• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आंब्राई

श्रीकांत आंब्रे

marmik by marmik
February 20, 2026
in आंब्राई
0
आंब्राई

 

छगन भुजबळ
टण् टणा टण् उड्या मारत
बरा होऊन आलो मी
पक्ष आपला सावरण्याचे
अमृत नोनी प्यालो मी

आम्ही चौघे पुरे आहोत
आधार देण्या पक्षाला
कळेल तुम्हा आमची ताकद
नाही जाणार मोक्षाला

तशी वेळही आली जर तर
भाजपमध्ये जाईन विरुन
तीन घरोबे झाले बदलून
चौथ्याची चव घेऊ फिरुन

 

धनंजय मुंडे
वाल्या माझा आत गेल्यावर
माझा भक्कम त्राता गेला
दादा सोडून गेल्यावरती
सावरणारा नेता गेला

दादा नसता घड्याळाचे त्या
आम्हीच आहोत तारणहार
नावे तरी ना घेऊ किती मी
एकेक आहोत तालेवार

हीच असे ना वेळच बक्कळ
उखळ पांढरे करण्याची
अंगावरची कलंकशोभा
हलके हलके पुसण्याची

अजितदादा पवार
मी गेल्यावर काय घडे हे
का होती हे नेते अ‍ॅक्टिव्ह
खड्यासारखे वेचून ज्यांना
फेकून केले मी तर पॅसिव्ह

जो तो धावे स्वार्थ साधण्या
पक्षाची तर नसेच पर्वा
सरकारमध्ये जाऊच म्हणती
रोज चाटण्या भाजप मेवा

निंदा झेलून केले जरी मी
तिजोरीचे सरकारी रक्षण
पोट फुटेतो रगडा आता
करा करा रे सारे भक्षण

 

 

शरद पवार
एका दगडात अनेक पक्षी
मारण्याचा हा छंद जुना
पुन्हा एकदा तेच करुनीया
उडणार्‍यांना लावू चुना

असली नसली सत्ता तरीही
त्यांच्यापाठी असतो मी
काही दुवे तर समान असती
तरी कुठेही नसतो मी

नाही कुणीही शत्रू माझा
राजकारणही नाही धंदा
पटो ना पटो भूमिका माझी
ना चिंता कुणी वंदा-निंदा

देवेंद्र फडणवीस
मनात असते वेगळे तरीही
चेहर्‍यावर ते दिसत नाही
कळती सगळी सोंगे-ढोंगे
सावध असतो फसत नाही

अडचणीत ते येतील नक्की
पुरते आहे ठाऊक मजला
तरीही त्यांना चुचकारुनही
मैत्रीच्या मी गातो गजला

भाजपा मोठा करण्यासाठी
जे जे वाटेल ते ते करतो
पाहून घ्या तुम्ही उपरे चेहरे
खोगीर भरती कशी जिरवतो

Previous Post

दादांचा खरा वारसदार कोण?

Next Post

अब अच्छे दिन नही आनेवाले…!

Next Post
अब अच्छे दिन नही आनेवाले…!

अब अच्छे दिन नही आनेवाले...!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.