• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय नो नेव्हर

संतोष पवार

marmik by marmik
January 10, 2026
in भाष्य
0
नाय, नो. नेव्हर…

अमेरिकेतून सर्वच्या सर्व भारतीयांची हकालपट्टी करावी, ते आपल्या देशासाठी उपद्रव आहेत, अशी मागणी एका पत्रकाराने केली आहे. भारतीयांविरोधातले आंदोलन तीव्र होत आहे. एका फोनवर युद्ध थांबवणारे भक्तांचे पापा आता आपल्या मित्राला सांगून भारतविरोधी अमेरिकनांना दटावण्याचा आदेश का देत नाहीत?
– शैलेंद्र फडतरे, भूम
आपले पापा कितीही सुपर हिरो असले तरी त्यांनाही दटावणारा कोणीतरी बॉस असतो, हे शेंबड्या पोरालाही कळतं.. तरी तुम्ही असा प्रश्न विचारताय? म्हणजे एक तर तुम्ही शेंबडे आहात किंवा आम्हाला शेंबडे समजताय.

धुरंधर या हिंदी सिनेमाच्या झंझावातातही ‘उत्तर’हा मराठी सिनेमा नुसता तगूनच राहिलेला नाही, तर चौथ्या आठवड्यात हाऊसफुल गर्दी खेचतो आहे, त्यातून मराठी सिनेनिर्माते काही धडा घेतील का?
– विनायक पाचपुते, माळशिरस
उत्तर नावाचा मराठी सिनेमा चालला, हे हिंदीवाल्यांना उत्तर आहे असं काही बोलू नका. त्यामुळे मराठी चित्रपटवाल्यांचे प्रश्न अधिक गंभीर होतील.. आधीच असलेल्या प्रश्नांवर, अनुदान या एका उत्तराशिवाय दुसरं कुठलंच उत्तर, उत्तर देण्याची जबाबदारी असलेल्यांकडे नाहीये, आणि आम्ही चित्रपटवाले स्वतःला प्रश्न विचारत नाही, कारण उत्तर शोधण्याची आमचीच इच्छा नाही.

लग्न झाल्यावर नवरे बायकोला इतके का घाबरतात? भांडण झाल्यावर बायका नवर्‍याशी बोलत नाहीत, ते ठीक आहे. पण त्या भांडी का आपटतात?
– अशोक परब, ठाणे
मग काय बायकांनी नवर्‍याला आपटायचचं? वड्याचं तेल वांग्यावर काढलेलं चालतं, तसंच बायका नवर्‍याचं तेल भांड्यावर काढतात असं स्वतःला समजवा आणि झाकली मूठ झाकलीच ठेवा. असं कितीही आडून आडून विचारलं तरी जे लपवायचं असतं ते उघडं पडतंच. आणि घरातल्या गोष्टी अशा बाहेर विचारलेल्या बायकोला कळल्या तर… फक्त विचार करा किती किती आणि काय काय आपटलं जाईल!
संतोषराव, एक प्रॉब्लेम झालाय. आमच्या वॉर्डमध्ये सगळ्या पक्षांचे मिळून ७७ लोक या वॉर्डची सेवा करायला इतके उत्सुक होते की त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी एकमेकांच्या झिंज्या उपटल्या, कानफटात मारल्या, गाड्या अडवून शिव्याशाप दिले…

आमची इतकी काळजी करणारी इतकी माणसं पाहून माझ्या डोळ्यांना अश्रूची जी धार लागली आहे, ती थांबतच नाही. मी काय करू?
– बंडू पाटील, पनवेल
अश्रूची धार नुसतीच गाळू नका. टीव्हीसमोर भाऊ भाऊ करून हंबरडा फोडा. तुमच्या अश्रूंची काहीतरी किंमत तुम्हाला नक्की मिळेल. या नाहीतर पुढच्या किंवा पुढच्या कुठल्यातरी निवडणुकीला… तोवर, जर सतरंज्या उचलत असाल तर त्या उचलत रहा…

आमच्या परिसरातले रिक्षावाले, अंडा बुर्जीवाले, रस्त्यावरचे फेरीवाले राजकारणात गेल्यानंतर त्यांचा हेलिकॉप्टर आणि लँबॉर्गिनी घेण्यापर्यंत जो काही विकास झाला आहे, तो पाहून माझा सीएचं शिक्षण घेणारा मुलगा आता ते सोडून राजकारण करायचं म्हणतोय. त्याला काय सांगू?
– सारिका वैद्य, कळवा
त्याला सांगा राजकारण करायचं असेल तर खोटी आश्वासनं, मतपेट्या पळवणं, असं जुनं पुराणं बुरसटलेलं राजकारण करू नकोस. बिनविरोध कसं निवडून यायचं याचा अभ्यास असणार्‍या नेत्याचा अभ्यास कर. आणि कसलाच अभ्यास न करता राजकारणात यायचं असेल तर दादागिरी कर, गुंडगिरी कर, एखादा हाफ मर्डर, मर्डर किंवा गेला बाजार बलात्काराचा आरोप होईल असं काहीतरी कर. ‘अशांना’ सुधरवण्यासाठी राजकारणात प्रवेश दिला जातोय त्याचा लाभ घे म्हणावं.

पुण्यात भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार मला पाहवत नाही, असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतायत. ही बातमी वाचल्यावर आमच्याकडचा जन्मापासून पायाने अधू असलेला एक माणूस हसत हसत नाचू लागला. असे आणखी विनोद कुठे वाचायला मिळतील?
– पांडुरंग वाघमारे, शिरूर
सोशल मीडियावर जाऊन दादांचे, भाऊंचे किंवा भाईंचे विनोद असं टाईप करा किंवा ट्रकभर पुरावे, चक्की पिसिंग… तोवर लग्न करणार नाही, मांडीला मांडी, आदर्श, महाराष्ट्र सदन, ७२ हजार कोटी, क्लीन चिट.. असं काहीही टाईप करा आणि कमेंट्स वाचा. प्रत्येक कमेंट विनोदापेक्षा भारी असेल याची खात्री बाळगा.

सत्ताधारी युतीमधल्या एकाही पक्षाचे नेते प्रदूषण, पिण्याचं पाणी, रस्ते, सार्वजनिक सोयीसुविधा, यांच्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत, फक्त मुंबईचा महापौर ‘खान’ होईल, वगैरे फडतूस मुद्द्यांवर फालतूची बडबड करत राहतात. यांना का निवडून द्यायचं आम्ही?
– नितीन बर्वे, प्रभादेवी
तुम्ही त्यांना निवडून देणार? तुमच्या मताला ते अगरबत्तीही लावणार नाहीत. कोणीही मत दिलं नाही तरी विरोधकांना ‘शहा’ देऊन बिनविरोध निवडून आणायचा ट्रेंड तुम्हाला माहित नाही का? तुम्ही निवडणूक आयोग आहात की भोळे आहात?

 

विचारून टाका प्रश्न

तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected]  या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

राशीभविष्य

Next Post
राशीभविष्य

राशीभविष्य

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.