• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बँकिंगमधला ट्रोजन हॉर्स!

सुधीर साबळे (सायबर जाल)

marmik by marmik
January 27, 2026
in सायबर जाल
0
बँकिंगमधला ट्रोजन हॉर्स!

‘बँकेचे व्यवहार करायला एकेकाळी बँकेच्या शाखेत जायला लागायचं. पैसे काढायचे असोत, भरायचे असोत, इतर काही काम असो- लांबलचक लाइनमध्ये उभे राहा, स्लिपा भरा, त्या बिनचूक भरा, नीट सह्या करा, जिथे काहीही लिहायचं नसतं, तो भाग कोरा ठेवा, अशा एक ना अनेक गोष्टी. शास्त्रंच ती. बँकेत जाणं हे सुटीच्या दिवशीचं किंवा सुटी काढून करायचं काम होतं. आता हे ऐकून नव्या पिढीचा विश्वासच बसणार नाही. आता अनेकांना खातं उघडण्यासाठी बँकेत जावं लागलं असेल तर ते तेवढंच, नाही तर आपल्या बँकेच्या शाखेचं तोंडही अनेकांनी पाहिलेलं नसतं. कारण आता बँकेचे व्यवहार ऑनलाइन झालेले आहेत. यूपीआय, बँकेची अ‍ॅप्स यांच्या माध्यमातून किचकटातले किचकट व्यवहार सोपे झाले आहेत. तुम्ही आधी किती वेळा बँकेत जात होतात, आता किती वेळा जाता, किती वेळा कुणाला चेक देण्याची वेळ येते, ते आठवून पाहा.

बँकेचे ऑनलाइन व्यवहार शक्य तेवढे सुरक्षित असतात. पण हेही सायबर विश्वच आहे. इथे देखील बँकेच्या डेटाची चोरी होऊ शकते. ती झाली तर आपला काहीच संबंध न येता आपले बँक खाते साफ केले जाऊ शकते. सायबर चोरटे त्यासाठी वापरतात बँकिंग ट्रोजन टेक्निक. हा गडबडगुंडा कसा केला जातो हे समजून घेण्याच्या आधी ट्रोजन हा प्रकार समजून घ्यायला हवा. ट्रॉय हे शहर ताब्यात घेण्यासाठी शत्रूने एक वेगळीच क्लृप्ती लढवली होती. त्या शहराच्या बाहेर एक लाकडी घोडा ठेवला गेला. तो प्रचंड मोठा घोडा ट्रॉयवासी शहरात घेऊन गेले. त्या रात्री त्या घोड्यातून सशस्त्र सैनिक बाहेर पडले आणि त्यांनी सगळं शहर ताब्यात घेतलं. या घोड्याला म्हणतात ट्रोजन हॉर्स़ त्याचप्रकारे आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सायबर चोरट्यांचे मालवेअर आपण आपल्या संगणकामध्ये घेतो आणि मग ते मालवेअर आपल्या संगणकाचा आणि त्या माध्यमातून आपल्या व्यवहारांचा ताबा घेतात. हे कसं होतं, हे जाणून घेऊ या हेमा सावंतांच्या उदाहरणातून.

हेमा सावंत या सरकारी कर्मचारी म्हणून निवृत्त झाल्या होत्या. पुढल्या आयुष्यातील वेळ त्यांनी पाककला, बागकाम, मुलांना शिकवणे, यासाठी खर्च करण्याचे ठरवले होते. या कामासाठी आपल्याला अधिक वेळ उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांनी बँकेचे व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन तंत्राचा वापर करण्याचे निश्चित केले. ऑनलाइन व्यवहार कसे करतात, याचे योग्य ते शिक्षण त्यांच्या मुलीकडून घेतले होते. त्यामुळे हळूहळू त्या ऑनलाइन व्यवहार करण्यामध्ये पारंगत होत चालल्या होत्या.

एका शनिवारी आपल्या संगणकावर ईमेलची तपासणी करत असताना हेमा यांना बँकेकडून एक मेल आली. त्या विषयामध्ये ‘तातडीची कारवाई आवश्यक- आपल्या बँक खात्याच्या संदर्भात’ असे नमूद करण्यात आले होते. हेमा यांनी तो ईमेल उघडला, तेव्हा त्यामध्ये तुमच्या बँक खात्यात काही गडबड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यामधून होणारे अनधिकृत व्यवहार थांबवण्यासाठी तुमच्या खात्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला सोबत देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. हेमा यांना आलेल्या त्या ई-मेलमध्ये बँकेच्या अधिकृत वेबसाइटची लिंक देण्यात आली होती. हेमा यांनी तो मेल वाचल्यानंतर त्या घाबरून आणि गोंधळून गेल्या होत्या. मेलमध्ये करण्यात आलेल्या सूचनेनुसार हेमा यांनी पुढचा मागचा विचार न करता त्या लिंकवर क्लिक केले. भावनेच्या भरात त्यांनी त्या वेबसाइटवर जाऊन तिथे बँक खात्याची माहिती, सामाजिक सुरक्षा क्रमांक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याचा तपशील भरला.

हेमा यांच्या त्या कृतीमुळे ‘बँक गार्डियन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अत्याधुनिक बँकिंग ट्रोजनला चालना मिळाली. हेमाच्या नकळत ट्रोजन त्यांच्या संगणकात घुसू लागला. संगणकावर होणारा प्रत्येक कीस्ट्रोक तो लॉग करू लागला. त्यामधून त्याने हेमा यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स, वैयक्तिक ओळख असणारा तपशील, आर्थिक माहिती रेकॉर्ड याची चोरी केली होती. ही चोरी करण्यात आलेली माहिती या डेटा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या सायबर गुन्हेगारांना पाठवण्यात आली. त्याचा वापर करून हेमा यांच्या बँक खात्यामधून अनधिकृतपणे पैसे वळवण्यात आले, त्याचबरोबर त्यांच्या क्रेडिट कार्डाचा वापर देखील करण्यात आला होता. पण हेमा या सगळ्या प्रकाराबद्दल अनभिज्ञ होत्या. एके दिवशी त्यांना बँकेकडून एक मेसेज आला, त्यामध्ये तुमच्या खात्यामधून एक लाख २५ हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. त्या एकदम हडबडूनच गेल्या. त्यांना प्रश्न पडला की हे काय होतंय, आपण कुणाला काहीच पैसे दिलेले नाहीत. त्यांना हा सगळा प्रकार संशयास्पद वाटला. हे कस घडतंय, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी ताबडतोब बँक गाठली. बँकेला आतापर्यंत घडलेल्या प्रकाराची बँकेला माहिती दिली.

तेव्हा त्यांना कळलं की आपल्याला आलेलं मेल मुळात आपल्या बँकेकडून आलेलंच नाही. आपण ज्या वेबसाइटवर गेलो ती बँकेची अधिकृत वेबसाइटच नव्हती. बँकेच्या प्रतिनिधीने त्यांना विचारलं की तुम्ही शहानिशा न करता त्यामध्ये कशी माहिती भरली? या प्रश्नाचं त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. ही तक्रार येताच बँकेने हेमा यांच्या खात्यामधून आर्थिक व्यवहार होऊ नयेत, म्हणून त्यांचे खाते तात्काळ बंद केले. हेमा यांना याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा तपास सुरू केला तेव्हा, झारखंडमधून एका टोळीने बँकिंग ट्रोजनच्या माध्यमातून हेमा त्यांच्या बँक खात्याची माहिती चोरून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी तपास करून पाच जणांच्या त्या टोळीला जेरबंद केले.

अशी घ्या काळजी

तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा: तुमची ऑपरेटिंग सिस्टम, वेब ब्राउझर आणि सर्व इंस्टॉल केलेले सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करा.

ईमेल आणि ऑनलाइन व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. अविश्वासू स्त्रोतांकडून आलेल्या फायली डाउनलोड करणे किंवा ईमेलमधील लिंकवर क्लिक करणे हे करताना विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

आपला संगणक नियमितपणे स्कॅन करा तुमच्या अँटीव्हायरस आणि अँटी-मालवेअर सॉफ्टवेअरने कीलॉगर किंवा इतर मालवेअर शोधण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरचे नियमित स्कॅन करा.

संगणक वापरताना आपल्याला सुरक्षित ब्राउझिंग कसे करता येईल, त्याची सवय लावून घ्या.

Previous Post

…आणि खिचडी साधली!

Next Post

पोक्याचा महाप्रबंध!

Next Post

पोक्याचा महाप्रबंध!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.