणवीस यांना हा निर्णय आधीच सांगितला असता तर त्यांची बेअब्रू झाली नसती. पण आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नाही, आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ अशी घोषणा ज्युनियर चाणक्यांनी केल्यानंतर सिनियर चाणक्यांचे फोन आले आणि फडणवीसांना पक्षादेशापुढे मान तुकवावी लागली, तेव्हा अनेक घरांमधल्या पुरणपोळ्या बेचव होऊन गेल्या.
हा सगळा धक्कातंत्राचा प्रयोग होत होता, तेव्हा राज्यात आदल्या रात्रीच पायउतार झालेले मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निरोपाच्या भाषणाने भारावलेले वातावरण होते. शिवसेनेने मोठे केलेल्या, सगळे काही दिलेल्या माणसांनीच शिवसेनेशी गद्दारी केली, आपल्या आईचे दूध बाजारभावाने विकायला काढले, हे पाहून सर्वसामान्य शिवसैनिक शोकसंतप्त झाला होताच; पण, महाराष्ट्राच्या इतिहासात, किंबहुना देशाच्या इतिहासात कधी घडले नसेल, असे आक्रीत उद्धवजींच्या राजीनाम्याने घडवून आणले होते. जे शिवसेनेचे परंपरागत मतदार नाहीत किंबहुना ज्यांनी शिवसेनेला कायम विरोधच केला आहे, असे अनेक लोक उद्धवजींच्या पायउतार होण्याने महाराष्ट्राने एक संयमी, धीरोदात्त, सज्जन मुख्यमंत्री गमावला आहे, याने खंतावले होते. समाजमाध्यमांवर लोक हळहळ व्यक्त करत होते. ही सहानुभूतीची लाट इतकी जोरदार होती की तिच्यामुळे फडणवीस यांची प्रतिमा कुटील, कारस्थानी, सत्तेला हपापलेले राजकारणी अशी होत आणखी काळवंडत चालली होती. सत्तेसाठी हातातल्या सगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग करणारा, सगळ्या देशावर ‘शत प्रतिशत’ सत्ता स्थापन करण्याच्या लालसेने विकृत पद्धतीने झपाटलेला पक्ष अशी भाजपची प्रतिमा आधीपासूनच आहे. बुलडोझर-बदनाम राज्यांमध्ये ती चालून जाते. महाराष्ट्रात ही प्रतिमा अंगलट येईल हे भाजपचे वरिष्ठ नेते जाणून असावेत. त्यामुळे उद्धवजींबद्दलच्या सहानुभूतीची लाट थोपवणं आवश्यक होतं. शिवाय भाजपने बटीक बनवलेल्यांपैकी चुकून एखाद्या यंत्रणेमध्ये न्यायबुद्धी, स्वाभिमान, कणा वगैरे शिल्लक असेल आणि त्यातून शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे पतन घडून आलेच तर आपल्याला नामानिराळे राहता येईल, असाही विचार फडणवीस यांच्या डिमोशनमागे असणार. शिवाय अशाप्रकारे फोडाफोड्या करून बनलेल्या सरकारमध्ये पहिल्या दिवसापासूनच अंतर्विरोध असतात. ही गाजराची पुंगी मोडून खाण्याची तयारी ठेवायची असतेच. तेच भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्त्वाने केले.
हे सगळे नाटक सुरू असताना समाजमाध्यमांमधले ट्रोल आणि भक्तगण वापरून फडणवीस यांच्याबद्दल सहानुभूतीची कृत्रिम लाट निर्माण करून उद्धवजींच्या लाटेला शह देण्याचा एक केविलवाणा प्रयत्नही यानिमित्ताने करून पाहिला गेला. फडणवीसांशी असे वागून भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्त्वाने महाराष्ट्राचा अपमान केला आहे, असा एक शोध काहींनी लावला आणि (पक्षभेद विसरून) सगळ्या महाराष्ट्राने फडणवीस यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे छुपे आवाहन केले गेले. हा फडणवीसविरोधी तीव्र भावना बोथट करण्याचाच प्रयत्न होता. मुळात, महाराष्ट्राने हळहळावे असे फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी काय केले आहे? त्यांच्या अपमानाने फार तर गुजरातच्या जनतेने व्यथित व्हावे, कारण, फडणवीस यांनी दिल्लीच्या हाताला हात लावून मम म्हणून महाराष्ट्रातील उद्योगधंदे, कार्यालयं आणि मुंबईचा रूबाब गुजरातला पळवून नेण्याच्या कामात जमेल तेवढा हातभार लावला आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी कसे पक्षादेशाचे पालन केले, शिस्त महत्त्वाची, आमच्या संघटनेत प्रत्येकजण कार्यकर्ता असतो, वगैरे ज्ञान पाजळले गेले. हे सगळे गुण फडणवीस शिवसेनेत शिस्त मोडून, पक्षादेश झुगारून सोबत आमदारांबरोबर सरकार स्थापन करत असताना ज्यांना आठवत होते, त्यांच्या धारिष्ट्याची आणि निलाजरेपणाची कमाल आहे. फडणवीस २०१९च्या निवडणुकीच्या आधीपासून ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे म्हणत होते (भाजप पुन्हा येईल आणि मी पक्ष ठरवेल ते करेन, असे म्हणत नव्हते), तो पक्षादेश होता का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जसा नेहरूगंड आहे- त्यांना ज्याप्रमाणे पं. जवाहरलाल नेहरूंची बदनामी करत प्रतिनेहरू बनायचे आहे, त्याप्रमाण्ो फडणवीस यांना पवारगंडाने ग्रासलेले आहे. त्या भरात त्यांनी शरद पवारांचे राजकारण संपले असे आततायी विधान केले आणि पवारांनी उत्तरादाखल त्यांचे तेव्हाचे मनसुबे संपुष्टात आणून दाखवले. पवारांना अडीच जिल्ह्यांचे राष्ट्रीय नेते असे हिणवण्यात फडणवीस यांचा परिवार आघाडीवर असतो. पवारांनी पटले नाही तेव्हा मातृपक्षातून बाहेर पडून स्वबळावर पक्ष स्थापन केला आणि तो आतापर्यंत चालवून दाखवला आहे. फडणवीस यांच्यात तशी धमक आहे का? नसेल तर मग पक्षशिस्त पाळण्याशिवाय गत्यंतर काय?
त्यांच्या महाशक्तीने आता (विधानसभाध्यक्षांच्या निवडीपर्यंत) १६४चा आकडा गाठला आहे, या आकड्यातील सत्य काय? सत्तेच्या साठमारीत भाजपच्या विचारधारेवर ज्यांची निष्ठा आहे, असे मूळ भाजपचे कार्यकर्ते नगण्य होऊन बसलेले आहेत. आदल्या रात्री ज्यांच्यावर भ्रष्टाचारशिरोमणी म्हणून आरोप करायचे, त्यांच्याचबरोबर दुसर्‍या दिवशी सत्ता स्थापायची, हा सत्तालोलुप निर्लज्ज व्यवहार या मूळ भाजपच्या सचोटीच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांची संख्या किती आहे? भाजपची खरी ताकद (अजून शिल्लक असली तर) तेवढीच आहे. बाकी वेगवेगळ्या यंत्रणा वापरून, लालूच दाखवून पक्षापक्षांतून हुसकावून आणलेल्यांची खोगीरभरती आहे. ज्या पक्षाने संधी दिली, वाव दिला, सगळी साधनसंपत्ती दिली, त्या पक्षाचेही जे झाले नाहीत, ते भाजपचे काय होणार आहेत? भाजपच्या बेडकीचा अशा प्रकारे फुगून बैल होणार आहे का?
तरीही हा एवढा अट्टहास करून भाजपला काय साधायचे आहे? महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य बरबाद होत होते आणि आता त्याची एकदम भरभराट होऊ लागणार आहे, असा भाजपने आव आणला तरी तो खरा आहे का? सत्ता स्थापन होताच, विधिमंडळात बहुमत सिद्ध होण्याच्या आत नव्या सरकारने दोन निर्णय केले, ते फार मनोज्ञ आहेत. एक निर्णय मेट्रोची कारशेड आरेच्या जंगलातच होणार, हा आहे. दुसरा भ्रष्टाचार जिरवणारी योजना अशी बदनामी झालेल्या जलयुक्त शिवार योजनेचे पुनरागमन आहे, हा आहे. आरेच्या जंगलातली झाडं रात्रीच्या अंधारात चोरट्यासारखी कापली गेली होती, याची आठवण मुंबईकरांना करून दिली गेली आणि कांजूरची जागा कारशेडसाठी उपलब्ध करून देण्याऐवजी आरेमध्येच कारशेड होणार, अशी उद्दाम घोषणा केली गेली ती कशासाठी? मुंबईच्या फुप्फुसांना नख लावून फडणवीस यांना कोणाचे हित साधायचे आहे? ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन’ची मजबुरी नेमकी कशातून आलेली आहे? जिच्यापायी एकेकाळच्या आपल्याच ज्युनियर मंत्र्याच्या हाताखाली काम करणेही त्यांनी गोड मानून घेतले आहे? हे सरकार यापुढे महाराष्ट्रहिताचे काय काम करणार आहे, त्याचे दर्शन या निर्णयांमधून घडायला हरकत नाही.
खरेतर हे शिवसेना कायमची संपवण्याचे कारस्थान आहे.
ज्या शिवसेनेच्या खांद्यावर बसून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा वापरून हा पक्ष राज्यभर विस्तारला, त्याच मित्रपक्षाला कायमचे संपवण्याचा हा डाव आहे. २०१४च्या निवडणुकीनंतर जे झाले त्यातून बोध घेऊन उद्धव ठाकरे यांनी खमकेपणाने शिवसेनेला सोबत ठेवून संपवण्याचा भाजपचा डाव हिंमतीने उलटवून दाखवला आणि विश्वासघात करणार्‍या, वचनभंग करणार्‍या भाजपच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडी बनवण्याचे धाडसही करून दाखवले. त्याचबरोबर त्यांनी भाजपच्या बनावट हिंदुत्वाच्या कासोट्याला हात घातला, हिंदुत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत अशी सर्वसमावेशक व्याख्या करून दाखवली, राज्यात जातीय, धार्मिक तेढ निर्माण होऊ दिली नाही, सर्वधर्मीयांच्या मनात विश्वास निर्माण केला, हे खरे दुखणे आहे.
महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासूनच ही अनैसर्गिक आघाडी आहे, नैसर्गिक युती भाजपबरोबरच आहे, असे टुमणे भाजपने लावले होते. मुळात काँग्रेस पक्षाबरोबर शिवसेनेने आताच सोबत केलेली नाही; आणीबाणीला पाठिंबा देण्यापासून अनेक वेळा, महाराष्ट्रहित किंवा मराठी माणसाची अस्मिता लक्षात घेऊन शिवसेनेने काँग्रेसबरोबर सहकार्य केले आहे, एकत्र मेळावेही घेतले आहेत. निवडणूकही लढवली आहे. भाजपने तर मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार चालवून झाले आहे, ती ‘नैसर्गिक’ युती होती काय? (असावी, कारण अलीकडे हिंदूविरोधी कारवाया करणारे मुस्लिम भाजपचे कार्यकर्ते किंवा आयटी सेलप्रमुख असल्याचे उघड होते आहे). गेल्या काही वर्षांमध्ये, भाजपबरोबर युती झाल्यानंतर शिवसेनेने कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे, त्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या आहेत. तरीही त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाने, हाताशी सत्ता असतानाही शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली नाही, तसे कारस्थान केले नाही. ते या तथाकथित मित्रपक्षाने करावे! त्याने पाठीत खंजीर खुपसावा! त्याला बाळासाहेबांचे सैनिक म्हणवणार्‍यांनी साथ द्यावी!
ज्या राज्यात आपल्याला कोणी विचारत नाही, तिथे एखाद्या पक्षाबरोबर युती करायची आणि शिरकाव करून घ्यायचा. त्या पक्षाच्या खांद्यावर बसून त्या राज्यात बस्तान बसवायचं. मग वेळ आली की त्या पक्षाला लाथ मारायची, त्याला संपूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा कट आखायचा, हे भाजपचे अनेक राज्यांतील धोरण राहिलेले आहे. प्रादेशिक पक्ष संपवायचे, एकमेव राष्ट्रीय प्रतिस्पर्धी Dासलेल्या काँग्रेसला शबल करायचे आणि देशावर एकचालकानुवर्ती सत्ता स्थापन करायची, असे हे फॅसिस्ट धोरण आहे. त्यात मुंबई गुजरातची होती, ती महाराष्ट्राला दिली गेली, असा एक वेगळा सल आहे. आधीच्या सत्ताकाळात मुंबईतील उद्योगधंदे, कार्यालये हटवून, मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या काहीही उपयोगाची नसलेली बुलेट ट्रेन आपल्यावर लादून मुंबईला गुजरातची बटीक बनवण्याचे षडयंत्र रचले गेले. त्यात अडथळा आहे तो शिवसेनेचा. महामुंबईमधले मराठीजनच नव्हेत, तर अमराठी बांधवही शिवसेनेला मतदान करतात. त्यांच्यासाठी अडीअडचणीला शिवसेनाच धावून जाते. शिवसेना संपली की मराठी अस्मितेचे राजकारण संपून जाईल आणि भाजपप्रणित हिंस्त्र आणि खोट्या हिंदुत्वाचा बुलडोझर महाराष्ट्रभर फिरवता येईल, अशी या पक्षाची कल्पना आहे, ती त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. म्हणून बेडकीला बैल बनण्याची घाई झाली आहे.
त्यात आपल्या काही माणसांनी सहभागी व्हावे आणि महाराष्ट्रविरोधी भाजपचे मांडलिक बनून या बुलडोझरचे चालकत्व पत्करावे, ही शिवसैनिकांसाठी फार खेदाची गोष्ट आहे. मात्र, शिवसेना संकटांमध्ये तेजाने तळपून उठते हा इतिहास आहे आणि बंडखोरांना, गद्दारांना मराठी माणूस कधी माफ करत नाही, त्यांना मातीत गाडतो, हाही इतिहास आहे. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता करावी लागणार आहे. शिवसैनिकांनाच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाला आता डोळ्यांत तेल घालून जागे राहावे लागणार आहे… कारण रात्र वैर्‍याची होतीच, आता दिवसही वैर्‍याचे आले आहेत! बेडकीचा फुगा फोडायला सज्ज व्हा!

Previous Post

नया है वह…

Next Post

महाराष्ट्र हळहळला

Related Posts

संपादकीय

रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

June 8, 2023
संपादकीय

बारसू पाकिस्तानात आहे काय?

May 5, 2023
संपादकीय

आता राष्ट्रीय जनगणना कधी?

April 27, 2023
संपादकीय

पुढे काय होणार?

April 20, 2023
Next Post

महाराष्ट्र हळहळला

शिवसेनेशी गद्दारी, राजकारणातून हद्दपारी!

शिवसेनेशी गद्दारी, राजकारणातून हद्दपारी!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.