• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वेबकॅम जेव्हा हॅक होतो…

सुधीर साबळे (सायबर जाल)

marmik by marmik
February 27, 2026
in इतर
0
वेबकॅम जेव्हा हॅक होतो…

वेबकॅम हा उपयोगाचा प्रकार. आपल्या मोबाइलला कॅमेरा असतो, कम्प्यूटरला वेबकॅम असतो. हा कॅमेरा ऑनलाइन मीटिंगच्या वेळी उपयोगाला येतो. एरवीच्या वेळी तो बंद असायला हवा. पण कम्प्यूटर वापरणार्‍या अनेकांना तो बंद करायचा असतो हे माहिती नसतं. तो आपण सुरू केलेला नसेल तेव्हा तो बंद असेलच, असं आपण गृहीत धरतो. पण, हा कॅमेरा हॅक झाला तर?
सायबर चोरटे अशा प्रकारे एखाद्याचा वेब कॅमेरा हॅक करून त्या आधारे त्याचे आक्षेपार्ह चित्रीकरण करतात, ते रेकॉर्ड करतात. त्याच्या आधारे समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार करतात. त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास ते व्हिडिओ जगजाहीर करण्याची धमकी देतात. काहीजण भीतीपोटी या प्रकाराला बळी पडतात.

स्वरा पंडित ही पत्रकार. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हा तिचा बीट. माहिती-तंत्रज्ञानात सतत होणार्‍या अपग्रेडेशनचं, नवनवीन संशोधनांचं तिला नेहमीच आकर्षण वाटायचं. त्याच विषयाच्या बीटवर काम करत असल्याने त्याची तिला माहितीही होती आणि विशेष म्हणजे सायबर सुरक्षेच्या बाबतीतही ती कायम जागरूक असायची.

एका रविवारच्या संध्याकाळी स्वरा घरी निवांत बसली होती. काही मेल चेक करण्यासाठी तिने संगणक सुरू केला. तेव्हा तिच्या मेलवर एक संदेश आला होता. ‘आम्ही तुला पाहतो आहोत’, अशा आशयाच्या हेडिंगचं मेल पाहून ती चपापली. तिने हा प्रकार काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मेल ओपन केली. या मेलमध्ये एक व्हिडिओ क्लिप जोडण्यात आली होती, त्यामध्ये स्वरा कपडे बदलतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. हा सगळा प्रकार पाहून स्वराला मोठा धक्का बसला. तो व्हिडिओ ओपन केल्यावर तिला कळलं की तो तिच्या बेडरूममधला खरोखरचा व्हिडिओ होता. त्या मेसेजच्या खाली धमकी देण्यात आली होती की तू मला खाली दिलेल्या पत्त्यावरच्या हॉटेलमध्ये भेटायला ये, अन्यथा तुझा हा व्हिडिओ जगजाहीर करण्यात येईल. त्यातून तुझी भयंकर बदनामी होईल.

स्वरा कम्प्युटरवर काम करताना तिचा वेब कॅमेरा कायमच सुरू असायचा. त्यातून आपल्याबाबत असे काहीतरी होईल, असे तिला वाटले नव्हते. पाच दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला जाण्यासाठी स्वरा घाईत होती, तेव्हा तिचा संगणक सुरू होता. स्वरा बेडरूममध्ये तयार होत असताना तिचा हा व्हिडिओ सायबर चोरट्यांनी संगणकाचा वेब कॅमेरा हॅक करून व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तिला अर्थातच त्याची काहीच कल्पना नव्हती. तो व्हिडिओ पाहून तिची भीतीने पुरती गाळणच उडाली. आता काय करू? यामधून कशी बाहेर पडू असे अनेक प्रश्न तिला सतावू लागले होते.

पण स्वरा पत्रकार होती, हार न मानता तिने या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवले. त्यासाठी तिने सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात काम करणार्‍या गोविंदची मदत घेण्याचे ठरवले. स्वराने तो मेल गोविंदला पाठवला आणि या सगळ्या प्रकाराची तपासणी करण्याची विनंती केली. गोविंदने शोध घेतला तेव्हा स्वराच्या संगणकावरील वेब कॅमेरा हॅक झाल्याचे अर्थातच उघड झाले. स्वराचा वेब कॅमेरा कायम सुरू असल्यानेच तो हॅक करण्यात आला होता. स्वरा आणि गोविंद या दोघांनी सर्व पुरावे नोंदवत, व्हिडिओ शोधले. स्वराने हा प्रकार सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितला. हा गंभीर खंडणीचा प्रकार असल्याने या हॅकरला रोखण्याचे आव्हान पोलीस आणि सायबर तज्ज्ञांसमोर उभे होते. दरम्यान, पोलीस आणि सायबर तज्ज्ञ गोविंद यांनी स्वराला आलेल्या ई-मेलच्या माध्यमातून सायबर चोरट्याचा आयपी अ‍ॅड्रेस शोधला. तेव्हा, कळले की हे चोरटे बंगळुरूमधल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणारे होते. वेब कॅमेरे हॅक करून अनेक मुली, महिलांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार त्यांनी याअगोदर केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्या सायबर चोरट्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

अशी घ्या काळजी

तुमचा वेबकॅम कव्हर करा : ज्यावेळी वेबकॅम वापरत नसाल तेव्हा तो झाकून ठेवा. जेणेकरून तुमच्या नकळत कोणताही व्हिडिओ रेकॉर्ड केला जाणार नाही. हा उपाय प्रभावी आणि सोपा आहे. तुम्ही फिजिकल कव्हर किंवा अगदी अपारदर्शक टेपचा तुकडा त्यासाठी वापरू शकता. चुकून तुमचा तुमचा वेबकॅम हॅक झाला तरीही, तो त्यात काहीही रेकॉर्ड करता येणार नाही.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा : शक्य असेल तिथे दुहेरी ऑथेंटिकेशन चालू करा. हे तुमच्या खात्यांमध्ये सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर जोडते आणि आक्रमणकर्त्यांना अनधिकृत प्रवेश करता येत नाही.

तुमचे सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा : तुमची ऑपरेटिंग सिस्टीम, वेब ब्राउझर आणि इतर सर्व सॉफ्टवेअर्स, विशेषतः सुरक्षा सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करा.

फिशिंग स्कॅमपासून सावध रहा : लिंकवर क्लिक करताना किंवा ईमेल किंवा मेसेजमधील संलग्न डाउनलोड करताना सावधगिरी बाळगा, विशेषत: ते अवांछित असल्यास. तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सायबर गुन्हेगार अनेकदा फिशिंग युत्तäया वापरतात.

अँटिव्हायरस सॉफ्टवेअर वापरा : संगणक किंवा लॅपटॉप हॅक होऊ नये यासाठी उत्तम दर्जाचे अँटिव्हायरस आणि
अँटि-मालवेअर सॉफ्टवेअरचा आवर्जून वापर करा.

वेबकॅम प्रवेश प्रतिबंधित करा : तुमच्या वेबकॅममध्ये असलेल्या गोपनीयता सेटिंग्ज पुन्हा एकदा तपासून बघा.
तुमच्या उपकरणांचे निरीक्षण करा : तुमचा वेबकॅम सक्रिय असल्याचे संकेतकांवर लक्ष ठेवा. बर्‍याच वेबकॅममध्ये एक प्रकाश असतो जो कॅमेरा वापरात असताना चालू होतो. तुम्ही तुमचा वेबकॅम वापरत नसल्यास आणि तो सक्रिय असल्याचे लक्षात आल्यास, त्वरित त्याची तपासणी करा.

Previous Post

नाटकातलं दर्जेदार नाटक!

Next Post

हाच आमचा धंदा!

Next Post
हाच आमचा धंदा!

हाच आमचा धंदा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.