कोरोना महामारी जगभरात थैमान घालत आहे. आता युरोपसह अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अनेक लसींच्या चाचण्या सुरू असून त्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे कोरोनावरील लस लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
मॉर्डनाने आपली लस 94.5 टक्के यशस्वी ठरल्याचा दावा नुकताच केला आहे. मात्र, आमची लस माणसांना आजारी पडण्यापासून वाचवू शकते, मात्र, कोरोनाची महामारी आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यात लस किती यशस्वी होईल, याबाबत मॉर्डनाच्या मुख्य वैज्ञानिकांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे संशोधकांची चिंता वाढली आहे.
कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्ती कोरोनाच्या संक्रमणापासून वाचू शकतात. मात्र, संक्रमित व्यक्तीकडून इतरांना फैलाव होणार नाही, याची खात्री नसल्याचे मॉर्डनाचे मुख्य वैज्ञानिक तल जक्स यांनी सांगितले. चाचणीदरम्यान इतरांना संक्रमण रोखण्यात लस यशस्वी आहे किंवा नाही याचे परीक्षण करण्यात आले नसल्याचे जक्स यांनी सांगितले.डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे.
या लस चाचणीत 94.5 टक्के यशस्वी ठरली आहे. मात्र, या लसीमुळे महामारी रोखण्यात यश येईल आणि कोरोनाच्या फैलावाला अटकाव होईल, अशा भ्रमात जनतेने राहू नये, असेही जक्स यांनी स्पष्ट केले आहे. मॉर्डना किंवा फायझर लसीच्या चाचणीदरम्यान लस संक्रमण रोखण्यात कितपत यशस्वी होईल, याची चाचणी करण्यात आलेली नाही. फक्त लस घेतलेल्या व्यक्तीचा संक्रमणापासून बचाव होऊ शकतो, असेही जक्स म्हणाले.
ऑक्सफर्डची एक्ट्राजेनका लसीच्या सुरुवातीच्या टप्प्यात लस कोरोनाचा फैलाव रोखण्यात यशस्वी ठरण्याबाबतची चाचणी करण्यात आली होती. मात्र, या लसीची चाचणी पूर्ण झाली नसून सुरुवातीच्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे लस घेणारी व्यक्ती संक्रमणापासून बचाव करू शकते. मात्र, कोरोनाची महामारी आणि कोरोनाचा वाढता फैलाव कसा रोखायचा, अशी चिंता वैज्ञानिकांना आहे.
आमची लस तुम्हाला आजारी पडण्यापासून आणि संक्रमणापासून वाचवू शकते, हे सिद्ध झाले आहे. मात्र, एखाद्या संक्रमित व्यक्तीपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यात लस यशस्वी ठरेल किंवा नाही, याबाबतची चाचणी करण्यात आली नाही. त्यामुळे ही लस संक्रमण रोखण्यात कितपत यशस्वी ठरेल,याबाबत ठाम दावा करता येत नसल्याचे जक्स यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या इतर लसीप्रमाणे मॉर्डनाची लसही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही लस संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील कोरोना व्हायरसचा खात्मा करत नसून व्हायरसला शरीरातील रिसेप्टरशी जोडण्यापासून बचाव करते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने लस घेतल्यास त्याला संक्रमण होण्याचा धोका टाळता येतो. मात्र, संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील व्हायरसचा खात्मा होत नसल्याने कोरोनाच्या फैलावाची शक्यता कायम राहते, असे जक्स यांनी म्हटले आहे. त्यामुळे लस घेतलेल्या व्यक्ती संक्रमणापासून स्वतःचा बचाव करू शकतात. मात्र, या लसीमुळे महामारी रोखण्यात यश येईल, असा दावा करता येत नसल्याचे जक्स यांनी सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना