• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

गणपती इले…

- सई लळीत (विचारवंतीण)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 1, 2022
in मी बाई विचारवंतीण
0

कोणीही कसल्याही घोषणा न देता कोकणच्या नसानसातून एकच आवाज घुमत असतो… गणपती इले… गणपती इले.
गणपतीच्या आधी आठ दिवस घरकारीण त्याला करवादून म्हणते, ‘दरवर्षा तुमका रंग काढुची आठवण करुची लागता? आज घर सगळा झाडून घेवा आणि उद्या रंग काढून टाका. कामा खूप पडली हत!’
‘आधी कडकडीत चा करुन दे आल्याची.. मगे कामाक लागतय.’
गरम चहाने घसा शेकला आणि जीभ भाजली की मगच त्याला चहा पिल्यासारखा वाटतो. मग मात्र तो झडझडावून कामाला लागतो.
घर झाडून झालं की रंग आणण्यासाठी तो बाजारात जायला निघतो. जाताना कुंभारांच्या गणपतीच्या शाळेवर नजर टाकल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. शाळेत गेल्यावर शेकडो युनिफॉर्म घातलेल्या मुलांमधलं आपलं मूल जसं अचूक ओळखता येतं तसा तो आपला गणपती अचूक ओळखतो. बरोबर दीड महिन्यापूर्वी पाट दिला होता. त्यानंतर रोज एक फेरी होतेच.
कोकणात एखादी वस्तू आणल्यासारखा गणपती आणत नाहीत. गणपतीच्या शाळेत जाऊन आधी मानाचा पाट दिला जातो.पाट दिला की कोकणात गणपती उत्सवाला सुरुवात होते.. कसला गणपती हवा… उदा.जास्वंदीच्या फुलावरचा, उंदरावरचा, गाय गणपती, शंकर पार्वती आणि गणपती इ. मग कपड्यांचा रंग सांगितला जातो.
मग जाता येता त्याची विचारपूस केली जाते. शाळेतल्या मुलाची प्रगती बघावी तशी त्यावर रोज एकदा तरी नजर टाकली जातेच. शाळा म्हटलं की हजेरी भरायला हवीच असं त्याच्या मनात येतं काय कोण जाणे! पण शाळेत गेल्यावर त्याला देवसभेत गेल्यासारखं वाटतं. विघ्नहर्ताच तो. त्याला बघूनच सगळ्या दुःखांचा विसर पडतो. गणपती हळुहळू आकार घेत जातो. कोरीव काम सुरु झालं की घरवाल्याचं भान हरपतं. मग मुलाबाळांना घेवून एक फेरी मारतो. घरकारणीला जावून गणपतीची प्रगती सांगतो.
केवळ आपल्याच नव्हे तर इतरांच्या गणपतीवर त्याची नजर असते (जशी दुसर्‍यांच्या मुलांवर असते). कोणाचा कसला गणपती आहे याची अचूक खबर त्याला तिथे कळते. त्यातलच एखादं भावलेलं रुप तो आपल्या पुढच्या वर्षासाठी नक्की करतो.
आजुबाजुच्या जगातल्या घडामोडींचा ठसा गणपतीच्या मूर्तीवरही असतो. चार वर्षापूर्वी मल्हाराच्या रुपातला गणपती फेमस झाला होता. कोकणात मात्र पारंपारिक गणपतीच आवडीने पूजला जातो.
गणपतीच्या शाळेत जाणं. त्यांना लागणारी किरकोळ मदत करणं उदा. चहापाणी देणं, डास चावत असल्यास धुमी फिरवणं, जगाच्या गजाली मजेत चघळत बसणं हा खूप जणांच्या आनंदी जगण्याचा भाग होतो. (मला तर ही वर्षातून एक मानसोपचाराची कार्यशाळा वाटते. माणूस वर्षभर फ्रेश एकदम.)
गणपतीची नजर रेखण्यासाठी खास कारागीर असतात. त्यांना तिथे बराच मान असतो. नजर प्रेमळ हसरी हवी आणि आपल्यावर रोखलेली हवी यावर मालवणी माणसाचा कटाक्ष असतो.
या सगळ्या गदारोळात वैनीबाय आनंदाने भिरभिरत असते. घराला बरा मस्त निळा किंवा गुलाबी रंग काढून झाला की गणपतीच्या मागे दिसणार्‍या चित्रासाठी ती आवाठातल्याच एखाद्या चित्रकाराला गळ घालते. मग एखादं सुंदरसं कमळ धाडकन भिंतीवर अवतीर्ण होतं. त्याला खाली गुलाबाची कळी असते. आंब्याची सुंदर हिरवीगार पानं असतात.खाली पाणी वगैरे काही नसल्यामुळे ते एकदम दैवी वाटतं.
कधी भिंतीवर लोभस निळाभोर क्रिष्णा आगमन करतो. गुलाबी जाड ओठ असलेला. एक हात जाड एक हात बारीक असलेला कृष्ण जेव्हा बासरी वाजवायला सुरु करतो तेव्हा घर भावभक्तीने निनादून जातं. वैनीबायची तर चित्रावरून नजर हटत नाही. कामांपुढे थारा नसतो… आणि तिला थकायला सवड नसते.
घरात काय जिन्नस हवे त्याची यादी करुन ती नवर्‍याकडून सामान आणवून घेते. एक दिवशी दुपारी जेवणं आटपली की चणाडाळ भाजून, दळून ती गूळ घालून पुरण करुन घेते आणि रात्री पोरी बाळींना हाताशी धरुन मोठा डबा भरुन छानशा खमंग करंज्या करुन घेते. आपल्या मुंबयवाल्या पावण्यांना या नेवर्‍या आवडतात; नव्हे त्यासाठीच ते येतात असा दाट संशय तिला कित्येक वर्षापासून आहे… बरं तो कोणी दूरही करत नाहीये… हे महत्वाचं! काठपदराची साडी, हिरव्यागार बांगड्या आणि केसात आंबाड्यावर माळलेली फुलं यामुळे ती साजिरी दिसत असते.
गणपती यायच्या आधी दोन दिवस चाकरमानी मुंबयसून येतात. सालं गावाचं रम्य रुप बघून ते शापच खुळावून जातात. येताना फळं, कपडे, मिठाया, लायटींगचं सामान, उदबत्या असं बरच कायमाय सढळ हस्ते घेवून येतात. खूप दिवस त्यांनी आणलेल्या सफरचंदांनाही उदबत्यांचा वास येतो आणि ढेकरही उदबत्तीच्या वासाचे येतात.
आज मला कळतंय की चाकरमानी कोकणात हा खायच्या प्यायच्या आरामाच्या आशेने नव्हे तर निव्वळ मनःशांती मिळवण्यासाठी येतो. घरी आल्यावर खळ्यात पेळेजवळ स्वागतासाठी आपोआप उगवलेले तिरडे आणि हरणं बघून तो समाधान पावतो आणि मुंबईला परत जाईपर्यंत तो सद्गदीत अवस्थेतच असतो.
तर गणपतीची माटी बांधून होते. कवंडाळं, हरणं, कांगलं, छोटा भोपळा, तवसं, ओल्या सुपार्‍या माटवीची शोभा वाढवतात. मोदकासाठी पिठी दळून होते. हरताळका जागवून होतात. आणि मग साक्षात गणरायांचं सकाळीच आगमन होतं. पायावर दुध पाणी टाकून आणि निरांजन उदबत्ती ओवाळून ती त्याला आत घेते.
आम्ही मुंबईत असतानाची गोष्ट. आम्ही सुट्टी दिवशी एका परिचितांकडे गेलो होतो. भरपूर गप्पा टप्पा खाणं पिणं झाल्यावर (चहा अर्थातच) त्यांच्या पत्नीने ट्रंकेतून एक पंचधातूची गणरायाची मूर्ती काढली आणि म्हणाली, आम्ही गणपतीला या मूर्तीचीच पूजा करतो आणि पाच दिवसांनी घरातच टबात विसर्जन करतो.
आणि आरती कोण करतं?
दुपारी मीच आणि रात्री आम्ही दोघं. इथे कोण शेजारी पाजारी येत नाहीत आरतीला!’
त्यांचा मुलगा परगावी शिकायला होता.
छान.. प्रदूषण वगैरे शून्य’ मी म्हटलं. मला अजून काही बोलायला सुचेना.
असो.
देव मस्तकी धरावा. अवघा हलकल्लोळ करावा. असं समर्थांनी म्हटलं आहे. हलकल्लोळ याचा अर्थ बोंबाबोंब असा नव्हे तर उत्सव नादमय असावेत असा त्याचा अर्थ. म्हणून भजनं आरत्या मोठमोठ्याने म्हणून उत्सव साजरा होता. गणपती घरी आल्यावर पाच दिवस सात दिवस अकरा दिवस माणसांच्या उत्साहाला भरती येते. खाणं पिणं, गाणं बजावणं यांची रेलचेल असते.
चतुर्थी दिवशी पाच प्रकारच्या भाज्या, वरण भात, मोदक असा रसाळ स्वयपाक ती रांधते. केळीच्या लांबझोक हिरव्यागार पानांवर जेव्हा ती पंगत वाढते तेव्हा सदानकदा पृथ्वीवर नजर ठेवून असलेला देवांचा अख्खा जत्था जेवायला खाली उतरलाय असं वाटतं.दिवस सगळा जेवणी खाणी आणि भेटीगाठी तर रात्री भजनं आणि फुगड्या. चिंता काळजी करायला दोन मिनीटं वेळ मिळत नाही.
बघता बघता गणपतीचे सुवासिक दिवस मागे पडतात. गणपती जायचा दिवस उजाडतो. तिचे डोळे सकाळपासून भरतच असतात. दुपारी वडे खिरीचं जेवण रांधून ती गणरायाला नैवेद्य दाखवते. त्याच्या हातावर दही घालते.. आणि दाटल्या गळ्याने निरोप देते. यंदा उशीरा इलो गणपती.. पुढल्या वर्सा बेगीना येतलो. ती हळूच मनाशी पुटपुटते.

Previous Post

पॉवरलिफ्टिंगचे द्रोणाचार्य

Next Post

क्विनोआ : प्राचीन पण परदेशी

Related Posts

मी बाई विचारवंतीण

सारवासारवीचे दिवस

September 29, 2022
मी बाई विचारवंतीण

कोरस

September 16, 2022
मी बाई विचारवंतीण

दगडांच्या देशा…

August 4, 2022
मी बाई विचारवंतीण

कोथिंबीरवाली बाई

July 21, 2022
Next Post

क्विनोआ : प्राचीन पण परदेशी

विघ्न टळलं... विघ्नहर्त्याच्या कृपेनं!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.