कोरोना संकटामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीच दिवसांपूर्वी ‘स्टोरी ॲाफ लागिरं’ या सिनेमाचे टिझर मोशन पोस्टर आल्यानंतर जी. के. फिल्मस क्रिएशन निर्मित हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी सोशल मीडिया हॅण्डलवरून आज केली. रोहित राव नरसिंगे दिग्दर्शित हा सिनेमा प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा आहे. या चित्रपटात रोहित राव नरसिंगे प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत चैताली चव्हाण, ऋतुजा आंद्रे, मोहन जाधव, सोमनाथ येलनुरे, प्रेमा किरण, मिलिंद दास्ताने आणि संजय खापरे हेही चमकणार आहेत. या चित्रपटात रोहित राव नरसिंगे फक्त अॅक्शन दृष्यांमध्येच नाही तर ऋतुजा आद्रेसोबत रोमान्स करतानाही दिसणार आहे.