• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

marmik by marmik
February 2, 2026
in बाळासाहेबांचे फटकारे
0
फटकारे बाळासाहेबांचे

हे व्यंगचित्र आहे मार्मिकच्या स्थापनेनंतरच्या दुसर्‍याच वर्षातलं. २७ मे १९६२ रोजी बाळासाहेबांनी रेखाटलेलं हे मुखपृष्ठ चित्र पाहिलं तर त्यांनी फ्री  प्रेस जर्नलसाठी काढलेल्या व्यंगचित्रांची आठवण होते. एकतर मार्मिक सुरू झाल्यानंतरचा हा सुरुवातीचाच पल्ला होता. त्यामुळे शैलीसातत्य राहिले असावे. शिवाय, तिथे इंग्लिश वाचणार्‍यांसाठी व्यंगचित्र काढताना बाळासाहेबांची शैली आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकारांच्या धाटणीची वाटत असे. त्या व्यंगचित्रांमध्ये अनेकदा आंतरराष्ट्रीय विषयही असत, व्यक्तिरेखाही असत, त्याचा हा परिणाम असावा! इथेही अमेरिका आणि ब्रिटन यांचं ‘व्यक्तिचित्रण’ आहे. पंडित नेहरू कपाळाला हात लावून बसलेले आहेत. इथे सगळ्यात चक्रावणारा आहे तो व्यंगचित्राचा विषय. टॅरिफ पे टॅरिफ हा अमेरिकेच्या हट्टाचा विषय आत्ताचाच नाही, ६५ वर्षांपूर्वीही आर्थिक निर्बंधांचं हत्यार तेव्हाचे अमेरिकन राज्यकर्तेही उपसत असत. भारताने अमेरिका आणि रशिया या महासत्तांमधल्या साठमारीत अलिप्ततावादाचं धोरण स्वीकारलं, पण सोविएत रशियाशी भारताची अधिक मैत्री होती. रशियाकडून भारताने विमानखरेदी केल्यानंतर भारताला अमेरिकेकडून होणार्‍या मदतीत २५ टक्के कपात केली गेली होती. मात्र, नेहरूंनी आणि त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी या पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर न झुकता रशियामैत्रीत खंड पाडला नाही. इंदिरा गांधींनी तर बांगला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नाक खुपसू पाहणार्‍या अमेरिकेला तोडीस तोड उत्तर दिलं. या सर्व नेत्यांनी अमेरिकेच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असलेला देश नंतर स्वावलंबी केला आणि अमेरिकेला निर्यात करण्याच्या स्तरावर आणून ठेवला. आता अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून नसलेल्या आपल्या देशाच्या निर्यातीवर ट्रम्प तात्या टॅरिफ पे टॅरिफ लावतात आणि कोणत्या दगडाखाली कोण जाणे, हात अडकलेले पंतप्रधान चकार शब्द उच्चारण्याची हिंमत दाखवत नाहीत! डॉलरसमोर रुपयाची घसरण म्हणजे देशाच्या प्रतिष्ठेची घसरण असे महान विद्वत्ताप्रचुर उद्गार काढणारे पंतप्रधानच रुपयाच्या नीचांकी घसरणीचे शिल्पकार असावेत, हा तर काव्यगत न्यायच म्हणायला हवा!

Previous Post

प्रेमशून्य नात्याचा कटू शेवट!

Next Post

इराक विरुद्ध इराण!

Next Post
इराक विरुद्ध इराण!

इराक विरुद्ध इराण!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.