नयना नटवे बंडू बावळेबरोबर डेटवर गेली होती. रात्री होस्टेलवर परत आल्यावर पर्स बेडवर टाकत ती केतकी कानविंदेला म्हणाली, देवा देवा देवा, काय एकेक नमुने असतात. तीन वेळा गालावर चापट्या माराव्या लागल्या मला त्याच्या.
केतकी मिष्कील हसत म्हणाली, असं गं काय केलं त्याने?
नयना कपाळाला हात लावून म्हणाली, अगं कसलं काय करतोय तो बावळ्या. तो जागा आहे का बोलता बोलता झोपलाय, हे पाहायला तीन वेळा चापट्या माराव्या लागल्या मला!!!