बेडूक नेमके पावसाळ्यातच कसे बाहेर पडतात? इतर वेळी ते कुठे असतात?
– स्वप्नील सावंत, कुडाळ
जसे राजकारणी निवडणुका आल्यावर बाहेर पडतात, तसे बेडूक पाऊस आला की बाहेर येतात इतर वेळी ते काहीच करत नाहीत… पावसाची प्रतीक्षा.
तुमचं आवडतं शहर कोणतं? सुरत की गुवाहाटी?
– नरेंद्र राणे, लांजा
मुंबई
मराठी चित्रपटांना ‘आता’ सुगीचे दिवस आले आहेत, असं दर दोनपाच महिन्यांनी ऐकू येतं… नेमकी काय भानगड आहे?
– गणेश कोळी, नायगाव
ते कधीच आलेले नसतात हेच उघड होत त्यातून.
मालिकांमधील कारस्थानी स्त्रिया सतत पाहून घरातल्या महिलाही तसेच वर्तन करू लागतील, अशी भीती अनेकांना वाटते… तुम्हाला काय वाटते?
– विलास गोटखिंडे, वैभववाडी
घरातल्या स्त्रिया पाहूनच सीरिअलवाले सीरिअल काढतात.
मोबाइलमुळे माणसं जोडली जातात की तोडली जातात?
– नलिनी केंद्रे, सासवड
तुम्ही ते कसं वापरताय त्यावर अवलंबून आहे.
राजकारणाचा हेतू काय? समाजकारण की सत्ताकारण?
– रेश्मा अनपट, डोंबिवली
सत्ता आणि पैसे.
संकटकाळी देव कोणाच्या ना कोणाच्या रूपात उभा राहतो, असं म्हणतात, ते खरं आहे का?
– भावना शहा, नागपूर
खोटं आहे हे… तो असता तर या देशात एवढी गरिबी आणि आर्थिक, जातीय विषमता नसती.
भारत भूषण, प्रदीप कुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार यांच्या सगळ्यांच्या अभिनयाबद्दल दोन(च) शब्दांत सांगा, असं तुम्हाला सांगितलं, तर काय असतील ते दोन शब्द?
– आफताब शेख, रहिमतपूर
यांनाच का दोष द्यायचा? अजून खूप हिरो आहेत… ज्यांच्याविषयी बोलता येईल.. दगड!
मधुबालाची लोकप्रियता तिच्या सौंदर्यामुळे होती की अभिनयामुळे? निसर्गदत्त सौंदर्यामुळे असेल तर त्यात तिची कर्तबगारी काय?
– रोहित काकडे, इस्लामपूर
ती दोन्हीचं मिश्रण होती…
मराठीत सध्या एकापाठोपाठ एक विनोदी नाटकं येतायत… पैसे मोजून प्रेक्षक येणार तर त्याला विचार नको, दोन घटकांची फक्त करमणूकच हवी, हा विचार पटतो का तुम्हाला?
– किरण गुरव, चेंबूर
हो.
पैसे से क्या क्या तुम यहाँ खरीदोगे, दिल खरीदोगे या के जाँ खरीदोगे, या ओळी आता व्यर्थ वाटू लागल्या आहेत. पैशासाठी इमानही विकायला तयार झालेले लोक दिसतात. पैसा इतका मोठा झाला आहे का हो?
– सायली राजवाडे, शिवाजी नगर, पुणे
होय.. आपली सगळी शिकवणूक ‘पैसे मिळवा… तेच महत्वाचे असतात’ असेच सांगते.
सध्या सगळीकडे अतिरंजित चरित्रपटांची चलती झाली आहे. या लोकांना खरंच कोणाचं चरित्र सांगायचं आहे की त्याआडून कसला तरी (अप)प्रचारच करायचा आहे?
– राणी येवले, सोलापूर
त्यांना सांगायचं भरपूर काही आहे, पण मांडता येत नाहीयेय.
जो आपला खांदा दुसर्याला तिसर्यावर बंदूक रोखण्यासाठी वापरायला देतो, त्याच्या खांद्यावर डोकं असतं का हो?
– मोहन आंब्रे, प्रभादेवी
हो. म्हणूनच तो असा गेम करतो.