ग्रहस्थिती- हर्षल वृषभेत, गुरू मिथुनेत, केतू सिंह राशीत, बुध वृश्चिक राशीत, रवि-मंगळ-शुक्र- बुध-प्लुटो मकर राशीत, राहू कुंभ राशीत, शनि, नेपच्युन मीनेत दिनविशेष- १ फेब्रु. माघ पौर्णिमा, ५ फेब्रु. संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रा. ९ वा. ४३ मिनिटांनी.
*******

मेष : नोकरीत अडकलेली कामे मार्गी लागतील. वादांमुळे बदली होऊ शकते. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात यश मिळेल, पण, हुरळून जाऊ नका, मोठे ध्येय ठेवा. अहंकार त्रासदायक ठरेल. महिलांना व्यवसायाच्या नव्या कल्पना सुचतील. समाजकार्यात सन्मान होईल, उत्साह वाढेल. मालमत्तेची कामे पुढे सरकतील. नव्या नोकरीच्या संधी येतील. घरात मोठ्या भावंडांशी छोट्या कारणाने मतभेद होतील. कुटुंबाच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्या. घरात शुभ वार्ता कळेल. कलाकार, लेखक, पत्रकारांसाठी यशदायी काळ. तरुणांचे नवे संकल्प पुढे सरकतील. काही ठिकाणी आग्रही भूमिका दूर ठेवा.

वृषभ : घरासाठी भरपूर वेळ खर्च होईल. नोकरीत अधिक अपेक्षा ठेऊ नका. मनातल्या सगळ्याच गोष्टी उघड करू नका. धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल. व्यवसायात यश मिळेल. येणे वसूल होईल. तरुणांनी अनावश्यक खर्च टाळावा. चांगल्या नोकरीची संधी चालून येईल. मुलांकडून आनंददायी बातमी कळेल. कामात चुका टाळा. काम सकारात्मकपणे पुढे न्या. व्यवसायात नव्या कल्पना येतील, आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. दानधर्मातून समाधान मिळेल. वाद टाळा, कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. अडकलेली कामे पुढे सरकतील.
![]()
मिथुन : कोणतेही काम काळजीपूर्वक पूर्ण करा. व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. आर्थिक गणित बिघडेल. घरात किरकोळ कारणावरून मानापमान होईल. मनस्वास्थ्य बिघडेल. नोकरीत डोकेदुखी वाढेल. तरुणांचा आनंद वाढेल. नवीन गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे. जाहीर मतप्रदर्शन टाळा. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मित्रमंडळी, नातेवाईकांना सल्ले देऊ नका. मनस्वास्थ्य बिघडू शकते. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट व्यवसायात आमदनी वाढेल.

कर्क : नोकरीत नवे बदल स्वीकारा. कौटुंबिक जबाबदारी वाढणार आहे. व्यवसायात घाई टाळा. आर्थिक नियोजनात चुका करू नका. तरुणांची काही धोरणे चुकू शकतात. मनात अकारण शंका निर्माण होईल. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लागेल. पैशाची देवाणघेवाण करताना गल्लत करू नका. एखादा जुना आजार डोकेदुखी वाढवेल. वेळीच उपचार करा. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीत वाद टाळा. कामात तत्परता कामी येईल. कोणाला आश्वासने देऊ नका. प्रवासात सावधगिरी बाळगा. मित्रांपुढे आपलेच म्हणणे रेटू नका.

सिंह : नोकरीत कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळेल. व्यवसायात नफा मिळेल. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. धार्मिक सहलीला जाल. तरुणांना वाढीव कष्टांतून यश मिळेल. मित्रांकडून मदतीची अपेक्षा करू नका. मुलांना यश मिळेल. कामाचा ताण घेऊ नका. अडकलेलं काम पुढे नेताना नवे अडथळे येतील. फायद्याच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, सकारात्मकता वाढवा. आर्थिक बाजू चांगली राहील. प्रेम प्रकरणात वाद होतील. विद्यार्थ्यांनी मनोबल वाढवावे. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नव्या ओळखींमधून कामे मार्गी लागतील.
![]()
कन्या : व्यवसायात यश मिळणार नाही. निर्णय चुकतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नोकरीत ताण वाढेल. आरोग्यावर परिणाम होईल. आर्थिक गणित बांधताना काळजी घ्या. अन्यथा उधारी करावी लागेल. ज्येष्ठांच्या सल्ल्याने पुढे चला. मन आनंदी ठेवा. राग व्यक्त करू नका. बांधकाम व्यावसायिक, ब्रोकर, वित्तीय सल्लागारांसाठी चांगले दिवस. आप्तेष्टमित्रांशी बोलताना काळजी घ्या. तरुणांना यशासाठी अधिकचे कष्ट करावे लागतील. योगा, ध्यान यासाठी वेळ देणे फायद्याचे ठरेल. नातेवाईकांसाठी भरपूर वेळ खर्च करावा लागेल. पत्नीशी जुळवून घ्या. तरुणांच्या कलागुणांना वाव मिळेल.
![]()
तूळ : मालमत्तेचा विषय सहज सुटेल. वाद टाळा. देवदर्शनातून समाधान मिळेल. भावंडांशी जमवून घ्या. नोकरीत हट्टाग्रह टाळा. नाहीतर वरिष्ठ नाराज होतील. व्यवसायात यशासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील. काही ठिकाणी मौन पाळा. महत्वाची कागदपत्रे वाचूनच स्वाक्षरी करा. जपून बोला. सामाजिक क्षेत्रात सत्कार होईल. मित्रांशी अति करणे टाळा. प्रेमात काही गोष्टी माफ करा. घरातल्या चर्चेत सहमती अवघड आहे. किरकोळ वाद होतील. न पटलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी जास्त बोलू नका. महिलांचा उत्साह वाढेल. मुलांना यश मिळेल.
![]()
वृश्चिक : घरात भांड्याला भांडे लागू देऊ नका. नोकरीत पगारवाढ, बढतीचे योग असले तरी बदलीही होऊ शकते. तरुणांनी दडपणात न अडकता नव्या नोकरीची संधी साधावी. व्यवसायात दूरचा प्रवास करावा लागेल. मुलांकडे लक्ष ठेवा, डोकेदुखी वाढवतील. मित्रांशी जुने वाद काढू नका. आर्थिक नियोजनावर भर द्या. गुंतवणुकीतून मिळेल. मुलांच्या कलाने घ्या. लेखक, प्रकाशक, कलाकारांना उत्तम यश मिळेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. सरकारी कामात शिस्त पाळा. अति आत्मविश्वास टाळा. दाम्पत्यजीवनात आनंद देणारे दिवस.
![]()
धनु : हातातले काम पूर्ण करा. चुका टाळा. नोकरीत वरिष्ठ नाराज होणार नाहीत, याची काळजी घ्या. धार्मिक कार्यातून शांती लाभेल. व्यवसायात नव्या योजना सफल होतील. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. काही ठिकाणी निराशा होईल. खचून न जाता जोमाने कामाला लागा. लहान गोष्टींचा विचार करण्यात वेळ घालवू नका. घरासाठी वेळ द्या. महत्वाची कामे झटपट पूर्ण होतील. व्यवसायात त्रास होतील, खर्च वाढतील. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. लेखक, संगीतकारांना सन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
![]()
मकर : नोकरीत तडजोडीचे धोरण स्वीकारा. सरकारी कामांत विलंब होईल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. कामे पुढे नेताना कुणावर अवलंबून राहू नका. मौज-मजेतून आनंदी व्हाल. मुलेही आनंदवार्ता देतील. तरुणांनी कामाची नवी संधी साधावी. घरात ज्येष्ठांशी जपून बोला. आयटी क्षेत्रात उलाढाल वाढेल, पण, उधळपट्टी टाळा. व्यवसायात बाहेरगावी जाल. प्रवासात पाकीट सांभाळा. आत्मविश्वास वाढेल. वास्तू खरेदीचे योग जुळून येतील. व्यवसायात आर्थिक येणी वसूल होतील. कामे झटपट पूर्ण होतील, पण घाई करू नका.
![]()
कुंभ : बोलण्यातून गैरसमज होऊ देऊ नका. नवीन वास्तू घेण्याचा प्रश्न मार्गी लागेल. आर्थिक व्यवहारात घाई नको. लोकांशी जमवून घ्या. व्यवसायात गणित चुकू देऊ नका. शिक्षकांना यश मिळेल. अचानक प्रवास कराल. तरुणांना यश मिळेल, पण अहंकार सोडा. थंड डोक्याने निर्णय घ्या. मित्रांबरोबर मौजमजेवर पैसे खर्च होतील. नोकरीत कामाच्या ताणामुळे आरोग्याचे गणित बिघडू शकते. रस्तावरून जाताना अरेरावी नको. भागीदारीत किरकोळ वाद होतील. समंजस भूमिका घ्या. छंदातून आनंद मिळेल. घरात जिभेवर लगाम ठेवा.
![]()
मीन : नोकरीच्या संधी चालून येतील. घरातील मंडळींचा मान राखा. मित्रांमध्ये दुरावा निर्माण होऊ देऊ नका. समाजकार्यात चांगली बातमी कळेल. व्यवसायात नव्या कल्पना सुचतील. विदेशात जाण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवे बदल स्वीकारा. अडकलेले काम ओळखीतून पुढे सरकेल. वायफळ खर्च टाळा. व्यवसायात दगदगीचा काळ. मनशांती टिकवून ठेवण्यासाठी योग, ध्यानधारणेचा फायदा होईल. लेखकांना सुवार्ता कळेल. व्यवसायात कल्पकतेने यश मिळेल. नोकरीत नवी जबाबदारी मिळेल, सकारात्मक ऊर्जा वाढेल.

