(‘मेरीच लाल’ किल्ला. ब्यादश्या नौरंगजेब यांचा शयनकक्ष. चहापन्हा नौरंगजेब बुलेटप्रूफ काचेच्या आत पलंगावर शंकेखोर नजरेने भयभीत बसलेले. समोर अनौरस टोकूर, कय्युम बंडा, मौजनाथ श्रींग, आणि नाजीम बिनबोभाट खालमानेने उभे! कोपर्यात छान अँगल साधून कॅमेरे लावलेले. मात्र पलंगाजवळ एक स्टुलावर अमानतुल्ला शामेनी एक अख्खी करंगळी नाकपुडीत घालून नाकाची रुंदी मोजत निवांत बसलेला.)
नौरंगजेब : (वजीर अमानतुल्ला शामेनीच्या किळसवाण्या कृतीकडे रागाने बघत) अमानतुल्लाजी, शायद तुम कुछ भूल रहे हो।
अमानतुल्लाह : (नाकातून काढलेली करंगळी न्याहाळत स्वत:च्याच तंद्रीत) मान्यवर, आपको मालूम होगा! मैं कुछ भूलता नहीं! मुझे तो ये भी याद हैं। आजसे बराबर सात दिन, साढ़े छह घंटे पहले मैंने इस नाक में उँगली डाली थी। लेकिन उस वक्त कोई इमरजेंसी आने की वजह से ये नाक साफ करना अधूरा रह गया था। उस वक्त मैंने ये सात दिन का बैकलॉग भर कर निकालने के लिए आज का दिन तय किया था। मान्यवर…
नौरंगजेब : (काहीसा चिडत) वजीरजी आप शायद भूल गये होंगे के हमने तुम्हे किस विषय के संदर्भ यहाँ बुलाया है।
अमानतुल्लाह : (नाकाला लावलेली करंगळी उपवस्त्राने पुसत) हो सकता है, बॉन्ड के संदर्भ में फैसला सुनाने वाले काज़ीपर ऐदिराम वसीभॉय की फौजे भिजवानी हो। या फिर से किसी अपोजीशन के सूबेदार को बरखास्त करवाना हो…?
बोभाट : (अमानतुल्लाहच्या कानाला लागत, बारीक आवाजात) त्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असंल, तुम्ही एक डाव ऐकून तर बघा. (तसा अमानतुल्लाह एक जळजळीत कटाक्ष बोभाटवर टाकतो. बोभाट चपापतो नि दोन पावलं मागे सरकतो.)
अमानतुल्लाह : झोलम खोर के हुक्म की हम जरूर तामील करेंगे। लेकिन मान्यवर हमे पता तो चले आखिर माजरा क्या है?
नौरंगजेब : (चिडून) मायला केव्हाचा आम्ही काय सांगायचा प्रयत्न करतोय? आणि इथं बोलावण्याआधी तुम्हाला इथं बोलावण्याचं कारण सांगितलं नव्हतं काय?
अमानतुल्लाह : (खालमानेने) माफी असावी चहापन्हा! आम्हीच मागे प्रायव्हसी जपण्यासाठी मनसबदार, सरदार, वजीर आणि सामान्य दरबारी यांना कामकाजाचं दिलं जाणारं ब्रिफिंग बंद करायला सांगितलेलं. त्यामुळे आम्ही इथं येताना आम्हास कोणी काहीही सांगितलेलं नाही.
नौरंगजेब : (प्रश्नार्थक मुद्रेने) ऐसे तो कोई काम कैसे हो पायेगा वजीरजी?
अमानतुल्लाह : वैसे भी इन दरबारियों को और मनसबदारोंको जानकारी देकर भी ये क्या कर पाते है? ज्यादातर ये गुड़ का गोबर ही करते है..!
नौरंगजेब : ये गलत लाइन कह दी। आपने। गुड़ का गोबर तो हम करते है। इसमें हमने मास्टरी मिलाई है। भूल गए?
अमानतुल्लाह : (चूक कळताच जीभ चावत मान खाली घालतो.) जी नहीं। हमे याद हैं।
(तितक्यात दारावरचा शिपाई घाईने आत येतो. मुजरा घालतो.)
शिपाई : चहापन्हा सलामत, एक हेर आपली इजाजत मागतोय, भेटण्यासाठी!
नौरंगजेब : पाठवा त्यास आत! (काहीतरी आठवल्यागत) आणि आत पाठवताना त्याची चांगली झडती घ्या! ना जाणो, भलत्याच कुणी पाठवलेला मारेकरी निघावा तो! (शिपाई डोकं हालवतो आणि बाहेर जातो. तो बाहेर जाताच एक हेर आत प्रवेश करतो.)
हेर : (मुजरा करत) ब्यादश्या सलामत…
नौरंगजेब : (हाताचा पंजा हलवत) रहने दे। रहने दे। क्या खबर लाया है। जल्दी कह दे।
हेर : झोलमखोर, पश्चिम की तरफ कुछ गुट इकठ्ठा होने की खबर है।औरतो और, और कुछ कबिले एकजूट होकर मेरीच लाल किल्लेकी तरफ आनेकी संभावना हैं।
बंडा : (भीतीयुक्त आश्चर्याने) बाबोव! हे जे काय गट, कबिले येणार म्हणता त्यांना अडवलं पाहिजे ना?
मौजनाथ : (अचानक काही चावल्यागत) हम इस बात की कड़ी निंदा करते हैं। और वजीर अमानतुल्लाह शामेनी से मांग करते है कि जल्द से जल्द इस मुसीबत का हल निकाला जाए।
टोकूर : (आत्यंतिक गंभीरतेने) क्या इस घटना के पिछे किसी बाहरी ताकद का हाथ है? इस विषय की जाँच करनी चाहिए।
बोभाट : मी लावू का छडा? मी यात पूर्ण माहिती घेऊन हा प्रश्न सोडवू का?
नौरंगजेब : मग आम्ही तुम्हाला काही पदं आणि पदव्या बहाल केल्यात त्या केवळ शोभेसाठी काय?
अमानतुल्लाह : (बोभाटचा हाती काही लागू द्यायचं नाही, या उद्देशाने) याची गरज नाही, चहापन्हा! आम्ही सर्व जाणकारी मिळवलीय. यांना म्हणावं स्वस्थ बसावं!
नौरंगजेब : (कुरघोड्यांचं राजकारण ध्यानी येताच) नुसत्या जाणकारीनं काय होईल वजीरजी? यावर काही ठोस उपाययोजना करायला हव्या! किती दिवस आम्ही शयनकक्षात बुलेटप्रूफ काचा लावाव्या?
अमानतुल्लाह : चिंता नसावी ब्यादश्या! आम्ही आक्रमणकारी कबिल्यांना किल्ल्याच्या आसपास देखील फिरकू देणार नाही!
(तोच बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज येतो. त्यासरशी आत ब्यादश्या स्वतःस लपवू बघतो. त्या आवाजापाठोपाठ काही पावलं शयनकक्षाच्या दिशेने येत असल्याचा आवाज येऊ लागतो.)
नौरंगजेब : (आत्यंतिक भीतीने) अमानतुल्लाह, बचाव मुझे! गोली मारो सालों को। भागो, कुछ करो। शायद वो यहाँ तक पहुँचे है।
(तोच दारावरचा पहारेकरी घाईने पुन्हा आत येतो.)
शिपाई : (मुजरा केल्यानंतर) ब्यादश्या सलामत, दोन कोतवाल आत येण्याची परवानगी मागतायेत!
नौरंगजेब : (भीत) ते नि:शस्त्र असतील तर बेलाशक आत धाडा. अन्यथा त्यांस गोळ्या घाला. आधी ती आपली माणसं आहेत याची खात्री करा!
(शिपाई तातडीने बाहेर जातो, पाठोपाठ दोन कोतवाल आत येतात. पुन्हा मुजरे झडतात.)
कोतवाल १ : (वजीर अमानतुल्लाह शामेनीकडे बघत) आपने जो हुक्म किया, त्याप्रमाणे केलं.
नौरंगजेब : (आत्यंतिक शंकेने) क्या हुक्म था, वजीरजी? क्या किया इन्होंने?
अमानतुल्लाह : (आनंदित मुद्रेने) मला आक्रमणकारी किल्ल्याच्या दिशेने येताय, याची कुणकुण आधीच लागलेली. मी तेव्हाच कोतवालांना आदेश दिलेला, त्यांना थांबवण्यासाठी!
नौरंगजेब : (उत्सुकतेने) काय आदेश दिलात आपण?
कोतवाल २ : वजीरसाहेबांनी आम्हाला शक्य त्या प्रकारे आक्रमणकारी गटांना आवरण्यास सांगितलेलं…
टोकूर : (उतावीळपणे) पण तुम्ही केलं काय नेमकं?
अमानतुल्लाह : यही की हमने आनेवाले सब रस्ते खोद दिये। उसपर सीमेंट के बड़े बड़े ब्लॉक खड़े किए। उसपर नुकीली तारे लगवाई!
कोतवाल १ : बस इतना ही नहीं! रास्ते पे जो रोडलाइट होते है, वो बंद करवाये। पानी बंद करवाया।
कोतवाल २ : झालंच तर पाण्याचे फवारे, अश्रूधुराच्या नळकांड्या, गन आणि पुरेशी फौज उभी केलीय!
मौजनाथ : और मैंने सुना है, टेलीविजन से गालीगलोच करनेवाले कुछ बंदे भी इस काम पर लगाए हैं ना?
टोकूर : त्यांना तर सगळ्यात पुढं उभं केलं पाहिजे! त्यांच्या नुसतं बोलण्याने जी घाण उडते त्याने कुणीही सभ्य स्वच्छ माणूस दहा पावलं मागे हटेल.
(पुन्हा खाली घोड्यांच्या टापांचा आवाज येतो. पाठोपाठ पावलांचा आवाज नि मागून पहार्यावरचा शिपाई आत येतो.)
शिपाई : (मुजरा वगैरे औपचारिकता पूर्ण करून) ब्यादश्या सलामत, एक हेर आलाय.
नौरंगजेब : (संशयाने पाहत) पाठव त्याला आत.
(शिपाई जातो नि हेर आत येतो. मुजरा करून उभा राहतो.)
नौरंगजेब : काय खबर?
हेर : काही आक्रमणकारी आत घुसण्याचा प्रयत्न करत असताना जखमी झालेत!
बंडा : (तावातावाने) त्यांनी यावंच का आत? त्यांना ब्यादश्या नौरंगजेबांची शक्ती माहीत नाहीय का?
हेर : (सांगणं चालू ठेवत) तरीही काहीजण आत शिरलेत…
टोकूर : काय सांगता? वजीर साहेबांची फौज काय करतेय? त्यांनी त्यांना हाकललं नाही का?
बोभाट : पण आहेत कोण ही लोकं? जी इतकी जिवावर उदार होऊन किल्ल्यावर आक्रमण करायला येतायत ती?
हेर : सामान्य शेतकरी आहेत ते!
बोभाट : पण त्यांना आत का यायचंय?
हेर : त्यांना त्यांच्या समस्या ऐकवायच्या आहेत!
नौरंगजेब : ये देखो मित्रों! हमने गारंटी का इश्तेहार दिया है ना? और उन्हें चाहिए क्या?
हेर : क्या मैं बता दूं? लेकिन उसके बाद मेरे जिंदगी की गारंटी कोन लेगा?
बोभाट : बता दे यार! क्या मांगे है किसानों की?
हेर : उन्हें एमएसपी चाहिए! मिनिमम सपोर्ट प्राइज!
अमानतुल्लाह : हमने सिर्फ अब्दानी और कुछ साथियों को एमएसपी पहले से लागू किया हुआ है, तो अब हम इतना खर्चा नहीं उठा सकते!
मौजनाथ : अब्दानी को एमएसपी?
नौरंगजेब : हां, त्याला मी मॅक्सिमम सपोर्ट प्राईस द्यायचं कबूल केलंय! आणि सध्या तरी एमएसपीचे या एकापेक्षा अधिक लाभार्थी करण्याची माझी तयारी नाही. आणि बंडा, टोकूर, श्रींग तुम्ही तिघं माझी ही मजबुरी त्या शेतकर्यांना सांगून या. (वजीर शामेनीकडे बघत) तोवर तुम्ही बंदुका लोड करून ठेवा, काय?