• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे…

Nitin Phanse by Nitin Phanse
January 31, 2025
in बाळासाहेबांचे फटकारे
0

हे एक ऐतिहासिक व्यंगचित्र आहे. ज्यांच्या जन्मशताब्दीचं वर्षं नुकतंच सुरू झालं आहे त्या हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेना स्थापन केली आणि एका वर्षातच ठाण्याच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. समाजकारणाला प्राधान्य देणार्‍या शिवसेनेला समाजकारणासाठी राजकारणात उतरावं लागलंच. त्या विजयाने उत्साहित होऊन शिवसेनेने मुंबई महापालिकेच्याही निवडणुका लढवायचं ठरवलं, तेव्हाचं हे मुखपृष्ठचित्र. १९६७ सालातलं. तेव्हा मुंबईत सर्वशक्तिमान होती बीपीसीसी म्हणजे मुंबई प्रदेश काँग्रेस. देशात काँग्रेस, राज्यात काँग्रेस, मुंबईत काँग्रेस, असं सगळं काँग्रेसमय चित्र होतं. पण, त्या बीपीसीसीच्या टाळक्यावरच निवडणूक प्रचाराच्या शुभारंभाचं श्रीफळ ‘वाढवण्या’ची धमक शिवसेनेत होती… ती दाखवून यथावकाश शिवसेनेने या महानगराची सत्ता मिळवली आणि मराठी माणसाचा योग्य सन्मान राखत, इतरांनाही उदारपणे सामावून घेत ती यशस्वीपणे राबवली. शिवसेनेच्या उत्कृष्ट कार्यामुळेच बीईएसटीसारखी संस्था एकेकाळी देशात खरोखरच बेस्ट होती, आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महापालिका बनून काही हजार कोटींच्या मुदत ठेवी करण्याइतकी ती कार्यक्षम होती. मुंबईवर कब्जा मिळवायचा आणि ती केंद्रशासित करायची, असं स्वप्न दिल्लीश्वर सत्ताधीशांनी कायमच पाहिलं आहे. आताचे सत्ताधीश तर इतके कुटील आहेत की मुंबई केंद्रशासित न करताच तिचं महत्त्व कमी करायचं, तिचा ताबा मिळवून मराठी माणसांना त्यांच्या राजधानीतच खच्ची करून टाकायचं, अशी स्वप्नं ते पाहात आहेत. त्यासाठी शिवसेनेचे दोन तुकडे करून गद्दारांना चारा घालण्याचं महापापही या सत्ताधीशांनी केलं आहे. राज्यात मतदारयाद्यांमध्ये झोलझाल आणि ईव्हीएममध्ये तिकडम् बाजी करून करून मिळवलेल्या बनावट महाविजयाने उन्मत्त झालेल्या या पक्षाला आता मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची स्वप्नं पडायला लागली आहेत… पण, मराठीजनांच्या एकतेची वङ्कामूठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आताच्या दिल्लीश्वरांच्या टाळक्यावर आपटल्याशिवाय राहणार नाही!

Previous Post

नरुद्दिन आणि दुनळ

Next Post

कुरकुरीत वेफर्सचा खुसखुशीत व्यवसाय

Next Post
कुरकुरीत वेफर्सचा खुसखुशीत व्यवसाय

कुरकुरीत वेफर्सचा खुसखुशीत व्यवसाय

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.