• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भोंदू खरात आणि हिप्नॉटिझम्

टोक्या टोचणकर (टोचन)

marmik by marmik
April 11, 2026
in टोचन
0
भोंदू खरात आणि हिप्नॉटिझम्

चित्र-एआय

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात खरातवर ठसठशीतपणे झालेले शेकडो आरोप सत्य असले तरी त्याला येत असलेली वशीकरण विद्या अर्थात हिप्नॉटिझमची बाब या गोष्टीवर हवे तितके लक्ष कोणीच केंद्रित केले नाही असे माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्याचे म्हणणे आहे. खरात महिलांना गुंगीचे पेय पाजून त्यांच्यावर अत्याचार करायचा हे खरे असले तरी त्याच्या संपर्कात आलेल्या कितीतरी स्त्रियांना त्याआधी हिप्नॉटाईज करून म्हणजेच त्यांच्यावर मोहिनीविद्येचा प्रयोग करून त्यांना तो वश करायचा, असे पोक्याचे ठाम मत आहे. ज्यांना मुळात हिप्नॉटिझ्म हा काय प्रकार असतो हे पूर्ण माहीत आहे, त्यांनाच त्याची कल्पना येऊ शकते. त्यातही अनेक प्रकार आहेत, असे पोक्या सांगतो. ज्याला हिप्नॉटाईज करायचा आहे त्याला समोर बसवून त्याच्या डोळ्यात लक्ष केंद्रित करून हिप्नोटिस्ट त्याला पूर्ण वश करून घेतो. इतका की हिप्नोटिस्ट जी आज्ञा म्हणजे हुकूम देईल त्याप्रमाणे समोरचा माणूस कृती करतो. किमान दोन दिवस तरी त्या माणसावरचा हा असर किंवा परिणाम कमी होत नाही. याचा अर्थ त्याचे मन त्या काळात हिप्नोटिस्टच्याच ताब्यात असते. अर्थात त्याचा मेंदू त्या हिप्नोटिस्टकडे गहाण पडलेला असतो. मात्र पूर्वीच्या जीवनात ज्याच्यावर मानसोपचार झाले असतील किंवा मानसोपचार डॉक्टरांकडून ज्याला शॉक दिलेले असतील तो माणूस हिप्नॉटाईज होऊ शकत नाही, तसेच ज्याच्या मेंदूची कार्यक्षमता अफाट असेल तर असा माणूसही हिप्नॉटिझमचा बळी होऊ शकत नाही, असेही पोक्या ठामपणे सांगतो. जे पुरुष आणि स्त्रिया अतिशय हळव्या, अति भावनाप्रधान, तसेच भोळ्या असतात त्या हिप्नोटिस्टला ताबडतोब वश होऊ शकतात आणि तो त्यांच्याकडून हवे ते वसूल करून घेऊ शकतो. एखाद्या बाईला रस्त्यात भूल घालून तिच्याकडील दागिने, रोकड एका माणसाने लंपास केले, अशा बातम्या आपण वृत्तपत्रात वाचतो, त्यामागे याच हिप्नोटिझमचे म्हणजे मोहिनीविद्येचे तंत्र वापरलेले असते. मात्र या हिप्नोटिझमचा उपयोग चांगल्या कामासाठी तसेच रुग्णाच्या मनाचे आरोग्य सुधारण्यासाठी करणारेही अनेक हिप्नॉटिस्ट या जगात आहेत.

पोक्याच्या सांगण्यानुसार त्याच्या मित्राचा एक डॉक्टर मित्र हिप्नॉटिझम विद्येत पारंगत होता. लोकांना हिप्नॉटिझम म्हणजे नेमके काय हे जाहीरपणे मनोरंजनाच्या माध्यमातून समजावून सांगावे, या हेतूने तो मोठ्या थिएटरमध्ये प्रेक्षकांनाही त्यात सहभागी करून हाउसफुल कार्यक्रम करायचा. ज्यांना या कार्यक्रमात मनापासून सहभागी व्हायचे असेल त्यांनीच स्टेजवर यावे, असे आवाहन तो करत असे. एकाच माणसावर नव्हे, तर अनेक माणसांवर एकाचवेळी सामूहिक हिप्नोटिझमचा प्रयोग करता येतो, हे तुम्ही या कार्यक्रमात पाहा असे त्यांनी सांगितल्यावर प्रेक्षकांचीही उत्कंठा शिगेला पोहोचत असे. प्रेक्षकगृहातील वीस-पंचवीस प्रेक्षक त्यानंतर स्टेजवर जात. त्यांना दोन-तीन रांगांमध्ये उभे करून तो हुकूम देई… तुम्ही हळूहळू अंग सैल सोडा, स्वतःला विसरा, अगदी शून्यात जा, लक्ष स्वतःच्या कपाळावर केंद्रित करा, समाधीवस्थेचा अनुभव येऊ द्या, आता तुम्ही लहान होत आहात, सहा महिन्याच्या बाळाएवढे… एवढं त्याने म्हटल्यावर त्या वीस-पंचवीस जनातले किमान पंधराजण त्यात तरुणीही असत, स्टेजवर लहान बाळासारखे रांगू लागत, रडत, खेळत, हसत. स्टेजवर आलेले आणि हिप्नॉटाईझ न झालेले तसेच उभे असत. त्यांना तो खाली पाठवत असे. त्यानंतर तो हुकूम देई, आता तुम्ही दहा वर्षांचे झाले आहात. तुम्ही उत्तम नृत्य करू शकता. तुमची नृत्यकला बाहेर येऊ द्या. नाचोऽऽऽ एवढं त्यांनी म्हटल्यावर त्यातील प्रेक्षक दे धमाल नाचायला सुरुवात करत.

हा त्यांच्या अंंतर्मनातून प्रकटलेला उत्स्फूर्त आविष्कार असे. कोणी वरातीतला डान्स, कोणी बाल्याचा डान्स, कोणी भगवानदादाचा डान्स, कोणी गरबा तर कोणी वाटेल तसा नाचे. एक मुलगी तर भरतनाट्यम करू लागली. नंतर कळलंं की ती या नृत्यात पारंगत होती. असे कितीतरी मनोरंजक प्रयोग करून प्रेक्षकांना तो हिप्नॉटिझम म्हणजे नेमके काय आहे समजावून या विद्येचा दुरुपयोग करणार्‍यांना त्याची शिक्षा भोगावी लागते ही स्पष्ट करीत असे. त्याच्या म्हणण्यानुसार ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रामाणिकपणे हे हिप्नोटिझमचे प्रयोग किंवा उपचार झाले ती व्यक्ती पूर्वी जर मनाने दुबळी, भिडस्त किंवा घाबरट असेल तर ती पुढील आयुष्यात मनाने इतकी कणखर, बोल्ड आणि धाडसी होते की, तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. त्या डॉक्टरकडून त्या प्रयोगात पोक्याचे असेच तीन मित्र स्टेजवर हिप्नॉटाईज झाले होते. त्यांच्या बाबतीत काही दिवसांतच इतके सकारात्मक परिणाम दिसू लागले की पोक्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आज ते तिघेही त्यांच्या व्यवसायात मोठ्या हुद्द्यावर आहेत. हिप्नोटिझमने मनाची एकाग्रता आणि बुद्धीकौशल्य वाढते. एखादी गोष्ट ठरवली की ती होणारच! इतका दृढनिश्चय त्यामागे असतो.

डॉक्टर म्हणतात, ही तुमच्या मनाच्या एकाग्रतेची किमया आहे. मन एकाग्र केल्यास आपण भला मोठा दगडही फक्त चार बोटांनी क्षणात उचलू शकतो… आम्ही चाटच झालो,

असे पोक्या सांगतो! डॉक्टरच्या म्हणण्यानुसार हिप्नोटिझममुळे मनाची शक्ती आणि एकाग्रता वाढवता येते. मात्र त्यासाठी एखाद्या तज्ज्ञ आणि प्रामाण्िाक हिप्नोटिस्टकडून हिप्नॉटाईज करून घ्यायला हवे. खरात प्रकरणात खरातच्या तरुणपणापासून हिप्नोटिझम अर्थात वशीकरणाची विद्या त्याला नक्कीच अवगत असणार. मात्र तिचा दुरुपयोग केल्याने त्याची फळे त्याला भोगावी लागत आहेत, असा पोक्याचा निष्कर्ष आहे, मी त्याला त्याबाबत खोदून खोदून विचारलं असता पोक्या म्हणाला, गिर्‍हाईकांना
हिप्नॉटाईज करून नंतर त्यांची मने पूर्ण ताब्यात आल्यावर ती गिर्‍हाइके त्याला हवी तशीच वागतात. त्याला पूर्ण सहकार्य देतात. म्हणूनच खरात म्हणतो, मी स्वत: कोणाला आमंत्रण दिले नव्हते. त्याचा हा बनाव तद्दन खोटा पडला असला तरी त्यामागे त्याने
हिप्नॉटाईज केलेल्यांचा वाटा किती आहे, हे गृहीत धरून तपास व्हायला हवा.

Previous Post

राशीभविष्य (११ ते १७ एप्रिल २०२६)

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय, नो. नेव्हर…

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.