# मार्मिक > व्यंगचित्र साप्ताहिक ## Posts - [नाय नो नेव्हर](https://emarmik.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a5%8b-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b0-2/):   संविधानदिनी सर्व देशाभिमानी एकत्र येऊन संविधानाप्रति आदर व्यक्त करतात, कार्यक्रम राबवितात. मात्र अर्ध्या विजारीतून पूर्ण विजारीत आलेली मंडळी यात कुठेच दिसत नसतात. याचे कारण काय असावे बरे? – संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव, पुणे याला नेहरूच कारण असतील, कारण विजार अर्धी घाला, पूर्ण घाला किंवा घालू नका.. धडावरचं डोकं जर तेच असेल आणि त्या डोक्यातले विचार ‘तेच’ असतील आणि नेहरू ते विचार बदलू शकले नसतील, तर कोण जबाबदार असणार? वाटल्यास विचारा तुम्ही म्हणताय त्या विजारवाल्यांना! मी मटका अ़ड्ड्यावर धाड टाकण्याचा देमार स्टंट करून दाखवू शकतो, अल्पसंख्याकांबद्दल विखारी बोलण्यामध्ये तर माझी जीभ कोणीच धरणार नाही. माझ्या हातावर ‘मेरा बाप कोंबडी चोर […] - [राशीभविष्य](https://emarmik.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-2/): ग्रहस्थिती : हर्षल : वृषभ राशीत, गुरु -मिथुन राशीत, केतू -सिंह राशीत, बुध -वृश्चिक राशीत, रवि – मंगळ -शुक्र – धनु राशीत, राहू -कुंभ राशीत, शनि, नेपच्युन – मीन राशीत, प्लूटो -मकर राशीमध्ये. दिनविशेष : ३, जानेवारी, रोजी शाकंभरी पौर्णिमा, ६, जानेवारी रोजी अंगारक चतुर्थी, चंद्रोदय, रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी.   मेष : नोकरी, व्यवसायात शांत राहा. कटकट टाळा. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. व्यवसायात भ्रमनिरास होईल. तरुणांचा कल चैनीकडे राहील. आर्थिक नियोजन करा. मालमत्तेच्या संदर्भातील प्रश्न लांबणीवर पडल्याने अस्वस्थता वाढेल. सरकारी कामांत त्रास होईल. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. मोठ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नोकरीत त्रासदायक वाटले तरी बदल स्वीकारा. कामे […] - [भाजपाची दिवा स्वप्ने उधळणारच!](https://emarmik.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%a7%e0%a4%b3/): अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद, ग्रामपंचायत आणि कसल्या कसल्या निवडणुकीत भाजपाला कधी नव्हे ते मिळालेल्या पलंगतोड यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा आदेश मी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला दिला आणि त्याने तो कसलीही खळखळ न करता पाळला. तीच ही मुलाखत – -अभिनंदन फडणवीस साहेब. -नमो नमः आभारी आहे. एवढं दणदणीत घवघवीत यश भाजपाला कसं काय मिळालं हाच तुमचा प्रश्न असेल ना! तर ते मिळणारच होतं. या शिंदेंनी काड्या घातल्या नसत्या ना कोकणात आणि इतर ठिकाणी तर गिनीज बुकात नोंद झाली असती आमच्या विक्रमाची. आमच्याच जिवावर मोठे झाले आणि आमच्या जिवावर उठले स्वार्थासाठी. त्यांचा हवा भरलेला फुगा […] - [बरे केले देवा... नावडते काम दिले...](https://emarmik.com/%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%a6/): इतर कोणत्याही ठिकाणी नोकरी करताना जे होतं, ते पोलीस खात्यातही होतंच… बर्‍याचदा आपल्याला अजिबात न आवडणार्‍या ठिकाणी कामासाठी जावं लागतं… अशा ठिकाणी जावे लागणार आहे, हे ऐकल्यावर आपला हिरमोड तर झालेला असतोच, पण आपल्या मनात एक दूषित पूर्वग्रह असतो, त्यामुळे अशा ठिकाणी काम करताना मन रमत नाही, ते काम खूप कंटाळवाणे वाटते. काम पूर्ण करताना वेळ जाता जात नाही. रोज नाना प्रकारचे पन्नास प्रश्न आ वासून उभे राहिलेले असतात. पण शेवटी प्राप्त परिस्थितीत, प्राप्त साधनांनीच आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो… खरे तर आनंद तिथेच असतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. संत श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेत ‘बरे झाले…’ या शीर्षकाचे अनेक […] - [शिवराज्याभिषेकाची रोमांचक थरारक नेत्रदीपक `स्टोरी'!](https://emarmik.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82/): ‘द किरण माने शो- स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या म्युझिकल नाटकाचा ‘शिवारंभा’चा प्रयोग पाहायला कोल्हापूरच्या दिशेने निघालो, तेव्हा रवींद्र पोखरकरांना म्हणालो, नाटकांच्या, रंगमंचीय आविष्कारांच्या पहिल्या दुसर्‍या शोमध्ये बारीक बारीक गडबडी होत असतात. त्यामुळे सहसा प्रयोग दहा पंधरा प्रयोगांमध्ये सेट झाल्यानंतरच त्याला बोलावतात नाट्यकर्मी मंडळी. किरणने पहिल्याच शोला बोलावलं आहे… कसं होईल? पण, प्रयोग पाहिल्यानंतर हे शब्द गिळावे लागले… कड्डक वाजला प्रयोग. हा पहिला प्रयोग आहे असं वाटूच नये, इतका तो परफेक्ट झाला, रंगलाही तुफान. दुसरी एक विलक्षण गोष्ट पाहायला मिळाली. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासह अनेक नामवंत पाहुणे या शोला अनेक शहरांमधून आले होते. शुभारंभ असल्याने बाहेरचं आवारही सजवलेलं होतं… असा सरंजाम […] - [कीर्ती पावभाजी](https://emarmik.com/%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80/): ‘पावभाजी हा फेमस खाद्यपदार्थ मूळ मुंबईचा… देशात, राज्यात इतरत्र अनेक ठिकाणी पावभाजी ‘बॉम्बे पावभाजी’ याच नावानेच दिली जाते. पावभाजीचा एक बेसिक फॉर्म्युला कॉमन असला तरी व्यक्ती तितक्या प्रकृती तशी प्रत्येक ठिकाणची पावभाजी वेगवेगळ्या चवीची असते. अगदी मुंबईत देखील लोकप्रिय पावभाजी स्पॉट्सवर समान चवीची पावभाजी मिळत नाही. प्रत्येक ठिकाणच्या पावभाजीची खासियत वेगळी असते. पुण्यात ५३ वर्षांपासून अशी खास चवीची पावभाजी लोकप्रियतेत अव्वल जागी टिकून आहे. फर्ग्युसन रोडवरील प्रसिद्ध वैशाली हॉटेलसमोरची कीर्ती पावभाजी हे खवय्यांच्या आवडीचं ठिकाण आहे. प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील, हिंदी सिनेसृष्टीमधील खलनायक दिवंगत सदाशिव अमरापूरकर, कुलदीप पवार हे या पावभाजीचे चाहते होते. पुण्याच्या फेरीत इथली पावभाजी ते खायचेच […] - [बांगला देशाचा स्वातंत्र्यलढा](https://emarmik.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d/): २६ मार्च १९७१ ते १६ डिसेंबर १९७१. बांगलादेशाचे सुमारे ३५ हजार सैनिक आणि २० ते २५ लाख नागरिक मेले. भारत आणि बांगला देश यांचे मिळून ४ लाख २५ हजार आणि पाकिस्तानचे ३ लाख ७० हजार सैनिक लढले. युद्ध बांगला देशात, काहीसं पाकिस्तानात आणि काहीसं भारतात झालं. भारताचे १५०० सैनिक मेले, ४ हजार सैनिक जखमी झाले. पाकिस्तानचे ८ हजार सैनिक मेले आणि सुमारे ९० हजार जखमी झाले. युद्धाच्या शेवटी पाकिस्तानचे ९५ हजार सैनिक भारताला शरण गेले. *** युद्ध आणि बांगला देशाची निर्मिती. थोडं मागं जायला हवं. १९४७ला देशाची फाळणी झाली. फाळणीचा मुख्य मुद्दा धर्म हा होता. इस्लामच्या आधारावर पाकिस्तान झाला, भारतानं […] - [भारतीय क्रीडापटूंचा नववर्ष संकल्प!](https://emarmik.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b5%e0%a4%b0/): २०२५मध्ये भारतीय क्रीडापटूंनी छाप पाडली. आता लक्ष्य आहे, २०२६चे. या वर्षात जग ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉलमध्ये मश्गुल होईल. पण भारतासाठी ती केवळ पाहण्याची अनुभूती असेल. भारतीय क्रीडाक्षेत्राची खरी अग्निपरीक्षा क्रिकेटमध्ये असेल. याशिवाय बुद्धिबळ, हॉकी, कबड्डी, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचे आव्हान भारतापुढे असेल. भारताच्या क्रीडापटूंनी नव्या वर्षाचे कोणते नवे संकल्प केले असतील, याचा हा आढावा.   रो-को : विश्वचषकापर्यंत शानदार खेळू! रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने २०२४चा ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर ट्वेंटी-२० क्रिकेट प्रकारातून निवृत्ती पत्करली. पण २०२४च्या उत्तरार्धात न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात मानहानिकारक पराभव पत्करल्यानंतर २०२५मध्ये ऑस्ट्रेलियाकडून ३-१ अशी हार पत्करली. परिणामी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि प्रशिक्षक गंभीर यांनी […] - [पण आपण कट्टर!](https://emarmik.com/%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%95%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0/): अध्वर्यू अर्थात अर्ध्या आज समोरल्या नम्याबरोबर जायचं म्हणून टापटीप तयार होतोय. केसाचा कोंबडा, शर्टाची इन, चेहर्‍याला पावडर, कडक इस्त्रीची पॅन्ट. असं साग्रसंगीत तयार होऊन अर्ध्या बाहेर पडतो. आज शेजारची वहिनी भांडे घासतेय. ‘हं! निघाले गाव कोळपायला! काही घरादारात कामंधामं पाहावा ते नाही!’ वहिनी मुद्दाम चिडवू पाहते. ‘माह्या भावानं लग्न होईपर्यंत हेच केलं होतं! मी तो आदर्श मोडू कसा?’ अर्ध्या खोचकपणे उत्तर देतो. ‘तुमचा भाऊ बहकेल नव्हता तुमच्यावानी, आवरा!’ वहिनी सावरायचा प्रयत्न करते. ‘आता तो बहकेल होता, का सटकेल होता, हे तुम्हाला सांगत बसलो तर भांडे घासायचं सोडून तुम्ही तोंड झोडायला घ्याल. वर आमचीच इज्जत चव्हाट्यावर येईल. तव्हा बरीय झाकली मूठ […] - [फटकारे बाळासाहेबांचे](https://emarmik.com/%e0%a4%ab%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-2/): राष्ट्रीय बाणा ही तशी काही वाईट गोष्ट नाही. पण, संघराज्यात केंद्रातल्या सरकारकडून एखाद्या राज्याची जाणीवपूर्वक लूट आणि गळचेपी होत असेल, प्रादेशिक अस्मितेला नख लावलं जात असेल, तर अशावेळी राष्ट्रीय बाण्याच्या नावाखाली संघर्ष करण्यापासून पळ काढणं हे आत्मघातकी ठरू शकतं. सध्या तर महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण भारताला लुटून उत्तर भारतातल्या कायमस्वरूपी बिमारू असलेल्या राज्यांच्या घशात भरभरून निधी ओतणं सुरू आहे. हिंदी भाषा रेटून महाराष्ट्राची मराठी ओळख पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईवर तर आजवरच्या सर्वच सत्ताधीशांचं फारच ‘प्रेम.’ ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी सांभाळायची महाराष्ट्राने आणि तिची अंडी केंद्र सरकार पळवणार असा कारभार बिनबोभाट सुरू आहे एमएमआरडीएच्या नावाखाली. एकेकाळी मुंबई […] - [ग्यानबाला गुलाम बनवणारे डिमांड सप्लायचे अर्थशास्त्र!](https://emarmik.com/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87/): शाळा कॉलेजात शिकवल्या जाणार्‍या अर्थशास्त्राने ९९ टक्के लोकांना मूर्खांत काढून जगातल्या सगळ्या संपत्तीवर काही लोकांची मक्तेदारी कायम राहील याची काळजी घेतलेली आहे. उदाहरणार्थ आपलं सगळं अर्थशास्त्र, म्हणजे मुंबई, न्यू-यॉर्क, लंडनमधल्या काचेच्या इमारतीत बसून धोरणे आखणारे आणि बिजनेस प्लॅन ठरवणारे अर्थशास्त्री यांच्यापासून पासून, नुकताच एमबीए, इंजीनियरिंग करून बाहेर नोकरी नसल्याने काय करावे या विवंचनेत असणारा बेरोजगार तरुण, ते गावच्या चावडीवर तीनशे रुपयांची जीन्स घालून बीए वगैरे करून नोकरी नाही म्हणून शेतीला लागलेला शेतकरी. ह्या सगळ्या लोकांच्या डोक्यात एकच गोष्ट असते. कोणत्या गोष्टीला डिमांड जास्त आहे, म्हणजे ती गोष्ट करून मला श्रीमंत होता येईल, श्रीमंतांना अजून श्रीमंत होता येईल. पण ती डिमांड […] - [युतीचे राज्यकर्तेच घालतायत महाराष्ट्राच्या मुळावर घाव](https://emarmik.com/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a-%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be/): मराठी शाळा वाचवण्यासाठी दि. १८ डिसेंबर रोजी मराठी अभ्यास केंद्रातर्पेâ डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्त्वात सकाळी साडेदहा वाजता हुतात्मा स्मारक ते महानगरपालिका मुख्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आयुष्यात आत्तापर्यंत कधीच कुठल्या मोर्चात किंवा आंदोलनात भाग घेतला नसल्याने एक कुतूहल म्हणून या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलो. एक वेगळा अनुभव पण गाठीशी जमा होईल असे वाटले. मी स्वतः बिगर ते चौथी मराठी पाचवी ते सातवी इंग्रजी व पुन्हा आठवी ते अकरावी मराठी माध्यम असा हायब्रीड शालेय प्रवास केला आहे. १९६६पासून पूर्णपणे मुंबईकर असल्याने कॉस्मोपॉलिटन वातावरणातच नाही तर एकेकाळी गुंडांचा आगर असलेल्या सायन कोळीवाड्यामध्ये बरीच वर्ष काढली आहेत. हुतात्मा स्मारकाजवळ पोहोचलो […] - [`निष्ठावंत पॅटर्न' भाजपला जड जातोय!](https://emarmik.com/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a4%be/): निकालाआधीच महापालिका निवडणुकीचा निकाल लावण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला उमेदवारी भरण्याआधीच आतून मोठे धक्के बसू लागलेत. विरोधी पक्षांकडे उमेदवारच राहणार नाहीत, अशी भाजपची रणनीती आहे. मात्र, भाजप मंत्र्यांच्या याच रणनीतीला पक्षाच्या आतूनच जोरकस विरोध होतोय. यानिमित्ताने फडणवीसांचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन असोत की सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे या दोघांच्याही कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पण मुद्दा केवळ प्रश्नचिन्हाचा नाही, तर भाजपच्या जय-पराजयाचा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू पाहणारी घडामोड भाजपच्या निष्ठावंतांमध्ये सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी भरायचा शेवटचा दिवस जसा जवळ येतोय, तसं भाजपच्या पक्षफोड मोहिमेला वेग आलाय. नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांना अंधारात ठेवून मंत्री गिरीश महाजन यांनी […] - [आंब्राई](https://emarmik.com/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%88-2/): मुख्यमंत्री फडणवीस तीन हाती सत्ता मिळता ओरबाडून ती आम्हीच खावू दोघांना त्या फूटवून लवकर आम्हीच मोठा ढेकर देऊ गरज होती म्हणून आम्ही इकडून तिकडून केले गोळा शिरजोर होण्याआधीच करू साफच त्यांचा चोळामोळा आत्ता फारच चढून गेले उतरवू त्यांना लवकर खाली ना राहतील ते घरके-घाटके कोणीच राहणार नाही वाली     एकनाथ शिंदे बघितलीत ना माझी ताकद भाजपाची कशी जिरवली बाजार बुणगे हाती धरून भाजप. हवा कशी फिरवली त्यांना सुद्धा माहित आहे लोच्या करण्यात आम्ही एक्सपर्ट कातडे पांघरून वाघाचेही डरकाळ्याही देतो चौपट तरीही मनात वाटते भीती आत्ता सीएम काढतील उट्टे बसा म्हणतील असेच लोंबकळत नाही देणार एवढ्यात रट्टे   अजित पवार […] - [विकासाच्या नावाखाली देश होणार भकास!](https://emarmik.com/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6/): भारत सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास’ या तथाकथित धोरणातून नेमके कोणाच्या साथीने कोणाचा विकास केला जात आहे, हा खूप महत्वाचा राजकीय मुद्दा आहेच; परंतु त्याचबरोबर या विकासाच्या नावाखाली पर्यावरण उद्ध्वस्त करण्याचा जो अविचारी घाट घातला आहे, तो त्याहून अधिक भयानक प्रकार आणि मोठा मुद्दा आहे. अरवली पर्वतरांगाच्या आणि त्यावरील वृक्षराजीच्या सरंक्षणासाठीच्या ऊग्र आंदोलनानंतर केंद्र सरकारने त्यासंदर्भातला हेका मागे घेतला आणि पुढील खोदकामाला मनाई केली. परंतु, या सरकारवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. दोन पावलं मागे आल्यासारखं दाखवायचं आणि योग्य वेळी रेटा लावून आपलंच खरं करायचं, हा त्यांचा खाक्या आहे. इथेही तेच झाले नाही, तरच आश्चर्य! अरवली पर्वतरांगा या […] - [टपल्या आणि टिचक्या](https://emarmik.com/%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): □ ऑपरेशन सिंदूरच्या काळात बंकरमध्ये लपण्याचा सल्ला दिला गेला होता : पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांची कबुली. ■ दुसर्‍यांच्या बोळ्याने दूध प्यायल्यावर हीच वेळ येते. कुठे बंकरमध्ये लपण्याचा सल्ला मिळतो, कुठे ताबडतोब युद्ध थांबवण्याचा थेट आदेश! □ दोन गुजराती मुंबई गिळायला निघाले आहेत, आता तुझं माझं करून निष्ठा विकू नका : उद्धव ठाकरे यांची शिवसैनिकांना साद. ■ अस्सल शिवसैनिक कधीही आईचं दूध विकणार नाही. किती आले, किती गेले तरी शिवसैनिकांची निष्ठा ढळणार नाही, बाणा झुकणार नाही. □ राडेबाज विकास गोगावलेंचा २५ दिवसांनंतरही शोध नाही. ■ शोध घेतला जातो आहे का, याचा खरंतर शोध घ्यायला हवा. पैसेवाले, सत्ताधारी आणि सत्ताधारी पैसेवाले यांच्या बाबतीत पोलिसांचे […] - [पर्वतमाला गिळण्यासाठी अदानीने आSS वासला...](https://emarmik.com/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a6/): हां मैंने कसम उठाई है मैं देश नहीं बिकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा।। नरेंद्र दामोदरदास मोदी हे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले होते. प्रचारसभांमध्ये त्यांच्या मुखातून येणार्‍या या कवितेच्या ओळीतून जणूकाही एकमेव तेच राष्ट्रभक्त आहेत असे भासवले गेले. पुढे ते पंतप्रधान झाले. कसे कोण जाणे, पण सलग तिसर्‍यांदा निवडणूकही जिंकले. परंतु या कवितेशी ते इमान राखू शकले नाहीत. काय विकू आणि काय नाही, असा रोगच जणू त्यांना जडला. देशातील जल, जमीन, जंगल यांच्यावर त्यांची नजर पडली. या कवितेत घेतलेली शपथ ही देश इतर कुणाला विकायचा नाही, फक्त […] - [गोव्यात सामाजिक क्रांतीचा एल्गार](https://emarmik.com/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a/): महिलांच्या गुलामगिरीच्या विरोधात प्रबोधनकार फारच आक्रमकपणे भांडत राहिलेले दिसतात. त्यांच्या आजी आणि आईने केलेले संस्कार त्याला कारण आहेत. त्यामुळे त्यांनी हुंडाविरोधाची अत्यंत आक्रमक आणि यशस्वी चळवळ चालवली. बालविवाह, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण असे मुद्दे ऐरणीवर आणले. गोव्यातल्या देवदासी प्रथेविरोधातला त्यांचा एल्गारही महत्त्वाचा आहे.   प्रबोधनकारांनी त्या काळात अख्खा महाराष्ट्र पालथा घातला होता. दक्षिणेला कारवार, बेळगाव, विजापूरपासून उत्तरेला देवास, नागपूर, जळगावपर्यंत ते सगळीकडे फिरले होते. पण ते सांगतात तसा त्यांचा हा प्रवास ठरवून नाही, तर अनाहूतपणे कुणाच्या तरी बोलावण्यावरून व्हायचा. मराठवाडा तेव्हा निजामाच्या हुकमतीत असल्यामुळे तिथे ब्रिटिश भारतातल्या इतरांप्रमाणे प्रबोधनकारांचं जाणं झालेलं दिसत नाही. तळकोकणातही ते फारसे गेलेले दिसत नाहीत, पण पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या […] - [सतरंजीउचल्यांचे बंड!](https://emarmik.com/%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%89%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a1/): भारतीय जनता पक्ष हा फार मजेशीर पक्ष आहे. आज या पक्षाला डोळे झाकून मतदान करणार्‍यांना अतिशय भाबडेपणाने असे वाटते की देशाच्या विकासासाठी, स्थिरतेसाठी, संरक्षणासाठी आणि हिंदूंच्या हितरक्षणासाठी आपण या पक्षाला मतदान करतो आहोत. यातल्या कशासाठी या पक्षाने गेल्या ११ वर्षांत नेमकं काय केलं, याचा तटस्थ ताळेबंद कोणी मांडला तर या मंडळींना लक्षात येईल की आपण फारच मूर्खात काढलो गेलो आहेत. या पक्षाने धार्मिक भावना चेतवून आपल्याला एका भ्रमजाळ्यात अडकवले होते आणि आपण स्वेच्छेने त्यात पुरते अडकलो होतो. अर्थात, हे मान्य केलं जाईल का, याबद्दल शंकाच आहे. बेंबीत बोट अडकलं की गार लागतं, असंच म्हणावं लागतं ना! नगरपालिका आणि पंचायतींमध्ये आपल्याच […] - [देव अस्तित्वात आहे का?](https://emarmik.com/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be/): प्रसिद्ध सिनेलेखक, कवी, गीतकार आणि बुद्धिवादी नास्तिक विचारवंत जावेद अख्तर आणि इस्लाम धर्माचे विद्वान संशोधक, लेखक मुफ्ती शमाईल नदवी यांच्यात लल्लनटॉप या यूट्यूब चॅनेलवर झालेली आस्तिकता आणि नास्तिकता विषयावरील चर्चा गाजली. असा विषय आजच्या काळात चर्चिला गेला, हेच मोठे यश. अर्थात, ही चर्चा ठीकठाकच म्हणावी लागेल. कारण अशा गहन, गुंतागुंतीच्या आणि हजारो वर्षांच्या वैचारिक परंपरेत रुजलेल्या विषयावर पुरेसा वेळ तिथे दिला गेला नाही. मुळात हा हजारो वर्षं चर्चिला जाणारा विषय एका छोट्याशा कार्यक्रमातून दोन माणसांच्या वादविवादातून अंतिम निर्णयाला पोहोचेल अशी आशाही व्यर्थच आहे. अत्यंत मर्यादित वेळेत असे प्रश्न ‘सोडवणे’ किंवा त्यावर सखोल चर्चा करणे प्रत्यक्षात अशक्यच असते. मात्र, आजच्या विषारी, […] - [जावेद, मुफ्ती आणि आस्तिक-नास्तिक वाद!](https://emarmik.com/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%a8/): एखाद्या नवशिक्या व्यक्तीने किती पाहुणे आलेत ते पुन्हा पुन्हा मोजून , दहा वेळा पाककलेची पुस्तके रिफर करून, शंभर वेळा सामग्री मोजून घेऊन, स्वयंपाक परफेक्टच झाला पाहिजे म्हणून आटापिटा करून तो लोकांना वाढल्यावर परत परत तो चांगलाच झालाय हे त्यांनाच बजावून सांगणं आणि एखाद्या अनुभवी व्यक्तीने मायेने, केवळ अंदाजाने साधासुधा पण चवदार स्वयंपाक करून प्रेमाने वाढल्यावर सगळ्या मंडळींनी मनापासून आणि चवीने जेवून स्वतःहून तृप्त होणं यात जो फरक आहे तसा फरक लल्लनटॉपच्या देव असणे आणि नसणे या वादविवादात होता. आस्तिकांचे प्रतिनिधी इस्लामी विद्वान मुफ्ती शमाईल नदवी साहेब कागद पेन घेऊन बसले होते, दहावी बारावीची मुले ज्या आक्रमक पद्धतीने शाळकरी शब्दांत वादविवाद […] - [बैंगण-बत्तीसी](https://emarmik.com/%e0%a4%ac%e0%a5%88%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3-%e0%a4%ac%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a5%80/): मनुष्यप्राण्याचे वर्गीकरण ‘वांगे अतिशय आवडणारे’ व ‘वांगे मुळीच न आवडणारे’ अशा दोन श्रेणींमध्ये केले तरी चालू शकेल. निदान मला भेटलेल्या अनेकांनी ‘वांगे आवडते का?’ ह्या प्रश्नावर नेहमीच अशा दोन विरुद्ध टोकाच्या आवडी सांगितलेल्या आहेत. बाकीच्या भाज्यांबद्दल मवाळ धोरण असलेले लोकही ‘वांगे’ म्हटले की एवढे कट्टर का होतात, हे काही समजत नाही. वांगी आवडणारे लोक वांग्याच्या अनेक रेसिपी आठवून अगदी ‘नॉस्तल्जिक’ होतात तर वांगी न आवडणारे ‘एकवेळ कारले चालेल पण वांगे नको’ असे निक्षून सांगत नाक मुरडतात. वांग्याचे स्वत:चे मात्र बर्‍याच भाज्यांसोबत गुण्या-गोविंदाने नांदण्याचे (की शिजण्याचे?) मोकळे-ढाकळे धोरण असावे! वांगी-बटाटा हा तर साताजन्माचा सोबती असल्यासारखा भाजीचा प्रकार झाला. ते दोघे जणू […] - [फटकारे बाळासाहेबांचे](https://emarmik.com/%e0%a4%ab%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87/): बाळासाहेबांनी रेखाटलेले हे मार्मिकचे मुखपृष्ठ आहे ७ जुलै १९७४च्या अंकावरचे. म्हणजे किमान ५१ वर्षांपूर्वीचे. त्यावेळी एक राक्षस जन्माला येतो आहे, याची चाहूल त्यांना लागली होती, आज त्या राक्षसाच्या माध्यमातून दिल्लीचा महाराक्षस मुंबईचा घास घ्यायला सज्ज झालेला असताना जागृत मराठी माणूस बाळासाहेबांच्या दूरदृष्टीला दाद देईल, पण मुंबई वाचवण्यात यशस्वी होईल का? हा मोठा प्रश्न आहे. त्यावेळच्या काँग्रेसच्या सरकारने महानगर प्राधिकरण योजना या साळसूद नावाने ही योजना महाराष्ट्रात आणली. आज तिचं नाव आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए. मुंबईसारख्या सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेल्या महानगरातल्या मराठी माणसांनी काँग्रेसची सत्ता घालवून महापालिका शिवसेनेच्या हाती सोपवली आणि दिल्लीश्वरांचा पोटशूळ जागा झाला. त्यांना […] - [भंडारा](https://emarmik.com/%e0%a4%ad%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be/): संध्याकाळची वेळ. अध्वर्यू चौकात गुरगुडे पुतळ्यामागच्या बाकड्यांजवळ येतो. कीर्तन सप्ताहातील भंडार्‍यात जेवणासाठी जाण्याचं नियोजन करण्यासाठी पोरांची वाट बघत बाकड्यावर बसतो. निदान ओळखीपैकी एखादं तरी इथून भंडार्‍याकडे जाईल ही त्याची अपेक्षा. एकटं जाणार कसं ना? कुणी बरोबर असलं तर बरं राहतं ना? इथं भल्या भल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था झालेली, तिथं हा पुतळा बरा सुस्थितीत आहे. कारण भैय्यासाहेब! हे भैय्यासाहेबांचे पिताश्री! त्यांचा हा पुतळा! भैय्यासाहेब गावच्या तरुणांचे स्वयंघोषित आधारस्तंभ काय ते! भैय्यासाहेब बर्‍याच प्रयत्नानंतर राखीव कोट्यातून गेल्या टर्मला गावचे सरपंच झाले. आता म्हणे त्यांना पंचायत समिती, झेडपी खुणावतेय. सरपंचपदाला भैय्यासाहेब शिंग मोडून वासरांत शिरले होते. पण आता लढाई जनरल कोट्यात होणार असल्यानं […] - [जंगल आम्ही मारलं... आणि फाशी बिबट्याला !](https://emarmik.com/%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80/): माणूस जेव्हा स्वतःला पृथ्वीचा मालक समजू लागला, तेव्हाच निसर्ग आणि मानव यांच्यात संघर्षाची बीजे रोवली गेली. जंगले तोडली गेली, नद्या वळवल्या गेल्या, डोंगर पोखरले गेले, समुद्र भरले गेले आणि तरीही माणसाला समाधान मिळाले नाही. विकासाच्या नावाखाली निसर्गाची अशी लूट झाली की आज जंगले संपत चालले आहे. दोष मात्र जंगलातील प्राण्यांवर ढकलला जातो. वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष हा एखाद्या अचानक घडलेल्या अपघाताचा परिणाम नाही; तो मानवनिर्मित संकटाचा थेट परिणाम आहे. वाढती लोकसंख्या, बेफिकीर शहरीकरण, जंगलांवरील अतिक्रमण आणि तथाकथित विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल या सगळ्यांचा स्फोटक परिणाम म्हणजे आजचा वन्यजीव–मानव संघर्ष. मुंबई ठाण्याची सीमा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. मात्र शहराचा […] - [साहित्य संमेलनाकडून काही अपेक्षा!](https://emarmik.com/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80/): सातारा येथे १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान ९९वे अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली असून ज्येष्ठ लेखिका-विचारवंत डॉ. मृदुला गर्ग या उद्घाटक आहेत. तर ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी हे समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. सातारा आणि दक्षिण महाराष्ट्रातील मराठी वाचकांना, भाषिकांना या साहित्य संमेलनात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. मराठी साहित्य संमेलन ही महाराष्ट्रातील एक महत्वाची सांस्कृतिक परंपरा आहे. १८७८ सालापासून चालत आलेली परंपरा आणि हा साहित्योत्सव आजही आंनदात साजरा केला जातो. साहित्य संमेलने भरविण्याची […] - [एपस्टीन फाइल्सचा भारतात हादरा बसणार की नाही?](https://emarmik.com/%e0%a4%8f%e0%a4%aa%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4/): एपस्टीन फाइल्स हा संपूर्ण भारतासह जगभरात गेल्या काही दिवसांपासून एक कीवर्ड बनलेला होता. १९ डिसेंबर या तारखेला अमेरिकेत काय होणार याकडे सार्‍या जगाचं लक्ष लागलेलं होतं. महाराष्ट्रात या तारखेचं गूढ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वक्तव्यानं वाढवलं होतं. १९ तारखेनंतर देशात मराठी माणूस पंतप्रधान बनेल असं एक वक्तव्य त्यांनी केलं होतं. आता अमेरिकेत काय घडतंय याचा भारताच्या राजकारणाशी काय संबंध? तर त्याचं उत्तर या एपस्टीन फाइल्समध्ये आहे. अमेरिकेतला हा अब्जाधीश फायनान्सर ज्याच्यावर हजारो अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा आरोप आहे, त्याच्याशी संबंधित सगळ्या फाइल्स जाहीर करण्याबाबत एक कायदा अमेरिकेत नुकताच मंजूर झाला होता. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर ते हे सगळं प्रकरण […] - [वासना विकृतीची गलिच्छ दलदल!](https://emarmik.com/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9b-%e0%a4%a6%e0%a4%b2/): आपल्या देशातील राजकीय वर्तुळात एपस्टीन फाइल्स हे शब्द मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. तसे तर याची चर्चा जगभरात आहे, खासकरून अमेरिकेत तर मागील कित्येक महिन्यांपासून आहे. आपल्याकडे काहींना वाटते की, या फाइल्सचे तपशील अमेरिकन संसदेत सार्वजनिक केल्यानंतर राजकीय घडामोडींना ऊत येईल. असे काही होईल की नाही हे काही दिवसांत कळेलच. तूर्त एपस्टीन फाइल्सची आणि या मागच्या विकृत वासनाकांडांची माहिती. एपस्टीन हा स्वतः सेक्स हाउंड होता, विकृत होता. त्याने केवळ बाललैंगिक शोषण केले अशातली बाब नव्हती, तर त्याने जगभरातील धनाढ्य धेंडांना लहान मुली पुरवल्या. त्या मुलींचे एकदा नव्हे तर अनेकदा शोषण केले. दोन दशकं तो हा उद्योग करत होता. त्याचे स्वतःच्या […] - [बोलले जे तेच केलंय, करून दाखवलंय!](https://emarmik.com/%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%be/): ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याचे अतिशय आकर्षक शीर्षक होते. १६ डिसेंबर २०२५ रोजी वरळीतील एनएससीआय डोम येथे हा मेळावा पार पडला. युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात मुख्य संबोधन केले. त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत सलग २५ वर्षे सत्तेत असताना केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. यात शुद्ध पाणीपुरवठा, नागरी सुविधा, कचर्‍यातून वीजनिर्मिती, डिजिटल शिक्षण, ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर सवलत, कोस्टल रोड, बेस्ट बस सेवा सुधारणा आदी कामांचा उल्लेख केला. आदित्य यांनी मुंबईकरांना आवाहन केले की, शिवसेनेने करून दाखवलेली कामे अभिमानाने सांगा आणि मुंबईला ‘अदानीस्तान’ होऊ […] - [कपटीपणाचा बुरखा फाडणारे तुकोबा!](https://emarmik.com/%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87/): कपट काही एक। नेणे भुलवावयाचे लोक ।।१ ।। तुमचे करितो कीर्तन। गातो उत्तम ते गुण ।।२ ।। दाऊ नेणे जडीबुटी। चमत्कार उठाउठी ।।३ ।। नाही शिष्यशाखा। सांगो आयाचित लोका ।।४ ।। नव्हे मठपती। नाही चाहुरांची वृत्ती ।।५ ।। नाही देवार्चन। असे मांडिले दुकान ।।६ ।। नाही वेताळ प्रसन्न। काही सांगो खाणखुण ।।७ ।। नव्हे पुराणिक। करणे सांगणे आणिक ।।८ ।। नाही जाळीत भणदी। उदो म्हणोनि आनंदी ।।९ ।। नेणे वाद घटा पटा। करिता पंडित करंटा ।।१० ।। नाही हलवीत माळा। भोवते मेळवूनि गबाळा ।।११ ।। आगमीचे कुडे नेणे । स्तंभन मोहन उच्चाटणे ।।१२ ।। नोहे त्यांच्या ऐसा। तुका निरयवासी पिसा […] - [चिकित्सा `दगलबाज शिवाजी’ची](https://emarmik.com/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80/): ‘दगलबाज शिवाजी’ हा लेख म्हणून आधी प्रबोधनमध्ये प्रसिद्ध झाला आणि नंतर स्वतंत्र पुस्तिकारूपाने. या दोन्ही वेळेस हा दीर्घ लेख वाचकांना पसंत पडला. विशेष म्हणजे ब्राह्मणी कंपूतल्या नेहमीच्या विरोधकांपैकीही अनेकांनी त्याचं कौतुक केलं. त्यात भालाकार भोपटकरांसारखे कडवे ब्राह्मणी मताभिमानीही होते. पण प्रबोधनकार या कौतुकात वाहून जाणारे नव्हते. उलट आपण केलेल्या मांडणीवर टीका करणारा लेखच त्यांनी प्रबोधनच्या जून १९२७च्या अंकातच प्रसिद्ध केला होता. प्रबोधनच्या या अंकात ’दगलबाज शिवाजी’ हा मूळ लेख दहा पानं भरून प्रसिद्ध केला आहे. तो संपल्यावर पुढच्याच पानात आणखी एक मथळा आपलं लक्ष वेधून घेतो. तो असतो, ’गो–ब्राम्हण प्रतिपालक शिवाजी’. या मथळ्याच्या खालीच कंसात पुढच्या छोटेखानी लेखाचं स्वरूपही लिहिलेलं […] - [और एक पाकिस्तान?](https://emarmik.com/%e0%a4%94%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8/): नुकताच धुरंधर नावाचा एक (अप)प्रचारपट प्रदर्शित झाला. तो तुफान गर्दी खेचतो आहे, गल्ला कमावतो आहे. सत्यघटनांवरून प्रेरित काल्पनिक सिनेमा असं म्हणायचं, त्यातल्या खोटेपणाकडे बोट दाखवलं की सिनेमा काल्पनिक आहे असं म्हणायचं, मग सिनेमात वास्तवातल्या घटना, वास्तवातली माणसं यांचा उल्लेख, त्या काळातल्या बातम्यांचं सोयीस्कर फुटेज, वगैरे गोष्टी का वापरल्या आहेत, असं विचारलं की तो सत्यघटनांवरूनच प्रेरित आहे, हे सांगायचं, असा हा खेळ असतो. पण, खोट्याचा रेटा फार काळ टिकत नाही. यूट्यूबर ध्रुव राठीने या सिनेमातल्या थापांचा जबरदस्त पंचनामा केला आहे. या सिनेमात अजित डोवाल यांच्यावर बेतलेल्या व्यक्तिरेखेचा उदो उदो करण्यात आला आहे, मात्र, डोवाल हे पूर्वीपासूनच कसे अपयशी अधिकारी आहेत, याचे […] - [आम्ही टॅक्स का भरावा...?](https://emarmik.com/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be/): देशाच्या नागरिकांनी करायचे नागरी कर्तव्य म्हणून इतर सर्व देशांसारखे आपणही कर भरतो. कराच्या विविध प्रकारात, प्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्स, अप्रत्यक्ष कर म्हणजे औद्योगिक, जी.एस.टी. इ. वेगवेगळे कर आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, खाण्यापिण्यापासून आरोग्य, शिक्षणापर्यंत केल्या जाणार्‍या प्रत्येक खरेदी-विक्रीवर जीएसटी आणि इतर स्वरूपात देखील हजार मार्गांनी आपण सतत टॅक्स भरतो! टॅक्स कोणते आणि कसे भरतो, यापेक्षा आपण ते ‘का भरतो आहोत’ हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे… करप्रणालीमागे अत्यंत महत्वाचे हेतू असतात..ज्यांच्याकडून हे वेगवेगळे कर बारा महिने तेरा काळ पिळून काढून घेतले जातात, त्याच जनतेच्या संपूर्ण सर्वांगीण हितासाठी, विकासासाठी ह्या करातील पैशाचा वापर केला जाणे अपेक्षित असते. सर्वांना लाभ देणार्‍या […] - [आंब्राई](https://emarmik.com/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%88/):   एकनाथ शिंदे   भाजपाने आमचे पळवले त्यांचेसुद्धा आम्ही पळवले फिट्टम्फाट झाली आता युतीसाठी हात मिळवले ते मोठे की आम्ही मोठे निकालात कळेल आता सीएमसाहेब तर वाटच पाहतायत कधी घालू यांना लाथा आमच्यापेक्षा त्यांची सेटिंग खरोखरच आहे मोठी तरीही मला आशा वाटते वाजतील आमची नाणी खोटी देवेंद्र फडणवीस संविधानाचे गाणे गात पायी तुडवू लोकशाही विरोधकांचा गळा दाबून शिरजोर करू हुकूमशाही सत्ताप्राप्ती हेच लक्ष्य विरोधक हे आमचे भक्ष्य संपवल्यावर त्यांना कायम भाजपाला मिळेल मोक्ष विकासाच्या नावाखाली स्वातंत्र्याचा कोंडू श्वास खोट्याचेही खरे करून लोकशाहीला लावू फास       शिंदे-भाजपा गट रद्द होणार निवडणुका जर का आधी माहीत असते मतदारांच्या खुशीसाठी आम्ही […] - [माओच्या गरूड झेपेचे बळी](https://emarmik.com/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%93%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a1-%e0%a4%9d%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%b3%e0%a5%80/): शेतमालाचं उत्पादन वाढवण्यासाठी माओच्या चीनमध्ये पीकपद्धतीमधे बदल करण्यात आले. रशियन वैज्ञानिक ट्रॉफिन लायसेंको यांच्या मार्गदर्शनाखाली शेती केली गेली. लायसेंको यांचा वनस्पतीशास्त्राबाबतचे सिद्धांत चुकीचे आणि संशयास्पद होते. पीक वाढवायचं असेल तर पेरणी जवळ जवळ करावी. दिलेल्या जागी जास्त बिया पेरल्या तर धान्याची जास्त ताटं उगवतील आणि उत्पादन जास्त होईल, हा सिद्धांत कोणीही तपासून पाहिलेला नव्हता. लायसेंकोनं सांगितलं, माओनी ऐकलं. जमिनीतला कस, पोषणमूल्य शेवटी मर्यादित असतं, ते ताटांच्या संख्येत विभागलं, परिणामी धान्याचं उत्पादन कमी झालं. अपुर्‍या पोषणामुळं झाडं वाढली नाहीत. खोलवर पेरणी. बी जमिनीत खोलवर पेरलं तर तेवढ्या प्रमाणात मुळं जास्त वाढतील, परिणामी पीक वाढेल असा सिद्धांत सांगितला गेला. हा सिद्धांतही कोणीही […] - [मेसीचं ‘दूरदर्शन,’ फुटबॉलची दशा तीच!](https://emarmik.com/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a4%ac%e0%a5%89/): जगातील सर्वकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटू अशी ख्याती असलेला लिओनेल मेसीचा भारत दौरा आयोजकांनी उत्तमपणे विकला. यातून मेसीनं आणि आयोजकांनी मोठी कमाई केली. कोलकातात फसलेल्या उपक्रमातून धडा घेत अन्य शहरांत मेसीदर्शन यथोचित होईल, याची काळजी घेण्यात आली. परंतु तरीही महानायक मेसीचं भारताने काय करायचं? हा प्रश्न पडतोच. याचीच उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न. तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं, असं १०० टक्के म्हणता येणार नाही. कोलकातात अस्सल चाहत्यांनी जे केलं, ते जगानं पाहिलं. मग हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीत सावधपणे सावरलं. म्हणजे कोलकाता तोडफोडीची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पैसे मोजून आणलेल्या फुटबॉलरसिकांचं ‘मेसीरंजन’ होईल, याची काळजी घेण्यात आली. कोलकाताच्या घटनेमुळे काही मंडळींना ‘चुकलं आमचं […] - [बाप नंबरी, बेटा दस नंबरी!](https://emarmik.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%b8-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%80/): बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. याचा अर्थ असा की माणसाचे गुण, स्वभाव, क्षमता किंवा भविष्यकाळातील प्रवृत्ती लहानपणीच दिसू लागतात. त्याच्यासमोर जसे आदर्श ठेवले जातात तशी त्या बाळाची वाढ होते. मुळात संस्कार आणि शिक्षण या गोष्टी मुलांना घडवतात आणि समाजात आदर्श निर्माण करतात. पण मुळातच आनंदीआनंद असेल तर खोडाला तरी नावं का ठेवा! महाराष्ट्रात सध्या अमेडिया प्रकरणात असाच प्रकार अनुभवायला मिळत आहे. ९९ टक्के मालकी असणार्‍या पार्थ अजित पवार यांना मुंढवा जमीन प्रकरणात चक्क क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात गेली तीन दशकं सतत दृश्यमान राहिलेले नाव म्हणजे अजित अनंतराव पवार. प्रशासनातील पकड, निर्णयक्षमता, आक्रमक […] - [आ बैल मुझे मार](https://emarmik.com/%e0%a4%86-%e0%a4%ac%e0%a5%88%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%9d%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0/):     सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री म्हणून ज्या खुर्चीवर बसले होते त्या खुर्चीचा सन्मान पुढेही बहुतेक गृहमंत्र्यांनी ठेवला. तेव्हा देशासाठी लढणारे, देशहिताचा विचार करणारे हे सगळेच खरे सरदार होते. परंतु आता मूर्खांचे सरदार सत्तेत आले आहेत. संसदेत निवडणूक सुधारणा आणि एसआयआरवरील चर्चेने गृहमंत्री अमित शहा आधीच वैतागले होते. या वैतागातच लोकसभेत विरोधकांना ‘साला’ म्हणाले. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेत महिलांवर जर्सी गाय, काँग्रेस की विधवा, शूर्पणखा, ‘पचास करोड की गर्लफ्रेंड’ अशा शब्दांची उधळण केली होतीच. या संस्कारी नेत्यांनी प्रदूषणासारखे ज्वलंत प्रश्न मागे टाकत ‘वंदे मातरम’च्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चेला प्राधान्य दिले. यामागील भाजपचा राजकीय उद्देश लपून राहिला […] - [दाना दुष्मन चाहिये](https://emarmik.com/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a8-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%87/): प्रबोधनकारांचं ‘दगलबाज शिवाजी’ हे पुस्तक फारच लोकप्रिय झालं. त्याला पुण्यातल्या ब्राह्मणी वर्तुळातूनही अनपेक्षितपणे कौतुकाची पावती मिळाली. त्यात एककल्ली हिंदुत्वाचे प्रवक्ते असणारे भालाकार भोपटकर मुख्य होते. या सगळ्या प्रतिसादासह या पुस्तकातल्या चर्चेतल्या मुद्द्यांची ही उजळणी. लोकमान्यांचं ‘केसरी’ आणि शिवरामपंत परांजपेंचं ‘काळ’ यासारखी ब्राह्मणी वळणाची वर्तमानपत्रं पुण्यात लोकप्रिय असतानाच्या काळात ‘भाला’ नावाचं वर्तमानपत्र सुरू करणं हे मोठंच धाडस होतं. भोपटकर बंधूंनी फक्त ते धाडस केलं नाही, तर भाला हे अधिक कट्टर ब्राह्मणी वळणाचं नियतकालिक चालवलं आणि गाजवलं देखील.या भावांमधले थोरले भास्कर बळवंत उर्फ भोपटकर हेच `भाला`चे संपादक. ते भालाकार भोपटकर म्हणूनच ओळखले जात. सर्वात धाकट्या दिनकररावांना काळाने लवकर ओढून नेलं. मधले लक्ष्मण […] - [लोकशाहीची अग्निपरीक्षा](https://emarmik.com/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be/): ज्यावेळी देशात निवडणूक प्रक्रियेबद्दल कधी नव्हे इतकं अविश्वासाचं वातावरण बनलेलं आहे, अशा काळात संसदेत निवडणूक सुधारणेबद्दलची चर्चा पार पडली. ही चर्चा केवळ निवडणूक प्रक्रियेचीच नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांची परीक्षा घेणारी ठरली. संसदेत दोन विषयांवर चर्चा करण्यास सरकारनं तयारी दर्शवली. वंदे मातरमची दीडशे वर्षे आणि दुसरा विषय होता निवडणूक सुधारणा. खरंतर विरोधक या चर्चेला मतदार पुर्ननिरीक्षणावरची म्हणजे एसआयआरवरची चर्चा असंच नाव द्या म्हणत होते. पण सरकार काही तयार झालं नाही. त्यांनी हा विषय मोघमच ठेवला. वंदे मातरमची चर्चा म्हणजे जुना इतिहास खोदून काढण्याचंच काम होतं, जे भाजपला नेहमी आवडतंच. त्यानिमित्ताने नेहरुंच्या नावाचा गजर पुन्हा एकदा संसदेत घुमलाही. पण या […] - [कुंभ आमचा; कुंभ त्यांचा!](https://emarmik.com/%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ad-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ad-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be/): नाशिक येथे होऊ घातलेल्या आगामी सिंहस्थ मेळ्यासाठी ‘तपोवना’तील १७-१८०० झाडे तोडण्याच्या प्रश्नावरून सध्या रान पेटलं आहे. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होईल, हा मुद्दा नाशिककर स्थानिक जनतेनं ऐरणीवर आणला असून, त्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनात राज्य स्तरावरील काही नेते तसंच कलावंत आणि विचारवंतही सामील झाले आहेत. पण हा विषय केवळ पर्यावरण वा तेथे पुढे होऊ घातलेल्या एका व्यापारी संकुलापुरता आता मर्यादित राहिलेला नाही. त्यात राजकारणाचे अनेक पदर गुंतलेले आहेत. शिवाय, नाशिक येथेच २००३मध्ये झालेल्या सिंहस्थाच्या वेळी घडलेल्या एका मोठ्या दुर्घटनेची पार्श्वभूमीही त्यास आहे. त्यास कारणीभूत अर्थातच या गोदावरी नदीकाठचं मूळ नाशिक, तसंच नदीपलीकडल्या ‘पंचवटी’ या प्रचलित नावानं परिचित असलेल्या भागाची […] - [वर्षपूर्ती नव्हे वर्षआपत्ती!](https://emarmik.com/%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a4/): गेल्या डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष, मिंधे सेना आणि अजित पवार गट यांचे तीनचाकी महायुती सरकार सत्तेवर आले. एरवी छोट्याशा यशाची वारेमाप प्रसिद्धी करणार्‍या, इव्हेंट साजरा करणार्‍या भाजपाने वर्षपूर्तीचा मोठा गाजावाजा केला नाही. वृत्तपत्रातून पानभर जाहिराती, वर्षपूर्तीनिमित्त खास पुरवण्या आणि वृत्तवाहिनीवरील वर्षपूर्तीचा सोहळा आणि विविध माध्यमांवर मुलाखती-चर्चासत्रांचा (काही अपवाद वगळला तर) अभावच दिसला. पाच डिसेंबर २०२४ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित सोहळ्यात महायुती सरकारचा मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. २३०पेक्षा जास्त आमदारांचे पाशवी पाठबळ घेऊन त्यांनी राज्य कारभार सुरू केला. गेल्या एका वर्षात तीन पक्षांचे कडबोळे सरकार चालवताना राज्याची प्रगती दिसली नाही आणि गतिमान सरकारही दिसले […] - [व्हायरल](https://emarmik.com/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%b2/) - [नस नस में बिबट्या](https://emarmik.com/%e0%a4%a8%e0%a4%b8-%e0%a4%a8%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): सन्माननीय मंत्री महोदय, पशु पालन विभाग, महाराष्ट्र राज्य सीसी – १. अध्यक्ष, अखिल भारतीय बिबटे संघटना २. सन्माननीय सदस्या – अखिल भारतीय स्त्री बिबटे संघटना विषय – बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय मागे घेणेबाबत महोदय, नुकताच तुमच्या एका मसलतीत आमच्या जुन्नर विभागातील काही बिबट्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रायोगिक तत्वावर ११५ बिबट्यांची नसबंदी करण्यात येईल असे यात सांगितलेले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अहिल्यानगर आणि नाशिकमध्येही नसबंदीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. त्वरित हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी विनंती करण्यासाठी हा अर्ज अखिल भारतीय बिबटे संघटनेच्या वतीने करत आहोत. निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल असे […] - [करते वेडे... शब्दकोडे!](https://emarmik.com/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%87/): शब्दकोडे हा सर्वच नियतकालिकांचा अपरिहार्य भाग बनलेला आहे. वृत्तपत्रातून कोडी कधी छापली जाऊ लागली, याबद्दल कोड्यांच्या अभ्यासकांत मतभेद आहेत. इंग्लंडमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शब्दभांडार वाढविण्यासाठी मदत म्हणून अगदी प्राथमिक स्वरूपात इंग्लंडमधे कोड्यांचा वापर १९व्या शतकापासून केला जात होता. असं असलं तरीही अधिकृतरित्या पहिलं शब्दकोडं हे अमेरिकेतील नियतकालिकात छापून आलं, हे निर्विवाद आहे. आर्थर वेन या इंग्रजानं निर्माण केलेलं हे कोडं अमेरिकेत न्यूयॉर्क वर्ल्ड या साप्ताहिक वृत्तपत्रात २१ डिसेंबर १९१३च्या अंकात छापून आलं होतं. त्याचा आकार आजच्यासारखा मात्र नव्हता. तर तो पत्त्यातील चौकट होता. आर्थर वेनच्या या कोड्यानं जगाला वेड लावणारी एक प्रथा सुरू केली. ’न्यूयॉर्क वर्ल्ड’मागोमाग अनेक अमेरिकी दैनिकांनी आणि साप्ताहिकांनी […] - [तीन पिढ्यांची चव जपणारे शंकरराव वडेवाले...](https://emarmik.com/%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%b5-%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%b6/): बटाटावडा हा चवीने खाल्ला जाणारा पदार्थ… आपण कधी कधी घरी देखील तयार करतो….प्रत्येकाची बटाटावडा तयार करण्याची पद्धत वेगळी. वडा आणि पाव हा जगभर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे जागोजागी आपल्याला प्रसिद्ध वडापावाची दुकाने, ठेले पाहायला मिळतात. पुण्यातही गार्डन, जोशी वडेवाले असे नामांकित वडेवाले आहेत. पण शंकररावांची गोष्टच वेगळी. पुण्यात सकाळी अकरा वाजण्याच्या आत किंवा दुपारी चार वाजण्याच्या आत लक्ष्मी रोडकडून तुळशीबागेकडे जाणार्‍या चिंचोळ्या रस्तावर काकाकुवा मॅन्शनच्या दारातल्या शंकरराव वडेवाले या ठिकाणाला भेट द्या, त्यांच्या बटाटेवड्याची चव घ्या… हिरवी-काळी मिरची, आले लसूण, गूळ यांचा वापर करून तयार केलेली चवदार बटाट्याची भाजी, त्यावर डाळीच्या पिठाचे पातळ आवरण, बटाटेवड्यावर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्यावर […] - [भाईगिरी हीच हिरोगिरी](https://emarmik.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%9a-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80/): २०१४ मधली ही घटना असेल. पुण्यातील मध्यवस्तीमधल्या भागात एका गँगस्टरचा खून झाला होता. दोन गँगमधल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. तेव्हा मी पुण्यात क्राईम ब्रँचला सहायक पोलीस आयुक्त म्हणून काम करत होतो. या प्रकाराची चौकशी करत असताना कळले की विरोधी गँगमधील गुन्हेगारांनी त्या गँगस्टरवर लक्ष ठेवून फायरिंग आणि कोयत्याने वार करून हा प्रकार केला होता. भर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता, त्यामुळे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर उभे ठाकले होते. संध्याकाळपर्यंत हा प्रकार कुणी केला याची माहिती खबरीच्या माध्यमातून मिळाली होती. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले. त्यासाठी पोलिसांच्या पाच टीम तयार करून […] - [नाय, नो. नेव्हर...](https://emarmik.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a5%8b-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b0/): संतोषराव, तुमच्या नाटकाच्या प्रयोगात अचानक एखादा बिबट्या रंगमंचावर आलात तर काय कराल?– रंजना फातर्फेकर, रत्नागिरी आम्ही काय करणार? जे काही करायचे ते बिबट्या करणार… नंतर तुम्हीच म्हणाल एका महान नटाला बिबट्याने कचाकचा खाल्ला (तुम्ही नको ते विचारता, मग आम्ही स्वतःला महान नट म्हटलं तर काही बिघडलं?) महाराष्ट्रात बिबट्यांच्या प्रश्नावर अनेक लोक उपाय सुचवू लागले आहेत. कोणी त्यांची नसबंदी करायला निघालंय, कोणी जंगलात शेळ्या सोडतंय, कुणी बिबट्यांना पाळायचा सल्ला देतोय… एक ज्येष्ठ कलाकार म्हणून तुम्ही काय उपाय सुचवाल या प्रश्नावर? – श्रीपाद बेंद्रे, सोलापूर आधी लोकांना तूप रोटी खाऊ दे, जाडजूड होऊ दे, मग बिबट्याने खाऊ दे. या पलीकडे १०१ उपाय […] - [जय जय विश्वगुरू!](https://emarmik.com/%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82/): विश्वगुरू नरेंद्रजी मोदीजी यांना त्यांचे लाखो अंधभक्त ज्याअर्थी मानतात. त्यांच्यापाशी नक्कीच काहीतरी वेगळेपण असलंच पाहिजे, जे भाजपाच्या इतर नेत्यांपाशी नाही, असं माझा मानलेला परमप्रिय पोक्या मला म्हणाला, तेव्हा मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. उलट मीच त्याला म्हणालो की अशी दैवी शक्ती असलेली माणसं युगायुगातून एकदाच जन्माला येतात हे आपलं आणि या देशाचं परमभाग्य आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा अमेरिकेला लाभलेलं दैवी वरदानच आहे. तुला आपले विश्वगुरू मोदीजी यांच्या महानतेविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर तू एखाद्या निष्ठावंत अंधभक्ताची मुलाखत घे. तो तुला या विश्वरूपाचं साग्रसंगीत दर्शन घडवील. पोक्याने ते मनावर घेतलं आणि तो तडक मुंबईतल्या कट्टर अंधभक्तांची मुलाखत […] - [राशीभविष्य](https://emarmik.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af/): ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, गुरू मिथुनेत, केतू सिंहेत, बुध वृश्चिक राशीत, रवि, मंगळ, शुक्र धनु राशीत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष : २० डिसें. अमावस्या समाप्ती स. ७ वा. १२ मि., २३ डिसें. श्री विनायक चतुर्थी, अंगारक योग, २५ डिसें. ख्रिसमस नाताळ.     मेष : अतिरिक्त धनलाभ होईल. पैसे सुरक्षित ठेवा. मौजमजेवरील खर्चातून मनस्ताप होईल. स्पष्टपणा कामी येईल. संयमी आणि शांत राहा. नोकरीत कामाचा कंटाळा करू नका. वित्तीय कर्मचार्‍यांनी काळजी घ्यावी. घरात वागताना-बोलताना काळजी घ्या. ज्येष्ठांचा आदर करा. कामाचा हुरूप वाढेल. तरुणांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. व्यवसायात सकारात्मक विचारातून विषय मार्गी लागेल. धार्मिक ठिकाणांना भेटी द्याल. […] - [नाय, नो. नेव्हर...](https://emarmik.com/16-8-2025-naay-no-never-lekh/): संतोषराव, आमच्या शाळेत एक जोडी आहे गणा आणि गणपाची. मास्तरांनी गणाची खरडपट्टी काढली की तो काही बोलायच्या आत गणपा उठतो आणि गणाची बाजू मांडायला लागतो. असं तो का करत असेल बरं? – श्रद्धा पांचाळ, रत्नागिरी त्यांच्यातलं नातं तपासा… नाही… नाही… आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड यातून तुम्हाला काही कळणार नाही, मतदारयादी तपासा. त्यातून त्यांचं खरं नातं काय ते कळेल. आता ‘ते’ असं का करत असतील? या प्रश्नाच्या उत्तरावर एकच वाटतंय, ‘अशा’ नात्यांची सवय लागलेले… ‘तशा’ नात्याला सांभाळण्यासाठी वाटेल ते करतील… जास्त विस्कटून सांगायला लावू नका… मतदारयादीतून नाव शोधून त्यांचं नातं तपासण्याएवढा वेळ आणि तशी टीम आमच्याकडे नाहीये. कबुतरांना दाणे […] - [बदल गया इन्सान!](https://emarmik.com/16-8-2025-tokya-tochankar-lekh/): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील अतिपराक्रमी आमदार, नेते आणि मंत्री यांचे अभ्यासवर्ग घेतल्यानंतर त्या अतिउत्साही दिग्गजांमध्ये खूपच बदल झाल्याची चर्चा होती. ते खरे होते की खोटे हे जाणून घेण्यासाठी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्याच आपल्या माहितीसाठी… संजय गायकवाड : माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमचे कान टोचले ते योग्यच होतं. मला माझ्या त्या कृत्याचा आता पश्चात्ताप होतोय. किती क्रूरपणे वागलो मी त्या कँटीन बॉयशी. ती डाळही आंबलेली नव्हती. तरीही मी देशातला नंबर वन बॉक्सर आहे हे जगाला दाखवण्यासाठी त्या दुबळ्या पोरावर बॉक्सिंगचं प्रात्यक्षिक करून दाखवलं याचा मला आता पश्चात्ताप होतोय. मी त्या मुलाची क्षमाही […] - [राशीभविष्य](https://emarmik.com/16-8-2025-bhaskar-acharya-rashi/): ग्रहस्थिती : शुक्र, हर्षल वृषभ राशीत, मंगळ, केतु सिंहेत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत, गुरु मिथुनेत, रवि, बुध कर्केत, प्लुटो मकरेत. दिनविशेष : १६ ऑगस्ट गोपाळकाला, १९ ऑगस्ट अंजा एकादशी, २० ऑगस्ट प्रदोष, २१ ऑगस्ट शिवरात्री, गुरुपुष्यामृत योग, २२ ऑगस्ट पिठोरी अमावस्या, आरंभ सकाळी ११.५५ वा., पोळा. – – – मेष : कामात सामोपचार व संयम ठेवा. व्यवसायात घाई टाळा. काळजी घ्या. कामानिमित्ताने नव्या ओळखींतून विचारांची देवाणघेवाण होईल. घरात खर्चाचे प्रमाण वाढून मनस्वास्थ्य बिघडेल. नोकरीत अति विश्वास दाखवल्यास अडचणींत भर पडेल. कामात अधिक लक्ष द्या. चुका डोकेदुखी वाढवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मुलांना शैक्षणिक यश मिळेल. मित्रांशी जेवढ्यास तेवढे संबंध […] - [आर्म्स फॅक्टरी](https://emarmik.com/16-8-2025-rajendra-bhamare-lekh/): – राजेंद्र भामरे अवैध शस्त्रे वापरून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले होते. शहरभर त्याचे लोण दिवसेंदिवस पसरत चालले होते. पोलीस काहीच करत नाहीत, पोलिसांची गुन्हेगारांवरची पकड ढिली होत चालली आहे, अशा बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येत होत्या, त्यामुळे पोलिसांवर मान खाली घालण्याची वेळ येत होती. ते वर्ष होते सन २०१४… तेव्हा मी पुणे पोलीस क्राइम ब्रँचमध्ये सहायक पोलीस आयुक्त म्हणून काम करत होतो. शहरात सुरू असणारे हे गुन्हे थांबवण्यासाठी क्राइम ब्रँचची टीम कंबर कसत होती. शहराच्या विविध भागामध्ये पोलिसांनी खबर्‍यांचे जाळे घट्ट केले होते. त्यावेळी पुण्यात आठ गुन्हेगारी टोळ्या कार्यरत होत्या, त्याच्या सदस्यांना पोलिसांनी उचलून आणले होते, शहरात येणारी ही अवैध शस्त्रे कुठून […] - [वसा समृद्धीचा, मार्ग पंचखाद्याचा!!](https://emarmik.com/16-8-2025-vaibhav-bhalde-lekh/): परवा अचानक एका तातडीच्या कामासाठी मयूरबरोबर अलिबागला जाऊन आलो. संध्याकाळी बाहेर पडलो गावात चक्कर मारायला नी मनातल्या अनेक आठवणी उचंबळून आल्या. जेमतेम आठवड्यावर आलेल्या गणेशोत्सवाच्या खाणाखुणा ठळक दिसत होत्या सगळीकडे. सजावटीच्या सामानापासून नैवेद्याच्या नानाविध पदार्थांपर्यंत सगळी रेलचेल होती. अगदी पेडणेकरांच्या किंवा वैद्यांच्या दुकानातही बाप्पाच्या दागदागिन्यांचेच प्रदर्शन मांडलेले होते. तसं बघायला गेलं तर निर्गुण निराकारापासून सगुण साकाराच्या सर्व छटांमध्ये सहज सामावणार्‍या बाप्पाला खरंच का गरज असते या सगळ्याची? म्हटलं तर नाही, पण या सगळ्या उलाढालीने अनेक हातांना काम मिळते, अनेक बालमुखांनी मोदक खाऊन बाप्पा सुखावतो, नाही का? अलिबागकरांच्या लाडक्या पुरोहितच्या दुकानातली लगबग एखाद्या सुगृहिणीसारखी भासली मला यावेळी, पैपाहुण्याचे तोंड गोड करताना […] - [शतकमहोत्सवी झेंडूची फुले (भाग २)](https://emarmik.com/16-8-2025-shriram-ranade-lekh2/): मराठीत विडंबनकाव्याची पताका रोवणार्‍या ‘झेंडूची फुले’ या आचार्य प्र. के. अत्रे यांच्या कवितासंग्रहाचे हे शतक महोत्सवी वर्ष लेखक, संपादक, कवी, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, पत्रकार, राजकारणी पुढारी अशी नानाविध क्षेत्रे दणाणून सोडणार्‍या आचार्य अत्रे यांच्या महाप्रचंड व्यक्तिमत्त्वामधली ही मिश्किल बाजू उलगडून दाखवणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात सादर झाला. त्या कार्यक्रमाची ही संपादित संहिता. ‘झेंडूची फुले’ ही काय गंमत होती ते उलगडून सांगणारी. – – – आम्ही कोण? केशवसुत, क्षमा करा. ‘आम्ही कोण?’ म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी ‘फोटो’ मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पहिला? किंवा ‘गुच्छ’ ‘तरंग अंजली’ कसा अद्याप नावाचिला? चालू ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रातुनी? ते आम्ही परवाङ्मयातील करू […] - [टिप्सी](https://emarmik.com/16-8-2025-sarika-kulkarni-lekh/): आम्ही नव्यानेच पंजाब राज्यातील लुधियाना शहरात बदली होऊन गेलो होतो. एक छोटा बंगला भाड्याने घेतला होता. खाली घरमालक आणि वरती भाडेकरू अशी व्यवस्था होती. आम्ही शिफ्ट झालो. आमची दुचाकी तिकडे ट्रान्सपोर्टने पाठवली होती. ती उतरवून घेतली, पण गाडी चालू होईना. गॅरेजमध्ये न्यावी लागणार होती. करतारसिंग या आमच्या घरमालकांना विचारले, ‘जवळपास कुठे गॅरेज आहे का? म्हणजे आम्हाला गाडी दुरुस्तीला टाकता येईल.’ त्यांनी आजूबाजूला बघितले आणि ते म्हणाले, ‘गड्डी? किथ्थे है गड्डी?’ आम्ही आमच्या दुचाकीकडे बोट दाखवले तसे करतारसिंग जोरजोरात हसू लागले. आम्हाला काहीच समजेना. त्यांचे गडगडाटी हसू थांबल्यावर त्यांना कारण विचारले तर ते म्हणाले, ‘गड्डी तो चार पैंय्योवाली होती है. ये […] - [सिराज `राज’ चिरायू होवो!](https://emarmik.com/16-8-2025-prashant-keni/): इंग्लंडविरुद्धची अँडरसन-तेंडुलकर मालिका भारताने २-२ अशी बरोबरीत सोडवली. भारताच्या यशात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे महत्त्व अधोरेखित होते. बुमरा-शमीच्या वर्चस्वगाथेमुळे झाकोळलेला हा तारा या मालिकेत तेजाने चमकला. त्याची इंग्लंड दौर्‍यावरील कामगिरी आणि कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत. – – – क्षण-१ : लीड्सच्या तिसर्‍या कसोटीत रवींद्र जडेजाने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन शर्थीने लढत दिली. पण विजय २२ धावांच्या अंतरावर असताना शोएब बशीरचा चेंडू ११व्या क्रमांकावरील मोहम्मद सिराज बचावात्मक पद्धतीने खेळला. पण तो अनपेक्षितपणे वळला आणि अलगदपणे त्याच्या डाव्या यष्टीवर आदळून एक बेल्स खाली पडली. भारताने हा सामना गमावल्याची हुरहूर वेदनादायी होती. सिराज जागच्या जागी खाली बसला. जे घडले, ते स्वीकारणे जड गेले. […] - [सत्यपाल नावाचा सिंह!](https://emarmik.com/16-8-2025-vikas-zade-lekh/): अनेक राज्यांचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक हे लोकसभा आणि राज्यसभेचेही माजी सदस्य होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा उदारपणाही कोत्या वृत्तीचे मोदी सरकार दाखवू शकले नाही. त्यांचे नाव घेतले तरी मोदी-शहांना धडकी भरावी, असा त्यांचा बाणेदारपणा होता. – – – बिहार, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक हे लोकसभा आणि राज्यसभेचेही माजी सदस्य होते. त्यांचे ५ ऑगस्ट रोजी निधन झाले. परंतु त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा उदारपणाही कोत्या वृत्तीचे मोदी सरकार दाखवू शकले नाही. जम्मू काश्मीरमधील कार्यकाळातील ऐतिहासिक निर्णयांमुळे आणि शेतकरी चळवळीला दिलेल्या पाठिंब्यामुळे मलिक कायम स्मरणात राहतीलच. त्यांचे नाव घेतले […] - [बाळासाहेबांचे फटकारे...](https://emarmik.com/16-8-2025-balasaheb-fatkaare-lines/): स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली मुंबई आणि महाराष्ट्राची दारे सर्व अन्यप्रांतीयांसाठी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ म्हणून खुली करण्यात आली, तेव्हा त्यातून स्थानिक मराठी माणसाचं काय नुकसान होणार आहे, हे पहिल्यांदा ओळखलं ते व्यंगचित्रकार आणि साप्ताहिक मार्मिकचे संपादक बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यांनी मराठी माणसाला जागं करण्यासाठी जिवाचं रान केलं, मराठी माणसावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मार्मिकमध्ये शब्द आणि रेषा या दोहोंचा मोठ्या ताकदीने वापर केला. मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍याच्या टाळक्यात आपटणारी शिवसेना नावाची वङ्कामूठ तयार केली… त्या काळात सर्वसमावेशक भारतीयत्वाच्या नावाखाली जो प्रकार केला गेला, तोच आता व्यापक हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू झाला, मराठी माणसांचं ‘मराठी भय्या’करण व्हायला लागलं, आपल्याच […] - [राहुलजींची छडी आणि मिंध्यांची ब्लॅक कॉमेडी!](https://emarmik.com/16-8-2025-sushma-andhare-lekh/): – प्रा. सुषमा अंधारे भारतीय संसदेतील विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली. दृकश्राव्य माध्यमाद्वारे प्रात्यक्षिक दाखवत त्यांनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या भरजरी पितांबराची अक्षरशः लक्तरंच पत्रकारांच्या समोर टांगली. ती नेमकी कुठून आणि कशी शिवावी हा भाजपासमोरचा यक्ष प्रश्न आहे. राहुलजींनी जे महत्त्वाचे पाच प्रश्न उभे केले त्यावर भाजपाकडून तर्कशुद्ध उत्तर येणं अपेक्षित होतं पण तर्कशुद्ध वादविवाद करतील ते भाजपाई कसले? ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मतांवर पडलेल्या दरोडा राहुलजींनी काल ज्या पद्धतीने स्पष्ट करून सांगितला, त्याने भाजपाची भंबेरी उडाली आहे आणि नेहमीप्रमाणे मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी कोण कुठे बसला, […] - [टपल्या आणि टिचक्या](https://emarmik.com/16-8-2025-taplya-tichkya-lekh/): □ चीनला जाण्यासाठी मोदी बॅगा भरत असतानाच ट्रम्प यांनी भारतावर लादला ५० टक्के कर. ■ सापनाथाचा फणा चुकवायला नागनाथाशी दोस्ती करून उपयोग काय? भाबडेपणाने हिंदी चिनी भाई भाईची घोषणा देणार्‍या नेहरूंची आयुष्यभर निर्भर्त्सना करून शेवटी त्याच वाटेने जाण्याची वेळ आली? □ फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये वॉर; बेस्ट महाव्यवस्थापक पदावर दोघांनीही केल्या परस्पर नेमणुका. ■ त्यातली फायनल कोणती राहिली? म्हणजे बॉस कोण आहे, ते दुसर्‍याने समजून जावे आणि दिल्लीतले उंबरे आणखी झिजवावे. □ मतचोरीच्या पुराव्यांचा सात फुटांचा ढीग दाखवला; राहुल गांधी यांनी बॉम्ब फोडला. ■ निवडणूक आयोगाची वेबसाइटच आता चालेनाशी झाली. आणि महाराष्ट्रातले कोणी सुसंस्कृत पुढारी, गरज नसताना, आपली नोकरी नसताना […] - [निवडणूक चोरणारी टोळी उघडी पडली](https://emarmik.com/16-8-2025-prashant-kadam-lekh/): विरोधी पक्ष म्हणते आम्हाला कागदपत्रे द्या, तर इलेक्ट्रॉनिक व्होटर लिस्ट देण्याऐवजी किचकट कागदपत्रं दिली जातात. राहुल गांधींनी या सगळ्या कागदपत्रांचा तब्बल सात फुटांचा ढीग पत्रकार परिषदेत दाखवला. ही कागदपत्रं २०० ते ३०० किलो वजनाची होती. – – – निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राहुल गांधींनी ७ ऑगस्टला घेतलेल्या पत्रकार परिषदेला काय म्हणावे?.. ही पत्रकार परिषद वादळी गौप्यस्फोट करणारी तर होतीच; पण त्यांनी इतक्या तपशीलवार, नावानिशी ही माहिती उघड केली की ती केवळ पत्रकार परिषद नसून आयोगावर दाखल केलेलं चार्जशीटच होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली या तीनही राज्यांचे निकाल तिथल्या राजकीय वातावरणापेक्षा विपरीत लागले आहेत. निवडणूक प्रक्रियेबद्दल आम्हाला इतके दिवस शंका […] - [जेथें भेटेल तेथें ठोका ।।](https://emarmik.com/16-8-2025-kiran-mane-lekh/): – किरण माने परवा ‘द केरला स्टोरी’ या अतिरंजित आणि धर्मांधतेला बढावा देणार्‍या सिनेमाला दोन नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाली. खरंतर ती एक कलाकृती नसून ते एक अत्यंत हिडीस खोटे नरेटिव्ह होते… ज्याचा उद्देश फक्त एका विशिष्ट धर्माची बदनामी करणे हा होता. असो. हल्ली कलाक्षेत्रात असा धर्मद्वेष्टा, जातीयवादी प्रचार करणार्‍या दांभिकांची चलती आहे… पण या निमित्तानं मला त्या सिनेमाच्या वेळची एक घटना आठवली. ‘केरला स्टोरी’ बघून आल्यावर एक इसम सोशल मीडियावर येऊन ढसाढसा रडायला लागला. त्या समाजानं आपल्या धर्मातल्या मुलींवर केलेल्या अत्याचाराबद्दल हृदय पिळवटणारी पोस्ट त्याने रडत रडतच केली. ती वाचून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी स्वत:ला चार वेळा चिमटा काढून […] - [प्रबोधनी विचारांचं प्रवेशद्वार](https://emarmik.com/16-8-2025-sachin-parab-lekh/): प्रबोधनकारांचं काय वाचलंय, असं विचारलं की देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें असं उत्तर देणारे अनेकजण भेटतात. हा दीर्घलेख आणि पुढे त्याचं छोटेखानी पुस्तक ही प्रबोधनकारांच्या विचारांची ओळखच आहे. फक्त प्रबोधनकारांच्याच नाही, तर एकूणच सत्यशोधकी विचारांच्या वाचनाची सुरुवात या लेखाने झाल्याचंहीअनेकजण सांगतात. हे त्या अर्थाने प्रबोधनी विचारांचं प्रवेशद्वारच म्हणायला हवं. – – – प्रबोधन मासिकाच्या पाचव्या वर्षाच्या दुसर्‍या अंकात प्रबोधनकारांनी लिहिलेलं कर्मवीर भाऊराव पाटील यांचं परिचयपर लिहिलेलं चरित्र आणि चौथ्या अंकात त्यावर करावा लागलेला खुलासा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या आपण सविस्तर समजून घेतल्या आहेतच. त्याशिवाय या चार अंकातले हेमगर्भ, निर्विकल्प, भागवती भट्टीतला सनातनी हिंदु या टोपणनावांनी आलेले लेखही लक्ष वेधून […] - [पूर्वसुरींचे अभिमानसंचित जोपासणारा ‘मार्मिक’!](https://emarmik.com/16-8-2025-ulhas-pawar-lekh/): – उल्हास पवार मार्मिकचा ६५वा वर्धापनदिन १३ ऑगस्ट रोजी झाला, त्याबद्दल या व्यंगचित्र साप्ताहिकाला अभिवादन. ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्रे, प्रबोधन, मनोरंजन आणि बरंच काही ठासून भरलेलं असतं, ती परंपराच आहे. मार्मिकचे संस्थापक, संपादक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे प्रसिद्ध विचारवंत, पत्रकार, व्यंगचित्रकार आणि एका संघटनेचे महान नेते होते, जनसमूहाला वक्तृत्त्वशैलीची भुरळ घालण्याचं आणि आपल्याबरोबर ओढून नेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. ‘मार्मिक’ला आणखी एक परंपरा आहे ती प्रबोधनकार ठाकरे यांची. प्रबोधनकार म्हणजे अत्यंत जुन्या सामाजिक चळवळींमधला एक अग्रगण्य नेता. राजर्षी शाहू महाराज, भास्करराव जाधव, गणपतराव जाधव, तात्यासाहेब जवळकर ही फार मोठी यादी आहे, त्या प्रभावळीतील एक मातब्बर नेता म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. ते माननीय बाळासाहेबांचे वडील […] - [ठाकरेबंधूंचा मार्मिक @ ६५](https://emarmik.com/16-8-2025-yogendra-thakur-lekh/): बहुतांश राजकीय पक्षांची त्यांचा पक्षीय विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वृत्तपत्रे आहेत. त्यात दैनिके आहेत तशी साप्ताहिके देखील आहेत. पक्ष स्थापन झाल्यानंतर त्या सर्व साप्ताहिकांचा, मासिकांचा जन्म झाला आहे. पण साप्ताहिकातून एखाद्या संघटनेचा/पक्षाचा जन्म होतो, याचे एकमेव उदाहरण हे ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे आहे. देशातील हे बहुधा एकमेव उदाहरण असावे. थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी १३ ऑगस्ट १९६० रोजी प्रामुख्याने व्यंगचित्रांचा समावेश असलेले ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. पुढे ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांनी, लेखांनी आणि अग्रलेखांनी एक क्रांती केली आणि इतिहास घडवला. बाळासाहेबांच्या कुंचल्याने आणि लेखनाने मुंबईतील मराठी माणसांवरील होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले. झोपी गेलेला मराठी माणूस […] - [कर्म मराठी, धर्म मराठी!](https://emarmik.com/16-8-2025-marmabhed-lekh/): गेला आठवडा देशभरात ‘साप्ताहिक मार्मिक’च्या एका अलीकडच्याच मुखपृष्ठाने गाजवला. त्याचा विषय होते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘माय फ्रेंड डोलांड’! या गृहस्थांनी भारतावर कसला राग काढायला घेतला आहे, कोण जाणे! त्यांच्या याआधीच्या निवडणुकीत, तेही मुस्लिमांचा द्वेष करतात म्हणजे ते ‘आपले’ आहेत, असा र्‍हस्वदृष्टीचा, कोता विचार मोदी यांनी केला होता. सगळे राजनैतिक संकेत बाजूला ठेवून, भारताचे १०० कोटी रुपये पाण्यात घालून मोदींनी त्यांचा उघड प्रचार केला होता. त्याचा भारताला तेव्हा काही खास फायदा झाला नाही. दुसर्‍या सत्ताकाळात तर ट्रम्प यांनी भारताचा पाणउतारा करण्याचा एककलमी कार्यक्रमच चालवला आहे. अमेरिकेतल्या भारतीय घुसखोरांना बेड्या घालून पाठवण्यापासून भारतावर जास्तीत जास्त टॅरिफ […] - [नाय, नो, नेव्हर...](https://emarmik.com/09-8-2025-naay-no-never-lekh/): दोन भाऊ एकत्र आले, एकाने दुसर्‍याला वाढदिवसाला विश केले, तेव्हापासून महाराष्ट्रात बरनॉल आणि कैलास जीवन यांचा खप फार वाढला आहे म्हणे! – प्रमोद सावंत, कुर्ला मग बरनॉल आणि कैलास जीवन यांनी सुद्धा कमावायचं नाही का? त्यांचा ‘खप’ वाढला तरी तुम्ही ‘चुप’ रहा ना. की दोन्ही कंपन्यांकडून इलेक्शन फंड उकळण्याची ही आयडिया आहे? की दोन्ही कंपन्या बंद पाडून, त्या नाममात्र दरात आपल्या मुलाच्या नावाने विकत घेण्याचा तुमचा प्लॅन आहे? भावाने भावाला विश केलं म्हणून बरनॉल आणि कैलास जीवनचा खप वाढला असं कोणी म्हणत असेल, तर जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांना विश करत नव्हते, तेव्हा नात्यात कालवल्या जाणार्‍या विषाचा खप फार वाढला होता, […] - [निबर आणि निगरगट्ट](https://emarmik.com/09-8-2025-tokya-tochankar-lekh/): एकनाथ शिंदेंच्या शिंदेसेनेचे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांच्या उन्मत्त माजोरडेपणामुळे हैराण झालेले महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीकेचा मारा होत असूनसुद्धा ते या सार्‍याला खंबीरपणे तोंड देत आहेत हे पाहिल्यावर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला त्यांचं खूप कौतुक वाटतं. तो माझ्याकडे तसं बोलूनही दाखवतो. महायुतीला नेहमीच आपल्या चक्रम वागण्याने बदनाम करण्याचं काम करीत असलेल्या अशा महाभागांमुळे कुठली झक मारली आणि अशा येड्या लोकांचं लोढणं गळ्यात अडकवून घेतलं असं त्यांना वाटत असलं तरी त्यांची खरडपट्टी काढत, त्यांना इशारा, वॉर्निंग देत फडणवीसांची माध्यमांसमोरील बडबड पूर्वीच्याच त्वेषाने अखंड सुरू असते, याचंही पोक्याला आश्चर्य असतं. अशी पात्रं सांभाळताना एखादा मुख्यमंत्री खचून […] - [राशीभविष्य](https://emarmik.com/09-8-2025-bhaskar-acharya-rashi/): ग्रहस्थिती : शुक्र, हर्षल वृषभेत, मंगळ, केतू सिंह राशीत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन, मीन राशीत, गुरु मिथुनेत, रवि, बुध कर्क राशीत, प्लुटो मकरेत. दिनविशेष : ९ ऑगस्ट रक्षाबंधन, १२ ऑगस्ट अंगारक संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९.१३ वा., १४ ऑगस्ट पतेती, १५ ऑगस्ट श्रीकृष्ण जयंती, पारशी नूतनवर्ष, स्वातंत्र्यदिन. – – – मेष : नोकरीत अपमान होईल. व्यवसायात यश मिळेल, पत प्रतिष्ठा वाढेल, आर्थिक बाजू भक्कम राहील. भागीदारीत काळजी घ्या. मित्रांना समजून घ्या. मालमत्तेचे व्यवहार पुढे सरकतील. आरोग्याचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. तरुणांनी नव्या संधी विचारपूर्वक घ्या. नियोजनाने फायदा होईल. विमा सल्लागार, मार्केटिंगमध्ये यशदायी काळ. लेखक, प्रकाशकांना सुखद बातमी कळेल. नव्या गुंतवणुकीतून चांगला […] - [डीपफेक फसवणूक](https://emarmik.com/09-8-2025-sudhir-sable-lekh/): एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे माहिती-तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे. अनेक गोष्टी सोप्या होत आहेत. ही चांगली गोष्ट असली तरी दुसरीकडे या एआयमुळे फसवणूक करण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामध्ये तुमचा फोटो लावून फसवण्याचे प्रकार घडतात. अशा प्रकारापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी आपण काही नियम पाळायला हवेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वासार्ह वाटणारे डीपफेक व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग तयार करण्यासाठी गुन्हेगार एआय अल्गोरिदमचा वापर करतात. अलीकडच्या काळात याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआयचा वापर करून सायबर भामटे विविध प्रकारचे घोटाळे करतात. उदा. आर्थिक फायदा मिळावा म्हणून समोरच्या व्यक्तीची तोतयेगिरी करून फसवणूक करणे, त्याच्याबाबत खोटी माहिती पसरवणे, विशिष्ट कृती करण्यासाठी व्यक्तींना प्रवृत्त करणे, […] - [पावसाळी सूप्स (डंपलिंग सूप्स)](https://emarmik.com/09-8-2025-alpana-khandare-lekh/): सूप म्हटलं की सहसा आपल्याला हिवाळाच आठवतो. पण आपल्याकडे पावसाळ्यात सुद्धा हलकासा गारवा असतोच. शिवाय पावसाळी हवेमुळे थोडाफार सर्दीखोकल्याचा त्रासही बर्‍याचवेळा होत असतो. अशावेळी एखादे गरम सूप प्यावेसे वाटते. सहसा हिवाळ्यात जरा जास्त उष्मांक असलेले घट्ट आणि क्रीमी सूपचे प्रकार कंफर्ट फूड म्हणून खाल्ले जातात, तर पावसाळी हवेत हलके, पातळ आणि आले, लसूण असलेले आणि थोड्याशा आंबुस चवीचे सूप प्यावे वाटते. आपल्याकडे खिचडीबरोबर केले जाणारे पातळ टॉमॅटो सार किंवा दक्षिण भारतातले रसम किंवा पातळ आमट्या हेसुद्धा अशा सूपचेच प्रकार आहेत. पावसाळ्यात भिजून आल्यावर किंवा सर्दी झालेली असताना आले, लसूण आणि मिरे असलेले किंवा भरपूर आले आणि लिंबू घातलेले रसम किंवा […] - [अभिनयाचे ‘वजनदार’ दर्शन!](https://emarmik.com/09-8-2025-sanjay-dahale-lekh/): दोन जिवांचा विवाह हा एकमेकांशी एकनिष्ठ प्रामाणिक राहण्याचा वायदा असतो. हिंदुस्थानी जीवनशैलीत त्याला महत्वाचे स्थान आहे हे खरे, पण तरीही घटस्फोट का होतो? कसा होतो? सुखी संसारात अचानक घटस्फोट कदापि होत नाही आणि हा निर्णयही दोन्ही बाजूंनी तेवढा सहज सोपाही नाही. त्यासाठी काही ठोस कारणे असतात. परपुरुषाचे किंवा परस्त्रीचे आकर्षण वाटले तर दुरावा होतो. अनैतिक संबंधातूनही दोघेजण दूर जातात. मूल होणारच नसेल तर त्यातूनही घटस्फोट होतो. पूर्वी हुंडा आणि आता काही प्रॉपर्टी, पैसे यात अपेक्षाभंग झाला तरी नाती तुटतात. सासू-सुनेचा संघर्षही त्याला कारणीभूत ठरतो. पण एका अजब कारणामुळे घटस्फोट होऊ शकतो. जो बदलत्या लाइफस्टाइलमध्ये काही प्रमाणात सुसंगतही वाटू शकेल. तो […] - [कर भला तो हो भला!](https://emarmik.com/09-8-2025-dasu-bhagat-lekh/): कन्हैय्यालाल यांच्या अनेक भूमिका अगदी त्याच त्या होत्या, तरीही त्यांचे सादरीकरण, संवाद बोली, देहबोली अशी काही असायची की पडद्यावरील त्यांचे प्रसंग कधी कंटाळवाणे वाटत नसत. इतर पात्रांचे संवाद सुरू असताना त्यांच्या प्रतिक्रियाही तितक्याच उस्फूर्त असत. – – – लफंगा, ठग, कंजूष शेट, कठोर सावकार, बदमाश मुनीम, लालची बनिया, चलाख नोकर, बेईमान पोस्टमन, खोटा साक्षीदार, फूट पाडणारा सेक्रेटरी, बायकांवर डोळा ठेवणारा बेरकी, नफेखोर कारखानदार… सामान्यत: एकेकाळच्या भारतीय चित्रपटांतले हे खलनायक. हे नसतील तर नायक झिरो. यांच्यामुळेच प्रेक्षकांच्या मुठी आवळल्या जात, तोंडात अपशब्द येत, हे मार खाऊ लागले की प्रेक्षकांना मनस्वी आनंद होत असे, चित्रपटाच्या शेवटी हे मेले पाहिजेत किंवा जेलमध्ये गेले […] - [आंब्राई](https://emarmik.com/09-8-2025-ambraiii-lekh/): एकनाथ शिंदे कुणाकुणाला किती आवरू एकापेक्षा एक भारी तिकडून शहाजी डोळे वटारती सीएम बघती गंमत सारी दिला सल्ला यांना पोटे फुटेस्तोवर खाऊ नका गरीब बिचार्‍या वंचितांच्या पोटावरती मारू नका सगळे शिव्या देती मनात निमुटपणे राग गिळतो अगदीच ओव्हर झाल्यावरती मुकाटपणे गावी पळतो —– —– —– —– रामदास कदम बार बार देखो गाणे हजारवेळा गायले संकटात शिंदेंशिवाय पाठी कुणी ना राहिले काय सांगू बारची महती सुंदर सुंदर बारबाला नशा चढल्यावरती तुम्ही म्हणाल कलिजा खलास झाला कृपाशीर्वाद शिंदे यांचे राहोत सदा आमच्यापाठी हात धुवून लागू नका सीएम तुम्ही आमच्यापाठी —– —– —– —– देवेंद्र फडणवीस आमचे बघा किती सच्चे सारे धुतल्या तांदळासारखे […] - [शतकमहोत्सवी झेंडूची फुले](https://emarmik.com/09-8-2025-shriram-ranade-lekh/): मराठीत विडंबनकाव्याची पताका रोवणार्‍या ‘झेंडूची फुले’ या आचार्य प्र. के. अत्रे यांच्या कवितासंग्रहाचे हे शतक महोत्सवी वर्ष. लेखक, संपादक, कवी, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, पत्रकार, राजकारणी पुढारी अशी नानाविध क्षेत्रे दणाणून सोडणार्‍या आचार्य अत्रे यांच्या महाप्रचंड व्यक्तिमत्त्वामधली ही मिश्किल बाजू उलगडून दाखवणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात सादर झाला. त्या कार्यक्रमाची ही संपादित संहिता. ‘झेंडूची फुले’ काय होती ते उलगडून सांगणारी. – – – माझी शाळा (कविता) ही आवडते मज मनापासुनी शाळा लाविते लळा ही जसा माउली बाळा हासर्‍या फुलांचा बाग जसा आनंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी हासुनी खेळुनी सांगून सुंदर गोष्टी आम्हास आमुचे गुरुजी शिक्षण देती – केशवकुमार (प्र. के. […] - [सोमीताईचा सल्ला](https://emarmik.com/09-8-2025-prasad-tamhankar-lekh/): सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या! – – – जाहिरात आणि संस्कार प्रश्न : सोशल मीडियावर गेल्या काही काळापासून अनेक जाहिरातींमध्ये लहान मुले आणि संस्कृती यांचा वापर वाढलेला दिसतो. त्याचे कारण काय? उत्तर : खूप वर्षापूर्वी जगातील एका आघाडीच्या कॉफी उत्पादक कंपनीने जपानच्या बाजारपेठेत शिरण्याचा निर्णय घेतला. मात्र या कंपनीला म्हणावा असा प्रतिसाद काही मिळेना. विविध माध्यमाद्वारे जाहिराती करण्यात आल्या, प्रसिद्धीसाठी विशेष मोहिमा आखल्या गेल्या, पण प्रतिसाद काही वाढेना. शेवटी थकलेल्या कंपनीने एका तज्ज्ञ […] - [बाळासाहेबांचे फटकारे...](https://emarmik.com/09-8-2025-balasaheb-fatkaare-lines/): साप्ताहिक मार्मिकच्या स्थापनेपूर्वी बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे अनेक माध्यमांमधून रसिकांसमोर येत असतं. मार्मिक सुरू झाला १९६० साली. मराठी माणसाला त्याच्या राज्याच्या हक्काच्या राजधानीत योग्य स्थान मिळत नाही, हे पाहिल्यावर मराठी माणसाच्या मनात जो असंतोष खदखदू लागला, त्याला मार्मिकमधून वाट मिळू लागली आणि त्या धगधगत्या संतापातून जन्माला आली शिवसेना. मात्र, हे सगळे होण्याच्या किती तरी आधीपासून बाळासाहेबांना मुंबईवर कोणाचा आणि कशासाठी डोळा आहे, हे चांगलेच ठाऊक होते. हे व्यंगचित्र आवाज या विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरचे. तिथेही बाळासाहेबांनी लक्ष्मीमातेकडे ‘बम्बई हातची ज्याऊ देऊ नको’ असं साकडं घालणारा शेठजी दाखवला आहे आणि त्याचं ब्रीदवाक्य आहे सट्टा मेव जयते! आज हे सगळे […] - [संक्रमणानंतरचे ‘शुभ’वर्तमान!](https://emarmik.com/09-8-2025-prashant-keni-lekh/): शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका अतिशय थरारक पद्धतीने २-२ अशी बरोबरीत सोडवली. वेगवान गोलंदाजांना अनुकूल मैदानावरील ही कामगिरी तशी प्रेरणादायीच. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या भाऊगर्दीत कसोटी क्रिकेट अद्याप टिकून आहे, याची ग्वाही देणारी ही मालिका भारतीय क्रिकेटरसिकांसाठी पर्वणीच ठरली. – – – कसोटी क्रिकेट संपत चालले आहे, ही बोंब तशी कायमचीच. विराट कोहली, रोहित शर्मा या तारांकित फलंदाजांच्या निवृत्तीनंतर तर क्रिकेट अभ्यासकांनी ही बोंब आणखी मोठ्याने ठोकली. रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे ही मंडळी भारतीय कसोटी संघापासून दूर ठेवण्यात आली. पण पंचविशीचा संघनायक शुभमन गिल याने नव्या चमूसह इंग्लिश दौर्‍यावर चमत्कार घडवला. खूप कमी वयात मिळालेल्या नेतृत्वाचे ओझे शुभमन […] - [करारा जवाब!](https://emarmik.com/09-8-2025-hrushiraj-shelar-lekh/): दरबार ए आम! गलथान ए हिंद, ब्यादश्या नौरंगजेब मोईद्दीन हातात कागद घेऊन काही पाठ करतोय. मोठमोठ्याने बोलण्यासाठी हिंमत एकवटवतोय. ‘किसी भी मुल्…’ तो बोलण्याचा प्रयत्न करतो. पण बारीक आणि चिरका आवाज निघतो. स्वतःच्याच आवाजाला दचकून तो खुर्ची मागे लपतो. तितक्यात दिवाण ए आममध्ये धिप्पाड वजीर अमानतुल्लाह शामेनी प्रवेश करतो. दिवाण ए आममधील सार्‍या खुर्च्या रिक्त आणि कुणाचाही मागमूस न दिसल्याने वजीर आश्चर्यचकित होतो. खुर्चीमागील नौरंगजेब दिवाण ए आममध्ये आलेल्या त्या भव्य आणि गूढ सावलीने आणखी भितो नि बसल्या (लपल्या?) जागी घट्ट डोळे मिटून अल्लाहतालाचा धावा सुरू करतो. एकाएक खुर्चीमागून पुटपुटण्याचा बारीक लयीचा आवाज जरा पुढील दर पावलागणिक वाढल्यागत वाटल्याने वजीर […] - [होलोकॉस्ट अर्थात ज्यूसंहार](https://emarmik.com/09-8-2025-nilu-damle-lekh/): अ‍ॅडॉल्फ हिटरलनं १.५ कोटी ज्यू मारले. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर होता. निवडणुकीच्या वाटेनं तो हुकूमशहा झाला होता. १९३९ ते १९४४ या सहा वर्षात हा उद्योग हिटलरनं केला. मारले गेलेले ज्यू जर्मनीतले होते, पोलंडमधले होते, युक्रेनमधले होते, ऑस्ट्रियातले होते, झेकोस्लोवाकियातले होते, युरोपीय होते. हिटलरला जर्मनीचा विशाल जर्मनी आणि शुद्ध आर्य जर्मनी करायचा होता. त्यासाठीच त्यानं दुसरं महायुद्ध केलं. पहिलं महायुद्दानंतर जर्मनीची परिस्थिती बिघडत गेली. या बिघाडाला एक मोठ्ठं कारण ज्यू होते असं हिटलरचं म्हणणं होतं. ज्यू हे अशुद्ध लोक असल्यानं ती जमात पृथ्वीवरून नष्ट केली पाहिजे असं हिटलरचं मत होतं. – – – ज्यूंचा संहार आणि दुसरं महायुद्ध या दोन घटनांचा अप्रत्यक्ष […] - [कलंकित नेत्यांची भ्रष्ट महायुती!](https://emarmik.com/09-8-2025-yogendra-thakur-lekh/): महाराष्ट्राच्या सत्ताधारी महायुतीच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी भ्रष्टाचारी, असंवेदनशील कारभारामुळे आणि बेलगाम गैरवर्तनामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला आहे. त्यामुळे गेल्या पासष्ट वर्षात महाराष्ट्राची जेवढी नाचक्की झाली नसेल तेवढी फक्त तीन वर्षात झाल्याचे महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले. ज्या महाराष्ट्राने सुशिक्षित, सुसंस्कृत, संवेदनशील राजकारणाचा आदर्श इतर राज्यांना दाखवला त्याच महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आणि आमदारांनी विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर अश्लाघ्य वर्तन करून, असंवेदनशील वक्तव्य करून आणि गुंडगिरी करून आज महाराष्ट्राला बदनाम केले आहे, कलंकित केले आहे. महाराष्ट्रात पूर्वी ‘वलयांकित’ राजकारणी होते, आता ‘कलंकित’ राजकारण्यांचा भरणा अधिक झालेला आहे. महायुती सरकार अशा कलंकित, भ्रष्टाचारी आणि गुंड प्रवृत्तीच्या आमदारांना, मंत्र्यांना पाठीशी घालत आहे. या असंवेदनशील, कलंकित मंत्र्यांना निलंबित […] - [मैं नेहरू नेहरू चिल्लाऊंगाऽऽ](https://emarmik.com/09-8-2025-prashant-kadam-lekh/): एरवी ज्या भाजपच्या लोकांना इतरांकडे सतत देशभक्तीचे सर्टिफिकेट मागण्याची हौस असते, त्याच भाजपची आज बोलती बंद झाली आणि ओवैसी पाकिस्तानविरोधात प्रखरपणे बोलत आहेत हे एक वेगळंच चित्र यानिमित्ताने पाहायला मिळालं. – – – अखेर देशाच्या संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बहुप्रतीक्षित महाचर्चा पार पडली. खरंतर सुरक्षेच्या दृष्टीनं इतका संवेदनशील विषय म्हटल्यावर त्या चर्चेचा एक दर्जा राखला जाणं अपेक्षित होतं. पण स्वत: सत्तापक्षच जर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठीच या लष्करी कारवाईचा वापर करू पाहत असेल तर दर्जाची अपेक्षा काय ठेवणार? जे कुणी या कारवाईबद्दल तर्कशुद्ध प्रश्न विचारतायत त्यांना पाकिस्तानी ठरवणं, काँग्रेसच्या काळातल्या युद्धांच्या आठवणी काढणं, सगळं खापर देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू […] - [टपल्या आणि टिचक्या](https://emarmik.com/09-8-2025-taplya-tichkya-lekh/): □ गद्दारांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल – पक्ष बदलणार्‍या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत. ■ ते काम आता देशाच्या संसदेत होणार नाही, राज्यांच्या विधिमंडळात होणार नाही आणि निवडणूक आयोगाकडूनही अपेक्षा नाही, हे शिवसेनेतल्या फुटीच्या प्रकरणातून पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आता (तरी) कोरडी खंत व्यक्त न करता पुढाकार घेऊन गद्दारांना धडा शिकवला पाहिजे. □ हिंदुस्थानी अर्थव्यवस्था मेलीये – ट्रम्प यांचा मोदींना धक्का. ■ हेही मोदींचेच भाऊ! अतिरेक आणि अतिशयोक्ती हा दोघांचाही स्थायी भाव. एक सांगणार आम्हीच जगात नंबर वन, तेही खोटं आणि हे बरळतात भारतीय अर्थव्यवस्था मेलीये, तेही खोटं, तिचा गळा या सरकारच्या धोरणांनी पुरता आवळलेला […] - [दिल्लीचे तख्त राखण्याची संधी गडकरींना मिळणार का?](https://emarmik.com/09-8-2025-vikas-zade-lekh/): गडकरी जे बोलतात तसे वागण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना त्यांच्या कामातून, त्यांनी केलेल्या सहकार्यातून हे दिसून येते. विरोधी पक्षातील नेते तर गडकरींवर जाम खूष असतात. शरद पवारांनी गडकरींबाबत गौरवपूर्ण उल्लेख केला. – – – केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी सध्या जोमात आहेत. ते ज्या कार्यक्रमात जातात तिथे माहोल करतात आणि जे काही बोलतात लोक त्याचा थेट अर्थ ‘लेकी बोले सुने लागे’ असा काढतात. गडकरी हे अघळपघळ व्यक्तिमत्व आहे. मनात साचवून ठेवत नाहीत. कोणाची तमाही बाळगत नाहीत. गडकरींच्या याच गोष्टी लोकांना भावतात. महाराष्ट्रातील बहुतांश जनतेला ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही कवीकल्पना वास्तवात उतरवण्याच्या क्षमता गडकरींमध्ये आहे असे वाटते. […] - [नामयाची जनी](https://emarmik.com/09-8-2025-dnyaneshwar-bandgar-lekh/): – ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास। साधुसंता ऐसे केले मज ।।१ ।। संतांचे घरची दासी मी अंकिली। विठोबाने दिली प्रेमकळा ।।२ ।। विदुर सात्विक माझिये कुळीचा। अंगीकार त्याचा केला देवे ।।३ ।। न विचारिता कुळ गणिका उद्धरिली। नामे सरती केली तिही लोका ।।४ ।। ऋषीची कुळे उच्चारिली जेणे। रौरवी तेणे वस्ती केली ।।५ ।। नामयाची जनी भक्तीते सादर। माझे ते साचार विटेवरी ।।६ ।। जनाबाई माऊली या वारकरी संप्रदायातील महान संत. तेराव्या शतकात वारकरी संतांची जी मांदियाळी उदयाला आली होती त्यातील प्रमुख संत म्हणून जनाबाईंचा उल्लेख करावा लागतो. त्या नामदेवांच्या घरच्या दासी होत्या. दासी असूनही त्या […] - [गरीबांच्या शिक्षणासाठी भिक्षांदेही](https://emarmik.com/09-8-2025-sachin-parab-lekh/): फीसाठी दीड रुपया कमी पडला म्हणून मॅट्रिकची परीक्षा देता आली नाही, हे दुःख प्रबोधनकारांना आयुष्यभर टोचत राहिलं. त्यामुळे गरीबांच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या कर्मवीरभाऊराव पाटील यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. त्यांच्या बोर्डिंगमधल्या मुलांना दोन वेळ नियमित जेवता यावं, यासाठी त्यांनी सातार्‍यात भीकही मागितली. – – – कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाहू बोर्डिंगला सरकारी ग्रांट आणि मदत मिळावी, यासाठी प्रबोधनकारांचे प्रयत्न सुरूच होते. प्रबोधनकारांचा कर्मवीरांवर प्रचंड विश्वास होता आणि त्यांच्या कार्यावर प्रचंड जीव होता. त्यांच्याच एका शब्दावर प्रबोधनकार सातार्‍याला आले होते आणि त्यांच्या मैत्रीला जागूनच त्यांनी कफल्लक होऊन सातारा सोडलं होतं. त्यानंतर पुण्याला आल्यावरही प्रबोधनकार कर्मवीरांच्या शाहू बोर्डिंगसाठी झटत होतेच. कारण सातार्‍याला […] - [रडण्यासाठी ‘सैय्यारा’ बघायची गरज काय?](https://emarmik.com/09-8-2025-marmabhed-lekh/): ‘सैय्यारा’ नामक एक प्रेमपट अलीकडे चर्चेत आहे. हा सिनेमा पाहताना तरुण मुलंमुली आणि आपण अजूनही तरुणच आहोत, अशा समजुतीत असलेले काका-काकू धाय मोकलून रडताना दिसतात, काही जण तर भावनावेगाने बेशुद्धही होतात. सोशल मीडियावर अशा भावविव्हळ रुदालींचे रील्स ओसंडून वाहात आहेत… रुदाली प्रथेमध्ये ज्यांच्या मृत्यूनंतर रडायलाही कोणी जवळचं नसतं त्यांच्यासाठी रडायला भाड्याने बायका बोलावल्या जातात. ओळखदेखही नसलेल्या माणसाच्या कलेवरापाशी बसून जणू आपला जिवाचा जिवलगच हरपला आहे अशा पद्धतीने बेभान होऊन रडणं ही एक कलाच आहे. ‘सैय्यारा’ पाहून रडणारे सगळेच काही ‘मोले घातले रडाया’ असे रुदालींसारखे पैशासाठी रडणारे नाहीत. मात्र, ते एका यशस्वी मार्वेâटिंग गिमिकचा बळी ठरलेले असण्याची शक्यता फारच जास्त आहे. […] - [नाय, नो. नेव्हर...](https://emarmik.com/02-8-2025-naay-no-never-lekh/): मांसाहारासाठी निष्पाप जिवांची हत्या केली जाते, म्हणून ज्यांचा जीव कळवळतो, त्यांना त्यांच्या जेवणासाठी निष्पाप भाजीपाल्याचीही हत्याच केली जात असते, त्याचा कळवळा कसा येत नाही? ती पण ‘सोयरी वनचरे’च आहेत ना? – शरद पाटील, कोल्हापूर दुसर्‍याच्या खाली वाकून बघणं खूप सोपं असतं. पण स्वत:च्या खाली वाकून बघणं कठीण असतं. हे वाचायला कसंसंच वाटेल (कळवळावाल्यांना भाषेचाही कळवळा येतो) तरीही ही म्हण आहे आणि हा निसर्गनियमसुद्धा आहे. त्यामुळे हे कळवळावाले त्याप्रमाणे वागतात बिचारे. हे कळवळावाले, दुसर्‍याच्या सणाला कापल्या जाणार्‍या बोकडाबद्दल कळवळतात, पण तुमच्या आमच्या गटारीला कितीही कोंबडे बकरे कापले तरी वळवळतात का? नाही ना. मग हे तुम्ही का विसरता? ते काही बोलले म्हणून […] - [माज आणि माजोर्डे](https://emarmik.com/02-8-2025-tokya-tochankar-lekh/): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांच्या दृष्टीने माजलेले आमदार असा उल्लेख विधानसभेत केल्यानंतर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या इतका खूश झाला की मुख्यमंत्र्यांचे कौतुक कोणत्या शब्दांत करू असा पेच त्याला पडला. सगळे मंत्रीसुद्धा आमदारच असतात. त्यात भानगडबाज मंत्र्यांचा समावेश सरकारात असल्यामुळे ‘ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला’ या म्हणीप्रमाणे खुद्द सरकारलाच कुणी माजलेलं सरकार असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, असा दावा तो करू लागला. त्यावर मी त्याला म्हटलं की, अशा दावे-प्रतिदावे यांच्या मागे न लागता तू खुद्द अशा काही ‘माजलेले’ म्हटलं जाणार्‍या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांची न्याय्य बाजू मांड, म्हणजे त्यांचंही समाधान होईल. पोक्याने ते मनावर घेतलं. […] - [राशीभविष्य](https://emarmik.com/02-8-2025-bhaskar-acharya-rashi/): ग्रहस्थिती : शुक्र, हर्षल वृषभ राशीत, मंगळ, केतु सिंह राशीत, राहू कुंभ राशीत, शनि, नेपच्युन मीन राशीत, गुरु मिथुन राशीत, रवि, बुध कर्क राशीत, प्लुटो मकर राशीत. दिनविशेष : ५ ऑगस्ट पुत्रदा एकादशी, ६ ऑगस्ट प्रदोष, ८ ऑगस्ट नारळी पौर्णिमा. – – – मेष : बोलताना काळजी घ्या. नोकरीत मनाविरुद्ध घटनांचा त्रास होईल. महिलांनी आरोग्य सांभाळावे. तरुणांना नवी ऊर्जा मिळेल. मनातल्या गोष्टी पूर्ण होतील. नवीन घर घेण्याच्या दिशेने पावले पडतील. व्यवसायात अतिविश्वास दाखवू नका. विचार करा. मित्रांशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवा. नव्या व्यवसायाच्या संदर्भात घाई नको. आरोग्याकडे लक्ष द्या. संततीकडून चांगली बातमी कळेल. शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. घरात लहान चुका टाळा. शुभकार्यामुळे वातावरण आनंददायी […] - [खबर्‍यांची अनोखी दुनिया](https://emarmik.com/02-8-2025-rajendra-bhamare-lekh/): – राजेंद्र भामरे बर्‍याच दिवसांपासून मित्रांची मागणी होती की तुम्ही ‘खबरे’ या विषयावर लिहा. कारण तुमच्या तपासकथांमध्ये खबरे डोकावल्याखेरीज राहत नाहीत. आणि हो खरोखरच सामान्य माणसाला, वाचकाला खबरे या विषयाबाबत प्रचंड कुतूहल असते. विशेष करून चित्रपट, टीव्ही सिरीयलमधल्या रहस्यकथांमध्ये अनेकदा खबर्‍यांचा उल्लेख येतो, त्यावर काही प्रकाश टाकावा यासाठी हा लेखप्रपंच. माणूस जसा श्वासाशिवाय जगूच शकत नाही, तसा तपास अधिकारीही खबर्‍याशिवाय तपास लावू शकत नाही. ‘ज्या इसमाकडून तपासकामात मोलाची माहिती मिळते, तो इसम म्हणजे खबर्‍या. आर्य-चाणक्याने सुमारे २६०० वर्षांपूर्वी कौटिलिय अर्थशास्त्र या राज्यशकट चालवण्यासाठी लिहिलेल्या सुप्रसिद्ध ग्रंथात त्याने हेरखाते, गुप्तचर किती महत्वाचे आहे याचा ऊहापोह केलेला आहे. ते कसे नेमावे, नेमताना […] - [करूया सामान्यत्वावर मात, सांगे साखरभात!!](https://emarmik.com/02-8-2025-vaibhav-bhalde-lekh/): श्री रामकृष्ण मठातील उत्सवातील एक प्रसंग आठवतोय. सगळा केवळ आनंदोत्सव असतो हा एकूणच, वर मंदिरात पूजेची धामधूम असते तर आमच्याकडे पाककौशल्य पणाला लागते. मंदिराच्या तळघरात असलेल्या स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणे अन्नभोग बनविणारे आम्ही यादीनुसार एकेक पदार्थ बनवित होतो. ऐन धावपळीची वेळ थोडी पुढे सरकलेली, बाकी बहुतेक पदार्थ बनवून झालेले. म्हणून काही खास पदार्थ आम्ही विशेष निगुतीने बनवत होतो. तेवढ्यात वर सेवा देणारे एक ज्येष्ठ स्वयंसेवक मुद्दाम खाली आले आणि म्हणाले, अरे काय घमघमाट पसरलाय सगळीकडे! भाताच्या केशर-वेलदोडामिश्रित वासाने खेचून आणलं बघ म्हणे मला खाली. काहीतरी खास बनवतो आहेस वाटतं नैवेद्यासाठी. म्हटलं काका, साखरभात बनतोय. अर्थात बाकी गडबडीत हा संवाद इथेच थांबला, पण […] - [मेहनतीचे चीज करणारा पिझ्झा](https://emarmik.com/02-8-2025-sandesh-kamerkar-lekh/): मित्रमैत्रिणींचे गेटटुगेदर वा बर्थडे पार्टी असो पिझ्झा हे एक सिंबॉलिक फूड बनलंय. किंबहुना एका मोठ्या पिझ्झामध्ये ४–५ जणांचं पोट भरू शकतं हा विचार लोकांच्या मनात ठसलाय. यामुळे नोकरीऐवजी ब्रँड क्रिएशन, डिजिटल मार्वेâटिंग, क्लाऊड किचन मॅनेजमेंट यांचा अभ्यास केला तर अगदी थोड्या गुंतवणुकीतही या व्यवसायात तुमच्या मेहनतीचे चीज होऊ शकतं. – – – काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. महाराष्ट्रातील एका ग्रामीण शाळेतली पहिली दुसरीतील एक विद्यार्थिनी शिक्षिकेकडे पोळी भाजी आवडत नाही, मला पिझ्झा हवा अशी मागणी त्यात करत होती. थालीपीठ, डोशाला बाजूला सारून गेल्या काही वर्षांत भारतातील आबालवृद्धांनी पिझ्झाला आपलंसं केलं आहे. आज जगभरच्या रेस्टॉरंट्समध्ये, सिनेमा थिएटरांमध्ये, बर्थडे पार्टीत, […] - [फुल्या फुल्या आप्पा](https://emarmik.com/02-8-2025-sarika-kulkarni-lekh/): आप्पांची सगळ्यात मोठी कमाल म्हणजे आप्पा अजिबात शाळा शिकलेले नव्हते. त्यांना अजिबात अक्षरओळख नव्हती. त्यांना आकडे देखील वाचता येत नाहीत. त्यांच्या मोबाईलमध्ये एकही नंबर सेव्ह केलेला नाही. फोन आले की अंदाजाने ते ओळखतात किंवा बघून बघून आकड्यांची चिन्हं त्यांना ठाऊक झाली आहेत. – – – आप्पा नावाच्या असामीशी आमची गाठ अगदी योगायोगानेच पडली होती. आयुष्यात काही माणसे लिहिलेली असतात. कुठून कशी तुमच्या आयुष्याचा भाग होतील काही सांगता येत नाही. त्या माणसाचा आणि आपला पिंड अत्यंत वेगळा असतो. समान म्हणावा असा कुठलाही धागा नसतो. पण तरीही आपण त्या माणसांबरोबर असतो, वेळ घालवतो आणि पुढे ती माणसे विसरताही येणार नाहीत इतकी आपलीशी […] - [माझी ताई... २० लाख मुलींची आई!](https://emarmik.com/02-8-2025-santosh-deshpande-lekh/): जागतिक लोकसंख्या दिनी (वर्ल्ड पॉप्युलेशन डे) म्हणजेच ११ जुलै रोजी १९८१पासून दरवर्षी जागतिक स्तरावरचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अ‍ॅवॉर्ड) दिला जातो. दरवर्षी जगभरातून नामांकने मागवून एका व्यक्तीची आणि एका संस्थेची पुरस्कारासाठी निवड केली जाते. गेल्या चार दशकांत भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उद्योगपती जेआरडी टाटा या दोघांनाच हा पुरस्कार मिळाला होता. हेल्पेज इंडिया या संस्थेलाही या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. त्यानंतर ३० वर्षानंतर सातार्‍याच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्या रूपाने एका मराठी महिलेला २०२५ सालचा पुरस्कार दिला गेला, ही अभिमानास्पद अशीच बाब आहे. वर्षाताईंनी गेली ३५ वर्षे सामाजिक कार्याला वाहून घेतलं आहे. स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात देशभरात मोठा […] - [बाळासाहेबांचे फटकारे...](https://emarmik.com/02-8-2025-balasaheb-fatkaare-lines/): बाळासाहेबांनी १९६६ साली रेखाटलेलं हे मुखपृष्ठ चित्र. हे शिवसेनेच्या स्थापनेचं वर्ष. चित्राच्या खाली शिवसेनेच्या नोंदणीची बातमीही आहे मुखपृष्ठावर. त्यात २५ हजार जणांनी शिवसैनिक म्हणून नाव नोंदवलं आहे आणि नोंदणी अजून सुरू आहे, असं नमूद करण्यात आलेलं आहे. साहजिकच मराठी भूमिपुत्रांची त्यांच्याच राज्यातली अवस्था, हा बाळासाहेबांच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय या मुखपृष्ठावर आलेला आहेच. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणारे स्वातंत्र्यसेनानी आणि त्यांच्या जीवितकाळातील भारतीय जनतेचे निर्विवाद नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हे मुखपृष्ठचित्र आज या सदरात आले आहे, पण त्याचे औचित्य तेवढेच नाही. १९६६ साली मराठी माणसाची जी परिस्थिती होती, ती आजही तशीच आहे. तो आपल्याच राज्यात रस्त्याकडेला फाटक्या […] - [‘रूट’ त्याचा वेगळा!](https://emarmik.com/02-8-2025-prashant-keni-lekh/): जो रूटने एकेक शिखरे सर केली आहेत. आता फक्त कसोटी क्रिकेटमधील माऊंट एव्हरेस्ट त्याला साद घालते आहे. ३४ वर्षांच्या रूटची कारकीर्द ट्वेंटी-२० क्रिकेटच्या भाऊगर्दीत हरवत नाही. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची फलंदाजीची नजाकत ठळकपणे लक्षात राहते, तसेच त्याचे नेतृत्वगुणही लक्षात राहतात. – – – आयपीएल, देशोदेशीच्या लीग आणि द्विराष्ट्रीय मालिका अशी वर्षभराची ट्वेंटी-२० क्रिकेटची रेलचेल जागतिक क्रिकेटमध्ये असतानाही इंग्लंडचा फलंदाज जो रूट याचे वेगळेपण दिमाखात सिद्ध होते. आधुनिक क्रिकेटमधील कसोटी आणि एकदिवसीय प्रकारातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. ट्वेंटी-२० क्रिकेटचे आक्रमण त्याच्या फलंदाजीच्या शैलीत नाही. पण दीर्घकालीन क्रिकेटसाठी आवश्यक असे खास काहीतरी त्याच्याकडे आहे. फलंदाजीचे दर्जेदार तंत्र, अलौकिक सातत्य […] - [मय मेरा बार नहीं दूँगा!](https://emarmik.com/02-8-2025-hrushiraj-shelar-lekh/): सू-संस्कारी, फारदर्शक, स्वछ चिप मिनिष्टर यांच्या मिनिष्टर मंडळातील एक घरबार मिनिष्टर धोकेश छदाम यांच्या दालनाबाहेर काही जण रांगेत बसलेत. आत मध्ये मंद आणि कुंद प्रकाशात कुणी बसलेलं असावं. त्यात दालनाची रचना अशा प्रकारे केली आहे की आतला आवाज जराही बाहेर येऊ नये. बाहेर खुर्चीवर चोरट्या नजरेनं आडदांड माणूस बसलेला. तो क्षणा क्षणाला नुसत्या संशयाने उठून चौफेर नजर टाकतोय. तितक्यात एक रंगाने काळा-सावळा कपाळाला सफेद गंध लावलेला माणूस तिथे येतो. ‘जय महाराष्ट्र!’ सावळा माणूस अदबीने वाकत हात जोडतो. ‘जय गुजरात!’ आडदांड जरासा उद्धटपणे प्रतिसाद देतो. ‘साहेब, इथं बाहेर बसून तुम्ही जय महाराष्ट्र घालत नाहीत? या महाराष्ट्रात…?’ सावळा माणूस आश्चर्याने विचारतो. ‘अबे […] ## Pages - [Contact](https://emarmik.com/contact/): Address Marmik Prabodhan Prakashan Pvt. Ltd. Saamana Bhavan, Prabhadevi, Mumbai – 400025 - [TERMS OF SERVICE](https://emarmik.com/privacy-policy/terms-of-service/): TERMS OF SERVICE OVERVIEW This website is operated by Prabodhan Prakashan Pvt. Ltd Throughout the site, the terms “we”, “us” and “our” refer to Prabodhan Prakashan Pvt. Ltd. Prabodhan Prakashan Pvt. Ltd offers this website, including all information, tools and services available from this site to you, the user, conditioned upon your acceptance of all terms, conditions, policies and notices stated here. By visiting our site and/ or purchasing something from us, you engage in our “Service” and agree to be bound by the following terms and conditions (“Terms of Service”, “Terms”), including those additional terms and conditions and policies referenced […] - [Privacy Policy](https://emarmik.com/privacy-policy/): PRIVACY STATEMENT SECTION 1 – WHAT DO WE DO WITH YOUR INFORMATION? When you purchase something from our store, as part of the buying and selling process, we collect the personal information you give us such as your name, address and email address. When you browse our store, we also automatically receive your computer’s internet protocol (IP) address in order to provide us with information that helps us learn about your browser and operating system. Email marketing (if applicable): With your permission, we may send you emails about our store, new products and other updates. SECTION 2 – CONSENT How […] - [१८ ऑगस्ट २०१३](https://emarmik.com/%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95/%e0%a5%a7%e0%a5%ae-%e0%a4%91%e0%a4%97%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a9/): [dflip id="1130" ][/dflip] - [१४ जुलै २०१३](https://emarmik.com/%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95/%e0%a5%a7%e0%a5%aa-%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%88-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a9/): [dflip id="1133" ][/dflip]   - [उचला कुंचला](https://emarmik.com/%e0%a4%89%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%be/): [vc_row][vc_column][vc_single_image image=”856″ img_size=”large” alignment=”center”][vc_column_text] व्यंगचित्र ऑनलाईन पाठवण्यासाठी  editormarmik@gmail.com वर इमेल करा. [/vc_column_text][/vc_column][/vc_row] - [बाळासाहेबांच्या कुंचल्यातून](https://emarmik.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af/): [vc_row][vc_column][vc_column_text]नमस्कार , या वर्षी मार्मिकने हीरक महोत्सव साजरा केला. मार्मिक म्हणजे शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्याच्या धारधार फटकाऱ्यातून साकारलेली मराठी जनांसाठीची चळवळ. ज्याने पुढे शिवसेना नावाच्या तेजस्वी इतिहासाला जन्म दिला. निद्रिस्त समाजाला जागे करीत बाळासाहेब अन्यायाविरोधात लढण्यासाठी कुंचल्याच्या शस्त्रासह लढते झाले. मार्मिकनेही ६० वर्षांची ही लढाई लढत ‘ एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक’ अशी आपली ओळख कायम ठेवली आहे. मार्मिक हे केवळ एक साप्ताहिक नाही, तर तो बाळासाहेबांचा विचार जागृत ठेवणारे एक व्यासपीठ आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेली व्यंगचित्र कलेची परंपरा आहे. त्याच प्रेरणेतून बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आम्ही मार्मिकला नवीन स्वरूप देत आहोत. मार्मिकला साता-समुद्रापलिकडील मराठी माणसापर्यंत पोहोचवणारे हे सीमोल्लंघन आहे. […] - [मार्मिक परिवार](https://emarmik.com/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0/) - [वर्गणीदार व्हा](https://emarmik.com/subscribe/): [vc_row][vc_column][vc_gallery interval=”3″ images=”3418″ img_size=”full” onclick=””][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”2/3″][vc_single_image image=”19322″ img_size=”full”][/vc_column][vc_column width=”1/3″][vc_empty_space height=”140″][vc_raw_html]JTNDZm9ybSUzRSUzQ3NjcmlwdCUyMHNyYyUzRCUyMmh0dHBzJTNBJTJGJTJGY2hlY2tvdXQucmF6b3JwYXkuY29tJTJGdjElMkZwYXltZW50LWJ1dHRvbi5qcyUyMiUwQWRhdGEtcGF5bWVudF9idXR0b25faWQlM0QlMjJwbF9HUDlNaVpWN1hmZFJrNyUyMiUzRSUyMCUzQyUyRnNjcmlwdCUzRSUyMCUzQyUyRmZvcm0lM0U=[/vc_raw_html][/vc_column][/vc_row] - [जुने अंक](https://emarmik.com/%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95/): [vc_row][vc_column width=”1/2″][vc_column_text]http://emarmik.com/%e0%a5%a7%e0%a5%a6-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a9/[/vc_column_text][vc_column_text]http://emarmik.com/%e0%a5%a7%e0%a5%a8-%e0%a4%ae%e0%a5%87-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a9/[/vc_column_text][vc_column_text]http://emarmik.com/%e0%a5%af-%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a9/[/vc_column_text][vc_column_text]http://emarmik.com/%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95/%e0%a5%a7%e0%a5%aa-%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%88-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a9/[/vc_column_text][vc_column_text]http://emarmik.com/%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95/%e0%a5%a7%e0%a5%ae-%e0%a4%91%e0%a4%97%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a9/[/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/2″][vc_column_text]http://emarmik.com/५-मे-२०१३/[/vc_column_text][vc_column_text]http://emarmik.com/२-जून-२०१३/[/vc_column_text][vc_column_text]http://emarmik.com/%e0%a5%ad-%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%88-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a9/[/vc_column_text][vc_column_text]http://emarmik.com/४-ऑगस्ट-२०१३/[/vc_column_text][/vc_column][/vc_row] - [मार्मिकची वाटचाल](https://emarmik.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95/) - [मार्मिक विषयी](https://emarmik.com/about/): [vc_row][vc_column][vc_column_text]नमस्कार , सस्नेह जय महाराष्ट्र या वर्षी मार्मिकने हीरक महोत्सव साजरा केला. मार्मिक म्हणजे शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्याच्या धारधार फटकाऱ्यातून साकारलेली मराठी जनांसाठीची चळवळ. ज्याने पुढे शिवसेना नावाच्या तेजस्वी इतिहासाला जन्म दिला. निद्रिस्त समाजाला जागे करीत बाळासाहेब अन्यायाविरोधात लढण्यासाठी कुंचल्याच्या शस्त्रासह लढते झाले. मार्मिकने ६० वर्षांची ही लढाई लढत ‘ एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक’ अशी आपली ओळख कायम ठेवली आहे. मार्मिक हे केवळ एक साप्ताहिक नाही, तर तो बाळासाहेबांचा विचार जागृत ठेवणारे एक व्यासपीठ आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेली व्यंगचित्र कलेची परंपरा आहे. त्याच प्रेरणेतून बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आम्ही मार्मिकला नवीन स्वरूप देण्यासाठी सज्ज झालो आहोत. बाळासाहेबांचा आशीर्वाद सदैव […] - [मुख्य पृष्ठ](https://emarmik.com/): [vc_row][vc_column width=”2/3″][jnews_element_newsticker compatible_column_notice=”” newsticker_icon=”fab fa-accessible-icon” number_post=”5″ post_offset=”0″][jnews_slider_1 compatible_column_notice=”” number_post=”12″ post_offset=”0″ unique_content=”unique1″ include_category=”63″][/vc_column][vc_column width=”1/3″][vc_single_image image=”19229″ img_size=”full” onclick=”custom_link” img_link_target=”_blank” css_animation=”slideInRight” link=”http://emarmik.com/subscribe/”][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”2/3″][jnews_block_3 compatible_column_notice=”” content_type=”post” number_post=”2″ post_offset=”0″ include_category=”63″ sort_by=”oldest” excerpt_length=”20″][/jnews_block_3][jnews_block_9 compatible_column_notice=”” number_post=”4″ post_offset=”0″ include_category=”12″ first_title=”भाष्य”][jnews_block_21 compatible_column_notice=”” number_post=”4″ post_offset=”0″ include_category=”17″ first_title=”मनोरंजन”][jnews_block_15 compatible_column_notice=”” content_type=”post” number_post=”4″ post_offset=”0″ unique_content=”unique1″ include_category=”1″ first_title=”इतर”][jnews_block_5 compatible_column_notice=”” number_post=”3″ post_offset=”0″ include_category=”12″ excerpt_length=”20″ column_width=”8″ first_title=”भाष्य”][/jnews_block_5][/vc_column][vc_column width=”1/3″][vc_video link=”https://www.youtube.com/watch?v=ycHxe65ddHk”][vc_widget_sidebar sidebar_id=”home-loop”][jnews_block_5 compatible_column_notice=”” header_type=”heading_5″ number_post=”1″ post_offset=”0″ unique_content=”unique1″ include_category=”45″ excerpt_length=”20″][/jnews_block_5][jnews_block_22 compatible_column_notice=”” number_post=”3″ post_offset=”0″ unique_content=”unique1″ exclude_category=”86″ pagination_mode=”loadmore” pagination_number_post=”3″][jnews_block_19 compatible_column_notice=”” header_filter_category=”2″ number_post=”6″ post_offset=”0″ unique_content=”unique2″ exclude_category=”86″ first_title=”लोकप्रिय”][/vc_column][/vc_row][vc_row full_width=”stretch_row” css=”.vc_custom_1483584986908{margin-bottom: 40px !important;padding-top: 40px !important;background-color: #212121 !important;}”][vc_column][jnews_hero_2 compatible_column_notice=”” hero_margin=”2″ content_filter_number_alert=”” post_offset=”0″ hero_slider_delay=”3000″ hero_slider_item=”3″ hero_slider_enable=”true” hero_slider_auto_play=”true”][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”2/3″][jnews_block_2 compatible_column_notice=”” number_post=”5″ post_offset=”0″ include_category=”67″ excerpt_length=”20″ pagination_mode=”loadmore” pagination_number_post=”4″ first_title=”घडामोडी”][/vc_column][vc_column […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)