• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोनाकाळाने शेअर बाजार फुलवला…

- उदय कुलकर्णी (ओळख शेअर मार्केटची)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 30, 2021
in शेअर मार्केट
0

हळुहळू शेअर मार्केटला कोरोनाची कुणकुण लागली. २७ जानेवारी २०२०ला ते खाली आले. २४ व २५ फेब्रुवारी २०२०ला गुजरातमध्ये ट्रम्प आले, जंगी जाहीर कार्यक्रम झाला. म्हणजे केंद्र सरकारला अजून जाग यायची होती किंवा ते मानायला तयार नव्हते. पण शेअर मार्केटमध्ये मात्र उतार सुरू झाला होता. ते एका झटक्यात खाली आले नाही, हळुहळू खाली यायला लागले. २२ मार्च २०२०ला पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यू जाहीर केला, तेव्हा शेअर मार्केटला स्पष्ट धोका दिसला आणि दुसर्‍या दिवशी २३ मार्च २०२०ला शेअर मार्केट भूकंप झाल्यासारखे कोसळायला सुरुवात झाली.
—–

झिरोधा, अपस्टॉक्स इत्यादी नव्या डिस्काऊंट ब्रोकर फर्म २०१०पासून आल्या आणि दलाली कमी असल्याने नव्या असूनही त्यांना ग्राहक मिळाले. केवळ तरूणवर्गच नव्हे, तर मध्यमवयीन-वयस्क लोकही अशा फर्मचे ग्राहक झाले. जुन्या बड्या ब्रोकर फर्मनीही जागे होत कमी दलाली आकारणारे काही प्लॅन देऊ केले, पण बात कुछ जमीं नही. जुन्या फर्म कोणत्या कंपन्यांचे शेअर घ्यायचे याबद्दल रिसर्च करून रिपोर्ट देतात हा त्यांच्या बाजूचा एक मुद्दा, पण तो ग्राहकांना आकर्षक वाटत नाही.
शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणार्‍यांत काही प्रकार आहेत. काही लोक दीर्घ काळासाठी गुंतवणूक करतात. त्यांना इन्व्हेस्टर म्हणतात. हा वर्ग शेअरची खरेदी करतो ती एक किंवा जास्त वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी, लगेच विकण्यासाठी नाही. ते सतत खरेदी-विक्रीचे व्यवहार करत नाहीत. उलट काहीजण रोजच्या रोज किंवा सतत ट्रेडिंग करतात. त्यांना ट्रेडर म्हणतात. तर काही जण फ्यूचर अ‍ॅन्ड ऑप्शनचे व्यवहार करतात, तेही सतत केले जातात. तसेच हे लोक मोठ्या रकमेचे व्यवहार करतात, त्यामुळे दोघांसाठी दलाली कमी असणे खूप फायद्याचे आहे. ते साहजिकच नव्या ब्रोकर फर्मला पसंती देतील आणि पैसे वाचत असतील तर इन्व्हेस्टरना सुद्धा ते आवडेलच. दलाली कमी असण्याबरोबरच नव्या ब्रोकर फर्मचे प्लॅटफॉर्म म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठीची सिस्टम किंवा सॉफ्टवेअरही चांगले आहे.
आता कोरोनामुळे याचा एकत्रित काय परिणाम झाला ते बघू. कोरोनाचं अधिकृत नाव कोविड-१९ कारण २०१९च्या शेवटी शेवटी त्याची सुरवात झाली. तेव्हा शेअर मार्केटचे व्यवहार नेहमीसारखे सुरू होते. कधी वर, कधी खाली असे करत १४ जानेवारी २०२०ला सेन्सेक्स व निफ्टीने त्यांचा त्यावेळेचा उच्चांक गाठला. सेन्सेक्स ४१९५२ला बंद झाला व निफ्टी १२३६२ला बंद झाला. यानंतर हळुहळू शेअर मार्केटला कोरोनाची कुणकुण लागली. २७ जानेवारी २०२०ला ते खाली आले. २४ व २५ फेब्रुवारी २०२०ला गुजरातमध्ये ट्रम्प आले, जंगी जाहीर कार्यक्रम झाला. म्हणजे केंद्र सरकारला अजून जाग यायची होती किंवा ते मानायला तयार नव्हते. पण शेअर मार्केटमध्ये मात्र उतार सुरू झाला होता. ते एका झटक्यात खाली आले नाही, हळुहळू खाली यायला लागले. २२ मार्च २०२०ला पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यू जाहीर केला, तेव्हा शेअर मार्केटला स्पष्ट धोका दिसला आणि दुसऱ्या दिवशी २३ मार्च २०२०ला शेअर मार्केट भूकंप झाल्यासारखे कोसळायला सुरुवात झाली. एका मर्यादेपलीकडे ते खाली आले तर व्यवहार स्थगित ठेवले जातात, त्याला सर्किट ब्रेकर म्हणतात, ते लागू करावे लागले. नियमाप्रमाणे ४५ मिनिटांनी पुन्हा व्यवहार सुरू करण्यात आले आणि शेवटी सेन्सेक्स बंद होताना एकदम ३९३४ने खाली येऊन २५९८१ला बंद झाला आणि निफ्टी ११३५ने खाली येऊन ७६१०ला बंद झाला. या दोन्ही निर्देशांकांनी गाठलेला हा तळ-नीचांक. १४ जानेवारी २०२०ला सेन्सेक्सचा त्यावेळेचा उच्चांक ४१९५२ होता आणि निफ्टीचा १२३६२ होता; तिथून अडीच महिन्यात सुमारे ४० टक्के घसरण झाली. यानंतर २४ मार्च २०२०ला रात्री मोदींनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला, पण त्याचा परिणाम शेअर मार्केटने आधीच पचवलेला होता. यानंतर शेअर मार्केट कधी वर कधी खाली असे होत राहिले, पण नीचांकी तळापेक्षा खाली गेले नाही. २१ दिवसांसाठी असलेला लॉकडाऊन नंतर वाढवला, त्यानंतर अनलॉक सुरू झाले, निर्बंधामध्ये थोडी ढील मिळायला सुरुवात झाली. शेअर मार्केटचा ट्रेन्ड वर हाच जाणे राहिला आणि ९ नोव्हेंबर २०२०ला सेन्सेक्स ४१९५२ हा जुना उच्चांक मागे टाकून ४२५९७ला व निफ्टी १२३६२ हा जुना उच्चांक मागे टाकून १२४६१ या नव्या उच्चांकाला बंद झाले. तसेच २३ मार्च २०२०च्या तळापासून कोरोना-लॉकडाऊन, निर्बंध असूनही केवळ सात-आठ महिन्यात शेअर मार्केट चांगलेच रिकव्हर झाले आणि दोन डिसेंबर २०२१ला सेन्सेक्स ५८४६१ला बंद झाला व निफ्टी १७४०१ला बंद झाला. याचा अर्थ कोरोनाआधीच्या १४ जानेवारी २०२०च्या उच्चांकापेक्षाही सुमारे ४० टक्के अधिक वाढ. २३ मार्च २०२०ला सेन्सेक्सने जो २५९८१चा व निफ्टीने जो ७६१०चा तळ गाठला होता, त्या हिशेबात दणदणीत २२५ टक्के वाढ.
लेखमालेच्या पहिल्याच लेखात लिहिले होते तसे ओमायक्रॉनची बातमी आल्यावर शेअर मार्केट २६-११-२०२१ला खाली गेले होते, ते लवकरच वर गेले. पण बाजारात सध्या अस्थिरता आहे आणि बातम्यांप्रमाणे बाजार हेलकावे घेत आहे.
२४ मार्च २०२०पासून लॉकडाऊन लागला म्हणजे कंपन्यांचा व्यवसाय बंद झाला. उदा: विमानसेवा बंद तर त्या कंपन्यांना उत्पन्न नाही, पण काही खर्च सुरूच राहणार. कारखाने उत्पादन करू शकणार नाहीत. कंपन्यांना उत्पन्न नाही, नफा कमी तर त्यांच्या शेअरचे भावही त्यामुळे खाली येतात. पण जगभरातील बहुतेक देशांनी अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात सापडू नये म्हणून काही उपाययोजना केल्या. व्याजदर कमी केले म्हणजे कमी दरात कर्जे मिळतील, बाजारात पैसा उपलब्ध करून दिला, काही सवलती दिल्या, कर कमी केले, प्रोत्साहनपर योजना आणल्या. तसेच कंपन्यांनीही काही उपाययोजना केल्या, खर्च वाचवण्याचे मार्ग शोधले, जास्त दराने घेतलेली कर्जे फेडली व स्वस्त कर्जाचा लाभ घेतला. कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला. आयटी, वित्त यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करायला सांगून कंपनीच्या कामात खंड पडणार नाही याची तजवीज केली. भारतातच नाही तर अमेरिकेसह जगातील अनेक देशांत थोड्याफार फरकाने अशी स्थिती राहिली. एकीकडे कोरोनाचे भयंकर भय, व्यवसायात अडथळे किंवा तो बंद, मजूर, कर्मचारी गावी गेलेले पण त्यावर मात करत शेअर मार्केटने ही तळापासूनची २२५ टक्के भरारी २० महिन्यात घेतली.
ते वर जाण्यात आर्थिक-व्यावसायिक कारणांबरोबरच लोकांचा शेअर मार्केटमधील सहभाग वाढला याचा आणि नव्या डिस्काऊंट ब्रोकर फर्मचाही काही वाटा आहे. अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करायला लागले, पण काही कामांच्या बाबतीत ते शक्यच नव्हते. उदा: मारूती, टाटा मोटर्स अशा ऑटो कंपन्यांमधील कारखान्यात फ्लोअरवर काम करणारे ऑफिसर, कर्मचारी घरून काय काम करणार? असे घरी बसून असलेले व वर्क फ्रॉम होम करणारेसुद्धा अनेकजण पैसे मिळवण्यासाठी व घरी बसून शक्य आहे म्हणून ऑनलाइन ट्रेडिंगकडे वळले. पूर्वी स्मार्टफोन नव्हते, तेव्हा ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी पीसी– संगणक आवश्यक होते. आता हे व्यवहार स्मार्टफोनवरूनही करता येतात आणि तो तर सगळ्यांकडे असतो, त्यामुळेही हे व्यवहार करणे शक्य झाले. नवी पिढी तंत्रज्ञाननिपुण आहे, त्यांना हे व्यवहार करणे सोपे होते. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी डिमॅट अकाऊंट व ट्रेडिंग अकाऊंट आवश्यक आहे. फेब्रुवारी २०२०ला देशात चार कोटी डिमॅट अकाऊंट होते ते वाढत जाऊन जून २०२१ला सहा कोटी झाले, तेच ऑक्टोबर २०२१ला ७.६८ कोटी आहेत. साधारण १३ लाख नवे डिमॅट अकाऊंट एप्रिल २०२०पासून दरमहा सुरू होत होते. किरकोळ गुंतवणूकदारांचा इतका पैसा शेअर मार्केटमध्ये आला, त्यामुळेही ते वर गेले. किरकोळ गुंतवणूकदारांबाबत एक उल्लेखनीय बाब म्हणजे पूर्वी शेअर मार्केट कोसळलं की ते घाबरून पडलेल्या भावात विक्री करून मोकळे व्हायचे. यावेळेस मात्र असे पॅनिक सेलिंग- घाबरून विकून टाकणे दिसले नाही. त्यांची समज वाढलेली दिसली. अनेकांनी भरपूर नफा मिळवला. कितीजण दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत होते आणि कितीजण ट्रेडिंग करत होते त्याचा मात्र अंदाज नाही. तसेच शेअर मार्केट मंदीच्या तडाख्यात सापडले तर कितीजण टिकतील, सक्रीय राहतील त्याचाही सध्या अंदाज करता येत नाही. बँकांनी मुदत ठेवीवर व्याजदर कमी केल्याने त्यातून मिळणारा परतावा फारच असमाधानकारक झाला; तेही शेअर मार्केटकडे वळण्याचे एक कारण होते. तसेच बडे गुंतवणूकदार, देशी वित्तसंस्था यांचीही गुंतवणूक सुरूच होती.
जे लोक थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत नाहीत, पण इक्विटी म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात, त्यांचे पैसेही त्या फंडांमार्फत शेअर मार्केटमध्येच गुंतवले जातात. लोकांनी म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी सेबी व इतर संस्थांतर्फे अनेक वर्षे जाहिरात केली गेली होती, भरघोस प्रयत्न केले गेले होते. म्युचुअल फंड सही है ही मोहीम राबवली गेली होती. त्याचा परिणाम होऊन लोकांनी म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक केली आणि वाढवली. अनेकांना एकगठ्ठा मोठी रक्कम गुंतवणे शक्य नसते. तथापि दरमहा नियमित गुंतवणूक करणे शक्य असते हे लक्षात घेऊन सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपीचीही जोरदार मोहीम अनेक वर्षे सातत्याने करण्यात आली. त्याचाही फायदा झाला. ऑक्टोबर २०२१ला एकूण ४.६४ कोटी एसआयपी अकाऊंट होते आणि त्यातून ऑक्टोबर २०२१ या एका महिन्यात १०५१९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. दरमहा साधारण इतकी रक्कम एसआयपीद्वारे गुंतवली जाते. अशी सुरुवातीपासूनची रक्कम व एकगठ्ठा गुंतवणूक केलेली रक्कम मिळून इक्विटी म्युचुअल फंडांमध्ये ऑक्टोबर २०२१च्या शेवटी गुंतवणूक केलेली एकूण रक्कम होती १२.९६ लाख कोटी रुपये. याला अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) म्हणतात म्हणजे इतक्या मालमत्तेचे व्यवस्थापन म्युचुअल फंड उद्योग करत आहे आणि त्यात वाढ होत आहे.
याचबरोबर परदेशी वित्तसंस्था आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार अनेक वर्षांपासून आपल्या शेअर मार्वेâटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांनाही जास्त भांडवल उपलब्ध झाले आणि त्यांनीही कोरोनाकाळात चांगल्या परताव्यासाठी जास्त गुंतवणूक केली. पूर्वी त्यांनी पैसे काढून घेतले, विक्री केली की मार्केट खाली यायचे; यावेळेस देशी गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या गुंतवणुकीमुळे परदेशी वित्तसंस्थांनी विक्री करूनही मार्केट खूप खाली आले नाही. बाकी २३ मार्च २०२०ला तळ गाठला तेव्हा जोरदार विक्री झाली, तसेच मार्केटमध्ये सतत खरेदी-विक्री सुरू असते, ती वर-खाली होत असते ते सुरूच राहील.
(टिप : ‘शेअर मार्केट – अभ्यास आणि अनुभव’ हे प्रस्तुत लेखकाचे पुस्तक २०१५मध्ये प्रकाशित झालेले असून त्याचा उपयोग इथे केलेला आहे.)
क्रमश:

Previous Post

मनस्वी, कलंदर : भावे काका!

Next Post

हिंडालियमचा डबा

Related Posts

शेअर मार्केट

गुंतवणुकीचे तीन निकष

June 23, 2022
शेअर मार्केट

अभ्यासोनि गुंतवावे धन!

January 24, 2022
शेअर मार्केट

शेअर कसे निवडावे?

January 13, 2022
शेअर मार्केट

शेअर निवडायचे कसे?

January 8, 2022
Next Post

हिंडालियमचा डबा

पारंपरिक हिवाळा आहार : उंधियु आणि हरभरा पाला भाजी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.