अभिनेत्री मोनिका चौहान सध्या दंगल टीव्ही या वाहिनीवरील ‘रंजू की बेटियां’ या मालिकेत दिसतेय? त्यात रंजू (रीना कपूर) आणि गुड्डू मिश्रा (अयूब खान) यांची सर्वात मोठी मुलगी शालू मिश्रा ही भूमिका मोनिका करतेय. नुकताच तिने एका कन्स्टक्शन साईटवर काम केल्यानंतरचा आपला अनुभव शेयर केला. पडद्यावर काम करणं आणि वास्तवात काम करणं यात किती फरक असतो याची कल्पना आपल्याला कामगार म्हणून काम करताना आला असे ती स्पष्ट करते. ती म्हणते, हा आऊटडोअर शूटिंगमधला एक सीन होता. यात मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला इमारतीच्या बांधकामाची कामगार म्हणून दाखवायचे होते. हा सीन एका खऱ्या कन्स्ट्रक्शन साइटवर फिल्मावण्यात आला. एक पूर्ण दिवस मला त्याच रूपात राहावे लागले आणि डोक्यावर विटा वाहून न्याव्या लागल्या. तेव्हा मी खरोखरच कन्स्ट्रक्शन कामगार झाले असंच मला वाटलं. मी एक वृद्ध महिला पाहिली. शक्य नसतानाही नाईलाजाने तिला शारीरीक काम करावे लागत होते. ते पाहून मला खूपच वाईट वाटले, असेही ती सांगते.