कोणताही अव्वल व्यंगचित्रकार द्रष्टा असतो… हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तर निव्वळ व्यंगचित्रकार नव्हते; व्यंगचित्रकलेच्या बळावर राज्याच्या समाजकारणाचा, राजकारणाचा बाज बदलून टाकणार्या शिवसेनेची स्थापना करून त्यांनी मराठी माणसाला आवाज दिला होता… ते तर नेते म्हणूनही द्रष्टे होते… काळाची पावले ओळखत होते… ज्यांना रस्त्यावरून उचलून शिवसैनिकांच्या खांद्यांवर बसवले आणि शिवसैनिकांनीही ज्यांच्यासाठी रक्ताचे पाणी केले असे काही आपलेच लोक संकट येताच किंवा संधी मिळताच फितुरी करतील आणि मुंबई महानगरपालिकेवर बसवलेली मराठी पकड सैल करण्याचे पातक करण्यापर्यंत त्यांची मजल जाईल, याची कल्पना त्यांना तेव्हाच आली असावी… त्यांनी तेव्हाच्या फंदफितुरीबद्दल काढलेलं हे जळजळीत व्यंगचित्र आजही लागू पडावे, हा दैवदुर्विलास आहे.