• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय नो नेव्हर

संतोष पवार

marmik by marmik
February 27, 2026
in भाष्य
0
नाय, नो. नेव्हर…

भारतात चहावर बंदी आणली तर काय होईल?- अशोक परब, ठाणे

काय होणार म्हणजे, जे गुजरातमध्ये दारुबंदीचे झाले तेच होणार, चहा लपून-छपून खुलेआम मिळणार… आणि बंदी अंगाशी आली तर माननीय, आदरणीय, सन्माननीय न्यायालय त्या बंदीला स्टे देणार… तुम्ही आम्ही चहा पिता पिता त्याच्यावर चर्चा करणार… पुन्हा बंदीचं राजकारण करणारेच निवडून येणार… आणि बंदीने हैराण झालेले ‘हे पुन्हा पुन्हा कसे काय निवडून येतात?’ याच्यावर चर्चा करणार…चहा पिता पिता…

कवी म. पां. भावे म्हणतात की स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा…गुलाबाच्या फुलांनी त्यांचं ऐकलं तर मग आपल्याला गुलकंद कसा खायला मिळेल?- विक्रांत शिंदे, जत

भावे म्हणतात ती स्वप्नातली कळी सोडा, दादा कोंडके म्हणतात ना ‘तुला पाहून कळी माझी लई खुलते…’ त्या खर्‍याखुर्‍या कळी वर भागवून घ्या. गुलकंद काय पानाच्या दुकानात पण मिळतो राव!

‘शेर पाला है तो खर्चा भी उठाना पडेगा’ असं मी अनेकांकडून ऐकतो. पण जो मुंगीलाही घाबरतो, किरकोळ बिबट्यावरही गुरकावताना ज्याची फॅ फॅ उडते आणि हत्ती दिसल्यावर तर जो धूम पळच काढतो, असला निरुपयोगी आणि खर्चिक शेर पाळायचा तरी कशाला?- प्रवीण बापट, पुणे
असं कसं विचारण्याची छाती कशी होते तुमची? तुमची ५६ सेमी असलेली (छाती हो) ५६ इंच फुगावी असं वाटत नाही तुम्हाला?? दुसरा काही पर्याय आहे का (नुसतेच हवा भरून) फुगवण्याकरता?

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दंडुके घेऊन कुठेही जाऊन कोणालाही धमकावणारे गुंड पोलिसांना दिसतच नाहीत का? कुणालाही नाव गाव, एकमेकांशी संबंध विचारण्याची, धमक्या देण्याची परवानगी यांना देतं कोण? -सिद्धी गुरव, बेलापूर
बापाची परवानगी असल्याशिवाय पोरं उंडारत नाहीत…घरी असलेला बाप मुलांना धाकात ठेवतो, ‘बंगल्यावर बसलेला बाप’ मुलांना  फ्री हँन्ड देतो… बापाबापातला फरक सर्वसामान्याला कळत नाही. ज्याला कळतो तो दोन बापाचा.

देशाच्या विरोधी पक्षनेत्याने संसदेत विचारलेल्या प्रश्नांवर सत्ताधारी पक्षाचे चंगू मंगू मीडियाकडे जाऊन उत्तरं कशी देतात? संसदेत उत्तरं देण्यात त्यांची नेमकी कसली अडचण असेल?-  कैलास केंद्रे, किनवट

कैलासराव, खरं सांगा, ‘अडचण कसली आहे, या प्रश्नाच्या आडून चंगू मंगूंचे नंगू फोटो आणि व्हिडिओज असलेली एखादी फाईल विरोधी पक्षाकडे असेल का, या वेगळ्याच प्रश्नाचे उत्तर आमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करताय ना? आता विचारलयत म्हणून सांगतो, कसं आहे, संसद हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि मंदिरात आपल्या देवासमोर खरं बोलता येत नाही. पण मंदिराबाहेर खोटं बोलल्यावर तोच देव एखादा श्री किंवा कसलं तरी भूषण, यापैकी काही ना काहीतरी देतो याचा त्यांना अनुभव असेल.

डोनाल्ड ट्रम्पवर जेव्हा काही भारतीयांचं प्रेम उतू चाललं होतं, त्या काळात त्याचं मंदिर बांधलं होतं त्यांनी. आता ट्रम्प आपल्या देशावर खार खाऊन एकापेक्षा एक अन्यायकारक, एकतर्फी घोषणा करत सुटलाय, तर त्या मंदिरात दिवाबत्ती होत असेल का हो हल्लीच्या काळात? – सुरेश गांगण, बिरवाडी, महाड
दिवाबत्तीला तेल लागतं, इथं तेल कोणाकडून घ्यायचं याच्यावरून तो डोनाल्ड, त्याला डोलांड म्हणणार्‍याचं तेल काढतोय. आणि डोलांड म्हणणारा, त्याला प्रश्न विचारणार्‍यांचं तेल काढतो, त्यामुळे ‘नो कॉमेंट्स! तुमचा प्रश्न गेला तेल लावत!!

अति तिथे माती ही म्हण आपल्या काही नेत्यांच्या बालपणी शाळेत शिकवलीच गेली नसेल की ते शाळेतच गेले नसतील?-नीला कुलकर्णी, डोंबिवली

शाळेची माहिती विचारून कॉलेजच्या डिग्रीची माहिती घ्यायची आहे का? उद्या तुम्ही त्या डिग्रीची ‘शहा’निशा केलीत आणि तुमच्या नावाने सर्टिफिकेट वाटली गेली तर चालणार आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि तरीही हिंमत झालीच, तरी पुढच्या वेळी हा प्रश्न विचारण्याची हिंमत करू नका. उत्तर द्यायला आमची हिंमत व्हायला हवी ना! उगाच आमच्याकडून अति व्हायला नको.

Previous Post

राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.