• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वेगे वेगे धावू, पण पदकांपर्यंत जाऊ का?

marmik by marmik
January 10, 2026
in इतर, खेळियाड
0
वेगे वेगे धावू, पण पदकांपर्यंत जाऊ का?

तंदुरुस्तीसाठी ‘वेगे वेगे धावू’ हा मंत्र जपणारी त्सुनामीची लाट देशभरात आली आहे. ही लाट आरोग्यासाठी पोषक आहे. पण, मुंबई मॅरेथॉन आणि देशभरातली अशा असंख्य धावण्याच्या शर्यतींचे उपक्रम धावपटू घडवण्यात उपयोगी ठरलेले नाहीत. ही स्वानंदी धावाधावीची संस्कृती स्पर्धात्मक धावण्यात देशाला पदक मिळवून देण्यात अपयशी हेच वास्तव. त्याचा, १८ जानेवारीला होणार्‍या मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने घेतलेला हा ‘धावता आढावा’.

 

मुंबईतल्या नागरिकांचे आयुष्य धकाधकीचे, असे एकेकाळी कौतुकाने म्हटले जायचे. इथली लोकल म्हणजे जीवनवाहिनी. वेग आणि गर्दी या दोन्हीचा मेळ साधून घड्याळाच्या काट्यावर कार्यरत असणारी ही नागरी संस्कृती. पण आता मुंबईप्रमाणे असंख्य शहरे गर्दीची झाली आहेत. ती शहरेही रुबाब दाखवू लागली आहेत. पण मुंबईच्या रुबाबाची काही खास वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकीच एक म्हणजे दरवर्षी होणारी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा.
यंदा १८ जानेवारीला २३व्या वर्षातली २१वी स्पर्धा होते आहे. मुंबईकराला धावायला लावून कोट्यवधी रुपये कमावणे, हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट. म्हणूनच या धावण्याच्या स्पर्धेला कॉर्पोरेट चेहरा प्राप्त झाला आहे. मोठमोठ्या कंपन्यांची अधिकारी मंडळीही या स्पर्धेत इमाने-इतबारे धावतात. हा उपक्रम लोकांचा राहावा, म्हणून दुसरीकडे सामाजिकतेचे प्रदर्शन केले जाते. काही समाजसेवी संघटनांना निधी देऊन त्यांनाही उपक्रमात सामील करणे, हाही आयोजकांचा शिरस्ता. पण सकारात्मक पद्धतीने पाहिल्यास मुंबईकर मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होतात. धावण्याचे महत्त्व अधोरेखित करून त्याचा यथेच्छ आनंद लुटतात. धावण्याची ही चळवळ फक्त मुंबई मॅरथॉनपर्यंत आता मर्यादित राहिलेली नाही. आता गल्लीबोळात ही धावाधाव सुरू आहे. अल्ट्रा-मॅरथॉन, रनेथॉन, आदी विविध नावांनी ही लाट मुंबईतच नव्हे, तर देशभरात आली आहे. वयाचे बंधन न बाळगता गरीब-श्रीमंत लहान-मोठे सर्वच जण या तंदुरुस्तीच्या वारीत मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत. हे खरे तर कौतुकास्पद. परंतु यातील काही जण हे समाजमाध्यमांवर तंदुरुस्तीचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानणारे. त्यामुळेच आज येथून इथवर धावलो. आज कुठल्या तरी दिखाऊ शर्यतीत भाग घेऊन जेमतेम ती पूर्ण केली. पाहा माझी तंदुरुस्ती, असे छायाचित्र पोस्ट करून लाइक वसूल करणारी ही मंडळी स्वानंदापलीकडे काहीच मिळवत नाहीत. धावण्याकडे क्रीडात्मक पद्धतीने पाहिल्यास भारत स्पर्धात्मक धावण्याच्या नकाशावर खिजगणतीतही नाही, ही वस्तुस्थिती आहे.

कोणत्याही खेळाची देशातली स्थिती कशी आहे, ही त्यांची ऑलिम्पिक पदके किती, यावरून स्पष्ट होते. सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे
स्वातंत्र्यपूर्व काळात १९००च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिचर्डने २०० मीटर आणि २०० मीटर अडथळा अशी दोन रौप्य पदके जिंकली होती. ब्रिटिश-इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या या नॉर्मनची पदके भारताची म्हणूनच अधिकृतपणे गणली जातात. पण त्यानंतर भारताची धावण्यामधील पाटी कोरीच राहिली आहे. 

मुंबईतल्या नागरिकांचे आयुष्य धकाधकीचे, असे एकेकाळी कौतुकाने म्हटले जायचे. इथली लोकल म्हणजे जीवनवाहिनी. वेग आणि गर्दी या दोन्हीचा मेळ साधून घड्याळाच्या काट्यावर कार्यरत असणारी ही नागरी संस्कृती. पण आता मुंबईप्रमाणे असंख्य शहरे गर्दीची झाली आहेत. ती शहरेही रुबाब दाखवू लागली आहेत. पण मुंबईच्या रुबाबाची काही खास वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकीच एक म्हणजे दरवर्षी होणारी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा.

यंदा १८ जानेवारीला २३व्या वर्षातली २१वी स्पर्धा होते आहे. मुंबईकराला धावायला लावून कोट्यवधी रुपये कमावणे, हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट. म्हणूनच या धावण्याच्या स्पर्धेला कॉर्पोरेट चेहरा प्राप्त झाला आहे. मोठमोठ्या कंपन्यांची अधिकारी मंडळीही या स्पर्धेत इमाने-इतबारे धावतात. हा उपक्रम लोकांचा राहावा, म्हणून दुसरीकडे सामाजिकतेचे प्रदर्शन केले जाते. काही समाजसेवी संघटनांना निधी देऊन त्यांनाही उपक्रमात सामील करणे, हाही आयोजकांचा शिरस्ता.

पण सकारात्मक पद्धतीने पाहिल्यास मुंबईकर मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होतात. धावण्याचे महत्त्व अधोरेखित करून त्याचा यथेच्छ आनंद लुटतात. धावण्याची ही चळवळ फक्त मुंबई मॅरथॉनपर्यंत आता मर्यादित राहिलेली नाही. आता गल्लीबोळात ही धावाधाव सुरू आहे. अल्ट्रा-मॅरथॉन, रनेथॉन, आदी विविध नावांनी ही लाट मुंबईतच नव्हे, तर देशभरात आली आहे. वयाचे बंधन न बाळगता गरीब-श्रीमंत लहान-मोठे सर्वच जण या तंदुरुस्तीच्या वारीत मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत. हे खरे तर कौतुकास्पद. परंतु यातील काही जण हे समाजमाध्यमांवर तंदुरुस्तीचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानणारे. त्यामुळेच आज येथून इथवर धावलो. आज कुठल्या तरी दिखाऊ शर्यतीत भाग घेऊन जेमतेम ती पूर्ण केली. पाहा माझी तंदुरुस्ती, असे छायाचित्र पोस्ट करून लाइक वसूल करणारी ही मंडळी स्वानंदापलीकडे काहीच मिळवत नाहीत. धावण्याकडे क्रीडात्मक पद्धतीने पाहिल्यास भारत स्पर्धात्मक धावण्याच्या नकाशावर खिजगणतीतही नाही, ही वस्तुस्थिती आहे.

कोणत्याही खेळाची देशातली स्थिती कशी आहे, ही त्यांची ऑलिम्पिक पदके किती, यावरून स्पष्ट होते. सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे
स्वातंत्र्यपूर्व काळात १९००च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिचर्डने २०० मीटर आणि २०० मीटर अडथळा अशी दोन रौप्य पदके जिंकली होती. ब्रिटिश-इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या या नॉर्मनची पदके भारताची म्हणूनच अधिकृतपणे गणली जातात. पण त्यानंतर भारताची धावण्यामधील पाटी कोरीच राहिली आहे.

ऑलिम्पिकमध्ये धावणे (१००,२००,४०० मीटर) मध्यम पल्ल्याची शऱ्यत (८००, १५०० मीटर), लांब पल्ल्याची शर्यत (५ हजार, १० हजार मीटर), स्टीपलचेस (३ हजार मीटर), रिले (४ बाय १००, ४ बाय ४०० मीटर) आणि मॅरेथॉन अशा स्पर्धा होतात. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर शर्यतीत ‘फ्लाइंग शीख’ मिल्खा सिंग यांचे कांस्यपदक एक दशांश सेकंदाने हुकले होते.
मग १९८४च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर अडथळा शर्यतीत पीटी उषाचे पदक एक शतांश सेकंदाने हुकले. ‘भारताची सुवर्णकन्या’ म्हणून ओळखली जाणारी उषा याशिवाय ४०० मीटर शर्यतीतही अंतिम फेरीत पोहोचली होती. पुढे श्रीराम सिंग (८०० मीटर), कमलजीत संधू (४०० मीटर), अविनाश साबळे आणि ललिता बाबर (दोघेही ३००० मीटर स्टीपलचेस) अशा काही धावपटूंनी ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. पण पदक मिळवण्यात ते अपयशी ठरले.

आपण धावायला पाहिजे, ते जमत नसेल तर किमान चालायला पाहिजे, हे मात्र गेल्या अडीच दशकांत समाजमानसात रूढ झाले. त्याला प्रेरक अशी घटना घडली, ती म्हणजे २००४मध्ये मुंबई मॅरथॉनच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला. करोना साथीच्या कालखंडातील दोन वर्षे वगळता ही स्पर्धा अविरत सुरू आहे. पहिल्या वर्षी स्पर्धेत २२ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. गेल्या वर्षी हा आकडा ६३ हजारांहून अधिक उंचावला. देशातली सर्वात जास्त पारितोषिक रकमेची स्पर्धा हा तिचा लौकिक. कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र यांना धावण्याच्या प्रवाहात आणून उत्तम अर्थकारण निर्माण करण्याचा हा ‘आयपीएल’नंतर दुसर्‍या क्रमांकाचा प्रयोग गेली अनेक वर्षे यशस्वीपणे चालू आहे. अशा अनेक मॅरथॉनचे पीक देशभरात आले आहे. यातील व्यावसायिक गट सोडले, तर बाकीच्या गटात हौशे-गवशे आणि नवशे यांची जत्रा भरते. काही तर विविध रूपे धारण करून सामाजिक संदेश देतात. चला, सादरीकरण छान. यातून माध्यमांत छायाचित्रे, चित्रफिती, रील्स प्रदर्शित झाले म्हणजे स्पर्धेचा उद्देश सार्थ झाला.

पण स्पर्धात्मक मुंबई मॅरथॉनचा आढावा घेतल्यास हे समाधान होत नाही. मागील वर्षी मुंबई मॅरेथॉनच्या एलिट पुरुष गटात एरिट्रिया देशाच्या बेर्हाने टेस्फायने २ तास ११ मिनिटे ४४ सेकंद अशी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. भारताच्या अनिश थापाने २ तास १७ मिनिटे २३ सेकंद अशी वेळ नोंदवत एकंदर स्पर्धेत ७वे स्थान पटकावले. म्हणजेच विजेता आणि भारतीय अव्वल स्पर्धकामधील वेळेचे अंतर ५ मिनिटे ३९ सेकंद इतके होते. मुंबई मॅरेथॉनच्या महिला गटात केनियाच्या जॉइस चेपकेमोई टेलेने २ तास २४ मिनिटे ५६ सेकंद वेळेसह प्रथम क्रमांक पटकावला, तर भारताच्या निर्माबेन ठाकोरने २ तास ५० मिनिटे ०६ सेकंद वेळ नोंदवत सर्वोत्तम कामगिरी केली. तिला आंतरराष्ट्रीय विजेत्यांमध्ये १६वे स्थान मिळवता आले. या दोघींमधील वेळेचा फरक २५ मिनिटे १० सेकंद इतका होता. ही स्थिती वर्षानुवर्षे तशीच. त्यात कोणताही बदल झालेला आढळत नाही. भारतातल्या स्पर्धेत देशातली मंडळी नाउमेद होऊ नयेत, म्हणून भारतीय गट अशी वेगळी पदक गटवारी निर्माण करून प्रोत्साहन देण्याचे कार्य संयोजक नक्कीच करतात. पण त्यातून सकारात्मक फलश्रुती कोणतीच होत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही भारतीय धावपटू प्रभाव दाखवण्यात अपयशी ठरतात. मुंबई मॅरथॉनमध्ये गेली अनेक वर्षे आप्रिâकन धावपटूंची मक्तेदारी आहे. यात केनिया आणि इथिओपिया या देशांचे वर्चस्व कायम आहे. डोंगर-दर्‍यांची भौगोलिक स्थिती आणि जगण्यासाठीचा संघर्ष यामुळे वेगाने धावणे हे त्यांच्या नसानसात भिनलेले. पदकप्राप्तीनंतर हे खेळाडू आपली जीवनगाथा मांडतात, तेव्हा त्यांच्या यशोप्रवासाचे कौतुक वाटते. पण नेमकी अशीच स्थिती भारतातही बर्‍याचशा भागांत आहे. त्यांनाही जगण्यासाठी झगडावे लागते. पण तरीही दर्जेदार धावपटू का घडत नाहीत, याची खंत वाटते.

तात्पर्य, हेच की ‘वेगे वेगे धावू’ हा मंत्र जपणारी त्सुनामीची लाट देशभरात आली आहे. ही लाट तंदुरुस्तीसाठी पोषक. पण मुंबई मॅरथॉन आणि देशभरातली अशा असंख्य धावण्याच्या शर्यतींचे उपक्रम धावपटू घडवण्याच्या बाबतीत सार्थकी लागलेले नाहीत. ‘ही शर्यत रे आपुली’ ही केवळ तंदुरुस्ती आणि आनंदासाठी तसेच समाजमाध्यमीय सादरीकरणासाठी आहे. त्यातून ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकू शकतील असे धावपटू कधी घडतील अशी आशा धरू नका, हाच त्याचा निष्कर्ष आहे.

Previous Post

अरे संसार संसार…

Next Post

एका हुकूमशहाकडून दुसर्‍याची गच्छंती!

Next Post
एका हुकूमशहाकडून दुसर्‍याची गच्छंती!

एका हुकूमशहाकडून दुसर्‍याची गच्छंती!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.