• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 30, 2021
in बाळासाहेबांचे फटकारे
0

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या कुंचल्यातून रेषा सहज फटकार्‍यांनी किती प्रत्ययकारी आणि जिवंत होत आणि एरवी अवघड वाटणारी कल्पनाही किती सोपी भासत असे, याचं उत्तम उदाहरण असलेलं हे व्यंगचित्र… इंदिरा गांधींच्या लाटेने मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष आणि विरोधी गट या दोहोंची होडकी कशी उधळून लावली, ते दाखवून देणार्‍या या व्यंगचित्रात इंदिराजींच्या करारी मुद्रेचे भेदक डोळे हृदयाचा ठाव घेतात, त्यांच्या त्या सुप्रसिद्ध केशरचनेचं रूपांतर लाटांमध्ये होतं आणि त्यात पूर्ण भेलकांडलेली होडकी दिसतात… इंदिरा लाटेने विरोधकांचे कसे कस्पट करून टाकले होते, याचं अप्रतिम दर्शन घडवणारं हे व्यंगचित्र पाहिल्यानंतर कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीचा नुकताच लागलेला ‘निकाल’ आठवतो… इथे १४४ जागांपैकी १३४ जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत… पश्चिम बंगालमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मतं मिळवण्याचा भारतीय जनता पक्षाच्या बलदंड सरकारचा अक्राळविक्राळ प्रयत्न वंगबंधूंनी विधानसभा निवडणुकीत एकजुटीने हाणून पाडला. त्यातून काहीही न शिकलेल्या भाजपची अवस्था कोलकात्यात- होडके सोडा, ते फार मोठे असते- पार पाचोळ्यासारखी होऊन गेली ममता लाटेत.

Previous Post

दिल्लीचा लाकूडतोड्या आणि पायावर मारून घेतलेली कु-हाड

Next Post

मनस्वी, कलंदर : भावे काका!

Next Post

मनस्वी, कलंदर : भावे काका!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.