साक्षी मलिक
थातूर मातूर कारणे देऊन
न्याय दिल्याची नाटकं केली
स्त्री मल्लांचा रट्टा बसताच
इलेक्शनने जाग आली
जायची अब्रू केव्हाच गेली
ब्रिजदूषण उघडा पडला
इतके दिवस कानात बोळे
भाजपचा तर श्वासच कोंडला
स्त्री मल्लांचे शोषण होता
नाही कुणी धावून आले
इतका काळ गेल्यावरही
मंदिर बांधत पावन झाले
—– —–
नरेंद्र मोदी
इतकी बांडगुळे पोसलीत आम्ही
ब्रिजदूषण हा त्यातलाच एक
केवढी त्याची पॉवर मोठी
भाजपाशी तर एकदम नेक
केवढे मोठे बस्तान त्याचे
लाखो मताने होतो खासदार
खेळ सोडून भलत्याच क्रीडा
केल्या तरीही आमचाच सरदार
स्त्री-अबलांना न्याय देऊ
आमचे इलेक्शनचे भोंगे
जेव्हा वेळ येईल तेव्हा
उघडी पडतील आमची ढोंगे
—– —–
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संसद म्हणजे लोकशाहीचे
घटनेचे ते पवित्र दालन
खासदारांवर बंदी घालून
हुकूमशाहीचे करती पालन
संसद म्हणजे नाही मोदी
संसद म्हणजे नाही भाजप
लोकप्रतिनिधी या देशाचे
संसदेचे असती पाईक
खासदारांची मुस्कटदाबी
नाही संसदेला भूषण
घटनेची तर पायमल्ली ही
कधी उघडतील यांचे लोचन?
—– —–
देवेंद्र फडणवीस
जपानमुळे झालो डॉक्टर
आता घरीही जापनीज बोलतो
जामाशिता फुकाहोरींशी
फोनवरून गप्पा मारतो
डॉक्टर होण्याआधी मी तर
केवढा मोठा केला अभ्यास
त्याची माहिती त्यांनाच माहीत
त्यांनी नाही केलं नापास
शिंदे डॉक्टर झाल्यावरती
माझी खूप सटकली होती
मी जपानला गेल्यावरती
सेटिंग लावून जुळली नाती
—– —–
अजितदादा पवार
काय दिवे लावणार डॉक्टर
दिव्याखाली असतो अंधार
मिळाली तर मिळून जाऊंदे
मी तर यावर नाही बोलणार
मला कुणी तरी देऊ केली तर
मी ती डिग्री थेट नाकारणार
देणार्यांना चार शब्दही
माझ्या भाषेत थेट सुनावणार
मी तर म्हणतो द्या मंत्र्यांना
डॉक्टरेट ती सरसकट
पेटतील त्यांचे अक्कलदिवे
विझले तर द्या वाती फुकट