• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

भास्कर आचार्य

marmik by marmik
February 27, 2026
in इतर
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : हर्षल वृषभ राशीत, मंगळ, प्लूटो मकर राशीत, गुरू मिथुन राशीत, केतू सिंह राशीत, रवि, बुध, शुक्र, राहू कुंभ राशीमध्ये, शनि, नेपच्युन मीनेत दिनविशेष : २१ फेब्रुवारी रोजी श्री विनायक चतुर्थी, २४ फेब्रुवारी रोजी दुर्गाष्टमी, २७ फेब्रुवारी रोजी आमलकी एकादशी.

 

मेष : आपली कामे पूर्ण होतील. मात्र, नोकरी, व्यवसायात अतिरेक टाळा. आपले म्हणणे रेटू नका. आर्थिक बाजू भक्कम राहील, नियोजन करा. अचानक प्रवास करावा लागेल. त्यात अडचणी येतील. तरुणांना कामे पुढे नेण्यासाठी अधिकचे श्रम पडतील. उगाच कुणाला सल्ले देऊ नका. आठवड्याच्या सुरुवातीला कामातला उत्साह वाढेल. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. करियरला दिशा मिळेल. सरकारी कामे फटाफट पूर्ण होतील. व्यवसायात खबरदारी घ्या. भागीदारीत सबुरीने घ्या. कडाक्याचे वाद होतील. महिलांशी जपून बोला. खेळाडूंना यश मिळेल.

वृषभ : तरुणांच्या मनासारखी कामे घडतील. कामाला विलंब झाला म्हणून दुसर्‍यावर राग काढू नका. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. वरिष्ठ कामावर खूष राहतील. सरकारी कामात घाई करू नका. व्यवसायात स्पर्धेमुळे कामे रेंगाळतील. मुलांच्या चुका डोकेदुखी वाढवतील. मोठा निर्णय घेताना विचार करूनच पुढे जा. घरातील गणित बिघडू देऊ नका. अचानक खर्च वाढेल. मोहात अडकू नका. आर्थिक बाजू चांगली राहील. अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. विज्ञानविषयक व्यवसायात चांगले लाभ होतील.

मिथुन : नोकरी-व्यवसायानिमित्त दूरचे प्रवास करावे लागतील, कामाचे गणित बिघडेल. तरुणांच्या मनासारखी कामे होतील. करियरला आकार मिळेल. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल.थकीत येणे वसूल होईल. खिशात पैसे राहतील. सार्वजनिक जीवनात काळजी घ्या. सामाजिक कार्यातून आनंद मिळेल. नवीन घर घेण्याचा विषय मार्गी लागेल. सरकारी कामे पूर्ण होतील. घरात आपलाच हेका धरू नका. आठवड्याअखेरीस दगदग होईल, तिचा आरोग्यावर परिणाम होईल. तरुणांना विदेशात उच्चशिक्षणाची संधी चालून येईल.

कर्क : सरकारी योजनेचे लाभ मिळतील. व्यवसायात यश मिळेल. सार्वजनिक जीवनात पथ्ये पाळा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. पर्यटनाचे नियोजन कराल. घरात आनंद वाढवणारी बातमी कळेल. पैसे मिळवताना शॉर्टकट टाळा. व्यवहार चोख ठेवा. कुटुंबासाठी वेळ द्या. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. रियल इस्टेट क्षेत्रात लाभदायक काळ. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. विदेशातील व्यवसायातून चांगला लाभ मिळेल. लॉटरी, सट्टा यांच्या मोहात पडू नका.

सिंह : तरुणांना नशिबाची साथ मिळेल. नोकरीत काही बाबींपासून दूर राहा. घरात वादात अरेला कारे करू नका. नव्या ओळखीमुळे जुनी कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन जबाबदारी येईल. प्रवासात तब्येत सांभाळा. पत्नीचे सहकार्य मिळेल, घरात वातावरण उत्तम राहील. मुलांच्या वर्तनातून वाद होतील. शुभ घटना कानावर पडतील. इंजिनीअरांना नवीन संधी मिळेल. ध्यानधारणेत मन रमवा. खूप आत्मविश्वास दाखवायला जाऊ नका. मालमत्तेचे प्रश्न चर्चेतून सुटतील. तरुणांच्या डोक्यातील नव्या व्यवसायाची कल्पना मार्गी लागेल.

कन्या : व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. बँकेची कामे पुढे सरकतील. घरात अचानक खर्च वाढेल. अचूक आर्थिक नियोजन करा. भागीदारीत कामगारांचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. मित्रांशी वागताना गैरसमज टाळा. नातेवाईकांना मदत करावी लागेल. कागदपत्रांवर डोळे झाकून सही करू नका. तब्येतीची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घ्या. सार्वजनिक ठिकाणी जपून बोला. विचारपूर्वक कृती करा. कामानिमित्ताने प्रवासात डोकेदुखी वाढेल.नवीन गुंतवणूक करताना सावधान. तीर्थस्थळांना भेट द्याल, समाधान मिळेल.

तूळ : आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील. तरुणांना यश मिळेल. अहंकारापासून दूर राहा. काही ठिकाणी संयम ठेवा. कोणाला प्रतिक्रिया देऊ नका. अडकलेली कामे गुरुबळामुळे पुढे सरकतील. व्यवसायात कामाचा ताण वाढून वेळेचे गणित बिघडेल. मित्र, नातेवाईक भेटतील. थकीत येणी मिळतील. नवीन गुंतवणूक करू नका. प्रेम प्रकरणात जपून राहा. जुना आजार डोके वर काढेल. नवीन व्यक्तीवर विश्वासून निर्णय घेऊ नका. मौजमजेवर खर्च होईल. मित्रांच्या प्रेमात पडू नका. संस्मरणीय घटनांमुळे आठवडा चांगला जाईल. कोर्टातले दावे मार्गी लागतील. नोकरीत यशाचे शिखर सर कराल.

वृश्चिक : कोणाशी न पटल्यास वाद टाळा. व्यवसायात अचानक मोठी कामे करण्याची संधी नियोजनपूर्वक साधा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. कलाकारांना अपेक्षित यश मिळेल. सामाजिक कार्यातून सकारात्मकता वाढीस लागेल. प्रेमप्रकरणात मिठाचा खडा पडेल. घरात वाद टाळा. व्यवसायवृद्धीत यश मिळेल. आर्थिक बाजू काळजीपूर्वक सांभाळा. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या नव्या संधी चालून येतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील.

धनु : तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. धामि&क काया&तून समाधान मिळेल. सरकारी नियम तोडणे डोकेदुखी वाढवेल. प्रेमप्रकरणात त्रास वाढवून घेऊ नका. बोलण्याच्या ओघात चुका टाळा. आई-वडिलांचे ऐका. नातेवाईक, मित्रांशी जुळवून घ्या. व्यवसायात वाद टाळा. आथि&क व्यवहार जपून करा. नोकरीत कामाशी काम ठेवा. आपले म्हणणे रेटू नका. मित्रांबरोबर सहलीला जाल. अल्प यशाने हुरळून जाऊ नका. घरात टोकाची भूमिका नको. मन प्रसन्न होईल. तरुणांना स्पधे&त यश मिळेल.

मकर : व्यवसायात नव्या ओळखी लाभदायक ठरतील. हुरळून जाऊ नका. नोकरीत पगारवाढ, प्रमोशनचे योग आहेत. घरात ज्येष्ठांचा सल्ला कामी येईल. भावंडांची मदत मिळेल. कामात चंचलपणा दूर ठेवा. संगीतकार, कलाकारांना नव्या संधी चालून येतील. आथि&क बाजू भक्कम होईल. खेळाडूंना स्पधे&त यश मिळेल. साव&जनिक ठिकाणी जपून बोला. मित्रांशी वाद टाळा. ज्येष्ठांचा सल्ला ऐका. उधार उसनवारी नकोच. खचा&ला कात्री लावा. अति आत्मविश्वास दाखवू नका. शिक्षण क्षेत्रात चांगली बातमी कळेल. आत्मविश्वास वाढेल.

कुंभ : छंदाचे रूपांतर व्यवसायात होईल. अडलेली कामे वेगाने पुढे जातील. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. कशाचीही चिंता करू नका. खेळीमेळीने काम पुढे न्या. व्यवसायात भरपूर भ्रमंती करावी लागेल. त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. व्यवहारात पारदर्शीपणा ठेवा. सहलीत मौजमजा कराल. मनस्ताप देणार्‍या किरकोळ घटनांकडे दुर्लक्ष  करा. मित्रांशी जमवून घ्या. तरुणांसाठी सुखाचा काळ, मनातल्या इच्छा मागी& लागतील. भाग्योदय होईल. नोकरीत यशदायी काळ अनुभवाल. घरात छोट्या समारंभात मित्र, नातेवाईक भेटतील.

मीन : काही मंडळींना नशिबाची चांगली साथ मिळेल. नवे वाहन घेण्याचा विचार पुढे सरकेल. प्रवासात विशेष काळजी घ्या. बोलण्यातून गैरसमज होऊ देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यासाठी  भरपूर वेळ खर्च होईल. मित्रांबरोबर चैनीत वेळ जाईल. तरुणांचे मन प्रसन्न राहील. घरात आनंदाच्या बातम्या कळतील. कलाकार, संगीत क्षेत्रातील मंडळी यांच्यासाठी चांगला काळ. नव्या संधी चालून येतील. व्यवसायात बुद्धीचातुर्या  च्या जोरावर काम पूर्ण कराल. गर्दी ठिकाणी वाद टाळा. विदेशात शिक्षण घेण्याचा विषय मार्गी लागेल.

 

Previous Post

हाच आमचा धंदा!

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय, नो. नेव्हर…

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.