राज्यात होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस आता ‘ऑपेरेशन मृत्युंजय’ पक्रम राबवणार आहेत. नव्या वर्षात या उपक्रमाला सुरुवात होईल. या उपक्रमात राज्यात सर्वधिक अपघात होणाऱया पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, नगर जिल्ह्यावर लक्ष दिले जाणार आहे.
दर वर्षी राज्यात रस्ते अपघातात मृत पावणाऱयांची संख्या वाढतच चालली आहे. महामार्गाची भौगोलिक आणि रस्त्याची रचना ही अपघातांना कारणीभूत ठरते. शहराप्रमाणे आता ग्रामीण भागात वाढते अपघातही धोक्याची घंटा आहे.
वाढत्या गंभीर अपघाताची दखल घेऊन महामार्ग पोलिसांनी राज्यात ऑपेरेशन मृत्युंजय राबवण्याचे ठरवले आहे. महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार ओव्हरटेकिंग, लेन कटिंग, सुसाट वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना हेल्मेट, प्रवासी वाहनातून वाहतूक करणे ही अपघाताची महत्त्वाची कारणे आहेत. ‘ऑपरेशन मृत्युंजय’मध्ये महामार्ग पोलीस वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया चालकावर कडक कारवाई करणार आहेत. कारवाईसोबत महामार्ग पोलीस प्रबोधनदेखील करणार आहेत.
विशेष म्हणजे, अपघाताला ब्लॅक स्पॉटदेखील काहीसे कारणीभूत ठरतात. राज्यात सध्या एक हजार ब्लॅक स्पॉट आहेत. ते ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसीची चर्चा करून तेथे उपाययोजना करण्यात येत आहेत.
प्रत्येक गावात आता मृत्युंजय दूत
अपघातानंतर जखमी झालेल्याना गोल्डन अवर्समध्ये उपचार मिळणे आवश्यक असते. तर अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून कसे नेले जावे याची फारशी सर्वाना माहिती नसते. त्यामुळे महामार्ग पोलीस हे गावागावातील तरुणांची मदत घेणार आहेत. त्यांना मृत्युंजय दूत संबोधले जाणार आहे. मृत्युंजय दूतांना सीपीआरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. साधारण राज्यात एक हजार मृत्युंजय दूतांचे गट तयार केले जाणार आहेत. या उपक्रमात स्थानिक डॉक्टरांचीदेखील मदत घेतली जाणार आहे.
राज्यात नवीन वर्षात ऑपरेशन मृत्युंजय हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे 10 टक्के गंभीर अपघात कमी होतील. चालकांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे. वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
डॉ. भूषणपुमार उपाध्याय, अप्पर पोलीस महासंचालक, महामार्ग पोलीस तीन जिह्यांवर अधिक भर
राज्यात पुणे ग्रामीण,नाशिक ग्रामीण आणि नगर या जिल्ह्यात गंभीर अपघाताचे प्रकार वाढले आहेत. 2018 मध्ये नाशिकमध्ये 518 गंभीर अपघातात 557 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ऑपेरेशन मृत्युंजय अंतर्गत त्या जिल्ह्यावर अधिक भर दिला जाणार आहे. तेथे वारंवार अपघात का होतात त्याचा आढावा घेऊन तेथे उपाययोजना केल्या जाणार आहेत.
आकडेवारी
वर्ष एपूण अपघात गंभीर अपघात मृत्यू
2019 32,925 11,787 12,788
2020 22,340 9,286 9997
(नोव्हेंबर)
( संदर्भ : महामार्ग पोलीस )
सौजन्य- सामना