• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

खराखुरा राष्ट्रीय उत्सव!

- संतोष देशपांडे (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 1, 2022
in देशकाल
0
खराखुरा राष्ट्रीय उत्सव!

लालबागचा राजा, सिद्धिविनायक ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट असे एक ना अनेक शेकडो ट्रस्ट गणेशभक्तांनी देणगीदाखल दिलेल्या पैशांचा विनियोग मोठमोठ्या सामाजिक कामासाठी करतात. हजारो लोकांचे जीव वाचवले जातात. लाखो लोकांच्या शिक्षणाला मदत केली जाते. लोकमान्य टिळकांनी कदाचित ह्या उत्सवाला राष्ट्रीय उत्सव म्हणताना फार दूरदृष्टीपणा दाखवला होता असेच आज म्हणावे लागेल.
– – –

भारतात सर्व जातीधर्मात मिळून जे काही सण, उत्सव साजरे होतात, त्याची यादी फार मोठी आहे. या सर्व उत्सवांतून राष्ट्रीय कार्यात सर्वात मोलाचे योगदान देणारा सण गणेशोत्सव हाच असणार आहे. गणेशोत्सव एकमेव सण असा आहे, ज्या सणाने गेल्या १३० वर्षात राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक कार्यात फार मोलाची कामगिरी बजावली आहे. सण म्हणजे पूजापाठ, गोडधोड जेवण, नातेवाईकांचे एकत्र येणे हे ओघानेच येते. मिरवणुका, देखावे हे देखील बर्‍याच सणातून असतात, पण गणेशोत्सवात ह्या सर्व गोष्टी तर एकत्र येतातच, पण त्यासोबतच सगळा समाज देखील सुख दुःख, जात पात विसरून एकत्र येतो. तो नुसता एकत्रच येत नाही, तर ह्या राष्ट्राचे, ह्या समाजाचे आपण काही देणे लागतो ह्या भावनेतून ह्या काळात संपूर्ण समाज एका समर्पणाला देखील वाहून घेतो.
सार्वजनिक गणेशोत्सव ही कोणा एका व्यक्तीची कल्पना म्हणता येणार नाही, तरीदेखील ह्याची खरी सुरुवात पुण्यात झाली हे मात्र ठामपणे सांगता येईल. पुण्याचे नानासाहेब खाजगीवाले हे ग्वाल्हेर मुक्कामी असताना त्यांनी तिथल्या महाराजा शिंदेंच्या महालातील भव्य दिव्य गणेशोत्सव पाहिला व असा उत्सव आपण पुण्यामध्ये देखील करावा ही कल्पना त्यांचीच होती. पुण्यातील गुरूजी तालमीत १८८७पासून त्यांच्या पुढाकाराने गणेशोत्सव छोट्या प्रमाणात सुरू होता. तो मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा अशी कल्पना त्यांनी भाऊसाहेब लक्ष्मण जावळे या मित्राकडे मांडली असावी. भाऊसाहेब हे स्वतः क्रांतिकारी विचाराने भारावलेले होते. निष्णात वैद्य असलेल्या भाऊसाहेबांनी पुण्यात धर्मादाय दवाखाना देखील चालवला होता (त्यांचा पिढीजात व्यवसाय शालू रंगवण्याचा होता, ज्यामुळेच लोक त्याना भाऊ रंगारी ह्या नावानेच जास्त ओळखत). भाऊ रंगारी ह्यानी गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्यासंदर्भात एक बैठक बोलावली. या बैठकीत नानासाहेब खाजगीवाले, अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटावडेकर, लखुशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, खांडोबा तरवडे, मामा हसबनीस, दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन हे विविध जातीवर्गाचे प्रतिष्ठित उपस्थित होते. ह्या बैठकीत ठरल्यानुसार १८९२मध्ये पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटावडेकर आणि नानासाहेब खासगीवाले यांनी आपापल्या वाड्यात गणेशोत्सव साजरा केला (पुढे दोन वर्षानंतर भाऊ रंगारी आणि घोटावडेकर ह्यांचा हत्यार बाळगण्याचा परवाना रद्द झाला, यावरून गणेशोत्सवाला ब्रिटिश सरकार धास्तावले होते हे लक्षात येते). सार्वजनिक स्वरूपात धार्मिक उत्सवाला त्या काळात परवानगीची अडचण होती, म्हणून म्हणावे तर खाजगी आणि म्हणावे तर सार्वजनिक असे त्या उत्सवाचे संदिग्ध स्वरूप ठेवलेले होते.
पुण्यातल्या तीन गणपतींची १८९२मध्ये दहा दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुदर्शीच्या दिवशी जंगी मिरवणूक काढण्यात आली आणि ह्या मिरवणुकीत काशिनाथ ठाकुजी जाधव यांचा वाद्यवृंद देखील होता. लोकमान्य टिळकांनी ह्या तीनही उत्सवांना भरपूर प्रसिद्धी दिली. अग्रलेख लिहिले. अग्रलेखातूनच त्यांनी गणेशोत्सव हा एक राष्ट्रीय सण आहे असे सांगत लोकांना हा उत्सव साजरा करणे एक राष्ट्रकार्य आहे, अशाच स्वरूपाचे आव्हान केले. मुंबई आणि पुण्यात त्या काळात हिंदू मुस्लिम दंगे उसळले होते. ब्रिटिशांनी ह्या दरम्यान धार्मिक द्वेष वाढवून दोन धर्मात फूट वाढत कशी राहील ह्या दिशेनेच पावले टाकली. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर ब्रिटीशांनी पराकोटीचे दडपशाहीचे धोरण अवलंबिले होते. हिंदू समाजाच्या एकत्र येण्यावर बरीच बंधने घातलेली होती. ह्या दंगलीनंतर त्यात अजून भर पडली आणि म्हणूनच हिंदू आणि विशेषकरून पुणे आणि मुंबई येथील हिंदू ब्रिटीशांवर कमालीचे नाराज होते. हिंदूंमधील ह्या धुमसणार्‍या असंतोषाचे एका मोठ्या स्वातंत्र्य चळवळीत रूपांतर करणे शक्य आहे हे लोकमान्य टिळकांनी हेरले होते आणि त्यासाठी गणेशोत्सव हे एक उतम आणि सुरक्षित माध्यम आहे हे त्यानी ओळखले. १८९४ साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांनी स्वतः ‘ केसरी’ गणेशोत्सव सुरू केला. एक घरगुती पारंपरिक सण असलेल्या गणेशोत्सवाचे एका राष्ट्रीय सणामध्ये रूपांतर करण्यात लोकमान्यांचा मोठा वाटा होता. गणेशोत्सव हे निमित्त होते पण खरा उद्देश हा लोकाना एकत्र आणून स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग वाढवणे हाच होता आणि त्यात ते बरेच प्रमाणात यशस्वी ठरले. गणेशोत्सव मग स्वातंत्र्य चळवळींचे केंद्रबिंदू ठरला.
गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूपात सुरू केला असला तरी त्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश पूजनामध्ये वर्णवर्चस्व सुरूच होते. बहुजनाना, दलितांना पुजेसाठीचा मान दिला जात नव्हता. त्याला हादरा दिला गेला १९२६ साली. दादरच्या टिळक पुलाखाली दक्षिणेकडे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हायचा. दादरच्या व्यापारीवर्गापासून मजुरांपर्यंत सर्वजण ह्या गणेशोत्सवाला देणगी देत असल्याने हा गणेशोत्सव थाटात साजरा होत असे. ह्या मंडळावर वर्चस्व ब्राम्हणांचेच होते. टिळकांच्या मृत्यूनंतर एकूणच गणेशोत्सव मूळ राष्ट्रीय भावनेपासून दुरावत परत निव्वळ धार्मिक स्वरूपावर जाऊ लागला होता. दादरचा गणेशोत्सवदेखील त्याच वाटेवर गेला होता. पाचशे दलित तरुणांनी प्रत्येकी चार आणे वर्गणी देत ह्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्यत्व घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील दादरलाच राहात होते आणि १९२६ साली दादरच्या सार्वजनिक उत्सवातील गणेशपूजेचा मान दलितालाच मिळायला हवा अशी मागणी त्यांनी लावून धरली. प्रबोधनकार ठाकरे ह्यांनी बाबासाहेबांच्या मागणीला पाठिंबा दिला व दलिताला मान दिला नाही तर उत्सव होऊ न देण्याची ठाम भूमिका घेतली गेली. ह्यावर तोडगा म्हणून पूजेनंतर दलितांच्या हस्ते फुले वाहून त्यांना मूर्तीला स्पर्श करू द्यायचे ठरले. डॉ. आंबेडकरांचे सहकारी मडकेबुवा ह्यांनी मग तेथील सार्वजनिक नळावर आंघोळ केली व गणपतीला फुले वाहिली. गणेशोत्सव अशा प्रकारे आंबेडकरी चळवळीचे केंद्र झाला होता.
देवाकडे वैयक्तिक नवस बोलणारे भाविक बरेच असतात पण गणपती बाप्पाची बातच न्यारी. कोळी बांधव आणि लहान व्यापारी हक्काची जागा नसल्याने रस्त्यावर बाजारासाठी बसायचे. त्यांनी हक्काची बाजाराची जागा हवी म्हणून गणपती बाप्पाला सार्वजनिक नवस मागितला. १९३४ साली या गरजूंच्या मदतीला काही प्रतिष्ठित धावून आले आणि रय्यबअली तय्यबजी यांनी आपली मोकळी जागा या गरजूंना दिली. कोळी बांधव आणि लहान व्यापारी आपला बाजार स्वतःच्या हक्काच्या जागेत भरवू लागले. मग ह्या ठिकाणी जवळच १९३४ साली कोळीबांधवानी होडी वल्हवणार्‍या बाप्पाची स्थापना केली, जो आज नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून आपण ओळखतो. गणेशोत्सव अशा रीतीने जनतेला सोयीसुविधांसाठी एकत्र आणण्यास कारणीभूत ठरला.
स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सव मोकळेपणाने आणि थाटात साजरा होऊ लागला. राष्ट्रीय चळवळीत मोठे योगदान असलेल्या गणरायाला त्या काळातील महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे दुःख नक्कीच दिसत असणार. मराठी माणसाचे हक्काचे महाराष्ट्र राज्य अजून स्थापन होत नव्हते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोर धरू लागली आणि गणेशोत्सवाच्या कार्यक्रमातून अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख आणि शाहीर गवाणकर यांच्या लाल बावटा कलापथकांच्या कार्यक्रमांनी अवघे वातावरण संयुक्त महाराष्ट्रमय केले. गणेशोत्सवातील देखावे अखंड महाराष्ट्राची मागणी करू लागले.
१ मे १९६०ला हे महाराष्ट्र राज्य झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गणेशोत्सवाचे योगदान हे अनन्यसाधारण होते. स्वातंत्र्याचे म्हणावे तसे फायदे मजूर आणि पददलितांना मिळत नव्हते. मुंबईतील गिरणगावातील कामगार अजून पिळला जात होता. कामगारातून हळूहळू जागृती निर्माण होत होती. गणेशोत्सवातून मग कामगार नेत्यांची प्रखर भाषणे झडू लागली. गिरणगावातील गणेशोत्सव हा मग कामगार चळवळींचे केंद्र बनला. शिवसेना वाढली तीच मुळात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून. जिथे शिवसेनेची शाखा तिथे गणेशोत्सव आज देखील आहेच. आजची गणेशोत्सवातील डोळे दिपवणारी भव्यता, प्रचंड मोठ्या विसर्जन मिरवणुकी आणि त्यातून ओसंडून वाहणारा उत्साह हे सर्व शिवसेनेमुळेच शक्य झाले.
गणेशोत्सवाने फक्त भाविकांना, श्रद्धापूर्वक पूजा करणार्‍या भक्तांनाच खुणावले असे नाही, तर प्रखर विवेकवादी आणि धर्मातील थोतांडावर हल्ला चढवणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर देखील एका वेगळ्या प्रकारे गणेशोत्सवाकडे आकर्षित झाले. गणेशमूर्तींमधून कालानुरूप पर्यावरणाचा विनाश करणारे घातक रासायनिक पदार्थ वापरले जाऊ लागले व त्यांच्या वाहत्या पाण्यातील मोठ्या प्रमाणावरील विसर्जनामुळे नदी नाले प्रदूषित होऊ लागले. डॉ. दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांंनी मग पर्यावरणपूरक मूर्ती आणि कृत्रिम तलावात विसर्जन ह्यासारखी अनोखी मोहीम राबवली. धर्मांधांनी डॉक्टरांची निर्घृण हत्या केली तरी देखील डॉक्टरांनी सुरू केलेली ही पर्यावरणपूरक मोहीम काही थांबली नाही. पर्यावरणावरील मोठे विघ्न आज बर्‍याच अंशी टळले आहे.
लालबागचा राजा, सिद्धिविनायक ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट असे एक ना अनेक शेकडो ट्रस्ट गणेशभक्तांनी देणगीदाखल दिलेल्या पैशांचा विनियोग मोठमोठ्या सामाजिक कामांसाठी करतात. हजारो लोकांचे जीव वाचवले जातात. लाखो लोकांच्या शिक्षणाला मदत केली जाते. लोकमान्य टिळकांनी कदाचित ह्या उत्सवाला राष्ट्रीय उत्सव म्हणताना फार दूरदृष्टी दाखवली होती, असेच आज म्हणावे लागेल. एका धार्मिक सणाचे राष्ट्रनिर्माणात आणि समाजकार्यात असणारे प्रचंड योगदान म्हणून आपणा सर्वांना ह्या गणेशोत्सवाचा सार्थ अभिमान असला पाहिजे आणि तो सण विधायक समाज निर्माण करणार्‍यांच्या हातातच आपण कायम ठेवला पाहिजे.
गणपती बाप्पा मोरया

Previous Post

शेतीचं, सृजनाचं प्रतीक… श्री गणराय!

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

सुप्रीम कोर्टाने हातोडा हाणला तरी निर्लज्जम् सदासुखी!
देशकाल

सुप्रीम कोर्टाने हातोडा हाणला तरी निर्लज्जम् सदासुखी!

May 18, 2023
भाकरी, तवा जागच्या जागी; महाशक्तीचे ग्रह मात्र फिरले!
देशकाल

भाकरी, तवा जागच्या जागी; महाशक्तीचे ग्रह मात्र फिरले!

May 11, 2023
रामाच्या अयोध्येत रावणाचे राज्य!
देशकाल

रामाच्या अयोध्येत रावणाचे राज्य!

May 5, 2023
देशकाल

विसरा महाग भाजी, घ्या स्वस्त फाइव्ह जी!

October 6, 2022
Next Post

टपल्या आणि टिचक्या

देवा ट्री गणेशा…

देवा ट्री गणेशा...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.