
युद्ध काळातले काही महत्त्वाचे टप्पे.
१९८०…
इराकचे उपाध्यक्ष तारीक अझीझ यांच्या खुनाचा प्रयत्न, बगदाद. इराकमधल्या इराण्यांवर संशय, इराणी अयातुल्ला अल सदर यांना इराकमध्ये फाशी.
सद्दाम हुसेन सौदी राजांना भेटले आणि आपण इराणवर लष्करी कारवाई करत आहोत, अशी सूचना दिली.
सद्दाम हुसैन यांनी १९७५चा अल्जियर्स करार धुडकावला, शत अल अरबवर इराकचा ताबा जाहीर केला.
सप्टेंबरमध्ये इराणवर आक्रमण सुरू.
युनोनं ठराव क्र. ४७९ पारित करून दोघांनी एकत्र बसून प्रश्न सोडवावेत असं सुचवलं…
****
१९८१
इराण. एका इस्लामी नेत्याचा खून. इराणची राजवट धार्मिक नेत्यांच्या हाती सुुपर्द. इराणचे निवडून आलेले अध्यक्ष आणि पंतप्रधान यांचा खून. दहशतवादी सक्रीय.लेबनॉनमध्ये इराणी दहशतवाद्यांनी प्रâेंचराजदूताचा खून केला.बहारीनमध्ये शियांनी सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला.
****
१९८२
अल्जेरियन परराष्ट्र मंत्र्याचं इराणकडं निघालेलं विमान इराकनं पाडलं.अमेरिकेनं इराकवरचं दहशतवादी राष्ट्र हे लेबल काढून टाकलं, इराकला अधिकृत मदत द्यायला सुरुवात. युनोनं युद्धबंदी जाहीर केली, इराकनं मान्य केली, इराणनं अमान्य केली.
****
१९८३
रमझाननिमित्त इराककडून १ महिना युद्धबंदी.
****
१९८४
इराणमध्ये संसदेच्या निवडणुका पार पडल्या.
हेझबुल्ला या इराण पुरस्कृत संघटनेने अमेरिकन कार्यालयांवर हल्ले केले.
****
१९८५
इराण आणि सोवियेत युनियन यांचं नुकसान करण्यासाठी सौदी अरेबियानं अमेरिकेच्या सल्ल्यावरून तेलाचं उत्पादन वाढवलं आणि किमती खूप खाली आणल्या.
****
१९८६
युद्ध तहकुबीचा युनोचा ठराव क्र. ५८२.
युद्ध सुरूच.
सद्दाम हुसेन यांची युद्धबंदीची आणखी एक तयारी. इराणं पुन्हा धुडकावली.
****
१९८७
इराणचे कुवैत, बहारीन या देशांवर हल्ले.
बेल्जियन, नेदरलँड, इटली, अमेरिका यांची लढाऊ जहाजं वरील देशांच्या संरक्षणासाठी आखातात हजर.
****
१९८८
इराणनं युद्ध संपवण्याचा निर्णय घेतला.
इराकनं युद्धबंदीबाबतच्या अटी जाहीर केल्या.
इराणनं युनोचा युद्धबंदीचा ठराव क्र. ५९८ स्वीकारला.
खोमेनी यांनी आपणच युद्धबंदीचं विषप्राशन केलं, असं जाहीर भाषणात सांगितलं.
इराकनं इराणवर दबाव आणण्यासाठी इराणवरचे हल्ले सुरू ठेवले.
६ ऑगस्ट. इराणनं एकतर्फाr युद्धबंदी स्वीकारली.
२० ऑगस्ट युद्ध संपल्याची अधिकृत घोषणा.
****
युद्ध थांबवावं आणि प्रश्न वाटाघाटी करून सोडवावेत अशा आशयाचे क्र. ५८२, क्र. ५८८ आणि क्र.५९८ असे तीन ठराव युनायटेड नेशन्सनं पास केले.
या ठरावांना काही अर्थ होता?
युनायटेडन नेशन्समधले दादा देश हे युद्ध खेळत होते. अमेरिका, रशिया, प्रâान्स इत्यादी देश इराकला पैसे आणि शस्त्रं पुरवत होते; चीन इराणला शस्त्रं पुरवत होता. एकीकडं शस्त्रं द्यायची आणि दुसरीकडं युद्ध थांबवा म्हणायचं.
****
युद्धाच्या काळात एक इराण काँट्रा प्रकरण झालं.
इराणनं स्पॉन्सर केलेल्या हेझबुल्ला या संघटनेनं लेबनॉनमध्ये ८ अमेरिकन पकडून ओलीस ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी इराणनं शस्त्रांची मागणी केली. त्यातली काही शस्त्रं इराण इराकच्या विरोधात वापरणार होतं. तिकडं समांतर पातळीवर अमेरिका इराकलाही शस्त्रं पुरवत होती. म्हणजे अमेरिकन शस्त्रं इराकी आणि इराणी अशा दोन्ही बाजूंच्या माणसांना मारणार होती.
वरील शस्त्र पुरवठा गुंतागुंतीचा होता. इराणला शस्त्रं पुरवण्यावर अमेरिकेनं निर्बंध घातले होते. त्याच वेळी दक्षिण अमेरिकेतलं निकारागुआतलं सँडिनिस्टा सरकार पाडण्यासाठी अमेरिकेला बंडखोरांना पैसे पोचवायचे होते. आयडिया अशी की अमेरिकेनं इराणला शस्त्र पुरवायची, त्याचे पैसे अनधिकृतरीत्या निकारागुआत पोहोचतील.
शस्त्र पुरवठ्यावर निर्बंध घालणार्या कायद्यातल्या पळवाटा सीआयएनं शोधल्या, संसदेला टांग मारून अमेरिकेनं हा उद्योग केला. पण पेपरांनी प्रकरण शोधून काढलं आणि बोंब केली.
****
इराण एयरलाईन्सचं एक नागरी विमान अमेरिकेच्या व्हिन्सेन या नौदलातल्या जहाजानं पाडलं. विमानात २९० माणसं होती. जहाज इराणच्या समुद्री परिघातच होतं. अमेरिकन नौदल अधिकार्यानं सांगितलं की त्यांना ते लढाऊ विमान वाटलं. नौदलानं विमानाशी संपर्क करून चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण विमानानं कोणतीही माहिती न दिल्यानं विमान पाडावं लागलं, असं अमेरिकन नौदलाचं म्हणणं होतं. लढाऊ आणि प्रवासी विमान यातला फरक अमेरिकन यंत्रांना-उपकरणांना कळत नाही? अमेरिका वापरत होते ते तंत्रज्ञान इतकं कमी प्रतीचं होतं?
****
युद्धामुळं इराणची अर्थव्यवस्था कोसळली. सैन्याचा आणि सुरक्षा गार्डचा भार सांभाळणं अर्थव्यवस्थेला अशक्य झालं. अराजक माजलं. बाजारात जीवनावश्यक वस्तू गायब झाल्या, मिळाल्या तर काळ्या बाजारात आणि महाग. असंतोष पसरला होता. खोमेनी यांची तब्येत आणि सत्ता ढासळली होती.
१९८९च्या फेब्रुवारीत खोमेनींनी सलमान रश्दींना ठार मारा असा फतवा काढला. रश्दींची सेटॅटनिक व्हर्सेस ही कादंबरी धर्मविरोधी आहे असं त्यांनी जाहीर केलं. जगभर खळबळ माजली. इराणी लोकांचं लक्ष आर्थिक, राजकीय प्रश्नांपासून सरकलं. या सार्याचे फायदे मिळवायला खोमेनी जिवंत राहू शकले नाहीत, १९८९च्या जूनमध्ये त्यांचं निधन झालं.
युद्धाच्या काळात इराकचं सैन्य कायच्या काय फुगलं होतं. रणगाडे, चिलखती गाड्या, तोफा यांची इराकजवळची संख्या इराणींच्या संख्येच्या तिप्पट झाली होती. इराकचं सैन्य इराकच्या चौपट झालं होतं. इराकचं हवाई दल इराणच्या सहापट झालं होतं. आखातातल्या तेल निर्यात करणार्या अरब देशांच्या एकत्रित सैन्याच्याही तिप्पट एवढा इराकी सैन्याचा आकार झाला होता.
युद्धावर प्रचंड खर्च झाला होता. मेलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना भरपाई द्यायची होती. लाखो सैनिक बेरोजगार तरी झाले होते किंवा अपंग तरी झाले होते, त्यांना नोकर्या आणि आर्थिक मदत द्यायची होती. तेल विहिरींचंही नुकसान झालं होतं. एकूणच इराकच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते. सद्दाम हुसैन आतून खूष होते, कारण आपण आता आखाती देशांचे नेते झालो आहोत असं त्यांना वाटत होतं. तसंच आपल्याला युद्धातलं सगळं कळतं, आपल्या युद्धकौशल्यामुळंच इराक जिंकला असं त्यांना वाटू लागलं होतं. कुठल्याही हुकूमशहाचं जे होतं ते सद्दाम हुसेन यांचं झालं. वास्तवाशी संबंध उरला नाही.

अर्थव्यवस्था कोसळली होती, कर्जाचा बोजा वाढला होता आणि तेलाच्या किमती घसरलेल्या होत्या. तेलाच्या किमती वाढवणं आणि धनको लोकांना विनंती करून कर्जफेड लांबवावी असं सद्दामनी ठरवलं. सौदीनं कर्ज माफ केलं, तेलाची किमत वाढवायला संमती दिली, पण कुवैत तयार झालं नाही.
इराकनं कुवैतवर लष्करी आक्रमण केलं. कुवैतच्या बाजूनं अमेरिका उभी राहिली, एक नवं युद्ध झालं आणि इराकचा पराभव झाला. इराक संपला.
युद्धाचा फायदा तुर्कीला झाला. युद्धाच्या काळात इराक आणि इराणला जगण्यासाठी लागणार्या वस्तू तुर्की पुरवत होतं, त्याचा प्रचंड आर्थिक फायदा मिळाला. दोन्ही देशांना लागणारी शस्त्रं पुरवण्यात तुर्की मध्यस्थ होता, त्याचं कमीशन तुर्कीला मिळालं. तेलाच्या किमती घसरलेल्या होत्या, तुर्कीनं स्वस्त तेल खरेदी करून आपला तेल साठा उत्तम केला. अब्जावधी डॉलर तुर्कीनं कमावले.
युद्ध झालं दोन देशांत, पण त्याचा परिणाम जागतिक राजकारणावर झाला.
सौदी अरेबियाचं फावलं. सौदीचं इराणशी शत्रुत्व होतं. इराकच्या काठीनं सौदीनं इराणला बडवलं, स्वतः नामानिराळा. इराकला काबूत ठेवून आखाती देशातलं तेल व राजकारण आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अमेरिका व पश्चिमी देशांनी सौदी व आखाती अरब देशांत आपलं स्थान मजबूत केलं, त्यांना आर्थिक मदत दिली, शस्त्रं दिली. भविष्यात इराकचा त्रास आपल्याला होता कामा नये यासाठी सौदी वगैरेंनी प्रचंड शस्त्र खरेदी केली, अमेरिकी व युरोपियन देशांतल्या उद्योगांचं उखळ पांढरं झालं.
सोवियेत युनियननं दोन्ही युद्धग्रस्त देशांना शस्त्रं पुरवली, त्यातून अब्जो
डॉलर मिळवले. परंतु युद्धाच्या आधीपासून अमेरिकेच्या प्रभावामुळं तेलाच्या किमती खाली उतरवल्या होत्या. त्याचा परिणाम रशियन अर्थव्यवस्थेवर झाला होता. या युद्धाच्या काळातच अफगाण मुजाहिदांनी रशियन सैन्याला अफगाणिस्तानबाहेर घालवून दिलं होतं. सोवियेत युनियनचं जगातलं राजकीय स्थान आणि अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती.
सोवियेत युनियनचं विघटन झालं.
म्हणजे एकूणात जगाचा, आखाती प्रदेशाचा तोल विस्कटला, अमेरिका गटाचं वर्चस्व वाढवणारा तोल तयार झाला.
****
विषारी वायू वापरण्याला आंतरराष्ट्रीय कायद्यात बंदी आहे. इराकी सैन्यानं इराणी सैन्यावर आणि नागरी विभागात विषारी वायू फवारले. त्यात १ लाख माणसं मृत्युमुखी पडली. काही हजार माणसांना विषबाधेच्या परिणामांना दीर्घ काळ तोंड द्यावं लागलं. विषारी द्रव अमेरिका, नेदरलँड, जर्मनी, युके आणि प्रâान्स या देशांतल्या कारखान्यांनी पुरवली. इराकमध्ये विषारी वायू तयार झाले, त्यांचा कच्चा माल जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इटली आणि प्रâान्स या देशांनी पुरवला. वायू कुठं सोडायचा किंवा रसायनं कुठं फवारायची ते ठरवण्यासाठी लागणारी टेहळणी अमेरिकन उपकरण आणि यंत्रांनी करून दिली.
स्पेननं इराणला ४५.८ कोटी युरोची आणि इराकला १७.२ कोटी युरोची शस्त्रं विकली.
अमेरिकेनं इराकला ५० कोटी डॉलर किमतीची लष्करी सामग्री विकली. त्यात हेलिकॉप्टर, शस्त्रं इत्यादी गोष्टी होत्या. इराक सरकार दहशतवादी संघटनांना मदत करत असल्यानं इराकला शस्त्रं पुरवू नयेत असा ठराव अमेरिकन संसदेनं केला होता.
इस्रायलला इराणमध्ये शस्त्र निर्मितीला मदत करायची इच्छा होती, व्यवसाय म्हणून. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इस्रायलनं इराणला विमानं, रणगाडे, क्षेपणास्त्रं यांना लागणारे सुटे भाग पुरवले.
लिबिया, सीरिया आणि चीननं इराणला शस्त्रं पुरवली.
ह्यूलेट पॅकार्ड, टेक्ट्रॉनिक्स इत्यादी अमेरिकन कंपन्या इराकी सैनिकी सामग्री आवश्यक कंप्यूटर ज्ञान आणि यंत्रं पुरवत होती.
लढाई तसं म्हटलं तर इराक आणि इराण या दोन देशांची. पण वास्तवात ती लढवली जगातल्या इतर देशांनी, मधल्या मध्ये युद्ध खेळणारे दोन देश बेचिराख झाले.
****
इराणनं युद्धाच्या काळात ९ ते १६ वर्षांची लाखो मुलं लढाईच्या जागी पाठवली. खोमेनीनं बासिजींची एक सेना तयार केली होती. बासिज म्हणजे एखाद्या ध्येयासाठी, सार्वजनिक कामासाठी तयार केलेली संघटना. बासीज सेना २ कोटी लोकांची होती. तिच्यात बहुतांशी गरीब घरची माणसं होती. त्यातच मुलंही सामील होती.
ही मुलं आघाडीवर पाठवली जात. पेरलेल्या सुरुंगावरून चालत जात. सुरुंग फुटत. मुलं मरत किंवा जायबंदी होत. सुरुंग नाहीसा झाल्यावर सैनिक सुरक्षितपणे आगेकूच करत. कुठल्याही व्यावसायिक सैन्यात सुरुंग शोधून वâाढणारी एक तुकडी असते. या तुकडीकडं सुरुंग हुडकणारी उपकरणं असतात. ही तुकडी वाट सुरक्षित करत पुढं सरकते आणि मागून सैन्य, रणगाडे पुढं सरकतात. इथे ही मुलं होती.
या मुलांचा गौरव केला जात असे. मुल्ला त्यांच्या नावानं जयजयकार करत. शहीद शहीद असे चित्कार जनता करत असे. ज्या घरांतून (बहुतांशी वंचित आणि गरीब) मुलं शहीद होत त्या घरांवर मुलांचे फोटो, पोस्टर्स प्रदर्शित करत, त्या घरांना गौरव प्राप्त होत असे.
डोक्यावर पांढरी पट्टी लावून मुलं अभिमानानं आघाडीवर गेली. काही लाख मुलं अशा रीतीनं मारली गेली.
****
किती किंमत मोजली? काय मिळवलं इराण आणि इराकनं?

