हे व्यंगचित्र आहे १९७८ सालातले. म्हणजे ४४ वर्षांपूर्वीचे. मुंबईत मराठी माणसाला त्याच्या हक्काची प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी स्थापन झालेली शिवसेना अवघ्या १२ वर्षांची होती. त्या काळातही मुंबई महानगरपालिकेत मराठी एकजूट होता कामा नये, यासाठी बाकीचे पक्ष जंग जंग पछाडत होते आणि तेव्हाही मराठीजनांच्या मुळावर उठलेले फितूर दगाफटका करत होते. त्यांच्याविषयीच्या प्रखर संतापातून बाळासाहेबांनी साक्षात छत्रपती शिवरायांना मुखपृष्ठावर अवतीर्ण केले. महाराजांच्या काळात फंदफितुरी करणार्यांचा कडेलोट केला जायचा. महानगरपालिकेतल्या तेव्हाच्या फितुरांनी मात्र मराठी एकजुटीचा कडेलोट करण्याचा प्रयत्न केला. अशा गद्दारांना गाडून, त्यांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेनेची वाटचाल सुरूच राहिली आणि तिने मंत्रालयावर शिवरायांचा भगवा फडकवण्याचा पराक्रम केला… आजही काही फितुरांनी मुंबई महानगरपालिकेवरचा मराठी ठसा पुसून ती परप्रांतीयांना आंदण देण्याची सुपारी घेतली आहे… आता जनता जनार्दनच यांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही.