एकनाथ शिंदे
भाजपाने आमचे पळवले
त्यांचेसुद्धा आम्ही पळवले
फिट्टम्फाट झाली आता
युतीसाठी हात मिळवले
ते मोठे की आम्ही मोठे
निकालात कळेल आता
सीएमसाहेब तर वाटच पाहतायत
कधी घालू यांना लाथा
आमच्यापेक्षा त्यांची सेटिंग
खरोखरच आहे मोठी
तरीही मला आशा वाटते
वाजतील आमची नाणी खोटी
देवेंद्र फडणवीस
संविधानाचे गाणे गात
पायी तुडवू लोकशाही
विरोधकांचा गळा दाबून
शिरजोर करू हुकूमशाही
सत्ताप्राप्ती हेच लक्ष्य
विरोधक हे आमचे भक्ष्य
संपवल्यावर त्यांना कायम
भाजपाला मिळेल मोक्ष
विकासाच्या नावाखाली
स्वातंत्र्याचा कोंडू श्वास
खोट्याचेही खरे करून
लोकशाहीला लावू फास
शिंदे-भाजपा गट
रद्द होणार निवडणुका
जर का आधी माहीत असते
मतदारांच्या खुशीसाठी
आम्ही पैसे वाटले नसते
कशावरून वीस तारखेला
देतील का ते आम्हा व्होट
एकोणीसला पुन्हा वाटू
नोटा अगदी सरळसोट

पैसेवाटपात तडजोड नाही
संधी फक्त एकदाच येते
पुन्हा पुढे ढकलू नका
आमची बघा गोची होते
निवडणूक आयोग
तेव्हा आमचा वापर करून
लोकशाहीचे बांधलेत थडगे
कायदे बसवून धाब्यावरती
आम्हालाही केलेत कोडगे

आता आमच्या तालावरती
तुम्हालाही नाचवतो मी
काही इलेक्शन स्थगित करून
माज तुमचा उतरवतो मी
वरपासून खालपर्यंत
सारा पैशाचा हा बाजार
मतखरेदी पैसे वाटून
मतदारांना करती लाचार
धनंजय मुुंडे
वाल्या कराड, प्रिय मित्रा
सतत तुझी आठवण येते
कोण म्हणतो क्रूरकर्मा
आठवणींनी रडे येते

आज तू हवा होतास
निवडणुकीच्या माहोलात
हत्येच्या त्या आरोपातून
खितपत पडलास तुरुंगात
सरपंचाच्या मुलीपेक्षा
तुझीच काळजी आहे मला
मी जर असतो मंत्रीपदावर
काढला असता बाहेर तुला
