• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

आय कॅन डू इट

- संदेश कामेरकर (धंदा म्हणजे काय रे भाऊ!)

संदेश कामेरकर by संदेश कामेरकर
March 3, 2022
in धंदा म्हणजे काय रे भाऊ!
0

भारतात गेल्या वर्षी चाळीस स्टार्टअप युनिकॉर्न निर्माण झाले आहेत. यात मराठी मुलांचा टक्का वाढायला हवा. शार्क टँकमध्ये भाग घेताना आम्हाला फक्त पैसे नको होते, तर यातील जज उद्योजकांचा अनुभव, सल्ला हवा होता. आज लेन्सकार्टचे पीयुष बंसल, शादी डॉट कॉमचे अनुपम मित्तल असे पाच मोठे उद्योजक आमचे भागीदार आहेत.
– – –

‘स्टार्टअप’ हा शब्द आज तरूण मुलांसाठी परवलीचा बनला आहे. स्टार्टअप म्हणजे काय तर, एका लहानशा गरजेतून, कमी भांडवलातून, आणि नावीन्यपूर्ण युक्तीतून जो उद्योग सुरू होतो तो. त्या उद्योगाच्या मालकाला फक्त शेठ व्हायची इच्छा नसते, तर जग जिंकायची महत्त्वाकांक्षा असते. कोणतेही स्टार्टअप सुरू करण्याआधी आपल्याकडे भांडवल किती आहे यापेक्षा, आपली ‘आयडिया’ कशी सर्वोत्तम आहे आणि तिच्या जोरावर बाजारपेठ कशी काबीज करता येईल याचा विचार आधी करावा लागतो. आज स्टार्टअप्सनी आपले आयुष्य वेढलं गेलं आहे. जगातील कोणतीही वस्तू घरपोच पोहचवणारे ‘अमेझॉन‘, हॉटेल ते घर यातील अंतर संपवणारे ‘स्विगी‘, फिरायला घेऊन जाणारे मेक माय ट्रिप, नाटक-सिनेमाचे तिकीट बसल्या जागेवरून बुक करणारे ‘बुक माय शो‘, रिक्षाटॅक्सीवाल्यांना पर्याय देणारे ‘ओला‘, मित्रमंडळीना जोडणारे ‘फेसबुक‘ यासारख्या आज जगावर राज्य करणार्‍या मोठ्या कंपन्या कधी काळी स्टार्टअपच होत्या. यातील अनेक कंपन्या गॅरेजमध्ये, तरी काही घरातून सुरू झालेल्या आहेत. प्रत्येक माणसांच्या हातात स्मार्टफोन आल्यावर तर या प्रकारच्या व्यवसायांना सुगीचे दिवस आले आहेत. स्टार्टअपचे व्यवसायमूल्य जेव्हा शंभर कोटी डॉलर्सपेक्षा (साडे सात हजार कोटी रुपये) अधिक होते, तेव्हा ती कंपनी ‘युनिकॉर्न‘ म्हणून गणली जाते. गुगल, अ‍ॅमेझॉन अशा काही महाकंपन्या कालच्या युनिकॉर्न होत्या. आजची प्रत्येक युनिकॉर्न ही उद्याची महाकंपनी आहे असं म्हणतात.
नुकत्याच रांगायला लागलेल्या स्टार्टअप कंपन्यांना यशाच्या मॅरॅथॉन स्पर्धेत धावण्यासाठी एम व्हिटॅमिन अर्थात मोठ्या रकमेची गरज भासते. अशावेळी ‘एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया‘, असं पटवून देणार्‍या कंपन्यांत पैसे गुंतवायला, हाय रिस्क, हाय प्रॉफिट हा फंडा मानणारे अनेक गुंतवणूकदार तयार असतात. त्याबदल्यात स्टार्टअप कंपन्या आपला काही हिस्सा समभागस्वरूपात त्यांना विकतात. अनेक वर्षे बंद दरवाज्याच्या आड होणारा हा व्यवहार एका अमेरिकन चॅनलने शार्क टँक या नावानं २००९ साली टीव्हीवर आणला. त्यात नवीन उद्योजक बिझनेसच्या संकल्पना मांडतात. ती पटल्यास शार्क म्हणवले जाणारे इन्वेस्टर त्यांच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतात. या रियालिटी शोपासून प्रेरणा घेऊन अमेरिकेत अनेक नवउद्योजक निर्माण झाले. त्यातील काही उद्योग फसले, तर काही आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करीत आहेत.
अमेरिकन शार्क टँकची भारतीय आवृत्ती ‘शार्क टँक इंडिया‘ या नावाने सुरू झाली. या शोच्या १४ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये, मराठी तरूण मुलांच्या नुकत्याच सुरू झालेल्या एका लहान कंपनीला, एक कोटी रुपये त्यांच्या दहा टक्के समभागांच्या बदल्यात दिले गेले आणि संपूर्ण भारतभर त्यांच्या प्रॉडक्टची चर्चा सुरू झाली. एखादा व्यावसायिक बँकेकडे फक्त एक लाख रुपये कर्ज मागायला गेला तरी ते विचारतात, तुम्ही तारण काय ठेवणार? पण इथे कोणत्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेल्या मुलांच्या आयडियावर उद्योग जगतातील नामवंत शार्क एक कोटी रुपये का गुंतवत आहेत? कोण आहेत ही मुलं?
या दोघांपैकी एक आहे, समीर मिरजकर. पुण्यातील मध्यमवर्गीय घरातला एक मुलगा. त्याच्या वडिलांची हॉटेल्सना गाड्या भाड्याने देणारी एक ट्रॅव्हल एजन्सी होती. पण व्यवसायात उधारी वाढत गेली आणि धंद्यात खोट येऊन तो बंद पडला. मग लहानपणापासूनच समीरने कुठे पेपरची लाइन टाक, लेथ मशीनवर काम कर, कुठे फटाके वीक, असे उद्योग करून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. शिकत असताना त्याच्या हे लक्षात आलं की एका जागेवर बसून कारकुनी काम करणं त्याला जमणार नाही. त्याला खेळण्यापेक्षा जास्त आनंद आईला स्वयंपाकघरात मदत करण्यात मिळायचा. आई सुगरण होती, ते गुण समीरमध्ये मुरत गेले. बारावीनंतर करीयर कशात करावं हा विचार आला, तेव्हा त्याचं उत्तर तयार होतं-‘हॉटेल मॅनेजमेंट‘.
समीरने कॉलेजला प्रवेश घेतला. पण एक आर्थिक प्रश्न उभा राहिला, फीचा. छोटी मोठी कामं करून शाळेची फी भरणे सोपं होतं, पण हॉटेल मॅनेजमेंटची फी भरण्यासाठी नियमित नोकरी गरजेची होती. म्हणून मॅकडोनाल्डमध्ये नोकरी धरली. तिथे अगदी बेसिक कामापासून सुरुवात केली. गरज म्हणून केलेल्या पहिली नोकरीत फडका मारणे, लादी पुसणे, प्लेट्स धुणे, वेटरिंग ही सगळी कामे केली. यानंतर बरिस्ता कॉफी शॉपमध्येही काम केलं. हॉटेल इंडस्ट्रीचा अगदी मुळापासून मिळालेला हा अनुभव आज समीरला शिखरावर जाताना उपयोगी पडतो आहे, किंबहुना हाच अनुभव त्याला करीयरच्या प्रत्येक पायरीवर सोबत करतोय. समीर म्हणाला, मराठी तरूण मुलांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना काही काळ तरी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करायला हवं. या अनुभवाचा फायदा शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करताना किंवा व्यवसाय करताना नक्कीच होतो हे मी अनुभवातून सांगू शकतो. केवळ इंग्रजी बोलण्याचा सराव नाही किंवा लाज वाटते या कारणांनी आपल्या तरुणांनी ही संधी गमवायला नको. त्याचबरोबर तरूण मुलांनी करीयरच्या सुरुवातीच्या काळात जगाच्या पाठीवर कुठेही काम करायची तयारी दर्शवली पाहिजे. माझ्या शहरात, माझ्या घराजवळ नोकरी मिळायला हवी हा अट्टाहास सोडायला हवा. तरूण वयात जास्तीत जास्त अनुभव, पैसा कुठे मिळेल हाच एकमेव हेतू मनात बाळगायला हवा. तसेच नोकरी करताना, एकाच जागी अडकून न राहता, दर तीन चार वर्षांनी दुसर्‍या कंपनीत आपल्यासाठी अजून काय पर्याय उपलब्ध आहेत का, याकडे चौकस नजर ठेवायला हवी.
समीर नोकरी करून शिक्षण घेत असल्यामुळे त्याचे शेवटचे लेक्चर्स नेहमी बुडायचे, तो मित्रांकडून नोट्स घेऊन राहिलेला अभ्यास पूर्ण करायचा. पण एक दिवस एका सरांनी सर्वांसमोर वर्गात उभं करून त्याचा अपमान केला. समीरची आर्थिक परिस्थिती माहीत असूनही त्यांनी त्याच्या नोकरी करण्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘हा मुलगा आयुष्यात काही करू शकणार नाही, हा फक्त हॉटेलात वेटरच होऊ शकतो.‘ तेव्हा समीरला फार वाईट वाटलं आणि सरांचा राग देखील आला. तो तिथल्या तिथे सरांना उत्तर देऊ इच्छित होता, पण त्याने ठरवलं की या परिस्थितीत काही बोलण्यापेक्षा एक दिवस हेच सर माझं कौतुक करतील असं काही तरी मी आयुष्यात करून दाखवेन… आय कॅन डू इट…
कॉलेजमधून इंटर्नशिपसाठी त्याला सहा महिन्यांकरता अमेरिकेत साऊथ डाकोटा राज्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठविण्यात आलं. तिथे भारताबाहेर व्यावसायिक जग कसं आहे हे अनुभवता आलं. शिक्षण सुरू असताना घरची परिस्थिती बेताची आहे याची जाणीव समीरला होती. त्यामुळे चार वर्षांचा डिग्री कोर्स पूर्ण झाल्यावर परदेशी नोकरी करून चार पैसे जास्त मिळवू, या विचाराने त्याने २००८ साली लंडन येथे ‘रेड कार्निशन‘ या पंचतारांकित हॉटेलात पहिली नोकरी मिळवली. शेफ म्हणून काम करताना सुरुवातीच्या काळात ते एकाच पद्धतीचं काम देतात, ते एकसुरी काम न कंटाळता करण्यात तुमची खरी कसोटी लागते. समीर म्हणाला ‘परदेशात नोकरी करताना तुमची स्पर्धा जागतिक स्तरावरील शेफसोबत असते. त्यामुळे तुमच्या कामाची प्रत नेहमीच उच्च दर्जाची ठेवावी लागते. स्पर्धेच्या युगात तुमचा मार्ग तुम्हालाच निर्माण करावा लागतो. हळूहळू हॉटेल इंडस्ट्रीत पाय रोवून उभा राहात होतो. खाद्यपदार्थात नवीन प्रयोग करत होतो. अल्पावधीतच माझ्या हातच्या चवीचा बोलबाला होऊ लागला. आमची मॅनेजमेंटही खूष होती. आता कुठे आयुष्याला स्थैर्य प्राप्त होतय असं वाटत होतं. इतक्यात, २००९ साली जागतिक मंदीचा इंग्लंडच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला, यात हजारो कामगारांनी नोकर्‍या गमावल्या, तत्कालीन ब्रिटिश सरकारने बाहेरील देशातून लंडनमध्ये कामाला आलेल्यांच्या नोकर्‍यांवर गदा आणली. याचा फटका मला देखील बसला. लंडनहून २०१० साली भारतात परत यावं लागलं’.
परदेशी जाताना तरूण मुलांची काही स्वप्न असतात, जागतिक पातळीवर जावून नाव कमवायचे, गरीब परिस्थिती बदलून आर्थिक स्तर उंचवायचा, पण जागतिक संकटं येतात तेव्हा तुम्ही कितीही हुशार असलात, तरी सर्वच बाबी आपल्या हातात नसतात. अशा वेळी खचून जाण्यापेक्षा, लवकरात लवकर इतर पर्याय चाचपून पाहायला हवेत. हाच विचार करून समीरने भारतात परतल्यावर पुन्हा नोकरीचा शोध सुरू केला. तेव्हा पुणे व्यवसायाच्या दृष्टीने कात टाकत होतं. इथेही अनेक पंचतारांकित हॉटेल्स होती आणि येऊ घातली होती. समीरने काही ठिकाणी इंटरव्ह्यू दिले. पण मंदीचा परिणाम भारतातही दिसत होता. लंडनच्या तुलनेत इथल्या नोकरीत फारच कमी पैसे ऑफर केले गेले. इतक्या कमी पगारात काम करून अवमूल्यन करून घेण्यापेक्षा समीरने थोडं थांबायचं ठरवलं. नोकरी नसलेल्या काळात जेव्हा जेव्हा तो निराश व्हायचा, तेव्हा तो त्याचा जिद्दीचा मूलमंत्र म्हणायचा, आय कॅन डू इट…
बरेच दिवस मनासारखी संधी न मिळाल्याने त्याने शेफपेक्षा वेगळ्या वाटेनं जायचं ठरवलं, कॉलेजशिक्षण घेताना केलेल्या नोकरीचा अनुभव इथे कामी आला. क्यूएसआर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स) या फास्ट फूड क्षेत्रात त्याने उडी मारली. २०१० साली पुण्यात एफ सी रोड वरील ‘वेंकिज एक्स्प्रेस‘ या रेस्टॉरंट्समध्ये समीर मॅनेजर पदावर रुजू झाला. समीरचे करीयर खर्‍या अर्थानं इथून सुरू झालं. समीर म्हणाला, ‘बरिस्ता, मॅकडोनाल्ड अशा फास्ट फूड चेन्समध्ये काम कसं चालतं हे अगदी मुळापासून मला माहिती होतं आणि माझी एक सवय आहे की, कुठेही नोकरी करत असेन तरी कामाच्या बाबतीत मी मालकाची जबाबदारी उचलतो. ‘माझं काम आणि मी’ असं न करता, रेस्टॉरंटच्या कोणत्याही विभागात काहीही अडचण आली तरी मी उभा राहतो. कामाच्या बाबतीत मी कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही, तेव्हासुद्धा कंपनीचा जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल यासाठी वेळ काळ न पाहता सतत काम करत होतो. याचाच परिणाम म्हणून आमच्या रेस्टॉरंटची सर्व्हिस व क्वालिटीचे अभिप्राय ग्राहकांनी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. लवकरच आमच्या हॉटेलचा प्रॉफिट डबल झाला. याची दखल मॅनेजमेंटने घेतली. दीड वर्षांतच कंपनीने माझा पगार भरघोस वाढवत प्रमोशन दिले व बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये घेऊन संपूर्ण भारतात नवीन रेस्टॉरंट्स उघडण्याची जबाबदारी त्यांनी माझ्या खांद्यावर टाकली. वेंकीज या ब्रँडसाठी मी, हैद्राबाद, चंदीगड, मुंबई, दिल्ली अशा अनेक शहरांत नवीन रेस्टॉरंट उघडून सेट करून दिले. वेंकीज जॉइन करून चार वर्षं उलटली होती. काम उत्तम सुरू होतं, पगारही चांगला मिळत होता. पण भारतात वेगवेगळ्या शहरांत रेस्टॉरंटचे काम पाहताना, त्यांच्या नवनव्या अडचणी सोडवताना महिनो न् महिने कुटुंबापासून दूर राहावं लागत होतं. घरच्यांनी देखील ‘आता बास झालं, पुण्यातच येऊन काम कर’ असा लकडा लावला. मग २०१४ साली वेंकीजला राम-राम केला. एक चांगली संधी चालून आली, पुण्यातील पंचशील डेव्हलपर्सच्या हॉस्पिटॅलिटी विभागात नवीन इनिंग्जला सुरुवात केली. त्यांच्या आयटी पार्क इमारतीतील फूड कोर्टचे व्यवस्थापन माझ्याकडे होतं. ही नोकरी उत्तम चालली असताना, चांगला जम बसत असताना, कोविडच्या जागतिक साथीने दुसर्‍यांदा घरी बसवलं. इथे पगार सुरू होता, हेच काय ते समाधान होतं. शाळकरी वयापासून सतत पैशापाठी धावणार्‍या माझ्या आयुष्याला ब्रेक लागला. मी त्रयस्थपणे जीवनाकडे पहायला लागलो. मित्रांना, नातेवाईकांना फोन करणे, वेगवेगळे खाद्यपदार्थ करून खाणे, रात्री उशिरापर्यंत वेब सिरीज आणि बातम्या पाहणे हे सुरू होतं. अनेक वर्षं कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या शरीराकडे डोळस नजरेने पहायची सवड मिळाली नाही. या वेळेचा सदुपयोग करायचं ठरवलं, घरी व्यायाम सुरू केला. एप्रिल २०२० ते जुलै २०२० या चार महिन्यांत वजन ८६ किलोवरून ७८ किलोवर आणलं. आताही वजन आटोक्यात आहे. आज कितीही बिझी असलो तरीही व्यायाम करायला मी रोज एक तास काढतोच. व्यायामाव्यतिरिक्त इतर टाइमपास करण्याचा एका पॉइंटनंतर कंटाळा येऊ लागला. असं काम न करता बसून खाण्याची सवयच नव्हती. बाहेर अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या होत्या. ते चरितार्थासाठी भाज्या विकणे, मास्क बनविणे असे उद्योग करत होते. माझ्यासोबत कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट करणारा व लंडनमध्ये वाइन इंडस्ट्रीत काम करणारा विराज सावंत आता पुण्यात आला होता. मित्रांशी फोनवर बोलताना, आपल्याला काय व्यवसाय करता येईल या दृष्टीने चर्चा सुरू झाली. आमच्या बोलण्यात एक शब्द वारंवार येत होता, ‘स्टार्ट अप‘.
विराजचा वाईन क्षेत्रातला अनुभव व माझा रेस्टॉरंटमधला अनुभव यातून आपल्या मार्वेâटमध्ये उपलब्ध नाही अशी एक गोष्ट शोधून काढली. मद्यप्रेमींसाठी बिअर, व्हिस्की, रम अशी पेयं आपल्याकडे उपलब्ध आहेत पण रेडिमेड कॉकटेल आपल्याकडे उपलब्ध नाही. कॉकटेल हे नाव अनेक जणांना माहीत असतं. पण मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये त्यांच्या किंमती आवाक्याबाहेरच्या असतात आणि बाजारात मिळणारे मिक्स्चर घेऊन कॉकटेल बनवणे खटाटोपाचे वाटते. तरूण पिढीवर प्रभाव पाडणार्‍या वेब सिरीजमध्ये एक तरी कॉकटेल बारचा सीन असतोच. त्यात दोन तीन ड्रिंक्स मिक्स करताना हवेत ग्लास उडवणारे जगलर पाहून हा जादुई द्रवपदार्थ एकदा तरी ट्राय करायला हवा ही सुप्त इच्छा मदिराप्रेमींच्या मनात जन्मतेच. त्यांना बिअर प्यायला आवडते. मात्र व्हिस्की, रम, व्होडका यांची चव आवडत नाही. त्यामुळे वेगळ्या चवीचं कॉकटेल ते ट्राय करू शकतात. ‘स्मूथ किक अ‍ँड इझी टू कॅरी’ हा फंडा तरुणाईला जास्त आवडतो.
कॉकटेल बनवायचं निश्चित झाल्यावर पंचतारांकित हॉटेलात कॉकटेल बनवणारा एक पार्टनर शोधला, वरूण सुधाकर. आम्ही तिघांनी मिळून घरीच आरएनडी (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) सुरू केली. या काळात कोविड लॉकडाऊन सुरू होता. कॉकटेल बनवायला लागणारे रॉ मटेरियल जिथं मिळतं, ती फ्लेवर इंडस्ट्री म्हैसूर येथे आहे. पुणे ते म्हैसूर हे अंतर ११०० किलोमीटर आहे. आम्हाला तेथे जायला आंतरराज्य पास लागणार होता. प्रतिबंध सुरू असताना, एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जायला जिथे पास सहजासहजी मिळत नव्हता, तिथे दुसर्‍या राज्यात जाणे किती कठीण होतं हे तुमच्या लक्षात असेलच. पास मिळविण्यासाठी अनेकदा अर्ज केला पण तो कधी आम्हाला मिळालाच नाही. मग रिस्क घेऊन आम्ही आमचा प्रवास अर्जावरच सुरू केला. चार वेळा पुणे म्हैसूर प्रवास करताना अनेक अडचणी आल्या, पण प्रवास आम्ही थांबू दिला नाही.
म्हैसूरला जावून कॉकटेल मिक्स्चर बनविले, त्यात अनेक प्रयोग केले. बाजारातून रिकामे १००० कॅन विकत घेऊन त्यात आम्ही बनविलेले वेगवेगळे मिक्स्चर हाताने भरले, फिलिंग मशीनने कॅन सील केले आणि ते हजार कॅन पुण्यात घेऊन आलो. पुण्यात आल्यावर वेगवेगळ्या वयोगटातल्या जाणकार स्त्री-पुरुषांना हे कॉकटेल प्यायला दिलं, त्यांचा अनुभव, प्रतिसाद जाणून घेतला. काय आवडलं, काय नाही याची तपशीलवार माहिती जमा केली व पुन्हा म्हैसूरकडे प्रयाण केलं.
कॉकटेलचे चार हजार कॅन लोकांना पाजून चार वेळा सँपल सर्व्हे पूर्ण केला. त्यांचा अभिप्राय लक्षात घेऊनच नंतर लिट, जिन अँड टॉनिक, व्हिस्की कॉलिन्स, व्होडका म्यूल, रम लाते हे पाच फ्लेवर्स फायनल केले. काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्यापेक्षा अल्युमिनियम कॅन हे पॅकिंग, साठवणूक, मालवाहतूक या दृष्टीनं फारच उपयुक्त होते, हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे या कॅनमध्येच ड्रिंक विकण्याचा निर्णय आम्ही मिळून घेतला.
प्रॉडक्टला नाव देणे व कॅन डिझायनिंग यासाठी अ‍ॅड एजन्सी शोधत होतो. नामवंत एजन्सीज दहा ते पंधरा लाख रुपये मागत होत्या. धंद्यासाठीचे भांडवल आम्ही पगारातील बचत व घरच्यांकडून घेतले होते. त्यामुळे इतके पैसे या कामासाठी खर्च करणं योग्य वाटलं नाही. तेव्हा या कामाची गरज असलेली एक ‘स्टार्ट अप अ‍ॅड एजन्सी’ निवडली. त्यांनी कॅन डिझायनिंग अप्रतिम केलं व सर्वांच्या सहमतीतून ‘इन अ कॅन‘ हे नाव फायनल केलं. नाव ठरलं, डिझाईन फायनल झालं, कॉकटेलही तयार केलं. पण आता प्रश्न उभा ठाकला होता तो अल्युमिनियमचे रिकामे कॅन कोण बनवून देणार याचा. भारतात फक्त दोन कंपन्या हे कॅन बनवतात. यांचे ग्राहक, रेड बुल, किंगफिशर असे लाखो कॅन्सची ऑर्डर देणारे आहेत. आमच्यासारख्या कमी संख्येच्या ऑर्डरला ते ढुंकूनही पाहात नव्हते. एक कंपनी औरंगाबादला आहे, त्यांचे अधिकारी फोनवर बोलायलाही तयार नव्हते; तर मुंबईतील ‘बॉल बेव्हरेजेस’ या कंपनीतील अधिकारी फोनवर बोलत, पण, भेटायची ‘तारीख पे तारीख’ देत होते. शेवटी प्रâस्ट्रेट होऊन एक दिवस मी आणि विराज कंपनीच्या गेटवर पोहचलो, वॉचमन आत सोडायला तयार नव्हता. मी त्यांना म्हणालो, आम्ही पुण्याहून आलो आहोत आणि साहेबांना भेटल्याशिवाय आम्ही हलणार नाही. चार तास गेटवर उभे होतो, त्यानंतर आतून बोलावणं आलं. आईस बॉक्समधून आमचे कॉकटेल कॅन्स साहेबांकडे घेऊन गेलो. त्या साहेबांना कॅन डिझायनिंग आणि टेस्ट प्रचंड आवडली, त्यांनी आमच्या कल्पनेला दाद देत आमची कमी संख्येची ऑर्डर स्वीकारली. कॅन तयार होऊन आले तसे गोव्याला एक प्रोडक्शन युनिट टाकलं.
कॉकटेल कॅन विकताना, सर्वसामान्य ग्राहकांना ते परवडलं पाहिजे हा विचार मनाशी पक्का ठरवला होता. त्यानुसार गोव्यात आम्ही १४० रुपयांना एक कॅन विकतो. सध्या गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यांत व्यवसाय सुरू आहे. आतापर्यंत या दोन राज्यांत मिळून आम्ही सुमारे ऐंशी लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. अल्कोहोलसंबधित व्यवसाय करताना प्रत्येक राज्यांच्या स्वतंत्र नियमावली आणि कररचना असते, त्याचा विचार करूनच हात-पाय पसरावे लागतात. काही वर्षांपूर्वी अल्कोहोलसंबधित ड्रिंक्सच्या जाहिराती प्रदर्शित करायला मनाई होती, म्हणून या कंपन्या मिनरल वॉटर, सोडा यांच्या जाहिराती करत असत. पिणार्‍याला व विकणार्‍याला बरोबर कळायचं, की नावात काय आहे ते, तेरी भी चूप मेरी भी चूप असा मामला होता. पण आज समाजमाध्यमात या जाहिराती दिसू लागल्या आहेत. यावर वयोगट, जेंडर, स्थळकाळ आणि आवडी-निवडी पाहून अगदी अचूक जाहिराती पाठवता येतात. यामुळेच धंद्याच्या दृष्टीनं माल विकायला, नवीन ब्रँड बनवायला आज अधिकच सोपं झालं आहे.
कॉकटेलमधून अल्कोहोल काढलं की मॉकटेल तयार होतं, जे एक प्रकारचं सॉफ्ट ड्रिंक आहे. एकदा आमचा ब्रँड लोकप्रिय झाला की मॉकटेलही विकण्याचा विचार आहे. पण सध्या एकेका राज्यात नीट घडी बसवून मग पुढे जाण्याचा विचार आहे, पुढील महिन्यात दिल्ली, हरयाणा या राज्यांत विक्री सुरू होईल. याच गतीने संपूर्ण भारतात ‘इन अ कॅन’ पोहचवण्याचा निर्धार आहे.
भारतात गेल्या वर्षी चाळीस स्टार्टअप युनिकॉर्न निर्माण झाले आहेत. यात मराठी मुलांचा टक्का वाढायला हवा. स्टार्ट अप सुरू करताना, अनेक मुलं फक्त गुंतवणूकदार लाखो रुपयांची गुंतवणूक करतात म्हणून आयडिया घेऊन मार्केटमध्ये फिरत आहेत. शार्क टँकमध्ये भाग घेताना आम्हाला फक्त पैसे नको होते, तर यात जज असलेल्या उद्योजकांचा अनुभव, सल्ला हवा होता. आज लेन्सकार्टचे पीयुष बंसल, शादी डॉट कॉमचे अनुपम मित्तल असे पाच मोठे उद्योजक आमचे भागीदार आहेत. या यशानंतर काही मित्र म्हणाले, आता काय तू करोडपती झालास, मस्त ऐश कर. त्यांना सांगावंसं वाटतं की, आता तर धंद्याची पहिली पायरी चढलो आहोत, अजून शिखर गाठायचं आहे. थोड्या यशाने गाफील राहून चालणार नाही. प्रसिद्धीचे काही तोटेही असतात. आमची आयडिया पाहून अनेकांना आमची कॉपी करून या धंद्यात उतरावंस वाटेल. कॉम्पिटीशनला घाबरून चालणार नाही, तिचा मुकाबला करण्यासाठी आता गतीने व्यवसाय वाढवीत आहोत.’
स्टार्टअप ते शंभर करोड डॉलर्सचा युनिकॉर्न बनणे हा प्रवास तसा कठीण आहे. पण समीरला त्याच्या टीम आणि प्रॉडक्टवर ठाम विश्वास ठेवून लवकरच हा पल्ला गाठू याची खात्री वाटते. समीरची आत्तापर्यंतची यशस्वी वाटचाल पाहून या लेखाचा समारोप करताना मला आशेने हेच लिहावंस वाटतं… ही कॅन डू इट… तो आणि त्याचे पार्टनर मिळून… दे कॅन डू इट आणि तो करू शकतो तर यू कॅन डू इट, वुई कॅन डू इट!

Previous Post

कोकणचा किनारा धोक्यात

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे

Related Posts

धंदा म्हणजे काय रे भाऊ!

मुंढेबाईंचा बहुगुणी बटवा

October 5, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

स्वच्छ ताजे मासे, साफ करून घरपोच!!

September 21, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

जुनाट लाँड्री व्यवसायावर नावीन्याची कडक इस्त्री!

August 24, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

करिअरची गवसली वाट

July 27, 2023
Next Post
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

शब्दकळ्यांचा कल्पवृक्ष… ऋजुतेचा स्वामी

शब्दकळ्यांचा कल्पवृक्ष... ऋजुतेचा स्वामी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.