• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
June 30, 2022
in टपल्या आणि टिचक्या
0

□ देशात फार मोठी मनगटशाही सुरू – मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष.
■ ती सगळ्यांनाच दिसते आहे. विचारवंतांनी तिचा निषेध करून थांबू नये, तिच्या विरोधातल्या लढ्यात निर्भयपणे उतरून त्याला बळ द्यावे.

□ अग्निपथ योजनेचा विरोध करणार्‍यांवर भडकली कंगना.
■ तिच्याकडे हल्ली दुसरं काम तरी काय आहे? भरती करून घेता आलं तर पाहा.

□ भाजप कार्यालयात अग्निवीरांना सुरक्षारक्षक म्हणून नेमू : भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या वक्तव्याने वाद.
■ पोटातलं ओठांवर येतं ते असं… ही यांची सैनिकांप्रति भावना आणि हे सगळ्या देशाला देशभक्ती शिकवतात.

□ तोटा वाढला. खासगी कंपन्या त्रस्त.
■ अजून मुका मार खात बसा स्वस्थ.

□ कोरोना ही चीनचीच कालाकांडी : जागतिक आरोग्य संघटनांच्या प्रमुखांची खासगीत कबुली.
■ जे जगाला माहिती होते, त्यात यांनी काय नवे सांगितले? त्यावर चीनवर काय कारवाई करणार ते सांगा.

□ आरेमध्ये प्राण्यांसाठी भूमिगत रस्ते – आदित्य ठाकरे
■ गुवाहाटीवरून येणार्‍या काही बेईमान प्राण्यांनाही इकडेच सोडा.

□ ‘रात्री उशिरा भटकणे हा गुन्हा नव्हे’- न्यायालयाचे निरीक्षण; तरुणाला ठरवले निर्दोष.
■ चुकून हद्द पार करून गुजरातेत जाऊ नको म्हणावं फिरत फिरत, तिकडचे पोलिस लगेच एस्कॉर्ट पुरवून सुरतला नेतात म्हणे.

□ कटू निर्णय फायद्याचे : ‘अग्निपथ’च्या विरोधावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूचक विधान.
■ काही शंकाच नाही. नोटबंदी, जीएसटी, शेतकरी कायदे आणि आता अग्निवीर यांच्या अभूतपूर्व यशाने ते सिद्ध केलं आहेच.

□ पालिकेची मराठी पटसंख्या ९००ने वाढली. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांचा पुन्हा मराठी माध्यमांकडे कल.
■ मराठीत शिका आणि इंग्लिशही आत्मसात करा… यश तुमचेच आहे.

□ पाकिस्तानच्या मनसुब्यांना सुरुंग. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चार देशांची भारताला साथ.
■ तोंडघशी पडण्याची हौस काही फिटत नाही या देशाची.

□ यांत्रिकी शेतीमुळे शेतकरी कर्जबाजारी- सरसंघचालक
■ पंतप्रधानांना सांगा, ते एक मास्टरस्ट्रोक मारून शेतकर्‍यांना आधीचे दिवस बरे होते, असं वाटायला लावतील.

□ बिजू जनता दलाचे ओडिशातील आमदार बिजय दास स्वत:च्या लग्नाला जायचे विसरले.
■ आम्ही विसरलो असतो तर म्हणाला असतात लग्न टाळले, बोहल्यावरून पळ काढला… आमदार आहेत तर फक्त ‘विसरले’!

□ रामदेव यांचा अहमदाबादमध्ये योग प्रोटोकॉलचा अभ्यास.
■ आता बाबा इंग्लिसमध्ये भाता हलवून दाखवणार बहुतेक विदेशी गिर्‍हाईकांना!

□ श्रीलंकेला महागाई सोसेना. माजी क्रिकेटपटू रोशन महानामा पेट्रोलपंपावर लोकांना वेटर म्हणून ट्रेतून चहा वाटप करताना दिसला.
■ आपल्या क्रिकेटपटूंना येतात की नाही अशी काही इतर कामं? जस्ट आस्किंग!

□ हवामान बदलाच्या आपत्तीमुळे ५० लाख हिंदुस्थानींचे स्थलांतर. संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल.
■ राजकीय हवामान याच्यातच मोजतात की वेगळं मोजतात?

□ काळा पैसा रोखण्यात ‘नोटाबंदी’ अपयशी. स्विस बँकेत हिंदुस्थानींचे ३०,५०० कोटी रुपये. २०२१मध्ये गंगाजळीने १४ वर्षांचा विक्रम मोडला.
■ मोदीकाळातले धन आहे हे… पांढरे शुभ्र आहे… काँग्रेसकाळात होता, तोच काळा पैसा!

□ आठ पक्षांचे उत्पन्न १,३७३ कोटी रुपये. त्यात भाजपचे ५५ टक्के उत्पन्न.
■ हे फक्त अधिकृत तेवढंच… बाकी किती असेल!

□ दोन ठिकाणी निवडणूक लढवण्यास बंदी घाला. निवडणूक आयोगाचे सरकारला आवाहन.
■ स्वागतार्ह सूचना… एका ठिकाणी डबल निवडणुकीचा खर्च आणि भार कशाला हवा?

Previous Post

‘शिवसेना’द्वेषाची कावीळ

Next Post

मुंगी उडाली आकाशी

Next Post
मुंगी उडाली आकाशी

मुंगी उडाली आकाशी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.