• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

आरोप सिद्ध झाला तर…

- द. तु. नंदापुरे (विशेष लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
April 4, 2025
in विनोदी लेख
0

आपल्या राजकारणी पुढार्‍यांना आरोपांची नव्हाळी नसते. उलट त्यांच्यावर कुणी कोणतेच आरोप केले नाहीत तर ते बेचैन होतात. त्यांचे ब्लडप्रेशर वाढते. विविध आरोपांशी त्यांचे जिवाभावाचे सख्य असते. ते आरोपच खातात, आरोपच पितात, आरोपांवरच ते अतिशय सुखाने जगतात. अशा आरोपप्रिय व आरोपेच्छु लोकनेत्यांच्या मुखांमध्ये एक जरतारी प्रत्युत्तर सदैव सज्ज असते.
ते म्हणजे ‘माझ्यावरील आरोप सिद्ध झाला तर…’
सर्व आरोपी नेते बहुधा आमदार, खासदार किंवा मंत्री असतात. अन्य क्षुल्लक दर्जाच्या नेत्यांवर प्रचंड आरोप करून त्यांचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न बहुधा कुणीच करीत नाहीत. भ्रष्टाचार करणे, कमिशन खाणे, लाच घेणे, घोटाळा करणे अशा आरोपांची चढती भाजणी असते. कसलेला नेता कधीच आरोप मान्य करीत नसतो. तो सर्व प्रकारच्या चौकशीस (उसन्या आवेशानिशी) तयारच असतो. आणि प्रत्येकवेळी तो गर्जना करतो की, ‘माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास —-’.
वरील रिकाम्या जागेत बहुधा ‘मी राजकारणातून संन्यास घेईन’ असेच उत्तर असते. असे आरोप झालेल्या महान व्यक्तींची (म्हणजेच थोर लोकनेत्यांची) नावे आपल्या सगळ्यांना माहीतच असतात. परंतु या ठिकाणी त्यांची नावे घेण्याचे मी मुद्दामच टाळतो. माझ्या एका मित्राने मला एकदा सल्ला दिला की, जिवंत व्यक्तींची नावे देणे असभ्यपणाचे आहे. हा त्यांचा सल्ला मी तंतोतंत पाळतो आणि लिखाणातील सभ्यपणा मी मुळीच सोडत नाही. माझ्यावर कुणी असभ्यतेचा आरोप करू नये, हादेखील त्यामागचा सद्हेतू आहेच.
या आरोपग्रस्त थोर नेत्यांचा त्या आरोपांना उत्तरे देण्याचा एक फॉर्म्युला ठरलेला असतो. त्यामध्ये स्वत:चा सच्चेपणा, (धुतल्या तांदळासारखे) शुभ्र चारित्र्य, जनसेवेची अखंड तळमळ, अनन्यसाधारण त्याग, लोकांसाठी तीळतीळ झिजणे, वगैरे-वगैरे स्वस्तुतीपाठांसोबतच विरोधकांची म्हणजेच आरोपकर्त्यांची पोटदुखी, सूडबुद्धी, कुत्सित भावना, सत्तालालसा, खुर्चीची हाव आणि शेवटी आरोपकर्त्यांची वैफल्यग्रस्त मनोवृत्ती इत्यादी भरपूर चिखलफेक करून शेवटी ‘माझ्यावरील आरोप सिद्ध झाला तर…’ हे पालुपद ठोकून देतात.
या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात एक मोठी गंमत असते. हा आरोपी लोकनेता आपल्या मतांवर अतिशय ठाम असतो. त्यांच्या मते हे असले आरोप म्हणजे ‘दर्या में खसखस’. त्यामुळे तो अतिशय बेडर व बेरड असतो. स्वत:ची निर्दोषिता किंवा आरोपांची सत्यता त्यांच्या दृष्टीने अतिशय क्षुल्लक व कुजक्या बाबी असतात. त्या आरोपांची न्यायालयीन असिद्धता ही त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असते. तोच त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतो. न्यायालयीन म्हणण्यापेक्षा कायद्याच्या दृष्टीने असिद्धता म्हणणे अधिक योग्य होईल. कारण ते आरोप भलेही सत्य असतील, परंतु ते कायद्यांच्या विविध पळवाटांच्या चक्रव्यूहातून एकदा कसेबसे का होईना निसटले की तो आरोप असत्य आणि आरोपी सत्यवान बनतो. आजचा न्याय असा आहे. ‘आरोप सिद्ध झाला तर…’ अशी अट घालून स्वत:चे निर्दोषित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे आरोपींचे दोष आणि आरोपांची सत्यता मान्य करणेच नव्हे काय? परंतु सध्याचा प्रचलित कायदा (आणि न्यायदेखील) आरोपी पक्षालाच अनुकूल असल्याप्रमाणेच दिसतो.
‘कायदा गाढव असतो’, ‘न्याय आंधळा असतो’ अशी सुभाषिते कधी कधी कानी पडतात किंवा ती वाचनात येतात. वरील उदाहरणे पाहिल्यावर अशा विधानांची सत्यता प्रचितीस येते. न्यायालयीन न्याय म्हणजे अक्षरश: आंधळी कोशिंबीरच असते. अतिशय निष्णात खेळाडू जसा कधीच स्वत:वर डाव येऊ देत नाही. तो स्वत:वरील डाव हाणूनच पाडतो. स्वत:वरील डाव तो सिद्ध होऊनच देत नाही.
हे विचारमंथन चालू असताना फार पूर्वी कधीतरी वाचनात आलेली आणि सध्या मनाच्या उपजाणीव कक्षेत दडलेली ‘लॉयर्स आर लायर्स’, ‘न्यायालयात न्याय मिळत नसून, जे मिळते त्यास न्याय म्हणतात’ अशी व्यावहारिक सत्ये आणि तथ्ये मनाच्या जाणीव कक्षेत येतात. शालेय जीवनात कधीमधी वाटेत येणारी ही सुवचने जीवनाच्या शाळेत देखील भेटतातच.
आरोप का सिद्ध होत नाहीत? याचाही थोडा विचार करावा लागेल. लाच किंवा कमिशन किंवा पार्टी फंड इत्यादि नावांनी जे निधी दिले-घेतले जातात, ते दोन्ही पक्षांस लाभदायीच असतात. लाच देणारा कुणी अत्यंत उदार हृदयाचा दानशूर महात्मा नसतोच. तोसुद्धा व्यवहारीच असतो. या दानांमध्येही तो अतिशय फायद्याचा व्यवहारच पाहतो. त्या तथाकथित दानापेक्षा तो कितीतरी अधिक पटीने त्याचा लाभ पुढे घेऊ शकतो. तो लाभ विचारात घेऊनच तो त्या दानासाठी धनसज्ज होतो.
आपल्यासारख्या छोट्या लोकांचेच छोटे उदाहरणं घेऊ. तुम्ही काही कामासाठी गेलात. तेथील बाबू महाशय तुम्हास त्या कामांसाठी उद्या येण्यास सांगतात. म्हणजे आजची पायपीट व खर्च वाया गेला. पुन्हा उद्या तीच पायपीट आणि खर्च. तुम्ही अतिशय प्रेमाने (?) त्या बाबूसाहेबांना चहास चलण्यास आग्रह करता. बाबूसाहेब आणि त्यांचे दोन-तीन जिवलग मित्र त्यांची साथ सोडत नाहीत. तेसुद्धा त्या चहापानगृहात मोठ्या प्रेमाने, न बोलावताच, येतात. आवडीनुसार खारा, मीठा, चहा, पान इत्यादींचे यथेच्छ सेवन करून तृप्त झालेले बाबूजन अत्यंत प्रेमाने व उत्साहाने तुमचे काम तेथल्या तेथे चुटकीसरशी करून देतात. तुम्ही मात्र आंबट चेहर्‍याने चहावाल्यास पैसे दिलेले असतात. तरीपण दोन दिवसांची पायपीट, खर्च व कामबुडी तुम्ही वाचवली असते. त्या मानाने चहापार्टी महाग आहे काय? टपरीवर चहा पिणार्‍या आपल्यासारख्या टपरेल लोकांचे हे उदाहरण आहे. हे फार जुन्या काळचे व खेडूत जनतेचे उदाहरण आहे. सध्याच्या सुधारणेच्या युगात अशा प्रकारात खूप बदल झालेत. ते काही सांगता येत नाही. ‘न ये वदतां, अनुभवी जाणती ते.’ लाखो-करोडोंचे (सुटकेस भरभरून) केलेल्या अपव्यवहाराच्या कामापुढे आपल्या क्षुल्लक व्यवहाराचे आपले काम म्हणजे किस झाड की पत्तीच होय.
या अशा देवाणघेवाणीत दोघेही ‘कायद्याने’ गुन्हेगारच असतात. परंतु अशा व्यवहारात त्यांना कायद्याशी काहीच देणे-घेणे नसते. घेणारांप्रमाणेच देणारांसही कायद्यांमधून स्वत:ची निदोर्षिता राखावयाची असते. आपली गुन्हेगारी झाकण्याचा प्रयत्न हा कमिशनदाता किंवा लाचदाता करतोच आणि तेच घेणार्‍यासही पथ्यकारक असते. दोघेही येथे ‘सिद्ध-साधक’ असतात. ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप कधीच करीत नाहीत. आणि तसे आरोप केले तरी ते बिनबुडाचे राहतील याची खास काळजी घेतली जातेच.
कधीकधी या आरोप-प्रत्यारोप युद्धात आरोपकर्ते प्रारंभी भरपूर धुरळा उडवितात. परंतु नंतर त्यांचाच फजितवाडा झालेला असतो. कारण ते आरोप बहुधा ‘असिद्ध’च असतात. तरीपण या नसत्या फंदात पडल्याबद्दल त्यांना वाईट वाटण्याचे कारण नसते. कपडे झटकून ते पूर्ववत होतात. चारित्र्यहननकर्ते, सूडबुद्धीचे, विघ्नसंतोषी, असंतुष्ट अशी विशेषणे त्यांना चिकटतात. परंतु त्यांना ती काही फार महत्त्वाची आणि काळजी करण्याची बाब वाटत नाही.
काही काळाने आरोपकर्त्यांचे मनसुबे थंड होतात. मग ‘आरोप सिद्ध झाला तर…’ अशी गर्जना करणार्‍या स्वनामधन्य लोकनेत्यांचे, त्यांच्या सत्यनिष्ठेचे, निर्भीडपणाचे, न्यायप्रियतेचे व जनकळवळ्याचे केवढे कौतुक होते. त्यांचे कर्तृत्त्व तेजाळून निघते, त्यांच्याभोवती यशाचे तेजोवलय निर्माण होते आणि त्यांचा सर्वत्र उजळ माथ्याने व ताठ मानेने संचार सुरू होतो. तोंडपुजे व होयबांचा प्रचंड मेळा त्यांच्या आगेमागे सदैव दिमतीस असतो. पुढे कोणतेही आरोप साफ करणे हे त्यांना हाताचा मळ साफ करण्याइतके सोपे काम बनते.
शेवटी, माझे हे आरोप पुराण वाचून कुणीतरी एखादा खवचट वाचक माझ्यावर असा आरोप करेल की मी अशा घोषणाबाज निर्दोष आरोपींवर प्रच्छन्नपणे दोषारोपण करीत आहे. तर मी आरोपप्रेमी मित्राला ठासून सांगेन की, ‘माझ्यावरील हा आरोप सिद्ध झाल्यास मी लेखन संन्यास घेईन’. (कारण त्याखेरीज मी अन्य कोणताही संन्यास घेऊ शकत नाही.)

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

आंब्राई

Related Posts

विनोदी लेख

पाटील

April 11, 2025
विनोदी लेख

वक्फ वक्फ की बात!

April 11, 2025
विनोदी लेख

शरण अंकल

March 28, 2025
विनोदी लेख

देवाघरची फुले

February 24, 2023
Next Post

आंब्राई

मनावर गारुड करणारा "फँटम ऑफ द ऑपेरा"

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.