• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

ओवैसी, आधी आरशात पाहा…

- संतोष देशपांडे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 6, 2021
in कारण राजकारण
0

ओवैसी यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, वक्तृत्वशैली आहे पण मौलानांची दूरदृष्टी ते का दाखवत नसावेत? त्यांनी ज्या समाजाच्या उद्धाराचा वसा घेतला आहे त्या समाजासमोर सोलापूर येथे बोलताना बेजाबबादारपणे परत परत बाबरी मशीद उकरण्यामागे त्यांचा उद्देश हा मौलानांचा वारस बनण्याचा नसून जीनांचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचा आहे की काय, अशी दाट शंका येते. मुसलमान आणि हिंदू या दोघांनाही भारतीय असल्याचा अभिमान बाळगण्याचा सारखा अधिकार आहे आणि मुसलमानांच्या ह्वदयामधील भारत कोणीही काढून घेऊ शकत नाही असे ठामपणे सांगणारे मौलाना आझाद आणि या देशातील मुसलमानांना सतत हिंदुत्वाची भीती घालणारे ओवैसी यांच्यात फार मोठी दरी आहे.
—-

शिवसेना हा कम्युनल (धर्मवादी किंवा धर्मांध) पक्ष आहे असे विधान नुकतेच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोलापूर येथे केले. देशासाठी आता मूठमाती मिळालेल्या बाबरी मशिदीच्या पाडापाडीची आठवण देखील त्यांनी काढली. काही वाद देशाने कायमचे विसरले पाहिजेत, अन्यथा देश म्हणून आपण एकत्र पुढे वाटचाल करू शकत नाही. एका बाजूला शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन हिंदुत्वाला तिलांजली दिली असा अपप्रचार भारतीय जनता पक्ष करत असतो तर दुसरीकडे औवैसींना भाजपा आणि मोदींच्या हिंदुत्वापेक्षा शिवसेनेच्या हिंदुत्वाची चिंता सतावते आहे. लिळाचरित्रात चक्रधर स्वामींनी हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट सांगितली आहे. ज्या अंधाचा हत्तीच्या कानाला हात लागला, त्याला हत्ती सुपाच्या आकाराचा वाटला, तर ज्याचा पायाला हात लागला त्याला तो हत्ती खांबासारखा वाटला. सत्ता नसल्याने आंधळे झालेले भाजपा आणि एएमआयएमसारखे पक्ष शिवसेनेविषयी स्वतःच्या सोयीच्या नवनवीन व्याख्या करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी हे देखील आता सेक्युलर राहिलेले नाहीत, शिवसेनेसोबत युती केल्याने ते पक्ष देखील कम्युनल झाले आहेत, असा जावईशोध ओवैसी यांनी लावला आहे. खरे तर सरकार चालवायला एकाच विचारांचे पक्ष एकत्र येण्याएवजी भिन्न विचारांचे लोक एकत्र येत असतील तर ते जिवंत लोकशाहीचे प्रतीक आहे. त्यात सत्तेत रहायची अपरिहार्यता हेदेखील कारण आहे. भारतातील विविध आघाडी सरकारांच्या काळात केलेल्या विकासदराच्या टक्केवारीचा अभ्यास केला, तर एकपक्षीय सरकारांपेक्षा आघाडी सरकारांची कामगिरी सरस आहे, हे लक्षात येते. आघाडी सरकारमध्ये एक समान कार्यक्रम आणि धोरण यांच्यावर आधारित काम करावे लागते. मात्र, असे एकत्र येणारे पक्ष स्वतःच्या वैचारिक भूमिकेला तिलांजली देत नसतात, ती लवचिक ठेवतात, तिला तात्पुरती मुरड घालतात. ओवैसी हे कधीच स्वबळावर सत्तेत येणार नाहीत आणि त्यांना सत्ता भोगायची असेल तर युतीधर्माचा नीट अभ्यास करावा लागेल. वंचित बहुजन आघाडीसोबतची युती त्यांनी निवडणुकीनंतर लगेच तोडली. प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी एकमेकांसोबत न राहिल्याने महाराष्ट्रातील मोठ्या वर्गाचा विश्वासघातच झाला आहे आणि तो वर्ग परत मूळ पक्षांकडेच जाऊ लागला आहे.
ओवैसी हे महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांतील निवडणुकांमध्ये मोठ्या ताकदीने उतरले होते. ते उत्तर प्रदेशात १०० जागा लढवणार आहेत. तेलंगणासारख्या लहान राज्यात केवळ सात आमदार आणि एक खासदार असणारा हा स्थानिक पक्ष अचानक दिसेल त्या राज्यात निवडणुका लढवू लागला आहे. एका राज्यात निवडणूक लढवायला भल्या भल्या पक्षांची आर्थिक आघाडीवर हिम्मत होत नसते. असे असताना इतक्या राज्यातून निवडणुका लढवताना येणारा प्रचंड खर्च हा पक्ष कसा करत असेल? या एकाच आर्थिक बाजूचा विचार केला तरी या पक्षाचे प्रायोजकत्व कोणत्या ‘चाणक्या’कडे आहे, हे राजकारणाचे सामान्यज्ञान असणारे सुज्ञही लगेच ओळखतील. या पक्षाने उमेदवार दिल्यावर मुस्लिम मतांची विभागणी होते आणि अशा विभागणीचा तोटा हा कायम काँग्रेस व तत्सम पक्षांनाच होतो आणि फायदा हा अर्थात थेट भाजपाला होतो इतके सामान्यज्ञान औवेसींचा बोलविता धनी कोण हे समजून घ्यायला पुरेसे आहे. राजकारणात असे पडद्यामागचे साटेलोटे असू शकते व तो राजकीय डावपेचाचा एक भाग देखील आहे. पण एएमआयएम या पक्षाचा जन्म आणि त्या पक्षाची वाटचाल बघितली तर या पक्षासोबत छुपी मैत्री देखील हिताची नाही, हे लक्षात येते. हल्ली ओवैसी यांना अभ्यासू, बुद्धिमान आणि फर्डे वक्तृत्ववान अशी विशेषणे लावून कौतुकांचा वर्षाव करणारे बरेच भेटतात. अनेक उदारमतवादीही त्यांना सेक्युलर भारताचा सच्चा पाईक मानतात. पण त्यांनी या पक्षाचा इतिहास तपासावा. तो संघाइतकाच जुना आहे एएमआयएम हे पुर्वीच्या एमआयएम पक्षाचे नवीन धारण केलेले नाव. सेक्युलर दिसावा म्हणून हल्ली मुस्लिमेतर लोकांनाही हा पक्ष उमेदवारी देत असला तरी तो मूलतः अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करणारा एक कट्टर धार्मिक पक्ष आहे. ज्यांना हे पटत नसेल त्यांनी ओवैसी यांनी मुस्लिम धर्मात सर्व धर्मांनी समाविष्ट व्हावे असे विधान २०१५ साली का केले होते त्यावर विचार करावा. या पक्षाची स्थापना हैद्राबादचे निजाम मीर ओस्मान अली यांच्या सांगण्यावरून नवाब मेहमूद नवाज खान किलेदार यांनी ९४ वर्षांपूर्वी केली. पुढे १९३८ला बहादुर यार जंग हे या पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली या पक्षाने भारतीय संघराज्यात सहभागी होण्यास जहाल विरोध केला. १९४४ साली कासिम रझवी अध्यक्ष झाले आणि त्यांनी दीड लाख कट्टर रझाकारांचे संघटन केले. यावेळी या पक्षाने हैद्राबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण होण्यास विरोध केला. तसेच हैद्राबाद संस्थानामधून दक्षिण पाकिस्तानची निर्मिती करणे हेच या पक्षाचे ध्येय होते. यामुळे नेहरूंनी या फुटीरतावादी पक्षावर बंदी घातली आणि रझवीला नऊ वर्षे तुरूंगात डांबले. कायमचे पाकिस्तानला जाऊ आणि भारतात कधी परत येणार नाही या कबुलीवर मग या रझवीने स्वतःची सुटका करून घेतली आणि या सुटकेत महत्वाची भूमिका असलेला विश्वासू वकील अब्दुल वाहिद ओवैसी यांना जाताना फुटीरतावादी एमआयएम संघटनेचे अध्यक्षपद दिले. दक्षिण पाकिस्तानचे अधुरे स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी ज्या ओवैसींची होती, ते असदुद्दीन ओवैसींचे आजोबा. दक्षिण पाकिस्तानचे स्वप्न बापजन्मात साकार होणार नाही हे आता पूर्णपणे लक्षात आल्यावर या पक्षाने स्वतंत्र भारतातच कसा कट्टरतावाद वाढवता येईल याची चाचपणी करून निव्वळ दाखवण्यासाठी ओढलेला सेक्युलरवादी राजकीय मुखवटा म्हणजेच आजचा एएमआयएम पक्ष. नवचाणक्यांना त्यांचा फुटीरतावादी इतिहास माहित असून देखील राजकीय लाभासाठी हा पक्ष त्यांनी वाढू दिला. आज बिहार, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यात हा पक्ष राजकीय ताकद निर्माण करतो आहे ती कोणामुळे?
भारतीय मुसलमान नेतृत्वाच्या बाबतीत अपवाद सोडले तर कायमच कमनशिबी राहिला. वयाच्या ३५व्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्षपद मिळवलेले मौलाना अबू कलाम आझाद यांच्यासारखे प्रखर बुद्धिमान पुरोगामी नेतृत्व सोडून हा समाज मोहम्मद अली जीनांच्या प्रतिगामी नेतृत्वाला बळी पडला. १९३९ ते १९४६ अशी सलग सात वर्ष मौलाना आझाद यांनाच काँग्रेसच्या अध्यक्षपदी ठेवले गेले ते महात्मा गांधी यांच्या आग्रहामुळे. दरवर्षी नवा अध्यक्ष देण्याच्या प्रथेला विसंगत अशा आग्रहाला अंतर्गत विरोध असून देखील गांधी ठाम होते. देशातील मुसलमान मौलानांचे ऐकत नाहीत, पण काँग्रेसचे सर्वोच्च पद दिल्याने मौलानांची ताकद वाढेल आणि जीनांच्या मागे धावणारा समाज मौलाना पुन्हा काँग्रेसकडे आणतील आणि देशाची फाळणी टळेल या आशावादाने गांधी हे सर्व करत होते. त्यावेळी ओवेसींचे दादाजान आणि अब्बाजान काय करत होते हे त्यांनीच सांगावे. मुसलमानांना भडकवून जीनांनी पाकिस्तान पदरात पाडून घेतला खरा; पण मौलाना आणि त्यांना मानणारे करोडो मुसलमान भारतीय मातीशी एकनिष्ठ राहिले. शिक्षण हा प्रत्येक भारतीयाचा जन्मसिद्ध हक्क आहे हे मौलानांचे धोरण स्वराज्याच्या अधिकाराइतकेच महान आहे. स्वतंत्र भारताचे शैक्षणिक धोरण ठरवणारे भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद हे मुसलमान असून देखील या त्यांच्या धोरणाचा उपयोग त्यांच्याच समाजाने करून घेतला नाही, हे फार दुर्दैवी आहे.
ओवैसी यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, वक्तृत्वशैली आहे पण मौलानांची दूरदृष्टी ते का दाखवत नसावेत? त्यांनी ज्या समाजाच्या उद्धाराचा वसा घेतला आहे त्या समाजासमोर सोलापूर येथे बोलताना बेजाबबादारपणे परत परत बाबरी मशीद उकरण्यामागे त्यांचा उद्देश हा मौलानांचा वारस बनण्याचा नसून जीनांचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचा आहे की काय, अशी दाट शंका येते. मुसलमान आणि हिंदू या दोघांनाही भारतीय असल्याचा अभिमान बाळगण्याचा सारखा अधिकार आहे आणि मुसलमानांच्या ह्वदयामधील भारत कोणीही काढून घेऊ शकत नाही असे ठामपणे सांगणारे मौलाना आझाद आणि या देशातील मुसलमानाना सतत हिंदुत्वाची भीती घालणारे ओवैसी यांच्यात फार मोठी दरी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेवढे दलित समाजासाठी राबले, तेवढेच मौलाना आझाद मुसलमानांच्या उत्थानासाठी खपले; पण बाबासाहेबांचा दलितांनी केला तितका आदरसन्मान मुसलमान समाजाने मौलानांचा का केला नाही हे ओवैसी यांनीच सांगावे.
शिवसेनेवर ओवैसींनी टीका जरूर करावी, त्यांचा तो घटनादत्त अधिकार आहे. पण ती फक्त पक्षाच्या विचारधारेवर न करता कारभारावर देखील करायला हवी. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका करायला हल्ली कोणी फारसे उत्सुक नसतात. कारण अशी टीका महाराष्ट्रातील जनतेला पटत नाही, रूचत नाही. मग सोलापूर व इतर ठिकाणी एमआयएमने निवडणुकीत मुद्दे काय आणायचे? विरोध कशाला करणार हा यक्षप्रश्न ओवैसींसमोर आज आहे. त्यामुळेच मग जुनाच धार्मिक भावनांचा चलनी कोळसा उगाळत बसायची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांनी मुसलमान समाजाला आरक्षण द्यावे यासाठी मोर्चा काढायचे ठरवले आहे. असे आरक्षण घटनादुरूस्तीशिवाय शक्य नसल्याने मराठा आरक्षणावरील सुप्रीम कोर्ट निकालानंतर स्पष्ट झाले आहे. मुसलमान आरक्षणावर ओवैसी गंभीर असतील तर त्यांच्या मोर्चाची जागा दिल्ली असली पाहिजे. पण महानगरपालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रात आहेत, त्यामुळेच नाईलाजाने ते हा मोर्चा मुंबईत काढत असावेत. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा हा हास्यास्पद प्रकार आहे. मुसलमान आरक्षण हा गंभीर विषय आहे आणि त्यासाठी त्यांना समाजातील सर्व घटकांसोबत संवाद साधून शांततामय मार्गानेच जावे लागेल. ओवैसींच्या मोर्चामुळे जर आरक्षण मागणीला निवडणुकांचा राजकीय वास लागला तर मुसलमान आरक्षणाचा मुद्दा भरकटू शकतो, हे सुज्ञ मुसलमानांनी ओळखून या समाजाने ओवैसींच्या थिल्लर नेतृत्वाचा आधार न घेता राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहात भूमिका मांडत राहावी.
बिर्याणी हा पदार्थ हिंदू-मुसलमान दोघेही आवडीने बनवतात आणि खातात. हैद्राबाद हे ओवैसीसाठी कमी आणि त्या खर्‍या अर्थाने सेक्युलर बिर्याणीसाठी जास्त ओळखले जाते. भारतीय समाजाच्या आवडीच्या आणि एकात्मतेचे प्रतीक असलेल्या बिर्याणीत कम्युनल मिठाचे मोठे खडे टाकणे ओवैसींनी बंद करावे. त्यांच्या खयाली पुलावाने मतदारांचे पोट भरत नाही हे जाणून वेळीच स्वतःत आणि पक्षात सुधारणावादी पुरोगामी असा सकारात्मक बदल घडवून आणावा, कारण त्यांच्या समाजाला आज जीनांची नाही, तर मौलाना आझाद यांच्या विचारधारेची गरज आहे.

Previous Post

बिटकॉइन्सचा फुगा कधी ना कधी फुटणारच!

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

कारण राजकारण

भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

May 22, 2025
कारण राजकारण

जातगणना : एक चुनावी जुमला!

May 15, 2025
कारण राजकारण

मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

May 15, 2025
कारण राजकारण

टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

May 15, 2025
Next Post

टपल्या आणि टिचक्या

वात्रटायन

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.