
नरेंद्र मोदी
नोटबंदी वा सिलेंडरसाठी
जनता नेहमी रांगेत असते
खेद-खंत ना मुळीच त्याची
तरी मला का उगाच डसते

उन्हातान्हात ही तडफड तिची
पाहून मन हे जरा न द्रवते
शिस्त लावण्या करतो सारे
तुमचे हृदय का कळवळते?
जनतेची कशी करू मी पर्वा
मनमानी ते हुकूम देतो
जेव्हा येती ते अंगाशी
घाबरून ते मग मागे घेतो
देवेंद्र फडणवीस
भरपूर आहेत गॅस सिलेंडर्स
का उगाच या लावता रांगा
मोदीसाहेबांचा आहे संदेश
रांगा लावून दुखतील टांगा

खा हवे ते पदार्थ रुचकर
सगळी हॉटेल्स आहेत उघडी
आहे कुठे ती गॅस टंचाई
आमच्या नावे का ही फुगडी!
विरोधकांचा डाव असे हा
रामराज्य ना बघवे त्यांना
मस्त खाऊनी देतो ढेकर
आम्ही खातो तुम्हीही खा ना
डोनाल्ड ट्रम्प
तुमचा इंडिया ठेवला गॅसवर
मला त्याची ना मुळीच चिंता
माझ्या देशात भरपूर सिलेंडर्स
तुम्हीच सोडवा गॅसचा गुंता

गॅसचे चटके बसल्यावरती
कळली तुम्हाला माझी पॉवर
नाक दाबूनी तोंड उघडतो
माझ्या डोक्यावर आहे शॉवर
लोकांचे हाल पाहूनी होतो
मनास माझ्या विकृतानंद
तरी वाटते भीती मनाला
मित्रांचे दार होईल बंद
पाकिस्तान
इकडे आड तिकडे विहीर
आमची झाली पुरती गोची
सगळीकडून मिळती लाथा
जगात गेली अब्रु आमची

अमेरिकेची बाजू घेऊन
इराणशीही घेतला पंगा
अमेरिकेने हात झटकता
झाल्या आमच्या वरती ढेंगा
उठल्या सुटल्या तोंड दाबूनी
कुणीही देतो बुक्क्यांचा मार
आधीच अंदाधुंदी देशात
बॉम्बवर्षावात होऊ ठार
सोनम वांगचुक
लडाखी जनतेचा मी नेता
न्याय्य हक्कासाठी लढलो
मोदी-शहांच्या लहरीखातर
तुरुंगात मी खितपत पडलो

जो जो त्यांना पुरता नडतो
त्यांना टाकती तुरुंगात हे
कारण नसता आरोप खोटे
सूड घ्यावया करती पहा हे
एकशे सत्तर दिवसानंतर
मला ठरवती जर हे निर्दोष
हुकूमशहांची हीच प्रवृत्ती
कशास देऊ त्यांना मी दोष?

