• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंबईच्या धकाधकीत…

- सचिन परब (प्रबोधन १००)

सचिन परब by सचिन परब
January 7, 2022
in पंचनामा
0

जानेवारी १९१०मध्ये प्रबोधनकारांचं लग्न झालं. त्यानंतर ते दादरला स्थायिक झाले. राम एजन्सीमधली त्यांच्या नोकरीने त्यांना मुंबईकर चाकरमानी आयुष्याशी तोंडओळख करून दिली. पण त्याचबरोबर त्यांच्या अंगभूत कौशल्यांना प्रोत्साहन देण्याचं महत्त्वाचं कामही केलं.
—-

१९०९च्या सप्टेंबर महिन्यात प्रबोधनकारांना सेल्समनची नोकरी मिळाली आणि चार महिन्यांत त्यांचं लग्न ठरलं. बहिणीचं लग्न झाल्यानंतरच त्यांनी बोहल्यावर चढण्याचं ठरवलं होतं. त्यांच्या बहिणीची सोयरीक अलिबागजवळच्या एका गावातल्या कुळकर्णी कुटुंबाशी ठरली. या गावाचं नाव `माझी जीवनगाथा’मध्ये एका ठिकाणी वरसीली आणि दुसर्‍या ठिकाणी वरसयी असं आलंय. पुस्तकाच्या नव्याजुन्या सगळ्या आवृत्त्यांत हा घोळ आहे. त्यामुळे गावाचं नेमकं नाव कळत नाही. रायगड जिल्ह्यात वरसई गाव आहे. पण ते अलिबागपासून बरंच लांब पेण तालुक्यात आहे. वरसीली नावाचं तर गावच नाही. या संदर्भात शोध घेतल्यावर लक्षात येतं की ते गाव वरसोली आहे. फक्त सव्वा किलोमीटर अंतरावरचं हे गाव आता वाढत्या अलिबागचाच भाग बनलंय. इथली चौपाटी आणि विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे. या गावात कायस्थांची आणि त्यातही कुळकर्णी आडनावाच्या कुटुंबाची वस्ती होती, याची खात्रीशीर माहितीही मिळालीय. पण त्या गावात जाऊन आणखी खोलात शोध घ्यावाच लागेल, कारण याच गावात १९१० सालच्या जानेवारीत प्रबोधनकारांचं लग्न झालं होतं.
प्रबोधनकारांचं लग्नही बहिणीच्या लग्नासोबतच एकाच मंडपात करायचं ठरलं. लग्नासाठी प्रबोधनकारांनी गुप्ते मंडळींना प्रवासाचा खर्च पाठवून परतवाड्याहून अंधेरीच्या बिर्‍हाडी बोलवून घेतलं. तिथून ही सगळी वर्‍हाडं वरसोलीला गेली. तिथे ही दोन्ही लग्नं पार पडली. एक आनंददायी गोष्ट ही की प्रबोधनकारांचं लग्न झालं त्या वरसोली गावात आज त्यांच्या मुलाचं म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक छोटं स्मारक उभं राहिलंय. शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेने उभ्या राहिलेल्या भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीच्या युनिटने वरसोली बीचजवळ एक टुमदार गेस्ट हाऊस बांधलंय. त्याचं उद्घाटन गेल्या वर्षीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं.
या कामगार संघटनेचं काम खरं तर स्थानीय लोकाधिकार संघटनेच्या मोठ्या पसार्‍याचा एक भाग आहे. स्थानीय लोकाधिकाराचा म्हणजे स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी संघर्षाचा विचार शिवसेनेच्या स्थापनेच्याही ४४ वर्षं आधी म्हणजे १९२२मध्ये प्रबोधनकारांनीच पहिल्यांदा मांडला होता. त्याच प्रबोधनकारांच्या लग्नाचं साक्षीदार असलेलं हे गाव, प्रबोधनकारांनी सख्खी बहीण दिलेलं हे गाव आज शिवसेनाप्रमुखांच्या आठवणीही जपतंय. भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या या गेस्ट हाऊसचं नाव आहे `दैवत’ आणि त्यात दर्शनी भागात शिवसेनाप्रमुखांचं एक छान म्युरलही आहे. आता या संघटनेतले शिवसैनिक वरसोलीत कुटुंबासोबत सहलीला येत असतील. त्याच गावात कदाचित शिवसेनाप्रमुखही लहानपणी आत्याच्या घरी सुटीसाठी आलेही असतील.
लग्नानंतर प्रबोधनकारांनी अंधेरी सोडून कायमस्वरूपी दादरला घर करायचं ठरवलं. त्यासाठी नवीनच बांधलेल्या मिरांडाच्या चाळीत त्यांनी बिर्‍हाड केलं. प्रबोधनकार त्याविषयी लिहितात, `दादरचा नि माझा संबंध प्रथम सन १९०५चा असला, तरी `गृहेतिष्ठतिय: स: गृहस्थ:’ म्हणून सन १९१०ला येथील माझी वस्ती अथवा वसाहत कायम झाली. म्हणजे आज साठावर वर्षे मी दादरकर म्हणून येथे आहे.’ घर घरवाल्याची वाट बघत असतं, हे प्रबोधनकारांनी दिलेलं संस्कृत सुभाषित त्यांच्या बाबतीत खरंच ठरलं. ते पुढे दादर सोडून गेले आणि बर्‍याच वर्षांनी सातारा, पुणे, कर्जत, भिवंडी करून परत दादरला आले, तेव्हा मिरांडाच्या चाळीनेच त्यांना आपलं म्हणून स्वीकारलं.
लग्नानंतर प्रबोधनकार रूढ अर्थाने नोकरदार बनले. त्यातल्या सुरवातीच्या काळात म्हणजे १९१० ते १४ दरम्यान ते खासगी नोकरीत होते. तो काळ प्रबोधनकारांनी आत्मचरित्रात मस्त रंगवला आहे. पहिल्या महायुद्धाच्या आधीचा तो काळ खर्‍या अर्थाने जागतिकीकरणाचा होता. औद्योगिक आणि व्यापारी केंद्र म्हणून प्रचंड वेगाने विकसित होणारं मुंबई शहर जगातलं एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र बनलं होतं. जगभरातल्या कंपन्यांची ऑफिसं आणि एजन्सी मुंबईत होत्या. प्रबोधनकार काम करत असलेली राम एजन्सी रेल्वे क्लेम वसूल करण्याच्या कामाबरोबरच परदेशी माल विकणारी कमर्शियल एजन्सी म्हणून नावारूपाला आली होती. फोर्ट परिसरातल्या त्यांच्या ऑफिसात टाइपरायटर्स, डुप्लिकेटर्स, कॉपियर्स अशा परदेशी बनणार्‍या यंत्रांच्या विक्री आणि दुरूस्तीचं काम होत असे. त्यांचा व्यापार जगभर सुरू असायचा. प्रबोधनकार म्हणतात तसं `लंडन, बर्लिन, बेल्जम, पारिस आणि अमेरिका म्हणजे व्यापारी क्षेत्रात परसातल्या शेवग्यासारखे आम्हाला अगदी नजीकचे वाटायचे. हात घातला की शेंगाच शेंगा.’
मुंबईचं जगभराशी संपर्क ठेवण्याचं साधन त्या काळात बोटीने येणारं आणि जाणारं टपाल असायचं. बोटींतून आलेलं परदेशातलं टपाल दर शुक्रवारी सकाळी नऊ दहाच्या सुमारास मुंबईतल्या व्यापारी पेढ्या, बँका आणि ऑफिसांमध्ये पोचायचं. त्यामुळे शुक्रवारी नेहमीपेक्षा एक तास आधीच ऑफिसं भरायची. शेकडो पत्रांच्या नुसार कामं करण्यात आणि पत्रोत्तरं देण्याची दिवसभर धावपळ असायची. टाइपरायटर्स खडाडत असायचे आणि फोन खणाणत असायचे. रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत कामं चालायची. त्यामुळे रस्त्यात मित्र भेटला तरी तो पहायचा नाही, असं प्रबोधनकार सांगतात. बोरीबंदरच्या सेंट्रल पोष्ट ऑफिसात शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत परदेशी पाठवायचं टपाल पोचवावं लागायचं. त्यामुळे शनिवारी सकाळीच ऑफिसं उघडायची आणि वेळ गाठण्यासाठी धावपळ व्हायची. बारा वाजल्यानंतर फोर्ट भागात शुकशुकाट होऊन जायचा. कारण अनेक नोकरदार आठवड्याची सुटी साजरी करण्यासाठी प्लेजर ट्रिपला जायचे. त्यांच्या सहलींची ठिकाणं ही वांद्रे ते विरार भागात होती. कारण तेव्हा तिथे फारशी वस्ती नव्हती आणि शेतीवाडी चालायची. तिथे ट्रिप काढणारे क्लबही तेव्हा होते.
तेव्हाच्या मुंबईकर चाकरमान्यांच्या धावपळीचं वर्णन प्रबोधनकारांनी केलंय. ते वाचल्यावर अजून त्यात फारसा फरक पडला नसल्याचं जाणवेल, `सन १९१० ते १९१४च्या आगष्टापर्यंतचा मुंबईकरांच्या जीवनाचा काळ अगदी एकसुरी बनला होता. स्वदेशी आणि बहिष्काराच्या आंदोलनाने लोकमत इंग्रेजांविरुद्ध कितीही खळबळलेले झालेले असले, तरी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कसलाही काही बदल नव्हता. तीच नोकरी, त्याच सांजसकाळच्या आगगाड्या, तेच न् तेच ठराविक गाडी दोस्त, तीच हॉटेले नि तेच टिफिनचे पदार्थ! बाहेर बिटिशांविषयी तळतळाट, पण रोज हापिसातत्याच गोर्‍यांपुढे यस्सरयस्सर करणारे आम्हीच. नोकरमान्य लोकांची ही अवस्था होती, तरीही नोकरीच्या फंदात न पडता, स्वतंत्र काहीतरी हुन्नरीचा उद्योग करून इभ्रतीने पोट भरणार्‍या लोकांची संख्याही काही कमी नव्हती.’
तात्यासाहेब परांजपेंसारखा गुणग्राहक मालक असल्यामुळे प्रबोधनकारांना नोकरीत राहून नवनवीन कौशल्यं शिकता येत होती. प्रबोधनकारांना क्षमतेपेक्षा कमी पगार देत असल्याची जाणीव असल्यामुळे तात्यासाहेब त्यांना फावल्या वेळात नेहमीपेक्षा वेगळं काम सोपवून त्यांना जादा कमाईची संधी देत असत. कंपनीच्या मशीन दुरुस्तीच्या वर्कशॉपमध्ये प्रबोधनकार काम करत. पण त्यापेक्षाही एक महत्त्वाचं कौशल्य प्रबोधनकार तात्यासाहेबांमुळे शिकले, ते जाहिरातीचं. व्यापारविश्वाची तसंच जाहिरात कलेची माहिती देणारी मासिकं जगभरातून कंपनीत येत. ती आल्यावर प्रबोधनकारांच्या टेबलावरच पडत. एकदा `मर्कंटाइल गार्डियन’ नावाचं साप्ताहिक वाचताना प्रबोधनकारांच्या लक्षात आलं की त्यांची कंपनी ज्या परदेशी कंपनीशी नव्याने व्यापार सुरू करणार होती, ती लबाडी करणारी आहे. त्यामुळे कंपनीला होणारं नुकसान टळलं. त्याने तात्यासाहेब खुश झाले.
जाहिरात क्षेत्रातली नवीन तंत्रं शिकण्यासाठी लंडनचं `अडव्हर्टायझिंग अडव्हर्टायझिंग’ हे जाडजूड मासिक प्रबोधनकारांना तिथेच वाचायला मिळायचं. त्यामुळे या पासष्टाव्या कलेचा पायाभूत अभ्यास झाल्याचं प्रबोधनकारांनी नोंदवलं आहे. तात्यासाहेबांचे प्रो. बोस नावाचे एक हिप्नॉटिस्ट मित्र मुंबईला जाहीर कार्यक्रम करण्यासाठी आले होते. त्यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी तात्यासाहेबांनी स्वीकारली होती. त्यासाठी मोठी कापडी होर्डिंग रंगवण्याचं काम प्रबोधनकारांनी स्वत:हून मागून घेतलं आणि यशस्वीपणे पार पाडलं. शिवाय एका कंपनीसाठी मोठ्या आकाराच्या अक्षरांवर सोनेरी रंग देण्याचं कामही तात्यासाहेबांनी प्रबोधनकारांना मिळवून दिलं होतं. जाहिरात विषयातली त्यांची गती लक्षात घेऊन कंपनीच्या प्रत्येक प्रसिद्धी मोहिमेत त्यांना सामावून घेतलं जायचं. जाहिरातींचा मजकूर आणि चित्रं तयार करण्याचं कामही ते करत.
पुढच्या काळात प्रबोधनकार अनेक वर्षं जाहिरात आणि प्रसिद्धीच्या क्षेत्रात कार्यरत होते. `साप्ताहिक प्रबोधन’मधल्या जाहिरातीही त्यांच्या कल्पकतेची साक्ष देतात. त्याची मुळं प्रबोधनकारांच्या या खासगी नोकरीतल्या धडपडीतच दिसून येतात.

Previous Post

स. न. वि. वि.

Next Post

विघटनवादी कोरोनाचा नाश करण्याची संधी!

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
पंचनामा

कर भला, तो हो भला!

April 25, 2025
Next Post
विघटनवादी कोरोनाचा नाश करण्याची संधी!

विघटनवादी कोरोनाचा नाश करण्याची संधी!

मदारी आणि माकडाचं पिल्लू

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.