• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आंब्राई

श्रीकांत आंब्रे

marmik by marmik
March 4, 2026
in आंब्राई
0
आंब्राई

राहुल गांधी
माझे तोंड बंद कराया
लावती बघा सगळी शक्ती
आपली पापे झाकण्यासाठी
नेहमीच शोधती नवी युक्ती

हिंमत असेल तर या समोर
द्या प्रश्नांना मुँहतोड जबाब
पळपुटेपणा किती करणार
नाही टिकणार मुळीच रुबाब

लोकशाही स्वातंत्र्याच्या
मोठ्या मोठ्या मारती गप्पा
एक अकेला भारी पडतो
चुकवताना माझा लाफा

नरेंद्र मोदी
एपस्टिन फाइल, पेंग्विन बुमरँग
चारी बाजूंनी होतो हल्ला
तोंड देता देता होतो
सगळाच ऐवज एकदम खुल्ला

विश्वगुरु मी जगात मला
नेहमीच मिळतो कितीतरी मान
पाहवत नाही विरोधकांना
खुपतो माझा हा सन्मान

राहुल गांधीसकट टाकीन
विरोधकांना एकदम आत
कधीच होऊ देणार नाही
असत्याचा मी मुळीच घात

मोहन भागवत
भुताहाती सापडल्यावर
जशी माझी गोची होते
मुक्ताफळे येता बाहेर
चक्रावती भाजपा नेते

माझे हृदय इतके विशाल
मुळीच भेदभाव करत नाही
मुलेच मुले होऊ द्या आता
करा हिंदुनो एकदम घाई

आम्ही वेगळे भाजपा वेगळा
संघ आमचा नेहमीच सावध
नेहमीच काळजी घेतो आम्ही
होणार नाही आमची पारध

टिपू सुलतान
माझा धिक्कार करणार्‍यांनीच
केला होता माझा सन्मान
आता उघडे पडल्यावरती
का गेली ती खाली मान?

 

मुस्लीमद्वेष नसानसात
नेहमीच यांच्या वाहत असतो
दंगली पेटवून पोळ्या भाजण्या
हात कसा शिवशिवत असतो

शिवरायांच्या पासंगाला
मुळीच मी तर पुरणार नाही
साप साप म्हणून भुई आपटून
यांची अब्रू उरणार नाही

शत्रुघ्न सिन्हा
जन्माला मी आल्यापासून
`खामोश’वरती माझीच मालकी
डायलॉग माझे ऐकून मोजा
संख्या त्यांची आहे बोलकी

धमेंद्राचे कमीने-कुत्ते
त्यालाच बघा शोभून दिसतात
बाकी हिरो असतील मोठे
तोंडी त्यांच्या नाही शोभतात

प्रेम चोप्रा, प्राण, अमरिश
ज्याची त्याची होती जबान
तीरासारखे शब्द घुसती
त्या शब्दातच होती जान

Previous Post

`पेंग्विन’चे फडणवीस आत्मचरित्र!

Next Post

भाजपच्या हिंदुत्वाचा खोटा मुखवटा!

Next Post
भाजपच्या हिंदुत्वाचा खोटा मुखवटा!

भाजपच्या हिंदुत्वाचा खोटा मुखवटा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.