कलर्स वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या ‘शक्ती… अस्तित्व के एहसास की’ या या मालिकेतील सौम्या म्हणजेच रूबिना दिलैक ही पुन्हा एकदा या मालिकेत यायला सज्ज झाली आहे. या मालिकेत किन्नरांचे जीवन सुंदररीत्या दाखवण्यात आले आहे. या मालिकेने नुकतीच एक मोठी झेप घेतली आहे आणि आता त्यात हीरचे जीवन दाखवले जात आहे. तिने तिची ओळख उघड केल्यामुळे तिलासुद्धा तशाच प्रकारच्या त्रासातून जावे लागत आहे. जास्त शक्तिशाली अवतार धारण करणारी सौम्या तिच्या ओळखीमुळे व समाजातील तिच्या स्थानाने जास्तच आत्मविश्वासी होऊन नव्या प्रवासाला निघाली आहे. आपल्या पुनरागमनाविषयी बोलताना रूबिना दिलैक म्हणते, ही एक वेगळ्याच प्रकारची मालिका आहे. त्यात एका किन्नर समाजाची कमी माहीत असलेली बाजू मांडण्यात आली आहे. हा एक विलक्षण प्रवास आहे. थोड्या विश्रांतीनंतर एक नवीन आत्मा, नवीन ताकद आणि निश्चयाने सौम्या म्हणून मालिकेत परत येताना मला खूपच आनंद होतोय. मला घरी परत आल्यासारखे वाटत आहे, असेही तिने स्पष्ट केले.