सू-संस्कारी, फारदर्शक, स्वछ चिप मिनिष्टर यांच्या मिनिष्टर मंडळातील एक घरबार मिनिष्टर धोकेश छदाम यांच्या दालनाबाहेर काही जण रांगेत बसलेत. आत मध्ये मंद आणि कुंद प्रकाशात कुणी बसलेलं असावं. त्यात दालनाची रचना अशा प्रकारे केली आहे की आतला आवाज जराही बाहेर येऊ नये. बाहेर खुर्चीवर चोरट्या नजरेनं आडदांड माणूस बसलेला. तो क्षणा क्षणाला नुसत्या संशयाने उठून चौफेर नजर टाकतोय. तितक्यात एक रंगाने काळा-सावळा कपाळाला सफेद गंध लावलेला माणूस तिथे येतो.
‘जय महाराष्ट्र!’ सावळा माणूस अदबीने वाकत हात जोडतो.
‘जय गुजरात!’ आडदांड जरासा उद्धटपणे प्रतिसाद देतो.
‘साहेब, इथं बाहेर बसून तुम्ही जय महाराष्ट्र घालत नाहीत? या महाराष्ट्रात…?’ सावळा माणूस आश्चर्याने विचारतो.
‘अबे धंदे के टाइम पे आवाज मत बढा! अभी हमने शटर खोल्या है ना? जय गुजरात चिंधे साब ने दिया स्लोगन है! वहिच रटने का और बोलनेका आदेश दिया हय, छदाम साबने. इधर आदरबिदर सबकु मिलेगा! लेकिन ये मोहदानीराष्ट्र है ना? यहाँ इज्जत तो खाली गुजराती कूच मिलेगी! उसकी वजह से साब आज काऊंटर पर है ना?’ तो आडदांड फाडफाड बोलतो.
‘आपण पीए की शिपाई?’ सावळा पुढला प्रश्न सावधपणे विचारतो.
‘मैं? बाउंसर!’ आडदांड छातीपुढे करून अभिमानाने उत्तर देतो.
‘नवीन भरती काय?’ सावळा शंकेनं विचारतो.
‘नही साब! वो उधर रेड हुई न? तो सब पंटर लोग को ऐसे अलग अलग जगह पे पैâला दिया है साबने! आप उनके रेगुलर कस्टंबर हय क्या? लईच पूछताछ कररेले हो?’ बाऊन्सर बाऊन्सर टाकतो.
‘छे! छे!! अय नाही! काहीतरीच काय?’ सावळा पाल झटकल्यागत घाईने हात झटकत नकार देतो.
‘इतना कु चिल्लाते साब! जरा हल्लू बोलिए ना? इधर कुछ लफडा नहीं मंगता मेरेकू! तो क्या आप वो रेती डंपर के ड्रायव्हर हो क्या?’ बाउंसर पुढे सरकत कानात पुटपुटत विचारतो.
‘रेती? कुठली रेती? काय संबंध?’ सावळा आश्चर्याने प्रतिप्रश्न करतो.
‘वहीच कोंकण के नदी के घाट की? तुम वहांसेच डंपर भर भर के लाते ना इधर? ‘ बाउंसर पुन्हा अनाकळनीय प्रश्न करतो.
‘नाही, नाही! पण असं का वाटलं? ‘ सावळा स्वतःकडेच संशयाने बघत विचारतो.
‘नही! वो लडके लोग बी पैâला दिए है ना साबने! मेरेकू लगा उसमें से तुम एक हो क्या?’ बाउंसर कारण सांगतो.
तितक्यात लिफ्ट वर आल्याची शिपाई वर्दी देतो. मागोमाग एक दोन कार्यकर्ते लिंबू सरबत, धागेदोरे, काही अवाढव्य बॅगा,
सिगारेटची पाकिटं, गोमय, विदेशी पेय असं सारं साग्रसंगीत घेऊन येतात. घरबार मिनिष्टरच्या दालनात जातात. मागोमाग पावलांचा दणादण आवाज येतो. आवाजापाठोपाठ अजस्त्र देहाचे सात-आठ बनियन आणि लाल लुंगीधारी गुंड वा दरोडेखोर वाटावे असे इसम आस्तेकदम चालत दालनाकडे येतात आणि आत प्रवेश करतात. दालनाबाहेर बसलेली सगळी मंडळी स्तब्धपणे त्या टोळीकडे बघत राहतात. थोड्याच वेळात आतून अंगारे-धुपारे पेटवल्याचा वास येतो. दालनातून सुवासिक आणि काही ऊग्र वासांच्या लाकडांचा धूर बाहेर येतो. मध्येच तुपाचा दर्प दरवळतो. सगळ्यांच्या नजरा दालनाच्या दाराकडे लागून राहतात.
मधला कार्यक्रम अर्धा-एक तास चालतो. अचानक त्या धुरावर विदेशी पेय टाकल्याचा दर्प येऊ लागतो. मागून धूर बंद होतो. त्यापाठोपाठ दालनातून एक हिरवा-पिवळा वस्त्रधारी कुस्करलेला बंगाली-आसामी बाबा बाहेर पडतो. जाम घडी मोडल्याने तो हेटकत हेटकत चालतो. भयाने दालनाकडे बघत रडत-चरफडत वेगाने लिफ्टकडे धावतो. उपस्थित बसलेल्यांच्या चेहर्यावर एकच भाव उमटतो. ‘अरेच्या! हा कधी गेलेला आत?’ तर बाउन्सरच्या चेहर्यावर ‘सुटला बिचारा एकदाचा!’ असले भाव तरळतात.
लिफ्ट खाली पोहचते ना पोहोचते, तोच त्वरित वर देखील येते. लिफ्टमधून चार शिपाई एक मोठा टेबल घेऊन वर येतात. ते दालनात घेऊन जातात. ते चारजण दालन सोडेपर्यंत दाराच्या फटीतून एक गाणं पुसटसं कानावर येतं, ‘आम्ही हाये टोली, गद्दार टोली, चिंध्याची चोली रे…’ असे काहीसे शब्द कानावर येतात. चौघे शिपाई माघारी फिरतात नि दालनाचे दार बंद होते.
‘हे टेबल का नेलं आत?’ सावळा माणूस कसल्याशा शंकेनं प्रश्न विचारतो.
‘ये साब की टोली का टेबल डांस भोत फेमस हुएला था ना? तो जब भी उन लोगों का दिल करता है, तब वो टेबलच लाते!’ बाउंसर उत्तर देतो.
‘आता ह्यांना कितीवेळ लागेल आत?’ काहीशा चिंतेने सावळा प्रश्न करतो.
‘क्यू घाई हय क्या तुमको?’ बाउंसर उलट सवाल करतो.
‘घाई नाही पण काम महत्त्वाचं होतं म्हणून विचारलं.’ सावळा निराशेने सांगतो.
‘ये तुम्हारे आगे इत्ती बडी लाइन लगेली है। दो-एक घंटे के बाद अंदर से एक मेसेज आयेगा। तो सब बैठेले लोगोंकु एक एक टोकन दूंगा मैं!’ बाउंसर माहिती देतो.
‘टोकन? ते कशासाठी?’ सावळा व्यक्ती गांगरून विचारतो.
‘वो क्या है ना? जिसको चांदनी को देखना है, रज्जो को देखना है, या खाली दो घूंट लेने हो ऐसे हर एक को अलग टोकन है,’ बाउंसर थंडपणे सांगतो.
‘अरे पण हे मिनिष्टरचं दालन आहे ना? ही सारी लोकं कामं घेऊन आली असतील ना? त्यांना ह्यात कसला असेल इंटरेस्ट?’ सावळा माणूस!
‘दालन था। अब इसेही बार बना दिया साब ने और लोग काम के वास्तेच आते इधर। और इधर अंदर जाते ही सब भूल जाते है। माहौल ही कुछ ऐसा रेहता ना!’ बाउंसर पुढे काही बोलू पाहतो.
‘अरे पण लोकं समस्या घेऊन आलेत त्यांना तू काय दाखवतोय? तुला कळतं का?’ सावळा जरा कावतो.
‘हर मर्ज की दवा। इससे सब समस्या गायब हो जाती!’ बाउंसर सावळ्या व्यक्तीला समजावतो.
‘आज तू दालनात ही दवा दाखवतोय, उद्या तू सदनात घेऊन जाशील? काही रीत?’ सावळा किंचित आवाज वाढवतो.
‘साब सदन में बोर होते न सब लोग? इसकी गटर, उसकी मटर. ये खड्डा, वो बुढ्ढा! साला, बिनकाम का लफडा होता है। वैसे में गरीब आदमी हाउस में रमी तक खेल नही सकता. और वहां सब मेम्बर लोग की ढेर और चिल्लमचिल्ली या मारपीट देखने की वजह ऐसा कोई आइटम नंबर देखने कु मिल जाता तो लोग खुशीसे पागल बनते ना?’ बाउंसर एक वेगळंच चित्र उभं करतो.
‘पण यात माझा काय फायदा? इथंही माझं नाव वापरून छदाम साहेबानं स्वतःचंच उखळ पांढरं करतील की!’ सावळा नाराजीने बोलतो.
‘मतलब मैं समझा नहीं।’ काहीसा गोंधळून बाउंसर सवाल करतो.
‘आता त्या धाड पडलेल्या ठिकाणचं बिल माझ्यावर फाडलं, मग सदनात त्यांनी बार सुरू केला तर किमान ती चावी माझ्याकडे देतील का?’ सावळा व्यक्ती भाबडी आशा बोलून दाखवतो.
‘लेकिन आप हो कौन?’ बाउंसर अंती ओळख विचारतोच.
‘मीच तो कधीही न झालेला चालक कम पार्टनर शेट्टी!’ शेट्टी तेवढं बोलून तरातरा आत दालनात जातो, बनियन व लाल लुंगी ह्या चिंध्ये गँगच्या घरबार मिनिष्टर धोकेश छदाम याच्या हातून बार आणि नव्याने घडवू घातलेला बार अर्थात सदन अशा दोहोंच्या चाव्या हिसकावून घेऊ बघतो. तोच घरबार मिनिष्टर ची तंद्री भंगते आणि तो मोठ्याने किंचाळतो, ‘मय मेरा बार नहीं दूंगा!’ चारदोन बाटल्या त्यासरशी फरशीवर पडतात आणि फुटतात. बाहेरील शिपाई आत डोकावत गालातल्या गालात हसत सफाई कामगाराला नेहमीप्रमाणे रिंग करतो.